कच्चं दूध हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर समजले जाते. तसंच तर कच्च्या दुधाचे बरेच फायदे आहेत. मात्र, आपली त्वचा अधिक तजेलदार करण्यासाठी कच्चे दूध (raw milk for skin) अधिक फायदेशीर ठरते. कच्चे दूध हे चेहऱ्याची नैसर्गिक चमक तशीच राखण्यास मदत करते. कच्च्या दुधात आढळणारे तत्व त्वचा अधिक तजेलदार बनविण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. तसंच चेहऱ्यावर डाग, सुरकुत्या काढण्यासाठी आणि त्वचा अधिक तरूण दिसण्यासाठी कच्चे दूध खूपच फायदेशीर ठरते. तुम्हालाही मुलायम आणि डागविरहित त्वचा हवी असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी कच्च्या दुधाचा वापर करू शकता. कच्च्या दुधाचा तुम्ही वापर तर कराच. पण त्याचबरोबर तुम्हाला नेहमी त्वचा तजेलदार हवी असेल तर तुम्ही कच्च्या दुधामध्ये अधिक दोन पदार्थांचा वापर करू शकता. त्याबद्दलच आपण या लेखातून पाहणार आहोत. तुम्हाला जर डागविरहित त्वचा हवी असेल तर कच्चं दूध हा नैसर्गिक उपाय आहे. यामध्ये अँटिएजिंग गुण आढळतात.
उडीद डाळीचे 5 फेसपॅक, तुमची त्वचा बनवतील अधिक चमकदार
कच्चे दूध कसे आहे त्वचेसाठी फायदेशीर (How is raw milk beneficial for skin)
Shutterstock
कच्च्या दुधाचे त्वचेसाठी काही महत्त्वाचे फायदे आहेत ते नक्की काय आहेत ते पाहूया. त्याशिवाय कच्च्या दुधात दोन पदार्थ तुम्ही वापरलेत तर तुमच्या त्वचेसाठी अधिक फायदा होतो.
- त्वचा चमकदार होण्यासाठी
- त्वचेला करते नैसर्गिकरित्या मॉईस्चराईज्ड
- मुरूमांपासून करते बचाव
- त्वचा अधिक मऊ आणि मुलायम बनवते
- त्वचेवरून डाग आणि मुरूमं दूर करून त्वचा अधिक तजेलदार बनवते
- त्वचेच्या समस्यांसाठी अधिक फायदेशीर
गव्हाच्या पिठाच्या या तीन फेसपॅकमुळे त्वचा होईल अधिक चमकदार
कच्च्या दुधात मिसळा हे दोन पदार्थ आणि मिळवा अधिक तजेलदार त्वचा
1. पपई आणि कच्चे दूध
Shutterstock
दुधामध्ये पपई मिक्स करून त्वचेला नियमित लावल्यास त्वचा अधिक निरोगी आणि तजेलदार होते. पपईमध्ये एका प्रकारचे एंजाईम असते, जे डेड स्किन काढून टाकून चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास फायदेशीर ठरते. चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग असतील तर पपईचा गर काढून त्यात कच्चे दूध नीट मिक्स करा आणि व्यवस्थित फेटून घ्या. ही पेस्ट तुम्ही चेहऱ्याला लावा आणि साधारण 10 मिनिट्स तुम्ही चेहऱ्यावर तशीच राहू द्या. जेव्हा ही पेस्ट सुकेल तेव्हा चेहरा थंड पाण्याने धुवा. त्वचेची समस्या असेल आणि ज्यांना चेहऱ्यावर अधिक सुरकुत्या येत असतील त्यांनी पपई आणि कच्च्या दुधाचे हे मिश्रण नियमित वापरायला हवे. कच्च्या दुधामध्ये अँटिएजिंग तत्व असल्याने सुरकुत्या असणाऱ्यांना याचा फायदा मिळतो आणि त्चचा अधिक तरूण दिसू लागते. तसंच त्वचा अधिक तजेलदार दिसते आणि सुरकुत्या निघून जाण्यासही मदत मिळते.
चमकदार त्वचा हवी असल्यास करा घरगुती फेसपॅकचा (Homemade Facepack) वापर
2. मध आणि कच्चे दूध
Shutterstock
मध आणि कच्चे दूध हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या त्वचेसाठीही अत्यंत उपयुक्त ठरते. या दोन्हीचे मिश्रण त्वचेवर साचलेली धूळ, घाण स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरते. कच्च्या दुधामध्ये तुम्ही एक लहान चमचा मध मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. साधारण 10-15 मिनिट्स तसंच ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि असे नियमित केल्यास, तुम्हाला स्वतःला त्याचा योग्य परिणाम दिसून येईल. मध आणि कच्च्या दुधाचे हे मिश्रण तुमचा चेहरा अधिक मऊ आणि मुलायम बनवून तुमची त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार नैसर्गिकरित्या राखण्यास मदत करते.