ADVERTISEMENT
home / xSEO
बाळ रडण्याची कारणे आणि उपाय | Reasons Why Your Baby Is Crying In Marathi

बाळ रडण्याची कारणे आणि उपाय | Reasons Why Your Baby Is Crying In Marathi

घरात बाळाचे आगमन म्हणजे घरातत अगदी आनंदी आनंद असतो. बाळाच्या संगोपनात सारं कुटुंब कधी व्यस्त होतं आपलं आपल्याच समजत नाही. मात्र लहान बाळाचे संगोपन ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. बाळ लहान असल्यामुळे ते कोणाशी संवाद साधू शकत नाही. अशा वेळी व्यक्त होण्याचे त्याच्याकडे असलेले एकमेव साधन म्हणजे रडणे. लहान बाळाचे रडणे तुम्हाला  अनेक गोष्टी सांगत असते. यासाठी लहान बाळ रडण्याची कारणे तुम्हाला नक्कीच माहीत असायला हवी. बाळ रात्री का रडते हे लक्षात आलं की त्याला शांत करणं तितकंच सोपं जातं. कारण अशा अनेक गोष्टी असतात ज्या व्यस्त करण्यासाठी बाळाजवळ रडण्याशिवाय पर्यायच नसतो.म्हणूनच त्याचे रडणे समजून घेणे हे त्याच्याशी संवाद साधण्याचा आणि बॉन्ड निर्माण करण्याचा सोपा मार्ग ठरते.  

लहान बाळ रडण्याची कारणे – Causes Of Baby Crying In Marathi

लहान बाळ रडण्याची कारणे
लहान बाळ रडण्याची कारणे

बाळ रडण्याची कारणे खरंतर अनेक असतात. मात्र अचानक हसता हसता अथवा खेळताना बाळ रडू लागते. अशा वेळी त्याला शांत करण्यासाठी आधी त्याच्या रडण्याचं कारण तुम्हाला कळायला हवं.

भुक लागणे हे बाळ रडण्याचे कारण असू शकते

बाळ रडण्यामागचं महत्त्वाचं  कारण बाळाला भुक लागणे हे असू शकतं. बाळ मोठ्या माणसांसारखे जड अन्नपदार्थ खात नाही. त्यामुळे त्याला आपल्या वेळेनुसार भुक लागू शकत नाही. आईचे दूध पचवण्यासाठी बाळाला एक ठराविक वेळ लागतो आणि ते पचल्यावर पुन्हा भुक लागते. साधारणपणे बाळाला सुरुवातीच्या काळात दर दोन तासानंतर दूध देण्याचा सल्ला दिला जातो. कारण बाळाची दूध पिण्याची क्षमता आणि पचवण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे जर तुमचे बाळ अचानक रडायला लागले तर त्याला भुक लागली असेल हे ओळखा आणि त्याला शांत करण्यासाठी त्याला स्तनपान द्या.

दूध न पचल्यास सुद्धा बाळ रडू शकते

बाळाचे पोट भरले याचा संकेत त्याने ढेकर दिल्यानंतर येतो. कारण बाळ तोंडाने काही बोलू शकत नाही. यासाठी दूध पाजल्यावर बाळाला खांद्यावर घेऊन ढेकर काढण्याची पद्धत आहे. बाळ सतत झोपून असल्यामुळे प्यायलेले दूध व्यवस्थित पचण्यासाठी बाळाला खांद्यावर घेत त्याचा ढेकर काढणं गरजेचं असतं. मात्र हे करण्यासाठी तज्ञ्जांची मदत घ्यावी कारण चुकीच्या पद्धतीने बाळाला उचलले तर उलटी आल्याने प्यायलेले दूध बाहेर पडू शकते. ढेकर न दिल्यास बाळाला अस्वस्थ वाटते आणि ते रडू लागते. 

ADVERTISEMENT

पोट दुखणे हे बाळ रडण्यामागे एक सामान्य कारण आहे

बाळ सहा महिन्याचे होई पर्यंत बाळ फक्त आईच्या  दुधावर त्याचा आहार असतो.  ज्यामुळे आई जे खाणार त्याचा परिणाम बाळाच्या शरीरावर होत असतो. जर या काळात आईने चुकीचे पदार्थ खाल्ले तर बाळाला गॅस आणि अपचन होण्याची शक्यता  जास्त असते. यासाठीच बाळंतणीसाठी खास आहार आपल्याकडे दिला जातो जेणे करून बाळाला आईच्या स्तनपानातून योग्य आहार मिळावा. मात्र जर चुकून आईने एखादा अयोग्य पदार्थ खाल्ला तर त्यामुळे बाळाच्या पचनशक्तीवर परिणाम होतो.  अशावेळी बाळ पोटात दुखू लागल्यामुळे रडू लागते. हा संकेत आई फक्त तिने दिवसभरात काय खाल्ले यावरून समजू शकते. यासाठी बाळ अस्वस्थ असेल तर बाळाच्या डॉक्टरांचा आणि घरातील थोरामोठ्यांचा सल्ला घ्या आणि त्यावर लगेच उपचार करा.

अपुरी झोप झाल्याने सुद्धा बाळ रडते

बाळाच्या योग्य वाढ आणि विकासासाठी बाळाला पुरेशी झोप मिळणं गरजेचं असतं. जेवढा वेळ बाळ झोपेल तितकं त्याला चांगला आराम मिळतो आणि त्याची वाढ योग्य पद्धतीने होते. मात्र बाळाचं आगमन हे संपूर्ण कुटुंब आणि इतर मित्र परिवारासाठी आनंदाची गोष्ट असते. त्यामुळे प्रत्येकाला बाळाला खेळवायचं असतं. अशा वेळी जर बाळ जास्त वेळ जागं राहिलं अथवा अंगाखाद्यावर खेळत राहिलं तर त्याची झोप कमी होते. बाळाची झोप अपुरी असेल तर ते थकल्यामुळे चिडचिड करतं अथवा रडू लागतं. यासाठी बाळाला जास्तीत जास्त झोप मिळेल याची काळजी घ्यावी. 

बाळाला दात येत असतील तर बाळाला त्रास होऊन ते रडते

बाळ जसं जसं मोठं होत जातं तस तसं त्याच्या शरीराचा विकास होत जातो. बाळाला सहा महिन्यानंतर दात येतात. अशा वेळी बाळाला दात येताना हिरड्यांमध्ये त्याला अस्वस्थता जाणवते. बऱ्याचदा बाळाला दात येण्याच्या काळात जुलाब होतात. शरीरात होणारे बदल सहन होत नसल्यामुळे या काळात बाळ चिडचिड करतं. व्यक्त होण्यासाठीसाठी त्याच्याकडे रडणं हे एकच साधन असल्यामुळे ते रडून त्याला होत असलेला त्रास तुमच्याकडे सांगत असतं. 

बाळ रात्री का रडते – Bal Ratri Ka Radte Marathi

बाळ रात्री का रडते
बाळ रात्री का रडते

बाळाचे संवाद साधण्याचे माध्यम हे रडणे असल्यामुळे ते नेहमी रडूनच व्यक्त होत असते. बऱ्याचदा नवमातेला प्रश्न पडतो की बाळ रात्री का रडते. वास्तविक बाळ झोपेत रडणे यामागे त्याला भुक लागण्यासोबत आणखी अनेक कारणे असतात.

ADVERTISEMENT

शी-शू करणे –

बाळ दर दोन तासांनी दूध पित असते. त्यानुसार त्याची पचनशक्ती विकसित होत जाते. त्यामुळे जर दोन तासांनी त्याला शू अथवा शी होत असते. रात्री बाळ रडण्यामागे त्याने शू अथवा शी करणे हेच मुख्य कारण असते. कारण जरी तुम्ही बाळाला डायपर घातलेले असलं तरी शू अथवा शी केल्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागतं आणि त्याची झोपमोड होते. अशा वेळी त्याला स्वच्छ करणं त्याचे कपडे बदलणं अपेक्षित असतं. मात्र ही गोष्ट सांगण्यासाठी बाळ रात्री रडून व्यक्त होतं.

आईची ऊब हवी असते –

बाळ नऊ महिने आईच्या गर्भात वाढलेलं असतं. जन्माला आल्यानंतर त्याला बाहेरील वातावरणात जमवून घेण्यास थोडा वेळ लागतो. आईच्या गर्भात त्याला जी ऊब मिळते तितक्याच तापमानाची ऊब त्याला बाहेरील वातावरणात हवी असते. मात्र अति थंडी अथवा अति उष्णतेच्या काळात जन्माला आल्यामुळे त्याला बाहेरील वातावरणाशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागतो. अशा वेळी बाळ वातावरणातील बदल सहन होत नसल्यामुळे रडू लागतं. आईने जवळ घेताच त्याला पुन्हा हवी तशी ऊब मिळते आणि ते शांत होतं.

बाळाची जन्माची वेळ –

बाळ जन्माला आलेल्या वेळी काही महिने जागे राहू शकते. कारण त्याच्या शरीराला झोपेचं नैसर्गिक चक्र समजून घेण्यास वेळ लागतो. जर बाळ रात्रीच्या वेळी जन्माला आलं असेल तर ते तीन ते चार महिने रात्री जागं राहतं आणि त्याला भूक लागल्यास रडू लागतं. नैसर्गिक चक्रानुसार रात्रीच्या वेळी झाेपणं आणि दिवसा खेळणं हा दिनक्रम सुरू होण्यास बाळाला काही महिने द्यावे लागतात. त्यामुळे नवमातांना अशा वेळी रात्रीच्या वेळी बाळासाठी जागं राहणं क्रमप्राप्त असतं.

आजारपण –

लहान बाळाला बाहेरील वातावरण, आहारात होत असलेले बदल यामुळे छोट्या मोठ्या आजारपणाचा त्रास होतो. सर्दी अथवा ताप येणं हे या काळात नैसर्गिक आहे. मात्र यावर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बाळाला ताप येत असेल अथवा सर्दी झालेली असेल तर त्याला रात्री शांत झोप लागत नाही. अशा वेळी बाळ झोप येत नसल्यामुळे रडू शकतं. मात्र जर बाळाच्या आईने योग्य काळजी घेतली तर या काळातही योग्य उपचार करून बाळाला शांत झोपवणं शक्य असतं.

ADVERTISEMENT

उचलून घेण्यासाठी –

बाळाला जर सतत कोणीतरी मांडीवर अथवा जवळ घेत असेल तर त्याला सतत उचलून घेण्याची सवय लागते. अशा वेळी बाळ दिवसा जास्त काळ बेडवर अथवा पाळण्यात ठेवलं जात नाही. बाळाला उचलून घेण्यासाठी दिवसभरात अनेक लोक असतात. मात्र त्यानंतर बाळाला याची सवय लागते. रात्री मात्र बाळाला तुम्ही बेड अथवा पाळण्यात झोपवण्याचा प्रयत्न करता. बाळाला तसं नको असतं म्हणून ते रडू लागतं. अशा वेळी बाळाला आईच्या हाताचा पाळणा हवा असतो. उचलून घेतल्यावर ते पुन्हा शांत झोपतं. 

बाळ रात्री रडत असल्यास काय करावे ? – Bal Ratri Radat Aslyas Kay Karave?

बाळ रात्री रडत असल्यास काय करावे ?
बाळ रात्री रडत असल्यास काय करावे ?

बाळाला शांत करण्यासाठी आधी तुम्हाला बाळ का रडत आहे याचं कारण समजून घ्यायला हवं. ज्यामुळे तुम्हाला त्याला काय हवं ते पटकन समजतं आणि ते केल्यावर बाळ शांत होतं. यासाठी प्रत्येक मातापित्याला बाळाचं रडणं समजून घेता यायलाच हवं. बाळ शांत करण्यासाठी तुम्ही या गोष्टींचा वापर करू शकता. 

बाळाला नीट गुंडाळून ठेवा –

बाळाने शांत झोपायला हवं असेल तर बाळाला दुपट्यात गुंडाळून झोपण्याची सवय लावा. कारण आईच्या साडीच्या अथवा मऊ कापड्याच्या दुपट्यात गुंडाळून ठेवल्यामुळे त्याला आईच्या अंगाची ऊब मिळाल्यासारखं वाटतं. सुरक्षित भावना निर्माण झाल्यामुळे ते पटकन झोपतं. मात्र असं करताना लक्षात ठेवा बाळाला खूप घट्ट बांधून ठेवू नका. त्याला योग्य हालचाल करता येईल इतपत घट्ट गुंडाळून ठेवणं गरजेचं आहे. तसंच त्याचे हात, पाय आणि कंबरेखालील भागच फक्त गुंडाळून ठेवा. तोंडावर अथवा मानेकडे गुंडाळलं जाणार नाही याची काळजी घ्या. 

ढेकर काढण्याचे तंत्र शिकून घ्या –

बाळाला दूध पाजल्यावर ढेकर काढा. बाळाला ढेकर काढला की त्याच्या पोटात गेलेल्या दुधाचे योग्य पचन होते. यासाठी बाळाला दूध पाजल्यानंतर योग्य पद्धतीने खाद्यांवर उपडी ठेवा. पाठीवरून अलगद हात फिरवत त्याला ढेकर काढण्यासाठी मदत करा. असं केल्यानंतर तुमचं बाळ मुळीच रडत नाही.

ADVERTISEMENT

बाळाशी संवाद साधा –

बाळाला शांत करण्यासाठी त्याच्याशी बोलणं हा एक सोपा मार्ग असतो. कारण बाळ जेव्हा गर्भात असतं तेव्हा ते सतत आजूबाजूला आवाज ऐकत असतं. मात्र बाळ घरी आल्यावर त्याला त्रास होऊ नये यासाठी तुम्ही त्याला शांत खोलीत ठेवता. अशा वेळी बाळाला कोणताच आवाज ऐकू येत नाही आणि त्याला अस्वस्थ वाटतं आणि रडतं. म्हणूनच आईने बाळाशी संवाद साधला की ते हसू लागतं.

बाळाला दूध पाजा –

बाळ शांत करण्याचं हे एक उत्तम तंत्र आहे. तुम्ही बाळाला स्तनपान करत नसाल तर त्याला दुधाच्या बाटलीने दूध द्या. कारण त्याच्या रडण्यामागे त्याला भुक लागली आहे हे एक कारण असू शकतं. पण जरी त्याला भुक नसेल लागली तरी स्तनपानाच्या निमित्ताने ते तुमच्या जवळ येतं. बाळाला सुरक्षित वाटलं की त्याचं रडणं आपोआप कमी होतं. यासोबतच वाचा  बाळासाठी दूध येण्यासाठी उपाय | Balala Dudh Yenyasathi Upay Marathi

बाळाचे पोट तपासा –

बाळाला अपचन झाले असेल तर पोटात दुखत असल्यामुळे बाळ रडू लागते. अशा वेळी बाळाचे पोट नीट तपासून पाहा. जर बाळाला भुक लागली असेल तर त्याचे पोट हलके असेल तर पण जर बाळाला दूध नीट पचले नसेल तर बाळाचे पोट फुगते आणि मोठे होते. अशा वेळी गॅस झाल्यामुळे ते रडू शकते. अशा वेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचे आहे. यासाठी वाचा बाळाचे पोट साफ होण्यासाठी उपाय | Balachi Shi Honyasathi Upay

बाळ रात्री झोपेत रडत असल्यास काय करावे? –

बाळ रात्री झोपेत रडत असल्यास काय करावे?
बाळ रात्री झोपेत रडत असल्यास काय करावे?

लहान बाळ का रडते या मागचं कारण एकदा तुम्हाला समजलं की बाळाला रात्री झोपेत रडत असताना शांत करणं सोपं जातं.

ADVERTISEMENT
  • सर्वात आधी बाळाला जवळ घ्या त्याला तुमच्या अंगाची ऊब मिळाली की ते शांत होतं
  • बाळाला भुक लागली असेल तर लगेच त्याला स्तनपान द्या ज्यामुळे ते शांत होतं
  • बाळाने शू अथवा शी केली असेल तर त्याचा डायपर आणि कपडे बदला ज्यामुळे त्याला आराम मिळतो.
  • बाळाला ताप आला असेल अथवा पोट दुखत असेल तर डॉक्टरांच्या सल्लानुसार त्याला योग्य ते औषध द्या ज्यामुळे त्याला आराम मिळेल आणि रडणे कमी होईल
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक आई म्हणून नेहमी खंबीर राहा. बाळाच्या आजारपणात तुम्हाला स्वतःला धीराने वागावे लागेल. 
  • बाळ रात्री झोपत नसेल तर त्याच्या सोबत तुमचे जागरण होते, यासाठी बाळ जेव्हा दिवसा झोपते तेव्हा तुम्ही बाळासोबत झोप घ्या.
  • वर्किंग वुमन असाल तर बाळाला रात्री सांभाळण्याची जबाबदारी बाळाचे बाबा, आजी-आजोबा, मदतनीस यांच्यासोबत वाटून घ्या ज्यामुळे तुमची चीडचीड होणार नाही.

बाळ शी करताना का रडते आणि त्यासाठी काय करावे?

बाळ शी करताना का रडते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे कारण असे की  त्याला शू अथवा शीमुळे होणारा ओलावा अथवा चिकटपणा आवडत नाही. मात्र त्याला ते सांगता येत नाही म्हणून ते रडू लागते. अशा वेळी बाळाला लगेच स्वच्छ करणं आणि त्याचे कपडे बदलणं गरजेचं असतं. बाळ सुरुवातीच्या काळात दर दोन तासांनी दूध पित असल्यामुळे त्याचे शू आणि शी करण्याचे प्रमाण जास्त असते. यासाठी बाळ रडू लागताच सर्वात आधी त्याचे डायपर चेक आणि बदला. शी करताना त्रास झाल्यामुळेही बाळाला रडू येते. यासाठी बाळाचे लक्ष त्यावरून जावे यासाठी बाळाशी संवाद साधा. बाळाला शी पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करा. ज्यामुळे त्याला शी पूर्ण करण्याचा कंटाळा येणार नाही. लगेच स्वच्छ केल्यामुळे ते पुन्हा हसू अथवा खेळू लागेल. यासोबतच वाचा बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय | Babies Diaper Rash Home Remedies In Marathi

बाळ रडण्याची कारणे आणि उपाय आम्ही तुमच्यासोबत शेअर केले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळाचं व्यक्त होण्याचं माध्यम रडणं असल्यामुळे त्याच्या रडण्यातून तुमच्या बाळाची गरज ओळखा आणि त्यानुसार त्याला हवं तसा उपाय करा. ज्यामुळे बाळासोबत तुमचं बॉडिंग चांगलं होईल आणि बाळ प्रत्येक गोष्ट तुम्हाला रडण्यातून सांगू लागेल. 

FAQsबाळ रडण्याची कारणे आणि उपाय

प्रश्न -बाळ कोणत्या वयात जास्त रडते ?

उत्तर – बाळ जन्मानंतर पहिले सहा महिने खूप रडतं. मात्र हळू हळू पुढे आईला बाळाला काय हवं ते समजू लागलं की बाळाचं रडणं देखील कमी कमी होत जातं. सुरूवातीच्या काळात बाळ भुक लागल्यामुळे, शी-शू केल्यामुळे, पोट दुखल्यामुळे अथवा वातावरण सहन न झाल्यामुळे जास्त रडू शकतं.

प्रश्न – बाळ खूप रडलं तर त्याच्या आरोग्यावर याचा काही परिणाम होतो का ?

उत्तर – बाळाच्या रडण्यामागे कोणती आरोग्य समस्या अथवा आजारपण नसेल तर त्याच्या रडण्याचा फार चुकीचा परिणाम होत नाही. पण जर पोट दुखत असल्यामुळे अथवा ताप आल्यामुळे बाळ रडत असेल तर ते रडण्यामुळे जास्त थकतं आणि त्याला जास्त त्रास होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

प्रश्न – बाळाला पटकन शांत कसं करावं ?

उत्तर – बाळाला पटकन शांत करण्याचा सोपा मार्ग म्हणजे आईने बाळाला जवळ घेणं. कारण आईशी बाळाची नाळ जन्माआधीपासून जुळलेली असल्यामुळे आईच्या कुशीत बाळाला सुरक्षित वाटतं आणि ते लगेच शांत होतं. 

प्रश्न – बाळाला पोटात दुखत आहे हे नवमातेने कसं ओळखावं ?

उत्तर – बाळ पोट दुखण्यामुळे अस्वस्थ आहे हे ओळखण्यासाठी त्याचे पोट तपासावे. पोटाचा आकार फुगला असेल, बाळाला भुक नसेल अथवा बाळाने शी केलेली नसेल तर त्याच्या रडण्यामागे पोट दुखणे कारणीभूत असू शकते. 

प्रश्न – बाळ रडणे चिंताजनक कधी असू शकते ?

उत्तर – तुमचे बाळ जर सतत दोन ते तीन तास रडत असेल, दूध पाजून अथवा जवळ घेऊनही ते शांत होत नसेल तर त्याला वैद्यकीय मदतीची गरज असू शकते.

प्रश्न – बाळ दात येत असल्यामुळे रडत आहे कसे ओळखावे ?

उत्तर – बाळाला साधारणपणे सहा महिन्यांनी दात येण्यास सुरूवात होते. अशा वेळी बाळ खूप चिडचिड करते, मिळेल ती गोष्ट चावते. ज्यामुळे त्याला दात येत आहेत हे तुम्हाला समजू शकते.

ADVERTISEMENT

प्रश्न – बाळाच्या पोटातील गॅस कमी करण्यासाठी काय करावे ?

उत्तर – जर तुमचे बाळ पोटात गॅस झाल्यामुळे रडत असेल तर बाळाला खांद्यावर उपडी घ्या आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवा. ज्यामुळे ढेकर येईल आणि गॅस निघून जाईल. नवमातेने ओवा खाऊन बाळाच्या तोंडाजवळ अथवा बेंबीजवळ फुंकर मारल्यास बाळाला अशा वेळी बरे वाटतं. बाळाच्या पोटाला हिंगाचे पाणीदेखील लावून गॅस कमी करता येतो. 

28 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT