ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
दुःखी कोट्स गर्ल मराठी। Sad Quotes In Marathi For Girl

90+ दुःखी कोट्स गर्ल मराठी | Sad Quotes In Marathi For Girl

प्रत्येकाच्याच आयुष्यात उतारचढाव तर येतातच. कधी दुःखाचे ढग दाटून येतात तर कधी सुखाचा वर्षाव होतो. आयुष्य म्हटले की चांगल्यावाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागते.आपले सुख वाटून घ्यायला तर सगळी दुनिया बरोबर असते. पण आपले दुःख वाटून घेणारे लोक फार कमी असतात. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपल्या मनात दुःख साचलेले असते. आपण कोणाच्या वियोगाचे दुःखी असो किंवा एखाद्याने आपले हृदय तोडल्याचे दुःख असतील. काहींना जवळच्याच लोकांकडून इतका त्रास होतो की त्याविषयो कुणाजवळ व्यक्तही होता येत नाही. काहींना कुटुंबाशी संबंधित अशी दु:खं असतात जी वर्षानुवर्षे आपल्या जीवनात असतात. जेव्हा आपण दुखावतो तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो. सगळ्यांकडेच दुःख व्यक्त करण्यासारखी परिस्थिती नसते आणि आपले दुःख कोणी खरंच समजून घेईल अशी माणसेही प्रत्येकाच्या जवळ असतातच असे नाही. मग या भावना व्यक्त करण्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग शोधतो. काही लोक आपल्या भावना शब्दांत व्यक्त करून त्या कागदावर उतरवतात तर काही दु:खातही सूर शोधतात तर काही लोक रंगांतून त्यांचे मन मोकळे करतात. हल्ली आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणखी एक माध्यम आले आहे ते म्हणजे सोशल मीडिया! यावर अनेक लोक आपल्या भावना व्यक्त करत असतात. नाती जेव्हा त्रासदायक ठरतात तेव्हा अनेक लोक मराठी स्टेटस ठेवून भावना व्यक्त करतात. तुमचे दु:ख, तुमची वेदना, तुमचा त्रास शब्दांत मांडण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी दुःखी कोट्स (Sad Quotes In Marathi For Girl) आणले आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या भावना शब्दांत व्यक्त करू शकाल. 

वाचा – दु:खात साथ देतील अशा शायरी

दुःखी कोट्स मुलींसाठी – Sad Quotes In Marathi For Girls

अनेकदा असे होते की आपल्या भावना समजून घेणारे कोणीच नसते. पण एखादा लेख ,कविता वाचली की किंवा एखादे गाणे ऐकले की असे वाटते की हेच ते शब्द आहेत ज्यात आपल्या भावना अगदी परफेक्ट पद्धतीने मांडल्या आहेत. तुमचीही मनस्थिती दुःखी असेल आणि तुम्हालाही मन मोकळे करण्यासाठी शब्द सापडत नसतील तर पुढील कोट्स वाचा. यात भावना व्यक्त करण्यासाठी हमखास उपयोगी पडतील असे व तुम्हाला व्यक्त होण्यासाठी नक्कीच काहीतरी सापडेल. 

दुःखी कोट्स मुलींसाठी । Sad Quotes In Marathi For Girls
दुःखी कोट्स मुलींसाठी

असा एक प्रवास केलाय त्यानंतर पाय नाही तर हृदयच हरून थकून बसलंय…

ADVERTISEMENT

खूपदा तू जवळ नसतानाही तू जवळ असल्याचा भास होतो आणि मग सत्याची जाणीव झाल्यावर मनाला खूप त्रास होतो. 

कागदाचा तो तुकडा आजही मी जपून ठेवलाय… ज्यावर तू मस्करीत लिहिलं होतंस , “माझं तुझ्यावर प्रेम आहे.”

तुझ्या स्वप्नातील ती कदाचित मी नसेन… पण माझ्या श्वासातील तो मात्र तुझ्याशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही. 

तुला शोधायला जाऊ तरी कुठे, तू खूप बदलला आहेस. हरवलेल्या माणसाला शोधता येतं पण बदललेल्या माणसाला कुठून शोधायचं?

ADVERTISEMENT

आता मी ठरवलंय… प्रेम बीम काही करायचे नाही.. आपण प्रेम करतो पण लोक मात्र टाईमपास शोधत असतात, त्यांचा टाईमपास करून झाला की खड्यासारखे बाजूला काढून टाकून देतात. 

विसरशील खास मला, दृष्टीआड होता… पण तुला जेव्हा जेव्हा ठसका लागेल, तेव्हा तुला माझीच आठवण होईल. 

आज मला खूप रडावसं वाटतंय, स्वतःशी खूप भांडावंसं वाटतंय… भरलेल्या डोळ्यांनी आरश्यात बघावंसं वाटतंय आणि आपलं हक्काचं कोणीच नाही म्हणून,स्वतःचेच डोळे पुसावंसं वाटतंय… 

आयुष्यात नेहमी आनंदच मिळेल असे नाही, कधी कधी दुःखही सोसावे लागते, कितीही अहंकारी असाल तरीही, नियतीसमोर मात्र कधी ना कधी झुकावेच लागते…

ADVERTISEMENT

प्रेमात एकदा धोका खाल्ल्यावर पुन्हा प्रेमात पडायची इच्छाच राहिली नाही. आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय कारण आता परत रडायची इच्छा नाही… 

वाचा –  ब्रेकअप स्टेटस मराठी

मुलींसाठी दुःखी स्टेटस – Sad Status For Girls In Marathi

असे कितीतरी वेळा घडते की आपण जीव तोडून समोरच्याला आपल्या मनात काय चालले आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण समोरच्यापर्यंत आपल्या भावना पोचतच नाहीत. समोरचा आपलं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो. आपल्याला गृहीत धरले जाते. पण आता नव्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुम्ही मेसेजच्या किंवा स्टेटसच्या मदतीने तुमच्या भावना समोरच्यापर्यंत पोचवू शकता. तुमच्या प्रेमाच्या माणसाला मराठी प्रेम कविता पाठवू शकता. तुम्हाला खूप राग येत असेल, दुःखी ,हताश वाटत असेल तर पुढील स्टेटस त्या व्यक्तीला पाठवा आणि त्यांना जाणीव करून द्या की त्यांनी तुम्हाला किती दुःख दिले आहे. 

मुलींसाठी दुःखी स्टेटस । Sad Status For Girls In Marathi
मुलींसाठी दुःखी स्टेटस

मला एक सांग, तू माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेत आहेस… की खरंच तुला माझी अजिबात आठवण येत नाही? 

ADVERTISEMENT

तू मला सोडून गेलास तरी मी कोणालाही दोष देऊ शकत नाही. अगदी माझ्या हृदयाला सुद्धा… जे अजूनही तुझ्याच साठी धडधडते आहे… 

हे आयुष्य मी जगले, मी तुझ्या प्रेमात पडले, मी हरले, तू मला नाकारलंस, मी दुखावले, मी तुझ्यावर विश्वास ठेवला, मी चुका केल्या… पण या सगळ्यातून मला एक अनमोल धडा मिळाला की प्रेमात पडणे ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. 

त्याला निघून जायचं होतं… तो मला सोडून निघून गेला… मला गमवायचं होतं, मी गमावलं… फक्त फरक इतकाच की त्याने आयुष्यातले काही क्षण गमावले आणि मी मात्र माझं एका क्षणात सगळं आयुष्य गमावलं… 

आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपली काळजी घेणाऱ्या व्यक्तीला कधीही गमावू नका… एखाद्या दिवशी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल की तारे मोजण्याच्या नादात आपण आपला चंद्र गमावून बसलो आहोत. 

ADVERTISEMENT

माझ्यावर एवढे तरी उपकार करून बघ… माझ्या डोळ्यांतील अश्रूंमधील वेदना ओळखून बघ… 

आयुष्यात जोडलेली नाती अशी पटकन तोडून टाकायची नसतात. एका छोट्याश्या वादळामुळे घरे उध्वस्त होऊ द्यायची नसतात. 

मी फक्त मागितली होती तुझी कायमची साथ… पण तू मात्र लगेच सोडून दिलास हातातला हात… म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे म्हणजे आयुष्यात काहीच उरले नाही… 

माझ्या हृदयात आणि नशिबात फरक इतकाच आहे की जो हृदयात आहे तो नशिबात नाही आणि जो नशिबात आहे तो हृदयात नाही. 

ADVERTISEMENT

तुझ्यासाठी खूप सोपं आहे रे मला विसरून जाणं! पण माझ्यासाठी खूप कठीण आहे तुला विसरून जगणं… 

वाचा – आठवण स्टेटस मराठी

मुलींसाठी इमोशनल स्टेटस – Best Emotional Status For Girls In Marathi

काही लोकांना वाटतं प्रेम म्हणजे दुसऱ्याला कायम गृहीत धरणे आणि हक्क दाखवत राहणे. पण असे लोक आपण त्यांच्यावर हक्क दाखवू लागलो की मागे हटतात. त्यांना फक्त घेणे माहित असते, देणे त्यांच्या गावीही नसते. तुमच्याही आयुष्यात असे लोक असतील ज्यांच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे तुमचे मन दुखावले असेल तर त्यांच्यापर्यंत तुमचे दुःख पोचवण्यासाठी त्यांना हे कोट्स पाठवा किंवा हे इमोशनल स्टेटस त्यांच्यासाठी ठेवा आणि त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्या. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना भावनिक मैत्री कोटस पाठवून मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवू शकता.

मुलींसाठी इमोशनल स्टेटस | Sad Quotes In Marathi For Girls
मुलींसाठी इमोशनल स्टेटस

कधी कधी वाटतं की माझ्या जन्माचा उद्देशच हा आहे की इतरांनी मला त्रास द्यावा आणि मी तो सहन करत राहावा… 

ADVERTISEMENT

प्रेमात हरलात म्हणून नशिबाला आणि स्वतःला दोष देत बसू नका.. कदाचित देवाने याही पेक्षा चांगली व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल… 

प्रेम अशा व्यक्तीवर करा ज्याचे हृदय आधीच तुटलेले आहे कारण ती व्यक्ती जिने हृदय तुटण्याचे दुःख सहन केले असते ती दुसऱ्याचे मन कधीही दुखावत नाही. 

मन गुंतायला एक क्षण पुरेसा असतो आणि नाते तुटायलाही एकच क्षण पुरेसा असतो.. वेळ लागतो तो फक्त ते गुंतलेले मन काढून घ्यायला आणि तुटलेले हृदय सावरायला… 

जगात इतक्या सगळ्या गोष्टी आहेत खेळायला…पण तुला मात्र माझ्या भावना आणि माझ्या आयुष्याशीच खेळायचं होतं!

ADVERTISEMENT

शरीराला जखम झाली तर रक्त येते आणि सगळ्यांना कळते… पण मनाला जखम झाली की जास्त त्रास होतो आणि तो त्रास अश्रूंच्या रूपाने बाहेर पडला तरी कुणालाच कळत नाही. 

गमावलं मी ही होतं, गमावलं त्यानेही होतं! त्याच्या माझ्या गमावण्यात फरक इतकाच आहे की त्याला मिळवण्यासाठी मी सगळं काही गमावलं आणि सगळं काही मिळवण्यासाठी त्याने मला गमावलं!

कुणाला कितीही आपलं मानलं तरी, कुणासाठी कितीही जीव जाळला तरी शेवटी काळच दाखवतो की कोण आपलं आणि कोण परकं! परक्यांसाठी काहीही केलं तरी शेवटी परके ते परकेच राहतात… 

मी तुझ्या आयुष्यातून कायमचं निघून जावं ही तुझी इच्छा होती आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही एकच माझी इच्छा होती. 

ADVERTISEMENT

फुलाच्या गळून गेलेल्या पाकळ्या जश्या पुन्हा जुळू शकत नाहीत तसेच मनातून उतरलेले काही लोक पुन्हा मनात भरत नाहीत… 

वाचा – लाँग डिस्टन्स रिलेशनशिप कोट्स मराठीत

मुलींसाठी प्रेमाचे दुःखी कोट्स – Sad Love Quotes In Marathi For Girl

प्रत्येक मुलीला प्रेमात पडताना वाटते की समोरची व्यक्ती आपल्यावर तितकेच प्रेम करेल जितके आपण त्याच्यावर करतो. प्रत्येक मुलीला सुखाची अपेक्षा असते. मुलींना वाटते की त्यांचा प्रियकर, जोडीदार त्यांना समजून घेईल. पण अनेकदा तसे घडत नाही. काही ना काही कारणाने भांडणे होतात, गैरसमज वाढत जातात आणि मग ते नाते तुटण्याच्या मार्गावर येते. अनेक मुलींना त्यांच्या मनासारखे प्रेम मिळते. पण इतरांना मात्र दुःखाचे चटकेच बसतात. अशा मनाला जखम झालेल्या मुलींना भावना कुठे आणि कशा व्यक्त कराव्या हे कळत नाही आणि त्या आतल्या आत कुढत राहतात. तुम्हालाही प्रेमात वाईट अनुभव आला असेल तर खालील कोट्स वाचा. कदाचित तुम्हाला तुमच्या मनातील दुःख व्यक्त करणारे एखादे कोट सापडेल आणि तुम्हाला मन मोकळे करण्यासाठी शब्द सापडतील. ज्याच्यामुळे मानसिक त्रास झालाय त्या व्यक्तीला मर्मावर बोट ठेवणारे स्वार्थी मराठी कोट्स पाठवा.

मुलींसाठी प्रेमाचे दुःखी कोट्स | Sad Quotes In Marathi For Girls
मुलींसाठी प्रेमाचे दुःखी कोट्स

पाऊस आज खूप कोसळला… कदाचित कुणावर तरी रुसला होता.. कदाचित त्यानेही कुणावर प्रेम केले असेल आणि त्यालाही धोका मिळाला होता… 

ADVERTISEMENT

त्याला विसरून जा जो तुम्हाला विसरेल, बघू नका त्याच्याकडे जो तुम्हाला रडवेल…पण चुकूनही त्यांच्यापासून दूर जाऊ नका जे तुमच्या चेहेऱ्यावर हसू आणतात! 

जर त्याने तुम्हाला रिजेक्ट केलं, अस्वीकार केलं तर निराश होऊ नका… सामान्य लोक अशाच गोष्टी रिजेक्ट करतात ज्या त्यांना परवडू शकत नाहीत. 

रागात बोललेला एखादा शब्दही इतका विषारी असतो की तो प्रेमाच्या हजार शब्दांना एक क्षणात संपवून टाकतो. 

आयुष्यात अनेक लोक भेटतात, अनेक लोक आपल्या खूप जवळ येतात आणि दुरावतात. अनेक लोक शब्द देतात आणि विसरतातही… शेवटी आपण एकटेच असतो आणि सोबत उरतात फक्त आठवणी… 

ADVERTISEMENT

त्याने मला सोडताना हसत राहण्यास सांगितले… मी ही खोटंच हसत राहिले कारण प्रश्न त्याच्या आनंदाचा होता..

लोक म्हणतात की एका व्यक्तीच्या जाण्याने जग थांबत नाही… पण   कोणालाच हे कळत नाही की लाखो लोक मिळाले तरी त्या एका व्यक्तीची कमी पूर्ण होत नाही. 

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो ती व्यक्ती कधीच आपली होणार नाही याची जाणीव होणे. 

शब्दांतून सगळे दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरजच भासली नसती..सगळे काही शब्दांतून सांगता आले असते तर भावनांना काय किंमत उरली असती?

ADVERTISEMENT

तुला विसरावे म्हटले तर विसरताही येत नाही आणि तुझ्याविना एक क्षणभरही राहता येत नाही..

आयुष्य हे श्रावणासारखे आहे. कधी ऊन तर कधी पाऊस…कधी सुख तर कधी दुःख मिळते. सुख व्यक्त करावे लागत नाही. ते लगेच प्रत्येकाला समजते आणि ते साजरे करायला सगळे लोक जमतात. पण दुःख मात्र एकट्यानेच सहन करावे लागते. दुःख वाटून घ्यायला फक्त काही मोजकी जीवाभावाची माणसे उरतात. त्यांच्यापुढे आपले दुःख व्यक्त करण्यासाठी आपल्याला अनेकदा शब्द सुचत नाहीत. हे दुःख व्यक्त करण्यासाठी वाचा दुःखी कोट्स (Sad Quotes In Marathi For Girl) . 

हेही वाचा –

नात्यांची फिरकी घेणारे मराठी सुविचार टोमणे

ADVERTISEMENT

तुमचं मनोबल वाढवणारे आत्मविश्वास सुविचार मराठी

Best Friend Quotes In Marathi For Girl 

20 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT