शवासन (Shavasana Information in Marathi) हे योगाभ्यासातील एक महत्त्वाचे आसन आहे. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि मन शांत होते. हे पाठीवर झोपून करायचे आसन आहे. जेव्हा शारीरिक कष्ट अथवा मानसिक ताण असतो तेव्हा या आसनाचा सराव करणे जास्त फायद्याचे ठरते. म्हणूनच नेहमी व्यायाम अथवा भुजंगासन, गोमुखासन, धनुरासन अशा कठीण योगासनांचा सराव केल्यानंतर सर्वात शेवटी शवासन करण्याचा सल्ला दिला जातो. निरोगी राहण्यासाठी योगासने, व्यायाम आणि योग निद्रेचा सराव नियमित करावा. कारण योग निद्रेचे फायदे अनेक आहेत. विशेष म्हणजे योग निद्रेत जाण्यासाठी तुम्हाला शवासन करावे लागते. यासोबतच व्यायामाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आणि योगासनांची गोडी लावण्यासाठी सर्वांना पाठवा हे योगा कोट्स…
Table of Contents
शवासन म्हणजे काय – Shavasana Mahiti In Marathi
शव म्हणजे शरीराची मृत अवस्था. मृत अवस्थेत शरीर कोणत्याही प्रकारची हालचाल करू शकत नाही. शवासनात माणसाचे शरीर मृत अवस्थेप्रमाणे दिसत असते. यासाठीच इंग्रजीमध्ये या आसनाला Corpse Pose असे म्हणतात. कारण या आसनामध्ये कोणतीही हालचाल न करता फक्त निपचित पडून राहायचे असते. शिवाय या आसनामध्ये विचार करायचे नसतात. म्हणून या आसनाला शवासन असे म्हणतात. मात्र असं असलं तरी यात घाबरण्यासारखं काहीच नाही. उलट शवासन (Savasana Information in Marathi) करण्याचे शरीरावर अनेक फायदे होतात. शरीर निवांत आणि मन शांत होतं. यासाठीच व्यायामनंतर आणि कठीण श्रम केल्यावर शवासनाचा सराव करावा. ज्यामुळे शरीरातील सर्व स्नायू शिथिल होतात आणि संपूर्ण शरीराला आराम मिळतो.
शवासन करण्यापूर्वी माहीत असायला हव्यात या गोष्टी
शवासन नेहमी अति शारिरीक कष्ट अथवा व्यायाम केल्यावर केलं जातं. योगाभ्यासाचा सराव केल्यावर सर्वात शेवटी अथवा दोन कठीण आसनांच्या मध्ये शवासन केले जाते. मात्र शवासन करण्यासाठी फार चिंता काळजी करण्याची गरज नाही. जर तुम्हाला कोणताही शारीरिक त्रास नसेल तर तुम्ही तज्ञ्जांच्या मदतीशिवायही शवासन करू शकता. पण असं असलं तरी गरोदर स्त्रियांनी मात्र त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या तिमाहीमध्ये शवासनाचा सराव करू नये. कारण याचा तुमच्या बाळावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला पाठीचा त्रास असेल तर शवासन करू नये असा सल्ला दिला जातो.
शवासन कसे करावे – How To Do Savasana In Marathi
शवासन (Shavasana Information in Marathi) करण्यापूर्वी तुम्हाला शवासन कसं करायचं हे माहीत असायला हवं. यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स
- शवासन करण्यासाठी योगामॅट अथवा एखाद्या आसनावर पाठीवर झोपा.
- तुमच्या शरीरापासून हात जरा लांब ठेवा
- हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने आणि बोटे किंचित वाकलेली असावी.
- डोके उजव्या अथवा डाव्या दिशेला कललेले असावे.
- पायामध्ये थोडे अंतर ठेवा.
- डोळे बंद करा आणि शरीर शिथिल सोडा.
- संथपणे श्वास सुरू ठेवा आणि विचाररहीत अवस्था प्राप्त करण्यासाठी श्वासावर लक्ष ठेवा.
- व्यायामानंतर शरीरावर ज्या ज्या भागावर ताण आला असेल तो भाग शिथिल ठेवण्याचा प्रयत्न करा.
- पाच ते दहा मिनीटे या अवस्थेत पडून राहिल्यावर उजव्या बाजूला तीस सेंकद वळा.
- उजव्या अथवा डाव्या कुशीला वळून हाताच्या मदतीने उठत शवासनातून बाहेर या.
शवासन चे फायदे – Shavasana Benefits In Marathi
शवासन करण्याचे खरंतर अनेक फायदे आहेत. नियमित शवासनाचा सराव केल्यास त्याचे चांगले फायदे हळू हळू शरीरावर आणि मानसिक अवस्थेत दिसू लागतात. यासाठीच जाणून घ्या आरोग्यावर काय होतात शवासनाचे फायदे
मेडिटेशन – Meditation
शवासन करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे तुमचे शरीर निवांत आणि मन शांत होते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सतत कामाची चिंता, नातेसंबधातील ताणतणाव वाढताना दिसतात. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत नवनवीन आव्हानांना माणसाला सामोरं जावं लागतं. म्हणूनच या जीवघेण्या स्पर्धेचा ताण सहन करण्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे. शवासनाचा नियमित सराव केल्यामुळे तुमचे मन नकळत काही काळ ध्यान अवस्थेत जाते. शवासन करताना मेडिटेशन झाल्यामुळे तुमच्या मनावर नियंत्रण ठेवणं तुम्हाला जमू लागतं.
शक्ती वाढते – Increases Energy
दिवसभर काम करण्यासाठी शरीराला पुरेशी शक्ती हवी असते. मात्र व्यायाम केल्यानंतर काही काळ तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटत असतं. अशा वेळी काही मिनीटे शवासन करून तुम्ही पुन्हा पहिल्यासारखं फ्रेश होऊ शकता. नियमित शवासनाचा सराव केल्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही आणि टवटवीत दिसता. कारण योगासनांच्या सरावामुळे तुमच्या शरीर आणि मनावर नकळत चांगले परिणाम दिसू लागतात.
ताण कमी होतो – Reduces Stress
व्यायामानंतर सर्व अवयव, स्नायू, नसा, पाठीचा कण्यावर आलेला ताण कमी करण्यास शवासन मदत करते. ज्यामुळे तुम्ही काही मिनीटांमध्ये पुन्हा फ्रेश होता. शवासनात श्वासाकडे लक्ष देताना तुमच्या मनातील विचार हळू हळू कमी होतात. ज्यामुळे तुमच्या मनातील चिंता, काळजी, नकारात्मक विचार, थकवा, कंटाळा कमी होत जातो. मन प्रसन्न झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनातील ताणतणावाला नियंत्रित करण्याची कला आत्मसात करणं सहज सोपे होते.
शरीर निवांत होतो – Relaxes the Body
शारीरिक कष्ट अथवा व्यायाम केल्यानंतर काही काळ तुमच्या शरीरातून वेदना जाणवतात. स्नायू शारीरिक कष्टामुळे ताणले जातात आणि कडक होतात. मात्र निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेशा व्यायामाची खूप गरज असते. म्हणूनच व्यायाम केल्यानंतर पुन्हा दिवसभरातील कामे करण्यासाठी शरीर निवांत होणं गरजेचं असतं. शवासन करताना व्यायामानंतर आलेला ताण कमी होतो आणि शरीर निवांत होते. ज्यामुळे तुम्हाला तुमचा दिनक्रम उत्साहाने सुरु करणे शक्य होते.
मज्जासंस्था सुधारते – Nervous System
मज्जासंस्था ही शरीरातील एक महत्त्वाची कार्य प्रणाली आहे. मज्जा संस्था सुरळीत असेल तर तुमच्या अनेक शारीरीक क्रिया व्यवस्थित होतात. शवासन करण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा हा की त्यामुळे तुमच्या मज्जासंस्थेच्या कार्यात सुधारणा होते. कारण शवासनाचा तुमच्या शरीर, मन आणि श्वसनावर योग्य परिणाम होतो.
स्मरणशक्ती सुधारते – Improves Memory
शवासन करण्यामळे तुमचे मन शांत होते. मन शांत असते तेव्हा मनात नेहमी चांगले विचार येतात आणि मनाचे कार्य सुरळीत होते. जर तुमची स्मरणशक्ती कमजोर असेल तर शवासन करण्याचा सराव करणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. कारण हे आसन करताना तुमचे मन जास्तीत जास्त एकाग्र होते. तुम्ही या आसनात फक्त श्वासावर लक्ष ठेवू शकता. ज्यामुळे हळू हळू तुमची स्मरणशक्ती वाढण्याचा या एकाग्रतेचा चांगला परिणाम होतो.
झोप लागते – Cures Insomnia
शवासन म्हणजे झोपणे नाही. शवासन म्हणजे निपचित पडून राहून श्वासावर लक्ष ठेवणे. म्हणूनच शवासनाचा सराव करताना कधी झोपू नये. जर तुम्हाला झोप न येण्याचा अथवा अर्धवट झोप येण्याचा त्रास असेल तर व्यायामानंतर शवासनाचा सराव करा. कारण यामुळे तुमचा अनिद्रेचा त्रास कमी होऊ शकतो. झोपताना तुम्हाला शवासन करताना केलेल्या टेक्निक्सचा चांगला फायदा होतो आणि हळू हळू शांत झोप लागण्यास मदत होते.
रक्तदाब कमी होतो – Reduces Blood Pressure
अति ताणतणावात काम करणाऱ्या लोकांना नेहमी रक्त दाबाचा त्रास होत असतो. चिंता, काळजी, ताणतणाव यामुळे रक्तदाब कमी अथवा जास्त होतो. कारण मनाचा परिणाम नकळत शरीरावर होत असतो. ताण आला तर सर्वात आधी शरीरातील रक्तदाब अनियंत्रित होतो. अशा वेळी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाला शांत करून नियंत्रित करण्याची कला समजायला हवी. शवासनामध्ये मनावर नियंत्रण ठेवण्याचा सराव होतो. यासाठी रक्तदाब असणाऱ्या लोकांनी शवासनाचा सराव करावा.
मन स्थिर होते – Aligns Your Mind
मन स्थिर करणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. मन सतत भूतकाळ आणि भविष्यकाळात पळत असते. अशा अशांत आणि चंचल मनाला वर्तमान काळात स्थिर करण्याची गरज असते. वास्तविक ही एक खूप मोठी साधना आहे. आध्यात्मिक बळ आणि साधनेने मन स्थिर होणं शक्य आहे. मन स्थिर करणं म्हणजे शरीरात असले
शवासन करताना काय घ्यावी काळजी – Precautions While Doing Shavasan
योगासने करताना शवासन करणं हे इतर आसनांपेक्षा सोपं वाटत असलं तरी, शवासन करतानाही काही नियम पाळावे लागतात. यासाठी शवासनात असताना या गोष्टी पाळा.
- शवासनात असताना कधीच शरीराची जोरात हालचाल करू नका.
- गोंधळ असेल अशा ठिकाणी शवासनाचा सराव करू नका.
- शवासनात असताना विचार करत बसू नका.
- शवासनात झोपू नका.
- झोपण्याच्या गादीवर अथवा मऊ पृष्ठभागावर शवासन करू नका.
- शवासनातून बाहेर येताना घाई करू नका.
FAQ’s – शवासन माहिती मराठीतून | Shavasana Information in Marathi
प्रश्न – शवासनाचा सराव कधी करावा ?
उत्तर -योगासने अथवा व्यायाम केल्यानंतर अथवा मध्ये तुम्ही शवासन करू शकता. ज्यामुळे व्यायामामुळे आलेला शारीरिक थकवा कमी होण्यास मदत होईल.
प्रश्न – नव्याने योगा शिकताना शवासन कसे करावे ?
उत्तर – पहिल्यांदा शवासन करताना तुम्हाला श्वासावर लक्ष ठेवत विचार रहीत अवस्था गाठणे नक्कीच कठीण असेल. पण सरावाने तुम्हाला ते जमू लागेल. यासाठी शवासन करताना शरीरा शिथिल ठेवा आणि श्वासावर लक्ष ठेवण्याचा सराव करा.
प्रश्न – शवासन करणं कठीण आहे की सोपे ?
उत्तर – शवासन करणं सोपं वाटत असलं तरी ते एक कठीण आसन आहे. कारण सुरूवातीला तुम्हाला शवासन कराताना झोप येऊ शकते. पण शवासनात तुम्हाला न झोपता श्वासाकडे लक्ष ठेवायचे असते.
प्रश्न – शवासन आणि योग निद्रा समान आहेत का ?
उत्तर – नाही, योगनिद्रेत जाण्यासाठी तुम्हाला शवासन करावे लागते, मात्र शवासन आणि योग निद्रा नक्कीच समान नाहीत. योग निद्रा ही ध्यानाची एक पुढील अवस्था आहे जिच्यासाठी तुम्हाला शवासनाचा सराव करावा लागतो.
Conclusion – शवासन मराठी माहितीतून , Savasana Information in Marathi, शवासन माहिती मराठीतून , Shavasana Information in Marathi, Savasana Mahiti in Marathi जाणून घेताना आपण अनेक गोष्टींवर सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला तुम्ही कंमेट बॉक्समध्ये कळवू शकता. मात्र त्यासाठी योगासने आणि मुख्य म्हणजे शवासनाचा सराव तुम्ही नियमित करायला हवा.