ADVERTISEMENT
home / Fitness
International Yoga Day simple yoga poses for rainy day in Marathi

International Yoga Day 2022 : पावसाळ्यात घरीच करा ‘ही’ सोपी योगासने

पावसाळा म्हणजे चिखल, ओलावा आणि त्यातून होणारे इनफेक्शन… सहाजिकच या काळात आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. सध्या अनेक ठिकाणी साथीचे आजारही पसरले आहेत. पण यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी फिटनेस राखणं खूप गरजेचं आहे. नियमित योगासने केल्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही फिट राहते. यंदा जागतिक योग दिनानिमित्त घराबाहेर योगा क्लाससाठी जाणं शक्य नसेल तर घरातच योगासने करून राखा स्वतःचा फिटनेस… यासाठी जाणून घ्या काही अशी आसने जी तुम्ही पावसाळ्यात घरीच करू शकता. यासोबतच वाचा Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे, योग दिनानिमित्त सर्वांना पाठवा हे बेस्ट योगा कोट्स इन मराठी | Yoga Quotes In Marathi वाचा योगवरील मराठी पुस्तके | Yoga Books In Marathi, योग निद्रा म्हणजे काय, फायदे काय आहेत | Yoga Nidra In Marathi

भुजंगासन – 

भुजंग म्हणजे साप म्हणूनच या आसनाला इंग्रजीमध्ये कोब्रा पोझ असं म्हणतात. या आसनासाठी योगामॅटवर पोटावर झोपावे. हाताचे दोन्ही तळवे खांद्याला समांतर असावे. पायाचे घोटे जवळ आणावे आणि पायाची बोटं जमिनीकडे वळवावी. हाताने शरीराची वरची बाजू पोटापर्यंत वर उचलावी. दोन्ही तळहातांवर शरीराचा तोल सांभाळावा. हात सरळ ठेवावे आणि छाती बाहेर काढत हनुवटी उचलत नजर वरच्या दिशेला न्यावी. या आसनामध्ये वीस ते तीस सेकंद तोल सांभाळावा. वर जाताना श्वास घ्यावा खाली येताना श्वास सोडावा. या आसानामुळे तुमच्या पाठ, पोट, कंबर, हात आणि पायांवर चांगला ताण येतो. पचनक्रिया सुधारते आणि लैंगिक समस्या दूर होतात. फुफ्फुसे आणि ह्रदयासाठी हे आसन उत्तम आहे. शिवाय पावसाळ्यात घरीच हे आसन तुम्ही सहज करू शकता. यासाठी वाचा जाणून घ्या भुजंगासन संपूर्ण माहिती मराठी | Bhujangasana Information In Marathi

बकासन –

बकासन करण्यासाठी तुम्हाला योगामॅटवर व्रजासनात बसावे लागेल. त्यानंतर तुमच्या हाताचे दोन्ही तळवे जमिनीवर समांतर राहतील असे ठेवावे. दोन्ही पायांनी उकिडवे बसावे आणि पायांचे गुडघे हाताच्या कोपऱ्याजवळ आणा. शरीराचा संपूर्ण भार हातावर पेलत पायाचे दोन्ही तळवे वर उचला. या आसनाला बकासन असं म्हणतात कारण या स्थितीत तुमच्या शरीराची अवस्था बक म्हणजे बगळ्याप्रमाणे दिसत असते. तुम्ही जर हे आसन पहिल्यांदा करत असाल तर एक एक पाय वर उचलत हे आसन करण्याचा सराव करा. नाहीतर तोंडावर आपटलं जाण्याची शक्यता आहे. सरावाने हे आसन तुम्ही सहज करू शकाल. बकासनाचे शरीराप्रमाणेच मनावरही चांगले परिणाम होतात. कारण शरीराचा तोल सांभाळण्यासाठी तुम्हाला  मनाची एकाग्रता साधावी लागते. ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि छाती, पाय, हातावर चांगला ताण आल्यामुळे शरीर सुदृढ राहते. यासाठी वाचा बकासन माहिती मराठी | Bakasana Information In Marathi

नौकासन –

नौकासन हे पाठीवर झोपून करण्याचे आसन आहे. यासाठी योगामॅटवर पाठीवर झोपा आणि पाय पंचेचाळीस अंशात वर उचला पायांचा तोल सांभाळत तुम्हाला तुमचे डोके आणि पाठ देखील वर उचलायची आहे. ज्यामुळे तुमच्या शरीराचा आकार आता नौका म्हणजे एखाद्या नावे प्रमाणे दिसू लागेल. या आसनातही तुम्हाला तुमच्या नितंबावर शरीराचा तोल पंधरा ते वीस सेंकद सांभाळायचा आहे. नौकासनामध्ये पाय, मांड्या, कंबर, पाठीवर चांगला ताण येतो. ज्यामुळे तुमचे सांधे मजबूत होतात. तोल सांभाळण्यामुळे तुमचे मन आणि शरीर एकाच वेळी निवांत होते. हे आसन तुम्ही सहज घरी करू शकता. 

ADVERTISEMENT

कंधारासन –

कंधारासन हे पाठीवर झोपून करायचे आणखी एक आसन आहे. यासाठी योगामॅटवर पाठीवर झोपा आणि मॅट टू मॅट गॅप घेत पाय कोपऱ्यात वाकवा. दोन्ही हाताने पायाचे तळवे पकडा आणि कंबरेतून शरीर वर उचलून घरा. या आसनामुळे तुमचे हात, पाय, छाती, कंबर, मान अशा अनेक अवयवांना योग्य व्यायाम मिळतो. पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत होतो. पचनसंस्था सुधारते आणि मेंदूला रक्तपुरवठा होतो.  पंधरा ते वीस सेंकद या आसनात स्थिर राहण्याचा सराव तुम्ही पावसाळ्यात घरीच करू शकता. 

शलभासन –

शलभासन करण्यासाठी तुम्हाला योगामॅटवर तुमच्या पोटावर झोपावे लागेल.  दोन्ही हात जांघेजवळ ठेवा जमिनीच्या दिशेने तळवे असतील अशा पद्धतीने ठेवा. दीर्घ श्वास घेत तुमचे दोन्ही पाय वर उचलायचे आहे. या स्थितीत पाय आणि मान वर उचलायची आहे, मात्र फक्त पोट जमिनीवर चिकटलेले असावे. श्वास घेत वर जा आणि श्वास सोडत पुन्हा पूर्वस्थितीत या. या आसनामध्ये तुमचे शरीर नाकतोडे अथवा कीटकाप्रमाणे दिसते म्हणून याला शलभासन असं म्हणतात. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

20 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT