गायिका गीता माळी यांचा मुंबई विमानतळावरून नाशिकला जात असताना शहापूरजवळ सकाळी अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये त्यांचे पती विजय माळी यांचीदेखील प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. गीता माळी अमेरिकेतून दीड महिन्याने भारतात परतल्या होत्या आणि त्यांना घरी नेण्यासाठी त्यांचे पती विमानतळावर गेले होते. मात्र शहापूरजवळ नाशिक मार्गावर एकता हॉटेलसमोर त्यांची कार आणि एका टँकरची धडक होऊन दोघेही या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर उपचार चालू असतानाच गीता माळी यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पतीवर अजूनही उपचार सुरू असून तेदेखील गंभीर अवस्थेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांना लगेच शहापूर जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र गीता माळी यांची अवस्था फारच बिकट असल्याने त्यांचं निधन झालं असंही सांगण्यात आलं आहे.
‘अग्गंबाई सासूबाई’ फेम सोहमचं फिटनेस प्रेम
अपघाती निधनाने चाहत्यांना बसला धक्का
गीता माळी गेल्या दीड महिन्यापासून अमेरिकेत गायनाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यामुळे दीड महिन्यानंतर भारतात परतल्यावर त्यांनी आपल्या फेसबुकवरून काही फोटोदेखील शेअर केले होते. ज्यामध्ये मायदेशी परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. मात्र पुढे काय होणार आहे हे कधीच कोणाला कळलं नाही. त्यांच्यावर अशा प्रकारे काळाचा घाला घातला गेला आणि त्यामध्येच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे गीता माळी यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. त्यांनी मराठी गाणीदेखील गायली आहेत. तसंच त्या भारताबाहेरही अनेक शो करत असायच्या. बऱ्याचदा भारताबाहेर शो साठी त्यांचं येणं जाणं चालू असायचं. यावेळीदेखील असाच अमेरिकेचा दौरा करून आपल्या घरी नाशिकला जात होत्या. हा त्यांचा शेवटचा दौरा ठरला. त्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. गीता माळी यांचं इतक्या लहान वयात निधन झाल्याने सध्या सर्वजण हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
90s मधील हे सुपरमॉडेल्स सध्या काय करत आहेत
गीता माळी यांची गणपतीची गाणी प्रसिद्ध
गीता माळी यांची अनेक गणपतीची गाणी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक सीडीजदेखील बाजारात उपलब्ध आहेत. गीता माळी आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांचंच मन जिंकून घेतलं होतं. फार कमी कालावधीत त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. इतकंच नाही तर सुगम संगीतामध्ये त्यांची स्वतःची अशी वेगळी शैली त्यांनी निर्माण केली होती. अनेक दिग्गजांसोबत गीता माळी यांनी गायन केले आहे. अविराज तायडे, पंडित शंकर वैरागकर, मुंबई विद्यापीठाचे अच्युत ठाकूर यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे गिरवले होते. तसंच त्यांना अध्यात्म आणि ध्यानधारणेचीही आवड होती असं सांगण्यात येत आहे. त्यांनी देश – विदेशामध्ये अनेक गायनाचे कार्यक्रम करून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांचे स्वतःचे काही म्युझिक अल्बमदेखील होते. ज्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यामुळे आता सांस्कृतिक क्षेत्रात नक्कीच एक पोकळी निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान त्यांच्या पतीवर उपचार चालू असून अजूनही त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचा अंत्यविधी नक्की कधी करण्यात येणार आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. केवळ या दोन्ही कुटुंबावर नाही तर पूर्ण नाशिक शहरावर सध्या शोककळा पसरली आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.