सायनसचा त्रास हा संसर्गजन्य असल्यामुळे जीवाणूंमुळे तो अधिकच वाढतो. सर्दी, खोकला, नाक चोंदणे यासह नाकातून सतत पाणी येणे आणि तीव्र डोकेदुखी, ताप हेही त्रास सायनसमध्ये जाणवतात. नाक आणि चेहऱ्याच्या पोकळीत अती प्रमाणात चिकट पदार्थ साचल्यामुळे सायनसचा त्रास जाणवतो. सतत सायनसचा त्रास होणे ही एक गंभीर बाब आहे. त्यामुळे सायनसच्या सुरुवातीलाच त्यावर योग्य उपचार करायला हवेत. अन्यथा सायनसचा त्रास गंभीर स्वरूप घेऊ शकतो. सायनसचा त्रास सौम्य असेल तर घरच्या घरी त्यावर नैसर्गिक उपचारदेखील केले जातात. यासाठीच जाणून घ्या सायनस वर घरगुती उपाय (sinus home remedies in marathi).
सायनसचा त्रास कमी करण्यासाठी स्वतःला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. भरपूर प्रमाणात पाणी, ग्रीन टी, फळांचा रस पिऊन तुम्ही स्वतःला हायड्रेट ठेवू शकता. कारण यामुळे शरीरातील पाण्याची नियंत्रित राहते. पाण्यामुळे शरीरातील इतर क्रिया सुरळीत सुरू राहतातच. शिवाय नाकामधील चिकट द्रव्य आणि घाण बाहेर टाकण्यास यामुळे मदत होते. मात्र लक्षात ठेवा सायनसचा त्रास असलेल्या लोकांनी मद्यपान, कॉफी, धूम्रपान, कॅफेनयुक्त पेय मुळीच घेऊ नयेत. कारण यामुळे तुमच्या शरीराला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. याचप्रमाणे ‘हायड्रेट’ राहण्यासाठी खा ही फळं.
सायनसमुळे होणारा सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी अथवा नाक चोंदण्याचा त्रास कमी करण्याचा सोपा मार्ग म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणे. बऱ्याचदा डॉक्टदेखील तुम्हाला असं करण्याचा सल्ला देतात. कोविड १९ च्या काळात तर आता प्रत्येकाच्या घरी वाफ घेण्याचे उपकरण असते. जरी ते नसेल तरी तुम्ही भांड्यात पाणी गरम करून त्यानेही वाफ घेऊ शकता. वाफ घेतल्यामुळे तुमच्या नाक आणि श्वसनमार्गातील अडथळे दूर होतात. ज्यामुळे तुम्हाला श्वास घेताना त्रास होत नाही आणि सायनसपासून त्वरीत आराम मिळतो. यासाठीच जाणून घ्या चेहऱ्यावर वाफ घेण्याचे अफलातून फायदे (Benefits Of Steaming Face In Marathi).
सायनसचा त्रास होण्यामागचं कारण म्हणजे नाक, नाकपुड्या आणि चेहऱ्यातील पोकळीत चिकट द्रव्य जमा होणे. हे चिकट द्रव्य साचल्यामुळे तुम्हाला श्वसनक्रिया करताना अडचणी येतात. शिवाय सतत हा द्रव्य पदार्थ साचून राहिल्यामुळे इनफेक्शन होऊन सर्दी, ताप, डोकेदुखीसारखे त्रास वाढतात. यासाठीच वेळच्या वेळी नाकपुड्या आणि नाक स्वच्छ करणे हा त्रास कमी करण्याचा सोपा मार्ग आहे. नाक शिंकरून तुम्ही तुमच्या नाक, घसा आणि चेहऱ्यातील पोकळ भागात साचलेली घाण बाहेर काढून टाकू शकता. असं केल्याने त्वरीत आराम मिळतो आणि तुमचा श्वसनमार्ग मोकळा होतो.
सायनसमुळे नाक आणि चेहऱ्यातील पोकळीत अडथळे जमा होतात. ज्यामुळे रात्री झोपल्यावर श्वसनमार्गात अडचणी येतात आणि श्वास घेण्यास त्रास होतो. असं झाल्यामुळे तुम्हाला शांतपणे झोपणं शक्य होत नाही. रात्री झोपताना सतत हा त्रास जाणवल्यामुळे अस्वस्थ वाटू लागतं. यासाठीच शांत झोपेसाठी तुमच्या झोपण्याच्या पद्धतीत थोडा बदल करायला हवा. सायनसच्या त्रासात झोपताना डोकं वरच्या दिशेने ठेवल्यामुळे श्वास घेणं सोपं होतं. यासाठी तुम्ही डोक्याच्या खाली उशी ठेवू शकता . उशी ठेवल्यामुळे तुमचं डोकं शरीरापासून वरच्या दिशेला राहतं आणि श्वास घेणं सोपं होईल.
निलगिरी तेलाचे अनेक फायदे आहेत. निलगिरीचे तेल हे अॅंटि सेप्टिक आणि अॅंटि बॅक्टेरिअल असते. निलगिरीच्या तेलाचा वास अतिशय उग्र असल्यामुळे या तेलामुळे तुमचा श्वसनमार्ग लगेच मोकळा होतो. यासाठीच व्हिक्स अथवा सर्दीच्या औषधांमध्ये निलगिरीचा वापर केला जातो. शिवाय निलगिरीमुळे आजूबाजूचे वातावरण निर्जंतूकदेखील होते. यासाठीच सायनसचा त्रास होत असल्यास गरम पाण्यात निलगिरीचे थेंब टाका आणि त्याने वाफ घ्या. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या रूमाल अथवा उशी, पांघरूणावरही निलगिरीचे काही थेंब टाकू शकता.
सर्दी, खोकला आणि सायनससारखा त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला पुरेसा आराम करण्याची गरज आहे. अशा त्रासात तुम्ही बाहेरील प्रदूषित वातावरणात गेल्यास तुमचा त्रास अधिकच वाढू शकतो. यासाठीच सायनसचचा त्रास वाढू लागला की मस्त गरमागरम आणि हेल्दी सूप प्या आणि घरातच आराम करा. त्याचप्रमाणे एक गोष्ट लक्षात ठेवा या काळात तुम्ही हेल्दी खाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे चिकन सूप अथवा मस्त व्हेजिटेबल सूप प्या आणि आराम करा. गरम गरम सूप पिण्यामुळे तुमच्या नाक आणि घशाला लगेच बरं वाटू लागेल. यासाठी बनवा या गरमागरम हेल्दी सूप रेसिपीज
व्हिटॅमिन सी युक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. कोरोनाच्या काळातही अनेकांना व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेण्याचा सल्ला याचसाठी दिला जात आहे. व्हिटॅमिन सी युक्त भाज्या आणि फळांचा आहारात वापर करूनही तुम्ही शरीराला पुरेसे व्हिटॅमिन सी देऊ शकता. व्हिटॅमिन सी युक्त आहारातून शरीराला पुरेसे अॅंटि ऑक्सिडंट आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे घटक मिळतात. आजारपण आणि सायनससारख्या इनफेक्शन दूर करण्यासाठी असा आहार गरजेचा आहे. त्यामुळे सायनस कमी करण्यासाठी नियमित व्हिटॅमिन सी युक्त आहार घ्या.
नाक चोंदण्याचा त्रास श्वसन मार्गात अडथळे निर्माण झाल्यामुळे होतो. मात्र तुम्ही नियमित नेती पात्राचा वापर केल्यास तुमचा श्वसनमार्ग स्वच्छ आणि निरोगी राहतो. यासाठी नेती पात्र कसे वापरावे हे तुम्हाला माहीत असायला हवे. बाजारात तुम्हाला तुमच्या सोयीनुसार नेती पात्र विकत मिळते. नेती क्रिया ही सकाळी केल्यास लाभदायक ठरते. यासाठी कोमट पाण्यात मीठ टाका आणि हे पाणी नेती पात्रात भरा. डोके पंचेचाळीस अंशामध्ये झुकवा आणि वरच्या नाकपुडीजवळ नेती पात्र न्या. नेती पात्रातील निमूळत्या टोकाकडून नाकात पाणी ओढून घ्या आणि दुसऱ्या नाकपुडीतून ते बाहेर टाका. एकदा ही क्रिया पूर्ण केल्यावर डोके दुसऱ्या दिशेला झुकवा आणि दुसऱ्या नाकपुडीतून पाणी आत घ्या तिच क्रिया पुन्हा करा. नेती पात्राचा वापर करण्यासाठी नियमित सराव करण्याची गरज आहे. नेती क्रिया केल्यामुळे तुमचे नाक आणि नाकपुड्यांमधील मार्ग मोकळा होतो ज्यामुळे सायनसचा त्रास कमी होतो.
नाक आणि चेहऱ्याच्या पोकळीतील भागात सायनस जमा होतो. सायनस हा एक चिकट पदार्थ असल्यामुळे तो सुकून तुम्हाला डोकेदुखी, सर्दी असे त्रास जाणवतात. नाक चोंदण्यामुळे तुम्हाला नीट श्वास घेता येत नाही. मात्र डोकं आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्यामुळे हा चिकट पदार्थ तिथून निघून जातो. नाक शिंकरून पातळ झालेला द्रव्य पदार्थ तुम्ही नाकाबाहेर काढू शकता. मात्र त्यासाठी डोकं आणि नाकाजवळील केंद्रस्थाने तुम्हाला माहीत असायला हवीत. ज्यांच्यावर मसाज करून तुम्ही तुमच्या डोकेदुखीचा त्रास कमी करू शकता. मसाज हा सायनसवरील कायमस्वरूपी घरगुती उपाय नसला तरी यामुळे तुम्हाला काहीवेळासाठी त्वरीत आराम मिळू शकतो.
मीठाचा वापरदेखील निर्जंतूकीकरणासाठी केला जातो. त्यामुळे सर्दी, खोकला,ताप, नाक चोंदणे यावर उपाय करण्यासाठी तुम्ही जाडे मीठ वापरू शकता. ताप कमी करण्यासाठी मीठाच्या पाण्याच्या घड्या डोक्यावर ठेवल्या जातात हे तुम्ही ऐकलं असेलच. एवढंच नाही खोकला कमी करण्यासाठी मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या जातात. मीठाच्या पाण्यामुळे घसा निर्जंतूक होतो आणि घशामधील कफ आणि घाण बाहेर टाकली जाते. जाडे मीठ तव्यावर गरम करून ते एका कापडात गुंडाळून तुम्ही तुमचे डोके आणि नाकाकडचा भाग शेकवू शकता. नाक आणि चेहऱ्याच्या पोकळीत जमा झालेला सायनस असं केल्याने पातळ होऊन नाकावाटे बाहेर पडतो. शिवाय मीठामुळे तुमचा घसा स्वच्छ देखील होतो.
सायनस इनफेक्शन कमी करण्यासाठी सायनसवर घरगुती उपाय वर दिलेले आहेत. मात्र यापैकी चेहऱ्यावर वाफ घेणं आणि नाक स्वच्छ करणं हा सायनसवर त्वरीत आराम देणारा सोपा मार्ग आहे.
केळं खाण्यामुळे सर्दी वाढतं असं म्हटलं जातं, त्याचप्रमाणे केळं घशात अडकल्यामुळे घसा चॉकअपदेखील होऊ शकतो. यासाठी सायनसमध्ये केळं टाळणंच योग्य राहील.
सायनसमध्ये जर तुमच्या नाकातून सतत पाणी येत असेल अथवा नाक गळत असेल तर तुम्हाला नक्कीच जास्त त्रास होऊ शकतो. कारण यामुळे तुमच्या नाक सतत चॉक अप होत राहील आणि सायनसचा त्रास अधिकच वाढेल.