कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह सोहळा राजस्थानमध्ये थाटामाटात पार पडला. लग्नाचा शाही थाट चाहत्यांना फोटोज आणि व्हिडिओजमधून पाहायला मिळाला. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो खूपच व्हायरल झाले. कतरिनाच्या लग्नाचा गाजावाजा संपत नाही तोवर आता तिची बहीण इसाबेल लग्नासाठी तयार झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. इसाबेल कैफचे काही ब्रायडल लुकमधील फोटोज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोजमध्ये इसाबेल चक्क नवरी झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कतरिनाच्या लग्नानंतर खूश होत आता इसाबेलनेही लग्न केलं की काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.
Bigg Boss Marathi: फिनालेच्या इतक्या जवळ असताना सोनाली पाटील झाली एलिमिनेट
इसाबेलचं खरंच झालं का लग्न
इसाबेल फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ती अगदी एखाद्या नव्या नवरीसारखी सजलेली आहे. ब्रायडल लेंहगा, कानात झुमके, हातात बांगड्या आणि गळ्यात मोठा हार असा तिचा ब्रायडल लुक आहे. कतरिनाचा ब्रायडल लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता लोकांना इसाबेलचा हा लुकही प्रचंड आवडला आहे. कतरिना आणि विकीने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि कोणताही गाजावाजा न करता लग्न केलं. त्यामुळे कदाचित तिची बहीण इसाबेललाही असंच गुपचूप लग्न करायचं होतं अशी सध्या चर्चा सुरू आहे. आता तिने असं गुपचूप लग्न का आणि कोणाशी केलं याबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. मात्र इसाबेलने हा ब्रायडल लुक लग्नासाठी केलेलाच नव्हता… तर यामागे एक खास कारण दडलेलं आहे.
A फक्त तूच’ चित्रपटात ऋषिकेश वांबुरकर महत्त्वपूर्ण भूमिकेत
ब्रायडल लुकमध्ये खुलून आलं इसाबेलचं रूप
इसाबेलचे ब्रायडल लुकमधील फोटो पाहून चाहत्यांना वाटत आहे की कतरिनाच्या पाठोपाठ तिचंही लग्न झालं आहे. मात्र या फोटोमागचं सत्य काहीतरी वेगळंच आहे. वास्तविक इसाबेलचं लग्न झालेलं नसून तिने हे खास फोटोशूट एका मासिकासाठी करून घेतलेलं आहे. यातील व्हिडिओसोबत तिने शेअर केलं आहे की, “रीळसाठी रिअलसाठी नाही” म्हणजेच शूटसाठी केलेला लुक आहे खरं खुरं लग्न नाही अशा शब्दात तिने स्पष्टीकरण दिलं आहे. कतरिना कैफप्रमाणेच इसाबेललाही बॉलीवूडमध्ये तिचं स्थान निर्माण करायचं आहे. सहाजिकच त्यासाठी तिने आता कामाला सुरूवात केली आहे. तिने याआधी एका चित्रपटात डान्स नंबर केला होता. लवकरच ती पुलकित सम्राटसोबत सुस्वागतम खुशामदीद चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सोशल मीडियावरही इसाबेल चांगलीच अॅक्टिव्ह आहे. तिच्या इन्साग्राम पेजला एक कोटीपेक्षा जास्त फॉलोव्हर्स आहेत. त्यामुळे कतरिना पाठोपाठ लग्न जरी नाही केलं तरी ती तिच्या पाठोपाठ बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी नक्कीच सज्ज झाली आहे.
मनाची राणी जी गाते मर्जिची गाणी, अशी निराळी मैना आहे मोनालिसा बागल