आपली त्वचा सुंदर, नितळ आणि तजेलदार असावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पूर्वीच्या काळी लोक आजीच्या बटव्यातील कित्येक साध्या सरळ उपायांचा वापर आपल्या चांगल्या त्वचेसाठी करत असत. ज्यात नैसर्गिक वनस्पती, औषधी मुळं आणि घरगुती उपचारांचा समावेश असे. ज्यामुळे त्यांची त्वचा वर्षानुवर्षे छान दिसत असे. पण आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला त्वचेच्या देखभालीसाठी इतका वेळ देणं शक्य नाही. त्यामुळे आपली त्वचा कमीतकमी वेळात नितळ आणि तजेलदार दिसण्यासाठी आपण केमिकलयुक्त फेसवॉश, क्रिम्स, पॅक्स यांचा वापर करतो. ज्यामुळे आपली त्वचा काही काळासाठी चांगली दिसते.पण जसंजसं वय वाढू लागतं तसंतसं त्वचेची चमक कमी होऊ लागते.आपल्या नाजूक त्वचेला आयुर्वेदीक उपायांची गरज आहे. जे उपाय केमिकलविरहीत आणि नैसर्गिक पध्दतीने आपली त्वचा चांगली ठेवतील.असाच एक आयुर्वेदीक ब्रॅंड आहे पतंजलि. पतंजलि स्कीन केअर प्रोडक्टस् आपल्या त्वचेची काळजी घेतात आणि दीर्घकाळासाठी तजेलदार ही ठेवतात.
स्कीन केअरच्या प्रोडक्ट रेंजमध्ये पतंजलिने अनेक उत्पादन बाजारात आणली आहेत. फेसवॉशपासून, स्क्रबर, मॉइश्चरायजर क्रीम, फेसपॅक आणि जेलसारखी बरीच उत्पादन पतंजलिच्या स्कीन आणि ब्युटी केअर उत्पादनांमध्ये आहेत. ही सर्व उत्पादन पतंजलि ने नॉर्मल, ड्राय आणि ऑईली स्कीन प्रकारांना लक्षात घेऊन तयार केली आहेत. आयुर्वेदिक असल्याने ही सर्व उत्पादन केमिकलरहित आहेत. त्यामुळे ह्या उत्पादनांमुळे त्वचेला कुठलाही अपाय होत नाही.
हा फेसवॉश एक नाही तर तब्बल चार प्राकृतिक गुणांनी युक्त आहे. हा फेसवॉश कोरफड, संत्र्याचं साल, कडूनिंब आणि तुळशीच्या मिश्रणाने बनवण्यात आला आहे. कोरफड तुमच्या त्वचेला नितळ बनवते तर संत्र्याचं सालीचं सत्व तुमच्या त्वचेला तजेलदार ठेवतं. तसचं ह्यातील कडूनिंब आणि तुळशीचं गुण त्वचेला डागरहित करतात आणि त्वचा स्वच्छ व मुलायम ठेवतात. ह्या फेसवॉशच्या वापराने तुमची त्वचा ड्राय होत नाही. ही खास गोष्ट आहे. किंमत- ₹ ९०.
हा फेसवॉश खासकरून अॉयली आणि पिंपल प्रोन त्वचेसाठी बनवण्यात आला आहे. कडूनिंब आणि तुळशीचे गुण त्वचेला खोलवर स्वच्छ करून तिची निगा राखतात. तसंच त्वचेला प्रत्येक प्रकारच्या बदलापासून वाचवतात. ज्यामुळे तारूण्यपीटीकांचा त्रास होत नाही. कडुनिंब आणि तुळशीच्या जंतूनाशक गुणांमुळे त्वचेवरील तारूण्यपिटीका होण्यापासून थांबवते. किंमत- ₹ ७०.
पतंजलि लेमन हनी फेस वॉश हा साबणरहित असून एक हर्बल फॉर्म्युलेशन आहे. जे हळूहळू चेहरा स्वच्छ करून तेलरहित ठेवतो. लिंबामुळे तेलकट त्वचा कोरड बनवून पिंपलपासून मुक्त होते. तर दुसरीकडे मधामुळे त्वचा मॉइश्चराइज होऊन तरुण दिसते. हा फेसवॉश तुम्ही दिवसातून दोनदा वापरू शकता. किंमत- ₹ ४५
ऑरेंज अॅलोवेरा फेस वाॅशमध्ये संत्र्याचं सत्व आणि कोरफड जेल हे दोन्ही घटक आहेत. त्यामुळे हा फेसवॉश तुमची त्वचा सुंदर बनवतो आणि पिंपल्सना दूर ठेवतो. ह्या फेसवॉशमध्ये थोड्या प्रमाणात कडुनिंब आणि तुळससुध्दा आहे. ज्यामुळे चेहरा तजेलदार होतो आणि त्वचेवरील सर्व पिंपल्सचे डागसुध्दा नाहीसे होतात. किंमत- ₹ ४५
पतंजलि रोज फेस वॉश हा गुलाब, कडूनिंब आणि कोरफड ह्या प्राकृतिक तत्वांनी बनवण्यात आला आहे. ह्याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात. त्याबरोबरच चेहरा निरोगी आणि डागविरहीत होतो. हा फेसवॉश फक्त चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या तर दूर करतोच. तसेच चेहऱ्याचे पोषणसुध्दा करतो. हा खास तेलकट त्वचेसाठी बनवण्यात आला आहे. किंमत- ₹ ४५
दिवसभरात आपल्या चेहऱ्यावर भरपूर धूळमाती लागते. त्यामुळे दिवसाखेर आपल्या त्वचेला गरज असते धूळमातीचे सर्व कण काढून ती स्वच्छ करण्याची. ह्यासाठीचं पतंजलि ने आणला आहे पतंजलि अॅप्रिकॉट फेस स्क्रब. जो तुमच्या त्वचेवरी मृत त्वचा तर हटवतोच पण त्यासोबतच तुम्हाला ब्लॅकहेडसपासूनही मुक्तता देतो. हा स्क्रब तुमची त्वचा सैल पडू देत नाही आणि ती अधिक टवटवीत करतो. किंमत- ₹ ६०
मुलतानी माती ही खूप आधीपासून चेहऱ्याची निगा आणि सुंदरता वाढवण्यासाठी वापरात आहे. पतंजलिच्या सौंदर्या मुल्तानी मिट्टी फेस स्क्रब हा तुमच्या शुष्क त्वचेवर तजेला आणून ती निरोगी आणि चमकदार बनवतो. कदाचित ह्याच्या थंडीतील वापरामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे हा स्क्रब वापरण्याची योग्य वेळ उन्हाळ्यात आहे. हा स्क्रबर खोलवर जाऊन ब्लॅक हेड्स आणि मृत त्वचा हटवतो. किंमत- ₹ ७०
तुम्हाला नावावरूनच कळलं असेल की हा पॅक कोरफड आणि मुलतानी मातीच्या मिश्रणाने बनवण्यात आला आहे. पूर्वीपासून मुलतानी माती चेहऱ्याला लावण्याचा सल्ला दिला जातो. त्याकाळी घरीच ह्या मातीचा फेसपॅक बनवला जात असे. पण आता पतंजलि प्रोडक्ट्सचे फेस पॅक अगदी सहज उपलब्ध आहेत. हे त्वचाला थंडावा देतात आणि त्यासोबतच मुलायम ही बनवतात. सोबतच कोरफडाचे गुण त्वचेला निरोगी ठेवण्याचे काम करतात. किंमत- ₹ ६०
कडुनिंब, तुळस आणि काकडी्च्या गुणांनी युक्त असा हा फेस पॅक आहे. जो अतिरिक्त तेल दूर करून चेहरा नितळ बनवतो. त्यासोबतच चेहऱ्याच्या सगळ्या समस्या जसं पिंपल्स, डाग आणि ब्लॅकहेडसला दूर करतो. ह्यातील जंतूनाशक गुणांमुळे चेहऱ्यावरील उघडी छिद्र बंद करून त्वचेला नैसर्गिक तजेला आणतो. आठवड्यातून एकदा वापरल्याससुध्दा हा पॅक तुमची त्वचा निखारण्यात सहाय्य करतो. किंमत- ₹ ६०
हे क्रीम पतंजलिच्या सगळ्यात चांगल्या स्कीन केअर प्रॉडक्टसपैकी एक आहे. जे त्वचेची आर्द्रता कायम ठेवतं. ह्या क्रीममध्ये शिया बटर, कॅमोमाइल आणि ऑलिव्ह तेलचे गुण समावि्ष्ट आहेत. जे त्वचेला रूक्षपणा आणि अकाली वार्धक्यापासून दूर ठेवतं. जर तुमचा चेहरा अकाली मोठा वाटत असेल तर हे माॅइश्चराइजर क्रीम तुमच्यासाठीच आहे.किंमत- ₹ ७५
हे क्रीम तुमच्या त्वचेला नितळ बनवण्यासोबतच चमकदार बनवतं. कोरफडाचे प्राकृतिक गुण कोरड्या त्वचेमध्ये जणू जीव ओततात आणि तिला चमकदार बनवतात. ह्या क्रीमची हीच खासियत आहे की, तुमच्या त्वचेवर अॅंटी-एजिंगचे काम करते. हिवाळ्यात ह्याचा वापर करणं उत्तम आहे, कारण तेव्हा हे क्रीम तुमच्या त्वचेचा कोरडेपणा दूर करून ती कोमल बनवतं. किंमत- ₹ ७५
कापणे, सोलणे, भाजणे किंवा किड्याने चावल्यास खूप पूर्वीपासून कोरफड्याच्या वनस्पतीपासून बनवलेल्या औषधाचा लावण्यासाठी वापर केला जातो. हे त्वचेवर होणारी प्रत्येक अॅलर्जी दूर करतं.अॅलोवेरा जेल हे पतंजलिचे एक असे उत्पादन आहे, जे तुमच्या घरात असलेच पाहिजे.किंमत- ₹ ८०
पतंजलिची सर्व उत्पादन आयुर्वेदिक असून केमिकलमुक्त आहेत. जी त्वचेला कोणत्याही प्रकारे हानी पोचवत नाहीत. उत्पादनांचा नियमित वापर केल्यास त्वचेचे बाहेरील शत्रू जसे धूळ आणि माती ह्याच्यांशी लढण्यास बळ देतात.
नाही. असं मुळीच नाही. तुम्ही जेव्हा हवं तेव्हा ह्या उत्पादनांचा वापर बंद करू शकता. ह्या उत्पादनांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
पतंजलि स्कीन एॅंड ब्युटी केअर उत्पादनांच्या यादीत सौंदर्या स्वर्ण कांती फेअरनेस क्रीमसुध्दा आहे. ह्यातील नेचरल ऑइल, हर्ब्स आणि जीवनसत्वांचे गुण त्वचेला चमकदार बनवतात आणि आधीपेक्षाही स्वच्छ करतात. पण एक लक्षात घ्या की, हे क्रीम आपल्या कोणत्याही प्राकृतिक रंगात बदल करत नाही. हे फक्त तुमच्या नैसर्गिक चेहऱ्यावरील गेलेल तेज परत आणतं आणि ताजंतवान ठेवतं.
तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:
Home Remedies & How To Use Makeup To Hide Pimples In Marathi