ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
skin care hacks

हे स्किनकेअर हॅक्स घरी अजिबात नका करू ट्राय, होईल त्वचेला त्रास

आजकाल बर्‍याच गोष्टींसाठी ऑनलाईन हॅक्सची चलती आहे. काही हॅक्स खरंच आपला वेळ आणि मेहनत वाचवतात, तर काही हॅक्स काही चांगले करण्यापेक्षा नुकसानच जास्त करतात. स्किनकेअरच्या बाबतीत तर हे विशेषतः खरे आहे. उदाहरणार्थ, मुरुमांसाठी टूथपेस्ट किंवा विक्स सारख्या गोष्टी जरी त्यामुळे त्वचेला नुकसान होत असले तरीही घराघरांत वापरल्या जातात. आज बघूया अशा स्किनकेअरच्या हॅक्स ज्या त्वचेचे नुकसानच करू शकतात. त्यामुळे या हॅक्स तुम्ही घरी कधीही वापरून पाहू नका. सर्व ब्युटी हॅक तुमच्या त्वचेसाठी चांगल्या नसतात. त्यापैकी काही खरोखरच त्वचेचे अधिक नुकसान करू शकतात. 

चेहऱ्याला वॅक्सिंग करणे 

Skin Care Hacks Not Be Tried At Home
Skin Care Hacks Not Be Tried At Home

जर तुम्हाला तुमचा चेहरा वॅक्स करायचा असेल तर तुम्ही यासाठी फक्त पार्लरमध्ये जायला हवे. पार्लरमध्ये हे करण्यासाठी व्यवस्थित ट्रेनिंग घेतलेले प्रोफेशनल ब्युटिशियन्स असतात. चेहेरा वॅक्स करून घेण्याचा उद्देश फक्त चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढणे हाच असतो. त्यामुळे व्हाईटहेड्स, डेड स्किन किंवा टॅनिंग सारख्या वरवरच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी घरीच चेहेरा वॅक्स करण्याची चूक करू नका. चेहेरा चुकीच्या पद्धतीने वॅक्स केल्यास तुमच्या त्वचेची जळजळ होऊ शकते आणि त्वचेवर कायमचे डाग पडू शकतात कारण चेहेऱ्याची त्वचा खूप नाजूक असते. 

त्वचेचा रंग उजळण्यासाठी बेकिंग सोडा वापरणे

बेकिंग सोडामध्ये त्वचा तात्पुरती उजळ करणारे गुणधर्म असले तरी, त्यामुळे तुमच्या त्वचेच्या नैसर्गिक pH मध्ये बदल होतात. ते त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकते आणि त्यामुळे त्वचा खूप कोरडी होते. त्यामुळे बेकिंग सोडा आपल्या नाजूक त्वचेवर वापरू नका. 

लिप प्लम्परसाठी दालचिनी वापरणे 

तुम्हाला इंटरनेटवर लिप प्लम्प करण्यासाठी अनेक हॅक्स सापडतील. यापैकी एक म्हणजे दालचिनी पावडर मधात मिसळून ओठांवर घासणे. पण हे लक्षात घ्या की आपल्या ओठांची त्वचा खूप पातळ व नाजूक असते आणि दालचिनी लावल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

घरच्या घरी ब्लॅकहेड्स काढणे 

Skin Care Hacks Not Be Tried At Home
Skin Care Hacks Not Be Tried At Home

 स्वतःच स्वतःचे ब्लॅकहेड्स कधीही काढू नका. तुम्ही घरीच  ब्लॅकहेड्स काढून टाकण्याचा प्रयत्न केल्याने त्वचेची जळजळ होऊ शकते आणि त्वचेवर डाग पडू शकतात. तुम्ही घरीच ब्लॅकहेड्स काढण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला वेदना देखील होऊ शकतात. एक लोकप्रिय हॅक आहे ज्यामध्ये पेट्रोलियम जेली लावून त्यावर उबदार टॉवेल ठेवायला सांगतात पण असे केल्याने तुमचे पोअर्स अधिक बंद होतील आणि तुमची समस्या आणखी वाढेल. हट्टी ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सौंदर्यतज्ज्ञांची मदत घेणे होय. 

कच्च्या अंड्याचा पांढरा भाग मास्क म्हणून वापरणे

कच्च्या अंड्याचा पांढरा भाग वापरून तयार होणारे DIY फेस मास्क गेल्या काही वर्षांपासून लोकप्रिय झाले आहेत आणि ते साधारणपणे चांगले काम करतात असे दिसते. कारण अंड्याच्या पांढऱ्यामध्ये प्रथिने आणि कोलेजन असते जे त्वचेची लवचिकता आणि दृढता सुधारण्यास मदत करतात. पण ते थेट त्वचेवर वापरल्याने काही धोका निर्माण होऊ शकतो. कच्च्या अंड्यांमध्ये अन्नातून विषबाधा करणारे साल्मोनेला सारखे बॅक्टेरिया असू शकतात ज्यामुळे त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते. 

लिंबाचा रस ब्लीच म्हणून वापरणे

Skin Care Hacks Not Be Tried At Home
Skin Care Hacks Not Be Tried At Home

 लिंबाचा रस हा एक लोकप्रिय घटक आहे जो त्वचेवर घरगुती उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आणि ते वापरण्यास सुरक्षित असताना, एकदा तुम्ही तो इतर घटकांमध्ये मिसळता किंवा डायल्युट करता तेव्हा तो तुमच्या त्वचेवर कधीही लावू नका. उदाहरणार्थ, तुमच्या चेहऱ्यावर व ओठांवर चमक आणण्यासाठी किंवा अंडरआर्म्सची त्वचा उजळ करण्यासाठी लिंबाचा रस ब्लीच म्हणून वापरल्याने त्वचेवर लालसरपणा होऊ शकतो, त्वचेची साले निघतात आणि जळजळ देखील होऊ शकते.

म्हणूनच या स्किनकेअर हॅक्स कधीच घरी ट्राय करू नयेत. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

29 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT