ADVERTISEMENT
home / मनोरंजन
sonalee kulkarni

सारे रंग रंगले, बनारसी साड्यांमध्ये खुलले सोनालीचे सौंदर्य

महाराष्ट्राची शान आणि सौंदर्याची खाण अशी सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) नेहमीच आपल्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. गेल्या काही महिन्यांपासून तर सोनालीने व्यायामाचा उत्तम ट्रॅक ठेवत स्वतःला अधिक फिटदेखील ठेवले आहे. नुकतेच तिने आपल्या सोशल मीडियावर साड्यांमधील एक रील शेअर केले असून या रीलला अत्यंत कमी कालावधीमध्ये तुफान लाईक्स मिळाले आहेत. सोनाली कोणत्याही स्टाईलमध्ये अत्यंत सुंदर दिसते. पण जसे म्हटले जाते की, कोणतीही महिला साडीइतकी सुंदर आणि आकर्षक कोणत्याही कपड्यांमध्ये दिसत नाही. सोनालीचा हा व्हिडिओ पाहून नक्कीच तिच्या चाहत्यांच्या तोंडून पुन्हा एकदा ‘अप्सरा आली’ असेच निघाले नाही तर नवलच!

अधिक वाचा – मनाची राणी जी गाते मर्जिची गाणी, अशी निराळी मैना आहे मोनालिसा बागल

सप्तरंगी साड्यांमध्ये रंगली सोनाली 

सोनाली विविध प्रकारच्या साड्या नेसून आपल्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. यावेळी सोनालीने अक्षरशः सप्तरंगाच्या बनारसी साड्या (Banarasi Saree) नेसून आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रत्येक साडीमध्ये वेगळी स्टाईल आणि वेगळा रंग आणि हे सर्व एकाच रीलमध्ये सोनालीने दाखविल्यामुळे आता या साड्यांविषयीदेखील अधिक जाणून घेण्यासाठी तिचे चाहते, विशेषतः तिच्या महिला चाहत्या उत्सुक आहेत. गडद रंगाच्या आणि सोनालीचे सौंदर्य खुलविणाऱ्या अशा या बनारसी साड्या नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. बनारसी साड्यांचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी अथवा लग्नासाठी या साड्या म्हणजे नक्कीच सर्वांचे लक्ष वेधले जाते. बनारसी साडी, आकर्षक आणि गडद रंग आणि त्यातही सोनालीचे भुरळ घालणारे सौंदर्य, यामुळे या साड्या आणि सोनालीच्या सौंदर्याचा संगम अप्रतिम रंगला असून या रीलला तुफान प्रतिसाद मिळत आहे. हिरवी, गुलाबी, केशरी, पिवळी, निळी, जांभळी, लाल, पीच अशा विविधरंगी आणि मनमोहक साड्या नक्कीच लक्ष वेधून घेत आहेत. साड्यांचे अनेक प्रकार वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी वापरता येतात.

अधिक वाचा – Bigg Boss Marathi: फिनालेच्या इतक्या जवळ असताना सोनाली पाटील झाली एलिमिनेट

ADVERTISEMENT

आकर्षक आणि लक्षवेधी सोनाली

सोनालीकडे पाहून नक्कीच या साड्यांबाबत अधिक माहिती मिळावी असं कोणत्याही महिलेला वाटेल हे निश्चित. तर दुसरीकडे प्रत्येक साडीवर वेगळा मेकअप, वेगळा लुक आणि विविध दागिन्यांचा वापर करून सोनालीचा लुक अधिक आकर्षक आणि लक्षवेधी झाला आहे. सोनाली प्रत्येक साडी आणि लुकमध्ये वेगळी दिसत आहे. सोनालीला अशा वेगवेगळ्या लुकमध्ये पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले आहेत आणि सोनाली आता काही नवे प्रोजेक्ट करत आहे का? अथवा कोणत्या नव्या जाहिरातीमध्ये झळकणार आहे की काय असे प्रश्नही त्यांच्या मनात येऊ लागले आहे. दरम्यान या साड्या एका क्लोथिंग ब्रँडच्या असून या सर्वच साड्या सोनालीने उत्तमरित्या कॅरी केल्या आहेत. सध्या सोनाली आपल्या ‘पांडू’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून पुढील चित्रपटांच्या चित्रीकरणामध्येही व्यस्त आहे. तसंच नुकतेच ‘झिम्मा’ या तिच्या चित्रपटालाही उत्तम प्रतिसाद आणि यश मिळेल आहे. पांडू या चित्रपटानेही हाऊसफुल्लची पाटी झळकवली आहे. त्यामुळे सोनालीचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. तर आता सोनालीचा पुढचा चित्रपट कोणता असणार आणि सोनाली कोणत्या भूमिकेत आता दिसणार याचीच उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. 

अधिक वाचा – Year End 2021: यावर्षी हे मराठी कलाकार झाले आई-बाबा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

20 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT