ADVERTISEMENT
home / आरोग्य
cough home remedies

रात्रीच्या वेळेतच सतावणाऱ्या खोकल्यावर हे उपाय करा

खोकला झाला की त्याचा दिवसभर त्रास होतो. खोकून खोकून घसा काय पण बरगड्यांच्या खाली देखील दुखायला लागते. तब्येत बरी नसताना शांत झोप मिळाली की जरा बरं वाटतं पण खोकला होतो तेव्हा दिवसा काय रात्री देखील आपण शांत झोपू शकत नाही. खोकल्याची ढास आपल्याला रात्रभर जागे ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला आणखी थकल्यासारखे वाटते. खोकला व दातदुखी या अश्या गोष्टी आहेत ज्या रात्रीच जास्त त्रास देतात. त्यामुळे रात्रीच सतावणाऱ्या खोकल्यावर उपाय केला नाही तर शांत झोप मिळत नाही. 

रात्रीच्या वेळेतच येणाऱ्या खोकल्यावर आपण काही सोपे उपाय करू शकतो. बहुतेक वेळा, घरगुती उपचार किंवा ओव्हर-द-काउंटर (OTC) औषधांनी आपली खोकल्याची ढास थांबते. परंतु त्याने काही फरक पडत नसेल तर डॉक्टर एखादे खोकल्यावरील स्ट्रॉंग औषध लिहून देऊ शकतात ज्यामुळे आपल्याला शांत झोप लागते. 

खोकला कशामुळे होतो?

तुम्हाला सर्दी, सायनस इन्फेक्शन, टॉन्सिल्सचा त्रास असेल किंवा फ्लू झाला असताना जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या भरलेल्या नाकातून किंवा सायनसमधून कफ तुमच्या घशात येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला रात्री जास्त खोकला येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या घशाच्या मागील बाजूस खवखवते आणि त्यामुळे अस्वस्थ होऊन खोकला काढण्याची इच्छा होते किंवा इतर कारणांमुळे तुम्हाला रात्री जागवणारा खोकला देखील होऊ शकतो.

ज्यांना दम्याचा त्रास असतो त्यांच्या फुफ्फुसातील हवेच्या नळ्या अरुंद होतात आणि बंद होतात आणि खूप जास्त श्लेष्मा तयार होऊ शकतो. दमा असलेल्या लोकांना कोरडा खोकला देखील होऊ शकतो कारण ते श्वास घेत असताना पुरेशी हवा घेत नाहीत. कधी कधी हवेतील परागकण किंवा धूळ किंवा इतर कशाची ऍलर्जी झाल्यासही खोकला येतो.किंवा गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्समुळे आणि धूम्रपानामुळेही खोकला होऊ शकतो. कशाहीमुळे झाला असला तरी खोकला रात्रीच्याच वेळेला जास्त त्रास देतो. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – मिनिट्समध्ये खोकला होईल गायब, बनवा घरगुती सिरप

खोकल्याची ढास कमी करण्याचे उपाय 

खोलीतली हवा ओलसर करण्यासाठी ह्युमिडिफायर वापरा किंवा झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करा किंवा गरम पाण्याची वाफ घ्या. 

झोपताना अतिरिक्त उशी घेऊन इनक्लाईंन्ड पोझिशनमध्ये झोपा. परंतु असे फार वेळ झोपू नका नाहीतर मान व पाठीवर ताण पडून पाठदुखी किंवा व्हर्टिगोचा त्रास होऊ शकतो. 

रात्री झोपताना हळद व मधाचे चाटण घ्या. पाव चमचा हळद व एक चमचा मध असे एकत्र करून ते चाटण घ्या व त्यावर पाणी पिऊ नका. किंवा लवंग भाजून तिची पूड करा व ती चमचाभर मधातून घ्या. लवंग खोकल्यासाठी खूप फायदेशीर आहे.  खोकल्यासाठी आलं, तुळस, अडुळसा, लवंग अश्या बऱ्याच औषधी वनस्पती खूप परिणामकारक आहेत.

ADVERTISEMENT

झोपताना गरम पाण्यात मीठ घालून त्याने गुळण्या करा व झोपताना सोसवेल इतके गरम पाणी प्या. 

डॉक्टरांना विचारून एखादा सलाईन किंवा सॉल्टवॉटर नेझल स्प्रे वापरून पहा.

एक चमचा मध खा.मधामुळे घश्याला बरे वाटते आणि ढास थांबते किंवा एक चमचा आल्याचा रस व मध यांचे चाटण घ्या. आलं व मध हे दोन्हीही खोकल्यासाठी फायदेशीर आहेत. किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने कफ पातळ करणारे एखादे एक्स्पेक्टोरंट घ्या. 

फार दिवस घरगुती औषधांवर विसंबून राहू नका. जास्त दिवस खोकला जात नसेल तर डॉक्टरांना विचारून आवश्यक त्या चाचण्या करून घ्या म्हणजे तुम्हाला वेळेत उपचार मिळून तुमचा त्रास जाईल.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – सावधान! सर्दी खोकल्याचा त्रास वाढतोय

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

15 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT