ADVERTISEMENT
home / Dry Skin
Organic Body Butter

बॉडी बटरचा नक्की उपयोग काय, कोणते वापरावेत

( Dry, Itchy Skin? These Organic Body Butters Are All You Need)

जर तुम्ही नियमितपणे त्वचेची काळजी घेत असाल आणि प्रामाणिकपणे स्किनकेअर रुटीनचे पालन करत असाल तर बॉडी बटर हे प्रॉडक्ट तुम्हाला माहितीच असेल.बॉडी बटर हा मॉइश्चरायझरचाच एक प्रकार आहे जो आपल्या त्वचेला खोलवर हायड्रेट करतो. बॉडी बटर हे साधारणपणे  कोकोआ बटर, शिया बटर आणि मँगो बटरपासून बनवलेले एक घट्टसर क्रीम असते. तुमच्या त्वचेला अधिक पोषण मिळावे व निस्तेज कोरड्या त्वचेला आराम देण्यासाठी बॉडी बटरमध्ये कधी इसेन्शियल ऑईल्स देखील मिसळली जातात. 

Body Butter Benefits For Skin |  बॉडी बटरचा उपयोग
Body Butter Benefits For Skin

कोरड्या त्वचेसाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो पण बॉडी बटर कोरड्या आणि खरखरीत झालेल्या त्वचेला पुन्हा मऊ व निरोगी करण्यात मदत करते. नैसर्गिक घटकांपासून बनवलेले बॉडी बटर त्वचेमध्ये आर्द्रता लॉक करून त्वचा पुन्हा पूर्ववत मऊ बनवते. कोरडी त्वचा अकाली वृद्ध दिसू शकते. कोरड्या त्वचेवर सुरकुत्या फार लवकर येतात आणि त्यामुळे व्यक्ती अकाली वृद्ध दिसते. परंतु मॉइश्चरायझ्ड, निरोगी दिसणारी आणि चमकदार त्वचा आपले खरे वय लपवू शकते. म्हणूनच जर अकाली वृद्ध दिसायचे नसेल तर त्वचेची नियमितपणे काळजी घेणे आवश्यक असते. त्वचेची काळजी घेण्यात नैसर्गिक घटकांपासून बनवलेले ऑरगॅनिक बॉडी बटर तुमची मदत करू शकते.  बॉडी बटरचा आणखी एक उत्तम गुण म्हणजे ते वापरण्यास सोपे आहेत आणि अनेक उद्देश पूर्ण करतात. तुम्ही पुढीलपैकी एखादे बॉडी बटर वापरू शकता. हे बॉडी बटर्स ऑरगॅनिक आहेत आणि तुमच्या त्वचेसाठी अगदी सुरक्षित आहेत. 

ऑरगॅनिक हार्वेस्टचे ऑरगॅनिक बॉडी बटर विथ हनी मिल्क या बॉडी बटरमध्ये मध आणि दुधाचे पौष्टिक घटक आहेत. हे रिच बॉडी बटर त्वचेला 8 ते 12 तास मॉइश्चरायझेशन देऊन कोरड्या त्वचेला पुन्हा मऊ बनवते आणि संरक्षित करते. हे बॉडी बटर त्वचेत लगेच शोषले जाते आणि त्वचा तेलकट देखील होत नाही. हे 100% ऑरगॅनिक आहे व पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही त्वचेसाठी वापरण्यास योग्य आहे आणि केवळ कोरड्या त्वचेसाठी नव्हे तर सर्वच प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. रात्री झोपताना स्वच्छ आणि कोरड्या त्वचेवर पुरेशा प्रमाणात बॉडी बटर लावा. ते शोषले जाण्यासाठी 1 मिनिट हलक्या हाताने मसाज करा. यामध्ये शिया बटर, ग्लिसरीन, मँगो बटर, कोकोआ बटर, कोरफडीचा गर असे औषधी घटक आहेत. 

स्त्रियांना गरोदरपणानंतर त्वचेवर स्ट्रेच मार्क्स येतात. या स्ट्रेच मार्क्सना कधी कधी खाज देखील सुटते. अशावेळी या स्ट्रेच मार्क्सवर लावण्यासाठी सिरोनाचे स्ट्रेच मार्क्स बॉडी बटर फायदेशीर आहे. 

ADVERTISEMENT

सिरोना स्ट्रेच मार्क्स बॉडी बटर हे नैसर्गिक घटकांनी युक्त प्रॉडक्ट स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी आणि टाळण्यासाठी उपयुक्त आहे. हे त्वचेला खोलवर आर्द्रता देते आणि त्वचेला येणारी खाज शांत करते व  कोरड्या त्वचेला पुन्हा ओलावा देते. यामध्ये व्हिटॅमिन ए आहे जे स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी कोलेजनची पुनर्बांधणी करण्यास मदत करते. यात असलेल्या अवाकाडो ऑइलमध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई व ओमेगा -3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात आहेत जे खराब झालेली त्वचा रिपेअर करतात आणि मऊ करतात. याशिवाय यात कोकोआ बटर, शिया बटर आणि कोकोनट ऑइल देखील आहे जे त्वचेच्या पृष्ठभागावर आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी संरक्षणात्मक थर तयार करतात. 

गरोदरपणात वाढणाऱ्या पोटामुळे त्वचा ताणली जाते. तसेच हॉर्मोनल बदलांमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो ज्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्वचेला खाज सुटते आणि स्ट्रेच मार्क्स येतात. द मॉम्स को. च्या नॅचरल बॉडी बटर मध्ये  मॉइश्चरायझिंग तेलांसह कोकोआ आणि शिया बटरचे औषधी गुण आहेत जे तुमच्या त्वचेची नैसर्गिक लवचिकता वाढवतात व तुमच्या ताणल्या गेलेल्या पोटाच्या त्वचेला, नितंबांना आणि स्तनांना आराम देतात. दिवसातून एकदा लावल्यास या बॉडी बटरमुळे त्वचेला 24 तास मॉइश्चरायझेशन मिळते. 

ऑरगॅनिक हार्वेस्टचे ऑरगॅनिक बॉडी बटर विथ कॉफी हे रॉ आणि अनरिफाईंड बटर आहे. याचा रिच फॉर्म्युला त्वचेला 8 ते 12 तास मॉइश्चरायझेशन देऊन कोरड्या व निस्तेज त्वचेला बरे करतो. या बॉडी बटरमध्ये  कॉफीचे औषधी घटक आहेत. कॉफीमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचा दाह शांत करण्यास मदत करतात.  कॉफीमध्ये असणारे क्लोरोजेनिक ऍसिड (CGA) आणि मेलेनोइडिन्स हे घटक त्वचेचा दाह कमी करतात. तसेच यातील शिया बटर, मँगो बटर, कोकोआ बटर, Capuacu Butter हे औषधी घटक स्त्रिया व पुरुषांच्याही त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

हे नैसर्गिक घटकांनी युक्त ऑरगॅनिक बॉडी बटर तुम्हाला कोरड्या त्वचेसाठी वापरता येतील.

ADVERTISEMENT

Photo Credit- istockphoto 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

25 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT