ADVERTISEMENT
home / Mythology
महिलांची बॅग सांगते त्यांचा स्वभाव, जाणून घ्या तुमची बॅग काय सांगते

महिलांची बॅग सांगते त्यांचा स्वभाव, जाणून घ्या तुमची बॅग काय सांगते

महिलांसाठी त्यांची बॅग ही सगळ्यात महत्वाची साथीदार आहे. कारण महिलांना लागणाऱ्या सगळ्या वस्तू या बॅगमधून कॅरी केल्या जातात. पण प्रत्येकाची बॅगची निवड ही वेगळी असते. काहींना लहान बॅग आवडतात काहींना मोठ्या बॅग आवडतात. पण बॅगची आवड ही प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असते किंवा बॅगेच्या निवडीवरुन तुमचा स्वभाव अवलंबून असतो. तुम्ही कोणती बॅग कॅरी करता त्यावरुन तुमचा स्वभाव कसा आहे ते जाणून घ्या आणि तुम्हाला तो पटला की लगेच तुमच्या मैत्रिणीसोबतही ही पोस्ट नक्की शेअर करा.

तुमच्या चपलांवरुन कळतो तुमचा स्वभाव, जाणून घ्या तुमचा स्वभाव

शोल्डर बॅग

खूप जणांकडे शोल्डर बॅग असते. महिलांची ओळखच शोल्डर बॅगपासूनच होते. ऑफिसला जाण्यापासून ते अगदी बाहेर जाण्यापर्यंत सगळ्याच जणांकडे अशा प्रकारच्या बॅगा असतात. पण काही जणांना काही खास शोल्डर बॅग असतात. त्यांच्यासाठी अशा बॅग या स्टाईल आणि स्टेटस सिबाँल असतात. अशा व्यक्तिंना बॅग दाखवायला खूप आवडतात. त्यांच्यासाठी बॅग ही फॅशन स्टेटमेंट असते. अशा व्यक्ती या कामामध्ये खूपच हुशार असतात. त्यांना त्यांची काम करायला खूप आवडतात. एखाद्या असलेल्या वस्तूंपासून नवनव्या गोष्टी करायच्या असतील तर ही लोकं यामध्ये खूपच माहीर असतात.

ADVERTISEMENT

ब्रिफकेस बॅग

ब्रिफकेस बॅग ही तुमची कडक पर्सनॅलिटी दाखवते. अशा व्यक्ती आत्मविश्वासू असतात. त्यांना त्यांच्या वागण्यावर पूर्णपणे विश्वास असतो. अशा व्यक्ती या नेतृत्व करण्यास  योग्य असतात. अशा लोकांमध्ये लीडरशीप क्वालिटी असते. अशा व्यक्ती लॅपटॉप आणि त्यांचे डॉक्युमेंट घेऊन जाण्यासाठी अशा बॅग वापरतात.हल्ली खूप जणांकडे या बॅगा असतात. पण तरीही अशा बॅग काही जणांनाच घेऊन जायला आवडतात. अशा महिलांना त्यांचा मुद्दा पटवून द्यायला खूप आवडतो. अशा महिला कामाच्या ठिकाणी त्यांचा मुद्दा पटवून देतात आणि आपली सत्ता कायम ठेवतात. 

 तुमच्या नखांच्या आकारावरून ओळखा तुमचा स्वभाव

क्लचेस बॅग

क्लचेस बॅग

Instagram

ADVERTISEMENT

क्लचेस बॅग या लहान आणि क्युट असतात. अशा बॅग ही खूप जणांची ओळख असते. छोट्या अशा या बॅगा फॅन्सी असतात ती तुमची फॅन्सी पर्सनॅलिटी दाखवतात. अशी लोकंही पार्टी अॅनिमल असतात. अशांना पार्टी करणे बाहेर सतत भटकणे आवडते. अशी माणसं खूप सोशलाईज असतात. त्यांना खूप जणांमध्ये मिसळायला आवडते. अशांना जर पार्टीला घेऊन गेले तर त्या सगळ्यांचे आकर्षण बनतात आणि त्यांना तसे आवडतेसुद्धा. त्यामुळे ज्या सगळीकडे अशाच बॅगा घेऊन जातात. त्यांचा सर्वसाधारणपणे स्वभाव हा असाच असतो. 

#coffeelover आणि #Tealover लोकांचा स्वभाव नेमका असतो कसा?

सॅक

सगळ्या वस्तू राहण्यासाठी सॅक ही काही जणांसाठी सर्वोत्तम असा पर्याय आहे. खूप सामान राहण्यासाठी ही बॅग अनेक महिला घेतात. पण अशा बॅग वापरणाऱ्या महिला या थोड्या अघळपघळ असतात. त्या कायमच गोंधळललेल्या असतात. सतत काही ना काही सामान घेऊन त्यांना त्यामध्ये सगळे सामान घेऊन जायला आवडते. अशा व्यक्ती या प्रेमळ असतात. मनाने त्या नाजूकही असतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव आणि वागणे वेळेवेळेला बदलते. कधी कधी या व्यक्ती चिडखोरही होतात. पण तरीही त्या मनाने अधिक चांगल्या असतात.

ADVERTISEMENT

वॉलेट

Instagram

खूप जणांना काहीही कॅरी करण्याचा कंटाळा असतो. अशा महिलांना फक्त त्यांचे पाकिटच घेऊन जायला आवडते. अशा महिला या क्लासी असतात. त्यांना फार ताण घ्यायला आवडत नाहीत. अशा महिलांना बाहेर जाताना फक्त त्यांचे इंप्रेशन पाडायला आवडते. अशा महिला या अॅक्टिव्ह असतात. त्यांनी केलेली कोणती स्टाईल कधीही वाया जाणार नाही. जर तुम्हीही अशी बॅग कॅरी करत असाल तर तुमचाही स्वभाव काहीसा असाच असेल 

तुम्ही कोणती बॅग कॅरी करता यावरुन तुम्हाला तुमचा स्वभाव नक्कीच कळेल.

ADVERTISEMENT
06 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT