अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या लंडनमध्ये राज कुंद्रासह लंडनमध्ये वेकेशनवर आहे. शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर 3’ मध्ये परिक्षक होती. नुकताच सुपर डान्सरचा तिसरा भाग संपला आहे. सहाजिकच त्यामुळे ती पती आणि मुलासह लंडनमध्ये वेकेशनवर गेली आहे. शिल्पा शेट्टीने लंडनवरून एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर प्रेक्षकांच्या मजेशीर कंमेट येत असून तो सोशल मीडियावर सध्या फारच व्हायरल होत आहे.
शिल्पाचा मजेशीर व्हिडिओ तुम्ही पाहिला का
शिल्पाने लंडनमधून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शिल्पा एका तळ्याकाठी काही बदकांना ब्रेड खाण्यास देत असल्याचं दिसत आहे. शिल्पा बदकांना मजेत ब्रेड खाण्यास देत होती. मात्र अचानक काही बदके तिच्या फारच जवळ आल्याने शिल्पाची घाबरगुंडी उडाली. ज्यामुळे तिने हातातील ब्रेड टाकून दिला आणि चक्क तिथून पळ काढला. शिल्पाने या व्हिडिओमध्ये मरून रंगाचा टी-शर्ट आणि ब्लू जीन्स घातली आहे. शिवाय तिच्याजवळ लहान-मोठी अनेक बदके या व्हिडिओत दिसत आहेत. शिल्पाच्या हातातील ब्रेड पाहून सर्व बदके अचानक शिल्पाजवळ आल्याने ती या व्हिडिओमध्ये घाबरली आहे. शिल्पाचा हा मजेशीर व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांना नक्कीच हसू आवरता येत नाही आहे. आश्चर्य म्हणजे शिल्पाने स्वतःच हा व्हिडिओ तिच्या इंस्टा अकाऊंटवरून शेअर केला आहे. शिवाय तिने राज, शिल्पा आणि तिचा मुलगा वियान असं आम्ही तिघंही दरवर्षी बदकांना खाऊ घालण्यासाठी येतो. बदकांनी ब्रेडसोबत मलादेखील चोच मारली असती म्हणून मी घाबरले. कारण बदकांची चोच टोकदार नसली तरी मोठी आणि लांब असते. ज्याची मला भीती वाटली असं तिने या पोस्टसोबत शेअर केलं आहे.
शिल्पा लंडनमध्ये अशी करतेय मौजमस्ती
काही दिवसांपासून शिल्पा लंडन ट्रिपमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिने तिच्या समर पार्टीचे काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती सचिन तेंडूलकर, पती राज कुंद्रा आणि तिचा मुलगा वियान, बहिण शमीता शेट्टी, पार्टीचे होस्ट सीम कंवर आणि निरज कंवर यांच्यासोबत दिसत होती.
शिल्पा पुन्हा करतेय बॉलीवूडमध्ये कमबॅक
शिल्पा शेट्टीने बाजीगर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिचाया चित्रपटातील रोल हा फार मोठा नसला तरी अत्यंत महत्वाचा होता. या चित्रपटानंतर शिल्पा शेट्टी कधीच थांबली नाही. तिने एका पेक्षा एक चांगले असे चित्रपट केले. त्यामुळे तिचे बॉलीवूडमधील स्थान अढळ आहे. अभिनयाव्यतिरिक्त तिला फिटनेसची आवड असल्यामुळे ती तिचे अनेक फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे अनेक योगा व्हिडिओ परदेशातही प्रसिद्ध आहेत. शिल्पाने आता पुन्हा चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिल्पाने बारा वर्षापूर्वी उद्योगपती राज कुंद्रासोबत लग्न केलं. लग्न आणि मुलाच्या जन्मानंतर शिल्पा चित्रपटसृष्टीपासून दूर गेली होती. लाईफ इन मेट्रो नावाचा तिचा तसा शेवटचा चित्रपट त्यानंतर ती चित्रटातून दिसली नाही. मात्र शिल्पा आता पुन्हा तिच्या चाहत्यांना चित्रपटातून दिसणार आहे. शिल्पा नेमक्या कोणत्या चित्रपटात काम करणार आहे हे मात्र अजून जाहीर करण्यात आलेलं नाही. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने चित्रपटात कमबॅक करण्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. ती म्हणाली की, माझ्याकडे चांगली स्क्रिप्ट आली असून मी ती करण्याच्या विचारात आहे. लवकरच या संदर्भातील घोषणा मी माझ्या चाहत्यांसाठी करणार आहे. असे शिल्पाने सांगितले आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी चित्रपटात पुन्हा येत आहे हे नक्की.
अधिक वाचा –
12 वर्षानंतर शिल्पा शेट्टी करणार कमबॅक… लवकरच करणार घोषणा
शिल्पा शेट्टीने मुलगा वियान सोबत केलं वर्कआऊट
संजीवनी मालिका सतरा वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम