ADVERTISEMENT
home / आरोग्य
मुलांना लहान वयातच व्यायामाची सवय लावणं का आहे गरजेचं

मुलांना लहान वयातच व्यायामाची सवय लावणं का आहे गरजेचं

लहान मुलांना योग्य शारीरिक वाढ आणि विकासासाठी व्यायामाची गरज असते. योग्य वयात मुलांना व्यायामाची सवय लावल्यास त्यांच्या शारीरिक रचनेवर चांगला परिणाम होतो. लहानपणापासून व्यायाम करणारी मुले मोठेपणी अतिलठ्ठ होत नाहीत. शिवाय व्यायामाची सवय असल्यामुळे त्यांची हाडे आणि स्नायू मजबूत आणि लवचिक होतात. ज्याचा त्यांना आयुष्यभर फायदाच होतो. मुले खेळासाठी नेहमीच उत्साही असतात. मात्र त्यांची  खेळ आणि शारीरिक हालचालीमुळे खूप ऊर्जा खर्च होत असते. ज्यामुळे शारीरिक वाढ आणि विकासासाठी सतत ऊर्जेची गरज असते. मुलांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम फायद्याचा ठरतो. यासाठीच जाणून घ्या मुलांच्या शारीरिक विकासासाठी व्यायाम का आहे महत्त्वाचा.

मुलांची शारीरिक वाढ आणि विकास चांगला होतो –

मुलांची वाढ आणि विकास हा झपाट्याने होत असतो. मात्र जर तुमची मुलं व्यायाम अथा योगासने करत असतील तर त्यांची वाढ योग्य पद्धतीने होते. ज्याचे चांगले परिणाम त्यांच्या भविष्यात दिसून येतात. मुलांची उंची वाढण्यासाठी, हाडे आणि स्नायूंचा योग्य विकास करण्यााठी मुलांना लहानपणापासूनच व्यायामाची सवय लावा. 

मुलांचे वजन अतीप्रमाणात वाढत नाही –

बालपण हे असं एक वय असतं ज्या वयात काहिही खाल्लेलं सहज पचतं. शिवाय लहानपणी खाण्या-पिण्याबाबत फार बंधने पाळली जात नाहीत. या वयात योग्य पोषणासाठी सर्व प्रकारच्या पोषक गोष्टी मुलांनी खाणं गरजेचं असतं. मात्र या वयात मुलं अपथ्यकारक  अनेक पदार्थ खातात. ज्यामुळे काही मुलं लहानपणी अती लठ्ठ होतात. यासाठीच जर मुलांना लहानपणीच व्यायामाची सवय लावली तर त्यांच्या वजन आणि शरीरयष्ठीवर वाईट परिणाम होत नाही. 

ADVERTISEMENT

Shutterstock

लहान मुलांमधील Motor skills विकसित होतात –

काही Motor skills मुळे मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास चांगला होतो. शिवाय यामुळे मुलांना लिहण्याची, बोलण्याची, वाचन करण्याची, स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावणं सोपं जातं. 

मुलांमधील आत्मविश्वास वाढतो –

व्यायामाचा मुलांच्या शरीर आणि मनाचा विकास होतो. टीनएजमधील मुलांच्या भावनिक विकासासाठी व्यायामाची नक्कीच गरज असते. कारण याचा परिणाम त्यांच्या स्वभाव आणि आत्मविश्वासावर होतो. मुलांच्या व्यक्तिमत्वाला सुरेख पैलू देण्यासाठी त्यांना व्यायामासाठी प्रोत्साहन करणं पालकांच्या फायद्याचं ठरू शकतं. 

ADVERTISEMENT

Shutterstock

अभ्यासाचा ताणतणाव कमी होण्यास मदत होते –

पूर्वीपेक्षा आजकाल मुलांच्या अभ्यासात फार वाढ झाली आहे. शाळा, कोचिंग क्लासेस, निरनिराळ्या स्पर्धा, इतर क्लासेस, प्रोजेक्ट्स  अशा अनेक गोष्टीमुळे मुलांची आणि पालकांची चांगलीच दमछाक होते. ज्यामुळे अभ्यास आणि इतर गोष्टींमध्ये अव्वल असण्याचा ताण मुलांवर नकळत येतो. या ताणतणावाला हाताळण्यासाठी मुलांना व्यायामाची चांगली मदत होऊ शकते. 

मुलांचा मानसिक आणि भावनिक विकास होतो –

शरीरासोबत मुलांची योग्य मानसिक वाढ होणंही तितकंच गरजेचं असते. व्यायामामुळे मुलांच्या शरीरातील रक्तभिसरण सुधारते. ज्यामुळे मुलांच्या मेंदूला रक्त आणि ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो. ज्यामुळे मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासावर चांगला परिणाम होतो. यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते, निर्णय क्षमता सुधारते. 

ADVERTISEMENT

Shutterstock

मुलांना कोणत्या वयात आणि कोणते व्यायाम शिकवावे –

तुम्ही मुलांना कोणत्याही वयात व्यायाम शिकवू शकता. मात्र पाच वर्षांच्या आतील मुलांना निराळे आणि पाच वर्षांच्या वरील मुलांसाठी निराळे व्यायाम सूचवले जातात. पाच वर्षांच्या आतील मुलांसाठी कोणत्याही अॅरोबिक अॅक्टिव्हिज तुम्ही शिकवू शकता. ज्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, इंटरव्हल ट्रेनिंग, स्ट्रेचिंग, कोर बिल्डिंग अॅक्टिव्हिटीजचा समावेश असू शकतो. शिवाय मुलांना नृत्य, शारीरिक खेळ यांच्या माध्यमातूनही व्यायाम मिळू शकतो. पाच वर्षांच्या वरील मुलांसाठी मात्र तुम्ही जिम्नॅस्टिक, व्यायाम, सायकल चालवणे, योगासने, शारीरिक कसरती असे व्यायाम शिकवून त्यांचा विकास तुम्ही घडवून आणू शकता. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

लहान मुलांना वाचनाची गोडी कशी लावाल

लहान मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सोप्या टिप्स

ADVERTISEMENT

लहान मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल

 

13 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT