2019 सालामध्ये अनेक अभिनेत्रींनी सिनेजगतात कमबक केलं. या अभिनेत्री जास्तकरून 70 ते 80 च्या दशकातील आहेत. विशेष म्हणजे आपल्या काळात हिट ठरलेल्या दोन अभिनेत्री पुन्हा एकदा एकाच सिनेमात दिसल्या. चला जाणून घेऊया कोण आहेत या कमबॅक करणाऱ्या अभिनेत्री.
बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या सुपरहिट सौतन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरेने पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक केलं आहे. या चित्रपटाचं नाव आहे पानिपत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अविनाश गोवारीकरने केलं आहे. तर मल्टीस्टारर असलेल्या या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त आणि कृती सनोन हे कलाकार आहेत. पद्मिनी यांच्या कमबॅकबाबत खुद्द गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्वीट केलं होतं. त्यांनी लिहीलं होतं की, नमस्कार माझी भाची पद्मिनी कोल्हापुरे खूप चांगली कलाकार आहे. आता ती पानिपत चित्रपटात गोपिका बाईंची भूमिका करत आहे. मी पद्मिनीला आशिर्वाद देते. सोबतच आशुतोष आणि त्यांच्या टीमलाही शुभेच्छा देते.
जुन्या काळातील ग्लॅमरस अभिनेत्री झीनत अमान बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. योगायोग म्हणजे ती ही पानिपत या चित्रपटातून कमबॅक करतेय. झीनत या चित्रपटात सकीना बेगमची भूमिका करत आहे. हा चित्रपट 1761 साली पानिपतमध्ये झालेल्या तिसऱ्या लढाईवर आधारित आहे. जी अफगाण आणि मराठ्यांमध्ये झाली होती. झीनत या चित्रपटांद्वारे तब्बल 30 वर्षानंतर आशुतोष गोवारीकरसोबत काम करणार आहे.
Year Ender 2019: या वर्षी हिट ठरला बायोपिक फॉर्म्युला
अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांचा बदला हा सस्पेन्स चित्रपट याच साली रिलीज झाला. या चित्रपटातून सारा अली खानची आई म्हणजेच अमृता सिंग हिने पुन्हा कमबॅक केलं आहे. या चित्रपटात अमृताने राणी कौरची भूमिका केली आहे. अमृता सिंग ही सैफ अली खानची पहिली बायको आहे. लग्नानंतर अमृताने बॉलीवूडपासून दूर राहणं पसंत केलं होतं.
Year Ender:2019 मध्ये हे बॉलीवूड कलाकार झालेत मालामाल
बॉलीवूडमध्ये अभिनेत्री सेलिना जेटलीने 2003 साली ‘जानशीन’ या चित्रपटातून करियरला सुरूवात केली होती. या चित्रपटात सेलिनासोबत फरदीन खान हा अभिनेता होता. हा चित्रपट काही खास चालला नव्हता. पण या चित्रपटाची गाणी मात्र लोकांना पसंत पडली होती. यानंतर ही सेलिनाने काही चित्रपटात काम केलं पण तिचा अभिनय काही लोकांच्या पसंतीस पडला नाही. त्यानंतर सेलिनाने विदेशी बिजनेसमनसोबत लग्न केलं. आता सेलिना पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. सेलिनाच्या कमबॅक चित्रपटाचं नाव आहे ‘अ ट्रिब्यूट टू रितुपर्णो घोष: सीजन्स ग्रीटिंग्स’. या चित्रपटाच्या निमित्ताने सेलिना तब्बल सात वर्षानंतर बॉलीवूडमध्ये येत आहे. या चित्रपटाचं शूटींग पूर्ण झालं आहे.
YEAR ENDER : बॉलीवूडमधल्या या जोड्यांचं झालं ब्रेकअप
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.