जान्हवी आणि इशानच्या रिलेशनशिपबाबत बोनी कपूरचा खुलासा

जान्हवी आणि इशानच्या रिलेशनशिपबाबत बोनी कपूरचा खुलासा

श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टरने धडक चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री दिसली होती. त्यामुळे त्याय दोघांमध्ये निर्माण होणाऱ्या नात्याबाबत सर्वत्र चर्चा होऊ लागली. जान्हवी आणि इशान एकमेकांच्या जवळ आल्याच्या बातम्या सध्या वारंवार येत आहेत. इशान आणि जान्हवी वारंवार भेटतात आणि एकमेकांसोबत जास्तीतजास्त वेळ घालवतात असं म्हटलं जात आहे. एवढंच नाही तर इशान जाव्हवीला भेटण्यासाठी तिच्या घरीदेखील जातो अशी चर्चा आहे. मात्र आता या दोघांच्या रिलेशिपबाबत बोनी कपूरने एक खुलासा केला आहे.

Instagram

काय म्हणाले बोनी कपूर

एका मुखाखतीदरम्यान बोनी कपूरने त्याची मुलगी जान्हवी आणि इशानच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. बोनी कपूर यांनी सांगितलं की, “ जान्हवी आणि इशानने धडक चित्रपटात एकत्र काम केलं. ज्यामुळे त्या दोघांमध्ये एक चांगली मैत्री निर्माण झाली आहे. मी माझ्या मुलीवर प्रचंड प्रेम करतो ज्यामुळे मी तिच्या इशानसोबतच्या मैत्रीचा नक्कीच सन्मान करतो. मात्र तिचे आणि इशानचे नाते मैत्रीच्या पलीकडचे आहे हे मला मुळीच मान्य नाही.लोकांच्या मनात असलेला हा एक खूप मोठा गैरसमज आहे. शिवाय इशान धडक चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून कधीच आमच्या घरी जान्हवीला भेटण्यासाठी आला नाही. त्यामुळे त्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल फक्त मैत्रीचीच भावना आहे. दुसरं काही नक्कीच नाही.”

Instagram

इशान आणि जान्हवीची केमिस्ट्री

जान्हवी कपूर आणि इशान खट्टरची धडकमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच आवडली होती. धडक चित्रपटात जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या दोघांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा दोघांचाही पहिला चित्रपट होता. मराठी सुपरहिट चित्रपट सैराटच्या कथेवर आधारित चित्रपट होता. या चित्रपटादरम्यान जान्हवी आणि इशान यांच्यात चांगली मैत्री झाल्याचं दिसून आलं होतं. ज्यामुळे ते दोघं एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. बऱ्याचदा त्या दोघांना एकत्र पाहण्यात येतं. ज्यामुळे त्यांच्या अफेअरबाबत बातम्या येऊ लागल्या. इशान सतत जान्हवीच्या घरी जातो आणि बोनी कपूरने त्या दोघांचं नातं मान्य केलं आहे असंही म्हटलं जात होतं. 

Instagram

जान्हवीचे आगामी चित्रपट

जान्हवी सध्या रूह अफ्जाच्या शूटिंगमध्ये व्यस्त  आहे. यानंतर ती करण जोहरच्या तक्त या अॅक्शनड्रामामध्ये देखील झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, करिना कपूर, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. तसंच जान्हवी गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्येदेखील असणार आहे. थोडक्यात जान्हवी तिच्या आगामी चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचं दिसून येत आहे. सुदैवाने स्टार किड असल्यामुळे तिला पदार्पणातच अनेक चित्रपट मिळाले आहेत. मात्र आता या आगामी चित्रपटांकडून तिच्या चाहत्यांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत. या चित्रपटांसोबत तिच्या इशान खट्टरसोबत असलेल्या नात्याच्या बातम्यांनादेखील उधाण आलं होतं. मात्र आता बोनी कपूरने केलेल्या या खुलाश्यामुळे या चर्चेवर पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा

EX बॉयफ्रेंड हार्दिक पांड्यामुळे उर्वशी रौतेला हैराण, फॅन्सना केली विनंती

#BBM2 : धक्कादायक निकालात माधव देवचके झाला एलिमिनेट

रोहित आणि विराटचं बिनसलं, विराटनंतर अनुष्कालाही केलं unfollow

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम