ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘शोले’ चित्रपटाचा रिमेक एकाच अटीवर बनवणार

‘शोले’ चित्रपटाचा रिमेक एकाच अटीवर बनवणार

बॉलीवूडमध्ये रिमेक बनवणं हे काही नवीन नाही. अशा चित्रपटांची नेहमीच चलती असते. मग तो दाक्षिणात्य चित्रपट असो वा जुन्या बॉलीवूड चित्रपट व गाण्यांना नव्या पद्धतीने करून लोकांसमोर आणलं जात आहे. पण अशा रिमेक कलाकृतींवर बरेचदा टीकेचा सूरच ओढला जातो. तसंच काहीजण क्लासिक चित्रपटांच्या रिमेकच्या विरोधात बोलत आहेत. अशीच बातमी आली आहे ती 1975 साली आलेल्या कल्ट क्लासिक शोले चित्रपटांबद्दल. ज्याबाबत निर्माते-दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी त्यांचं म्हणणं मांडलं.

रमेश सिप्पी यांची अट एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितलं की, मी शोलेचा रिमेक बनवण्याबाबत उत्साहित नाही. पण जर कोणी अगदी हटके अंदाजात हा चित्रपट सादर करण्याचा विचार केला तर मी यावर विचार करेन. नाहीतर मला शोले रिमेक बनवण्यात अजिबात रस नाही. पण याचा अर्थ असाही नाही की, मी रिमेकच्या विरोधात आहे. अनेक चित्रपटांचा चांगल्या पद्धतीने रिमेक बनवण्यात आला आहे. एखाद्या चित्रपटाला तुम्ही दुसऱ्यांदा नव्याने कसं मांडता यालाही महत्त्व आहे. 

शोलेचा रिमेक येणार का? तुम्हाला माहीत असेलच की, 2007 साली निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्माने शोलेचा राम गोपाल वर्मा की आग या नावाने रिमेक बनवला होता. जो सुपरफ्लॉप झाला होता. या चित्रपटावर खूप टिकाही झाली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अजय देवगण यांसारखे कलाकारही होते. पण त्या चित्रपटाला शोलेचा रिमेक कितपत म्हणावं याबाबत शंकाच आहे.

Flashback : धर्मेंद्र यांनी उगारला होता शोमॅन सुभाष घईंवर हात

ADVERTISEMENT

मल्टीस्टारर शोले

ओरिजिनल चित्रपटाबाबत बोलायचं झाल्यास आजही शोले चित्रपट टीव्हीवर लागल्यावर तो हमखास पाहिला जातो. लोकांना आजही या चित्रपटाचे संवाद तोंडपाठ आहेत. 15 ऑगस्ट 1975 साली हा चित्रपट रिलीज झाला होता. ज्यामध्ये धर्मेंद्र, अमिताभ बच्चन. हेमामालिनी, जया भादुरी, संजीव कुमार आणि अमजद खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील प्रत्येक भूमिका लोकांच्या मनावर कोरली गेली आहे. मग ती जेलर झालेल्या असरांनीची असो वा सूरमा भोपाली जगदीप यांचा केमियो असो. शोलेचे फॅन्स आजही ते विसरलेले नाहीत.

रमेश सिप्पी यांनी सांगितलं की, एवढी मोठ्या स्टारकास्टसोबत सर्व एक्शन दृश्य करणं त्याकाळी फार अवघड होतं. पण मला आनंद आहे की, आमचे प्रयत्न वाया गेले नाहीत. आज 45 वर्षांनंतरही लोकांचं या चित्रपटावरील प्रेम कायम आहे. रमेश सिप्पी यांनी शोलेशिवाय अंदाज, सीता और गीता, शान, शक्ती आणि सागर असे माईलस्टोन चित्रपट बनवले आहेत. तसंच सध्या लॉकडाऊन दरम्यान दाखवण्यात येणारी जुनी क्लासिक मालिका बुनियादही त्यांचीच निर्मिती होती.

महानायकाच्या आणखी एका चित्रपटाचा रिमेक, आता रणवीर सिंह साकारणार ‘शहेनशाह’

हेही वाचा – असे बॉलीवूड स्टार्स ज्यांचं यश त्यांच्या आईला पाहता आलं नाही

ADVERTISEMENT
21 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT