कपूर घराण्यातील ‘जग्गा जासूस’ हा इन्स्टावर नसला तरी तो सगळ्यांना स्टॉक करतो असा खुलासा त्याची एक्स गर्लफ्रेंडने केला आहे. हा जग्गा जासूस म्हणजेच रणबीर कपूर आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड म्हणजे कतरिना कैफ… एका कार्यक्रमात कतरिना एक्स बॉयफ्रेंडसंदर्भातील खुलासा केला आणि सगळ्यांनाच शॉक बसला..आता थोडं थांबा. लगेच तुम्ही तुमचे इन्स्टाग्राम अकाऊंट स्टॉक करायला जाऊ नका कारण असे करुन तुमच्या हाती फार काही लागेल असे वाटत नाही.
काय म्हणाली कतरिना ?
कतरिना अरबाजच्या पिंच या शोमध्ये गेस्ट म्हणून गेली होती. त्यावेळीच तिने या गोष्टी शेअर केल्या आहेत. या दोघांचे ब्रेकअप झाले असले तरी रणबीरच्या काही गोष्टी कतरिना माफ करु शकली नाही. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या ब्रेकअपबद्दल देखील सांगितले होते. पण या कार्यक्रमात जेव्हा अरबाजने कतरिनाला एक प्रश्न केला … हा प्रश्न असा होता की, तू सोशल मीडियावर कधी फेक अकाऊंटचा वापर केला आहे. त्यावर कतरिना लगेचच म्हणाली की, मी कधीच सोशल मीडियावर फेक अकाऊंटचा वापर करत नाही. हा पण रणबीर कपूर हा फेक अकाऊंटचा उपयोग करतो आणि सगळ्यांवर नजर ठेवतो. आता रणबीरबद्दल तिला असे का बोलावेसे हे काय माहीत नाही. पण रणबीर कपूर सगळयांवर नजर ठेवतो हे नक्की! विशेष म्हणजे मला रणबीरनेच इन्स्टाग्राम शिकवले हे सांगायलाही ती विसरली नाही.
…आणि कतरिना, रणबीरचे बिनसले
गणेश गायतोंडे परत येतोय… आला sacred Games 2 चा टीझर
कतरिना आणि रणबीरची लव्हस्टोरी फारच गाजली होती. ही दोघं लग्न करतील असे देखील वाटत होते. कारण कतरिना सून म्हणून कपूर घराण्यालाही पसंद होती. पण अचानक त्यांच्या नात्यात असे काही तरी झाले की, त्यानंतर दोघांनी आपआपले मार्ग वेगळे केले. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी कतरिना त्या नात्याबदद्ल सगळ्यासमोर व्यक्त झाली. तिने या नात्यातील दुराव्यासाठी कोणालाच जबाबदार धरले नाही तर तिने स्वत:च त्याची जबाबदारी स्विकारली. सध्या कतरिनाचा एक्स बॉयफ्रेंड तिचीच मैत्रीण आलिया भटला डेट करत आहे. तो आलियाशी लग्न करणार असे देखील कळत आहे.
कपूर घराणेच जासूस
आता हे म्हणण्याचे कारण इतकेच की, रणबीरच्या नात्यातली आणखी एक कपूर भगिनी इन्स्टाग्रामवर नाही. पण ती देखील अशाच पद्धतीने स्टॉक करत असते. ती अन्य कोणी नाही तर करीना कपूर आहे. करीनानेदेखील कॉफी विथ करणमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यामुळे या भाऊ-बहिणींना लोकांच्या आयुष्यात डोकं घालायला आवडते. पण फेक अकाऊंटमधून…या दोघांनाही गॉसिपमध्ये फारच रस असल्याचे देखील म्हटले जाते. त्यांना बी टाऊनमध्ये घडणाऱ्या भानगडी माहीत असतात, असे देखील समोर आले होते.
इशा देओलचं बेबी शॉवरचे फोटो पाहिलेत का?
‘भारत’मध्ये व्यग्र
कामाबाबत बोलायचे झाले तर सध्या कतरिना तिच्या नव्या चित्रपटात बीझी आहे. सलमान खानसोबत ती या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटातील तिची भूमिका आणि तिचा लुक, विशेषत: तिचा अभिनय यामध्ये चांगला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळेआता या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेकजण पाहात आहेत.
(सौजन्य- Instagram)