बॉलीवूडची चांदनी अर्थात श्रीदेवी यांना जाऊन काल एक वर्ष झाले. दुबईला एका लग्नसमारंभासाठी श्रीदेवी गेल्या होत्या. तेथेच बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. श्रीदेवींची आठवण पुन्हा ताजी करण्यासाठी श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवींची एक साडी लिलावात काढली आहे. ही साडी अशी तशी नसून श्रीदेवींची जांभळ्या रंगाची कोटा सिल्क साडी आहे. या साडी विक्री मागील हेतूही खूप चांगला आहे. त्यामुळे आता काही लाखांच्या घरात या साडीची किंमत गेली आहे. अद्याप या साडीची विक्री करण्यात आलेली नाही. पण या साडीची किंमत आणखी वाढण्याची शक्यता सांगितली जात आहे. सोशल मीडियावर त्यांच्या यासाडीचे फोटो शेअर करण्यात आले आहे.
या चित्रपटांमुळे श्रीदेवी झाल्या सुपरस्टार
साडीतून समाजकार्य
बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या साडीच्या कलेक्शनमधून ही हँडिक्राफ्ट साडी काढली आहे. कोटा सिल्कमधील ही साडी जांभळ्या रंगाची आहे. साडीचे अंक चेक्सचे असून इन्स्टाग्रामवर श्रीदेवींनी नेसलेल्या या साडीचा फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. या साडीच्या विक्रीतून विधायक कार्य करण्याचा निर्णय बोनी कपूर यांनी घेतला. या साडीच्या विक्रीतून सेवाभावी संस्थेला मदत करणार आहे. या साडीची विक्री ४० हजार रुपयांपासून सुरु झाली. आता या साडीची किंमत १ लाख ३० हजार रुपये इतकी झाल्याची कळत आहे. अद्याप या साडीची विक्री झालेली नाही. त्यामुळे काही तासात या साडीची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. जितक्या लाखांना ही साडी विकली जाईल तितका फायदा एका सेवाभावी संस्थेला होणार आहे. कारण ही सेवाभावी संस्था महिला आणि लहानमुलांच्या विकासासाठी काम करणार आहे. त्यामुळे या साडीला जास्तीत जास्त किंमत मिळणे गरजेचे आहे.त्यामुळे या साडीचा लिलाव अद्याप थांबवण्यात आला नाही.
‘श्रीदेवी बंगलो’वर चिडले बोनी कपूर
एकापेक्षा एक सरस साड्या
श्रीदेवींचा अभिनय जितका चर्चेचा विषय होता. तितक्याच त्यांच्या साड्याही चर्चेत राहिल्या. त्यांच्या कपाटात एकापेक्षा एक सरस साड्या होत्या. त्यांच्याकडे सिल्क आणि साऊथ इंडियन साड्यांचे कलेक्शन होते. श्री देवींचे सौंदर्य साडीमध्ये अधिक खुलून दिसायचे हे आपण त्यांच्या कित्येक सिनेमांमध्ये पाहिले आहे. त्यांच्याकडे अगदी पारंपरिक साड्यांपासून ते आताच्या ट्रेंडी साडयांचेही उत्तम कलेक्शन होते. सिल्क साड्या या त्यांच्या आवडीच्या होत्या.त्यांनी घातलेल्या साध्या साडीचीही क्रेझ त्याकाळात पाहायला मिळाली आहे. मिस्टर इंडिया चित्रपटात ‘काटे नही कटते’ या गाण्यामधील त्यांची निळी शिफॉन साडी आठवते का? अगदीच प्लेन साडी होती ती. पण श्रीदेवीनंतर ही साडी इतकी प्रसिद्ध झाली की, त्यानंतर या साडीची क्रेझच आली. अनेक वर्ष अशा प्लेन साड्या फॅशन इन होत्या.
जुन्या साड्यांपासून बनवा साड्यांचे असे हटके पॅटर्न
झिरोमध्ये दिला गेस्ट अपिअरंस
शाहरुख खानचा ‘झीरो’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट दणदणीत आपटला असला तरी या चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी कॅमिओ केलेले आहेत. त्यापैकीच एक श्रीदेवी होत्या. या कॅमिओमध्ये त्यांनी एक हिरव्या रंगाचा सिक्वेन्स पार्टी ड्रेस परिधान केला आहे. त्यात त्या सुंदर दिसत आहे. या चित्रपटात त्यांनी शेवटचा कॅमिओ केला. त्या आधी त्यांचा मॉम हा चित्रपट प्रदर्शित झाला. श्रीदेवींनी बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटात काम केले. इंग्लिश विंग्लिश हा सिनेमा खूप प्रसिद्ध झाला. गौरी शिंदे श्रीदेवींना घेऊन आणखी एक चित्रपट करणार होती. पण त्या ‘मॉम’ आणि जान्हवीच्या डेब्यू चित्रपटात इतक्या व्यग्र होत्या की, त्यांना हा चित्रपट करायला वेळ मिळाला नाही.
(सौजन्य-Instagram)