सानिया मिर्झाच्या बहिणीचा निकाह होणार मोहम्मद अझरुद्दीनच्या मुलाशी

सानिया मिर्झाच्या बहिणीचा निकाह होणार मोहम्मद अझरुद्दीनच्या मुलाशी

2019 च्या सेलिब्रिटी लग्नांच्या यादीत नाव असणार आहे ते टेनिस स्टार (Tennis Star) सानिया मिर्झा (Sania Mirza) ची बहीण अनम मिर्झा (Anam Mirza) हीचं. जिचं लग्न लवकरच टीम इंडिया (Team India) चा पूर्व कप्तान मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharudin) चा मुलगा मोहम्मद असद (Mohammad Asad) शी लग्न करणार आहे. बऱ्याच काळापासून या दोघांच्या अफेयर आणि लग्नाबद्दल चर्चा होत होती. अखेर या चर्चांना खरं ठरवत सानिया मिर्झाने स्वतः या बातमीला दुजोरा दिला. 

एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, 'अनम डिसेंबर महिन्यात लग्न करत आहे. नुकतीच पॅरीसमध्ये तिची स्पिन्स्टर पार्टी साजरी करण्यात आली आणि आम्ही खूपच उत्साहित आहोत.’ या पार्टीचे फोटोजही सोशल मीडियावर मिर्झा बहिणींनी शेअर केले आहेत. 

View this post on Instagram

💝

A post shared by Anam Mirza (@anammirzaaa) on

बहीण सानियाने दिला दुजोरा

View this post on Instagram

💛

A post shared by Anam Mirza (@anammirzaaa) on

खरतंर अनम मिर्झाने (Anam Mirza) ने सोशल मीडियावर मोहम्मद असद (Mohammad Asad) सोबतचा तिचा फोटो शेअर केला होता आणि त्याला कॅप्शन दिलं होतं की, 'फॅमिली'. या फोटोनंतर दोघांच्याही लग्नाच्या अफवांनी जोर धरला होता. मग याबाबत खुलासा करताना सानियाने सांगितलं की, ती एका चांगल्या मुलाशी लग्न करत आहे. त्याचं नाव असद असून तो मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा आहे. पण सानियाने दोघांच्या निकाहच्या तारखेचा उल्लेख केला नाही पण एवढं सांगितलं की, लग्न डिसेंबरमध्ये असेल.

असदलाही करायचंय क्रिकेटमध्येच करिअर

अनम आणि असद हे गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. हे कपल नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतं. असदलाही वडिलांप्रमाणे क्रिकेटर व्हायचं असून तो सध्या गोवा रणजी टीमचा भाग आहे.

दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात

View this post on Instagram

You can't sit with us. 👸👸

A post shared by Anam Mirza (@anammirzaaa) on

सानिया मिर्झाची बहिणी ही फॅशन स्टाईलिस्ट असून तिचं हे दुसरं लग्न आहे. अनमचं पहिलं लग्न 2016 साली हैदराबादच्या बिजनेसमन अकबर राशिदशी झालं होतं. या लग्नाला फिल्म, राजकारण आणि फॅशन जगतातील अनेक सेलिब्रिटीजनी उपस्थिती लावली होती. पण तिचं पहिलं लग्न दोन वर्षातचं तुटलं आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

फराह खानने आधीच केला होता इशारा

सानिया मिर्झाची घनिष्ट मैत्रिण आणि फिल्ममेकर फराह खानने काही दिवसांपूर्वीच अनमकडे इशारा करत तिचा ब्राइड टू बी वाला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. सानिया आणि अनम मिर्झा (Anam Mirza) सोबतचा तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत फराह खानने लिहीलं होतं की, पिलो टॉक,जेव्हा मिर्झा बहिणी एकत्र असतील तेव्हा एकत्र वेळ घालवायलाचं हवा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे.तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.