ADVERTISEMENT
home / सौंदर्य
फळांच्या सालींनी घालवा पिंपल्सचे डाग

पिंपल्सचे डाग घालवतील या फळांच्या साली

 चेहऱ्यावर पिंपल्स येणे हे काही आपल्यासाठी फारसे नवे नाही. साधारणपणे मासिक पाळी, हार्मोन्स या बदलामुळे त्वचेवर पिंपल्स येत असतात. काही पिंपल्स हे येतात तसे निघून जातात. त्यांचे डाग फार काळ टिकत नाहीत. पण काही पिंपल्स (Pimples) हे इतके जिद्दी असतात की, त्यांचे डाग जाता जात नाहीत. अशावेळी हे  पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी खूप जण बरेच शर्थीचे प्रयत्न करतात. पण तुम्हाला  माहीत आहे का? खूप महागड्या क्रिम्सही जितका बदल घडवू शकणार नाही तितक फरक हा फळांच्या सालीमुळे होऊ शकतो. फळांच्या काही साली या पिंपल्सचे डाग हळुहळू कमी करण्यास मदत करतात. त्यामध्ये असलेले घटक हा बदल घडवून आणत असतात. चला जाणून घेऊया यासंदर्भातील अधिक माहिती 

अधिक वाचा: त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय | Skin Diseases Ayurvedic Remedies In Marathi

केळ्याची साल  (Banana Peel)

केळ्याची साल 

बारमाही मिळणारी ही केळीही आरोग्यासाठी फारच फायद्याची असतात. यामध्ये असलेले अनेक घटक जसे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अगदी त्याचप्रमाणे ते त्वचेसाठीही चांगले असतात. केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. जे त्वचेवरील तेलाला नियंत्रित करण्याचे काम करतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट हे त्वचेची इलास्टिसिटी वाढवण्यासाठी मदत करतात. केळ खाऊन झाल्यानंतर केळ्याची साल ही देखील अनेक गुणांनी युक्त असते. या सालीमध्ये असलेले घटक चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग हळुहळू कमी करण्यास मदत करतात. 

संत्र्याची साल (Orange Peel)

संत्र्याची साल

आंबट- गोड संत्री ही अनेकांच्या आहारात नक्कीच असतील. व्हिटॅमिन C ने युक्त अशा संत्र्याच्या सालीमुळे त्वचा तजेलदार आणि स्वच्छ दिसण्यास मदत मिळते. संत्र्याची साल ताजी असताना ती पिंपल्स आलेल्या ठिकाणी चोळली तरी देखील पिंपल्सचे डाग कमी होण्यास मदत मिळते. पिपंल्सचे नाही तर सनबर्न किंवा चेहऱ्यावर आलेली लालिमा कमी होण्यासही त्यामुळे मदत मिळते. जर तुम्हाला ताजी संत्र्याची साल मिळाली नाही तर तुम्ही पावडर आणून देखील ती भिजवून डागांवर लावू शकता. 

ADVERTISEMENT

पपई (Papaya)

पपईच्या साली

पपई ही देखील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सनी युक्त असते. यामध्ये असलेले ब्लिचिंग एजंट हे त्वचेसाठी फायद्याचे असतात. पपई खाल्यानंतर त्याच्या साली तोंडाला चांगल्या चोळा. ज्या ठिकाणी तुम्हाला पिंपल्सचे डाग असतील त्या ठिकाणी चोळा त्यामुळे हे डाग मुळापासून जाण्यास मदत मिळते. पपईचा गर ही घरात असेल तर तो देखील तुम्ही काढून ठेवला आणि त्याचे आईसक्युब बनवून चेहऱ्यासाठी वापरला तरी देखील त्वचा अधिक सुंदर दिसण्यास मदत मिळते. 

आता फळांच्या साली नक्की वापरा आणि तुमच्या त्वचेवरील पिंपल्सचे डाग घालवा.

अधिक वाचा : त्वचा रोगाचे प्रकार | Types of Skin Disease In Marathi

07 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT