ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
homemade cc cream

अशा प्रकारे घरीच बनवा सीसी क्रीम, येईल चेहेऱ्यावर नैसर्गिक चमक 

बहुतेक महिला मेकअप करताना चेहऱ्यावर सीसी क्रीम वापरतात. ते लावल्याने आपल्या चेहेऱ्याची त्वचा नितळ दिसते. सीसी क्रीम आपल्या चेहऱ्यावरील डाग आणि व्रण काही प्रमाणात लपवू शकते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ते फाउंडेशनऐवजी वापरू शकता. सीसी क्रीम लावल्याने, तुम्हाला चेहेऱ्यावर एकसारखी चमक आणि पोत मिळेल. मात्र, दरवेळी महागडी सौंदर्य उत्पादने खरेदी करणे प्रत्येकालाच शक्य नसते. अशा परिस्थितीत महिला त्यांच्या चेहऱ्यावर स्वस्त आणि कमी दर्जाची उत्पादने वापरतात ज्याचा त्यांच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. कारण खराब दर्जाची उत्पादने वापरल्याने त्वचेचे नुकसान होते. म्हणूनच बाजारातून सीसी क्रीम खरेदी करण्यापेक्षा तुम्ही ते घरीही बनवू शकता. घरीच सीसी क्रीम कसे बनवायचे तसेच त्या संबंधित सर्व काही जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. 

बीबी क्रीम की सीसी क्रीम, कोणते वापरावे 

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही बीबी क्रीम वापरावे. बीबी क्रीममध्ये हायड्रेटिंग गुणधर्म आढळतात. तर मुरुम आणि तेलकट त्वचेची समस्या असलेल्या महिलांनी सीसी क्रीम लावावे. सीसी क्रीममध्ये व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे त्वचेचे बाह्य घटकांपासून संरक्षण करते. काही चांगल्या दर्जाच्या सीसी क्रीममध्ये ग्रीन टी, सोया आणि शिया बटर हे औषधी घटकआढळतात, ज्यामुळे आपली त्वचा मऊ होते. सीसी क्रीममध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आढळतात, ज्यामुळे चेहरा नितळ दिसतो. सीसी क्रीम लावून तुम्ही उन्हापासून होणारे त्वचेचे नुकसान टाळू शकता, कारण त्यात एसपीएफचे गुणधर्म देखील असतात. 

Homemade CC Cream
Homemade CC Cream

सीसी क्रीम (CC Cream) मध्ये काय असते 

सीसी क्रीम हे कलर कंट्रोलर आणि कॉम्प्लेक्शन करेक्टर आहे. सीसी क्रीम विशेषतः त्वचेचा रंग उजळ करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे, मुरुमांचे व्रण आणि काळे डाग लपवू शकता. सीसी क्रीम खूप लाईट असते. त्यामुळे ते लावल्याने तुम्हाला असे वाटणार नाही की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर काही लावले आहे. उन्हामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही हे क्रीम वापरू शकता.

घरी सीसी क्रीम कसे बनवायचे 

तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या किंवा सहज मिळणाऱ्या काही गोष्टींच्या मदतीने सीसी क्रीम सहज घरी बनवू शकता. यासाठी फक्त खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

ADVERTISEMENT

साहित्य – 1 टीस्पून मॉइश्चरायझर , 1 टीस्पून एलोवेरा जेल , फाउंडेशन ,सनस्क्रीन . कॉम्पॅक्ट पावडर , लाइट पिंक ब्लश पावडर

कृती – 1 चमचे मॉइश्चरायझर, 1 टीस्पून एलोवेरा जेल, थोडेसे फाउंडेशन, सनस्क्रीन, कॉम्पॅक्ट पावडर आणि हलक्या गुलाबी रंगांची ब्लश पावडर एका भांड्यात घ्या आणि सर्व गोष्टी नीट मिक्स करा. त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. तुमचे होममेड सीसी क्रीम तयार आहे. हे क्रीम एका डबीत ठेवा जिला पक्के झाकण असेल. हे  क्रीम तुम्ही रोजही वापरू शकता. हे होममेड क्रीम लावण्यापूर्वी फक्त एकदा पॅच टेस्ट करून घ्या जेणे करून तुम्हाला एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असेल तर ती लगेच लक्षात येईल आणि चेहेऱ्याच्या त्वचेला त्रास होणार नाही. 

Homemade CC Cream
Homemade CC Cream

उन्हाळ्यात सीसी क्रीम वापरण्याचे फायदे

सीसी क्रीम उन्हाळ्यासाठी एक योग्य पर्याय आहे. कारण या क्रीमचा पोत हलका असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे हे म्हणजे क्रीम वितळत नाही. तुम्हाला संतुलित स्किन टोन हवा असेल, तर तुम्ही फाउंडेशनऐवजी त्याचा वापर करू शकता. तसेच यामध्ये सनस्क्रीन असल्याने ते उन्हापासून होणारे त्वचेचे त्रास कमी करण्यास उपयोगी आहे. 

Photo Credit – istockphoto

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

09 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT