चाळीशीनंतर त्वचेवर एजिंगच्या खुणा दिसू लागणं हे नैसर्गिक आहे. कारण वाढत्या वयासोबत तुमच्या त्वचेतील कोलेजीन, नैसर्गिक तेल आणि लवचिकपणा हळू हळू कमी होऊ लागतो. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. अशा कोरड्या त्वचेवर वातावरणातील बदलांमुळे फाईन लाईन्स, सुरकुत्या पडतात. तुमच्या चेहऱ्यावर अशा एजिंगच्या खुणा दिसण्याआधीच त्यावर उपाय करायला हवेत. ज्यामुळे चाळीशीतही तुम्ही तरूण मुलींप्रमाणे सुंदर दिसाल. चाळीशीनंतर निरोगी राहण्यासाठी हेल्दी डाएट आणि व्यायामावर भर देणं गरजेचं आहे. तितकंच आवश्यक आहे त्वचेची काळजी घेणं कारण ज्यामुळे तुम्ही सुडौल आणि सुंदर दिसाल. यासाठी फॉलो करा या स्किन केअर टिप्स
स्किन एक्सफोलिएट करणं आहे आवश्यक –
एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये ही गोष्ट असायलाच हवी. स्किन एक्सफोलिएट करण्यासाठी चांगल्या स्क्रबचा वापर करा. जर तुमची त्वचा ड्राय असेल तर एखादं क्रिम बेस्ड स्क्रब वापरा. ज्यामुळे तुमच्या त्वचेला पोषणदेखील मिळेल. तेलकट त्वचेच्या महिलांनी जेल बेस्ड स्क्रब वापरावं ज्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होईल. त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून गेल्यामुळे तुम्हाला फ्रेश आणि टवटवीट वाटू लागेल.
Shutterstock
त्वचा मॉईस्चराईझ करण्यास मुळीच विसरू नका –
वाढत्या वयानुसार तुमच्या त्वचेतील मऊपणा कमी होत जातो आणि एजिंगच्या खुणा निर्माण होतात. यासाठीच त्वचा योग्य प्रमाणात लवचिक राहणं गरजेचं आहे. त्वचेतील मऊपणा आणि लवचिकपणा टिकवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी त्वचेला मॉईस्चराईझर लावणं आवश्यक आहे. नेहमी त्वचेच्या गरजेनुसार मॉईस्चराईझर अथवा फेस सीरमचा वापर करा.
डार्क स्पॉट करेक्टर वापरा –
चेहऱ्यावरील पिंपल्स, पिगमेंटेशन, डाग, व्रण आणि एजिंग मार्क्स ही तुमच्या वाढत्या वयाची लक्षणे आहेत. यांना कमी करण्यासाठी बाजारात व्हिटॅमिन सी युक् डार्क स्पॉट करेक्टर मिळतात. याचा वापर त्वचेवर नियमित करायला हवा. शिवाय काही मेडिकेडेड क्रिमनेही तुम्ही चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी करू शकता.
Shutterstock
घरात असतानाही सनस्क्रीन लावणं आहे गरजेचं –
सर्वांनीच सनस्क्रीन वापरणं अत्यंत गरजेचं आहे .चाळीशीच्या पुढील महिलांनी मात्र ते न विसरता वापरावं कारण यामुळे तुमच्या त्वचेचं प्रखर सुर्यप्रकाश आणि त्यातून येणाऱ्या अतिनिल किरणांपासून सरंक्षण होते. सनस्क्रिन घरात असतानाही वापरा कारण टिव्ही आणि मोबाईलच्या प्रकाश किरणांचादेखील तुमच्या त्वचेवर परिणाम होत असतो. शिवाय सनस्क्रिन निवडताना ते एसपीएफल 30 च्या पुढील आणि पी ए रटिंग असलेलं खरेदी करा.
Shutterstock
रात्री नाईट क्रिमचा करा वापर –
रात्री झोपताना त्वचेला चांगलं नाईट क्रिम आणि आय क्रिम लावण्यास मुळीच विसरू नका. कारण नाईट क्रिम मुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील आणि आय क्रिममुळे तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स कमी होतील. रात्र भर त्वचेला आराम मिळण्यासाठी हे स्किन केअर रूटिन फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे.
भरपूर पाणी प्या –
निरोगी शरीर आणि तजेलदार त्वचेसाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. कारण पाणी आणि फळांचे रस यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. तुमच्या त्वचेला आवश्यक अॅंटि ऑक्सिडंट यातून मिळू शकतात. दिवसभरात तुमच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे हे ओळखा आणि त्यानुसार थोड्या थोड्या वेळाने पाणी प्या.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
दूध पावडरने येईल चेहऱ्यावर ग्लो, असा करा वापर
टीनएज मुलींसाठी स्कीन केअर टिप्स, त्वचा राहील कायम चिरतरूण
घरगुती पद्धतीने ब्लॅकहेड्स काढून थकलात तर या पद्धती करा ट्राय