ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
psoriasis make up hacks

सोरायसिसचा त्रास असताना मेकअप कसा करावा

चेहऱ्यावर असो किंवा तुमच्या शरीराच्या इतर भागांवर असो, सोरायसिसमुळे शारीरिक त्रास तर होतोच. शिवाय मनस्ताप होतो तो वेगळाच. शरीराच्या दृश्य भागावर सोरायसिसचा पॅच असला तर संकोचल्यासारखे होते. जर चेहेऱ्यावर सोरायसिसचा पॅच असेल तर सण-समारंभांना मनासारखा मेकअपही करता येत नाही. पण काळजी करू नका. सोरायसिस असला तरी तुम्ही सगळी काळजी घेऊन नक्कीच चांगला मेकअप करू शकता.  

खरं तर सोरायसिस काही असा लपवून ठेवण्यासारखा आजार नाही. तो त्वचेला होणारा एक त्रास आहे आणि तो बऱ्याच लोकांना असतो. काही टिप्स आणि युक्त्या व थोडा सराव केला तर  तुम्ही तुमचे पॅचेस कुठेही असतील ते मेकअपने  झाकूू शकता आणि नितळ त्वचेचा लूक मिळवू शकता. 

पहिली स्टेप- क्लिंझिंग

मेकअप करतानाची पहिली स्टेप म्हणजे तुमची त्वचा नेहमीप्रमाणे स्वच्छ करून घ्या.तुमच्या डॉक्टरांनी वापरण्यास सांगितलेले क्लीन्सर वापरून चेहेरा स्वच्छ धुवून घ्या. तसेच तुम्हाला डेड स्किन सेल्स काढायच्या असतील तर वॉशक्लोथने हळुवार चेहरा स्वच्छ करा. वॉशक्लॉथने त्वचेवरचा मृतपेशी निघून जाण्यास मदत होईल. हे करणे   महत्त्वाचे आहे, कारण ते तुमच्या त्वचेवर राहिल्यास पोपडे निघाल्यासारखा मेकअप दिसू शकतो. चेहरा हळुवार स्वच्छ करताना आपल्या संवेदनशील त्वचेची काळजी घ्या. 

अधिक वाचा मानसिक आजारामुळे त्वचाविकार होऊ शकतात का?

ADVERTISEMENT

मॉइश्चराइजर लावा

चेहरा स्वच्छ केल्यानंतर तो मऊ नॅपकिन किंवा टॉवेलने कोरडा करा आणि नंतर  सुगंधविरहित, हायपोअलर्जेनिक आणि नॉनक्लोगिंग असलेले मॉइश्चरायझर लावा. कुठलेही नवे प्रॉडक्ट त्वचेवर लावण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मॉइश्चरायजर लावल्यानंतर दहा मिनिटे थांबा आणि ते तुमच्या त्वचेमध्ये मुरू द्या. कारण पुढे जाण्याआधी आपली त्वचा हायड्रेटेड असायला हवी. आपल्याला सोरायसिसच्या आजूबाजूची त्वचा हायड्रेटेड हवी आहे, परंतु ती चिकट तेलकट व्हायला नको. जर त्वचा चिकट-तेलकट असली तर त्यावर मेकअप टिकणार नाही.

प्रायमर लावा 

एकदा त्वचेमध्ये मॉइश्चरायझर चांगले मुरले की मग पुढची स्टेप म्हणजे प्रायमर लावणे होय. कुठलाही मेकअप करताना आपण आधी प्रायमर लावले पाहिजे. प्रायमरमुळे  सोरायसिसचा पॅच झाकण्यास मदत होते. पेंट प्रायमर प्रमाणे त्वचेवर देखील प्रायमर लावल्यास मेकअपसाठी एक नितळ बेस तयार होतो.  

योग्य मेकअपचा वापर करा 

सोरायसिसच्या प्रॉब्लेम पॅचेससाठी आपल्याला मेकअपचा जाड थर लावावा लागतो. किंवा त्वचेवर उठलेले लाल चट्टे झाकण्यासाठी आपल्याला एखादे लाईट लिक्विडचा पर्याय वापरावा लागतो. तुमच्या त्वचेसाठी योग्य प्रोडक्ट कुठले आहे हे निवडताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणे करून तुम्हाला तुमच्या त्वचेसाठी योग्य प्रॉडक्ट्स निवडणे सोपे होईल. चेहऱ्यावर लावण्याआधी प्रत्येक प्रॉडक्टची पॅच टेस्ट करा. हाताच्या मागच्या बाजूला छोट्या पॅचमध्ये ते प्रॉडक्ट लावून बघा. जर तुमच्या त्वचेला त्याने काही त्रास झाला नाही तर तुम्ही ते मेकअपसाठी वापरू शकता.  

अधिक वाचा – खास व्यक्तीला भेटायला जाताना असा करा मेकअप, टाळा या चुका

ADVERTISEMENT

योग्य शेडची निवड करा

तुमच्या त्वचेच्या रंगाशी मिळतीजुळती शेड निवडा. आपल्यासाठी योग्य शेड कोणती हे बघण्यासाठी सोरायसिसच्या पॅचच्या जवळ असणाऱ्या त्वचेवर वेगवेगळ्या शेड्स ट्राय करून बघा. कधी कधी त्वचेच्या रंगाशी तंतोतंत जुळणारी शेड मिळते तर कधी दोन शेड्स एकत्र करून आपल्याला हवी ते शेड मिळवता येते. 

सोरायसिसचा पॅच झाकणे

जर तुम्ही चेहेऱ्याव्यतिरिक्त तुमचा गुडघा किंवा कोपरावर असलेला पॅच झाकण्यासाठी मेकअप करत असाल तर मेकअप करताना हात /पाय सरळ न ठेवता तो दुमडून ठेवून मगच मेकअप करा नाहीतर काही ठिकाणी मेकअप नीट लागणार नाही. 

मेकअप झाल्यानंतर लूझ पावडरने ब्रश करून किंवा स्प्रे मारून मेकअप सेट करा. तसेच मेकअप काढतानाही तो घासून काढू नका. हळुवार काढा. गरज पडल्यास पेट्रोलियम बेस्ड मेकअप रिमूव्हरची मदत घ्या. पण त्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. पुढच्या वेळेला मेकअप करताना या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि आत्मविश्वासाने मेकअप करा. 

अधिक वाचा – नवीन वर्षात ब्युटी रेजिममध्ये करा हे महत्वाचे बदल

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

 

10 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT