ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
nails cutting

रात्री नखं का कापू नयेत, काय आहे तथ्य

आपल्या हाताचे सौंदर्य वाढविण्याचे काम नखं करतात. नखं वाढवून त्याला योग्य आकार देऊन नेलपॉलिश लावल्यास, अधिक सुंदर दिसतात. हात अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण नखांचीही तितकीच काळजी घेतो. नखं वाढवताना त्याची काळजी घेणे आणि वेळोवेळी ती कापणेही गरजेचे आहे. अनेक घरांमध्ये नखं रात्री कापू नयेत असं सांगण्यात येते. नखं रात्री कापल्यास आजारी पडायला होतं असं म्हटलं जातं. तर काही ठिकाणी नखं रात्री कापण्याच्या बाबतीत काही अंधश्रद्धाही पाळल्या जातात. तर काही जणं सांगतात रात्री नखं कापणं योग्य नाही. पण नखं कापण्याची योग्य वेळ आणि रात्री नखं कापणं योग्य आहे की नाही याचे तथ्य आपण या लेखातून जाणून घेऊया. 

रात्री नखं कापावीत का?

नखं ही केराटिनपासून तयार होतात. जेव्हा रात्री नखं कापली जातात, तेव्हा नखं खूपच टाईट असतात. कारण रात्री सहसा आपण पाण्यात कोणतेही काम करत नाही. त्यामुळे नखांमध्ये अजिबातच मुलायमपणा नसतो. अशी घट्ट झालेली नखं कापताना त्रास होतो आणि शिवाय अशावेळी चुकीने नख वेगळ्याच बाजूला कापले गेले अथवा क्युटिकल्स कापले गेले तर त्वचेवर त्याची जखम व्हायला वेळ लागत नाही. तसंच टाईट नखं कापल्यास मधूनच तुटतात आणि यामुळे इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो. या कारणामुळे सहसा रात्री नखं कापू नयेत. अन्यथा कोणत्याही अंधश्रद्धा न बाळगता तुम्ही याचा वापर करावा आणि नखांची काळजी घ्यावी. 

नख कापण्याची योग्य वेळ (Perfect time for nail cutting)

नखं कापण्यासाठीदेखील नक्कीच योग्य वेळ असते. तुम्ही आंघोळ करून आल्यानंतर नखं कापणे नेहमीच सोयीस्कर ठरते. आंघोळनंतर साबण आणि पाणी यामुळे नखं अधिक मऊ आणि मुलायम असातात, त्यामुळे कापणे सहज आणि सोपे होते. याच कारणामुळे ही वेळ योग्य ठरते आणि नखं कापताना त्रासही होत नाही. 

कशी कापावीत नखं

how to cut nails

नखं कापण्याची सोपी पद्धत म्हणजे तुम्ही नखं कापण्यापूर्वी नेहमी हात ओला करून घ्या. नखं कापण्यापूर्वी तुम्ही हात धुवा अथवा एखाद्या भांड्यात पाणी घेऊन त्यात हाड बुडवा. पाण्यात हात घातल्यामुळे नखं मऊ आणि मुलायम होतात. मऊ झालेली नखं कापणे अधिक सोपे आहे. तसंच ओल्या नखांना आकार देणंही सोपं आहे. तुम्हाला नखं अधिक मऊ आणि मुलायम हवी असतील तर तुम्ही कोमट पाण्याचा उपयोग करून घ्या. 

ADVERTISEMENT

करा योग्य नेल कटरचा वापर 

नखं कापण्यासाठी तुमच्याजवळ योग्य नेलकटर असण्याचीही गरज आहे. नखं कापण्यासाठी तुम्ही नेलकटर आणि फाईलरचा वापर करा. पायाची वाढलेली नखं कापण्यासाठी तुम्ही टोनेल क्लिपरचा वापर करू शकता. तसंच नखं कापताना इन्फेक्शनचा वापर करण्यासाठी तुम्ही तुमचे वैयक्तिक नेलकटरच वापरा. नखं कापल्यानंतर नेलकटर गरम पाण्यात घालून व्यवस्थित धुऊन घ्या. सुकल्यानंतरच जागेवर ठेवा. यामुळे कोणालाही इन्फेक्शन होणार नाही. 

रात्री नखं का कापू नयेत आणि नखांची काळजी कशी घ्यावी याची महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला दिली आहे. कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता रात्री नखं न कापण्याचं शास्त्रशुद्ध कारण तुम्हाला या लेखातून आम्ही दिले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

30 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT