ADVERTISEMENT
home / Age Care
अॅंटि एजिंग आहे गुलाबाचं तेल, असा करा वापर

अॅंटि एजिंग आहे गुलाबाचं तेल, असा करा वापर

गुलाबाचे फुल त्याचे अप्रतिम सौंदर्य आणि सुंगध यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे सजावटीप्रमाणेच या फुलांचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठी हमखास केला जातो. तुम्ही आता पर्यंत गुलाबाच्या पाकळ्या अथवा गुलाबपाणी सौंदर्योपचारात नक्कीच वापरलं असेल पण गुलाबाचं तेलंही तितकंच फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का ?

गुलाबाचं तेल तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठीच जाणून घ्या याचे फायदे आणि घरच्या घरी गुलाबाचं तेल तयार करण्याची एक सोपी युक्ती

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो –

गुलाबाच्या तेलात अॅंटिसेप्टिक आणि अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊ शकतात. एवढंच नाही तर त्याचा वापर तु्म्ही अॅस्ट्रिजंटप्रमाणे करू शकता. वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये यासाठी गुलाबाचं तेल वापरणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरेल. नियमित या तेलाने मसाज केल्यास तुमची त्वचा चिरतरूण तर दिसेलच शिवाय तुमच्या डोळ्यांच्या खाली दिसणारी डार्क सर्कल्सही कमी होतील. गुलाबाच्या तेलातील अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे तुमची त्वचा स्वच्छ राहते आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. हे तुमच्या त्वचेतील छिद्रांमध्ये जमा होणारी धुळ, माती, प्रदूषण कमी करते त्यामुळे त्वचेचे पोअर्स बंद होत नाहीत. जर नियमित गुलाबाच्या तेलाने त्वचेला मालिश केलं तर त्वचेवर चांगला ग्लो निर्माण होतो. कोणत्याही महागड्या ब्युटी ट्रिटमेटशिवाय त्वचेवर असा ग्लो निर्माण करण्याचा हा एक साधा उपाय आहे. 

ADVERTISEMENT

Shutterstock

पिंपल्स कमी होतात –

चेहऱ्यावर निर्माण होणारे पिंपल्स ही एक मोठी डोकेदुखीच असते. त्वचेच्या छिद्रांमध्ये धुळ, माती, प्रदूषण अडकून राहिल्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त तेलाचा साठा होतो आणि इनफेक्शनमुळे पिंपल्स निर्माण होतात. अचानक चेहऱ्यावर येणारे हे पिंपल्स तुमच्या सौंदर्यामध्ये नक्कीच बाधा आणतात. मात्र गुलाब तेलाचा वापर केल्यामुळे हे चेहऱ्यावर पिंपल्स येणं नक्कीच कमी करता येऊ शकतं.  गुलाबपाणी पिंपल्समुळे येणारे डागही कमी करतं. त्यामुळे जर तुम्हाला नितळ आणि चमकदार त्चचा हवी असेल तर त्वचेवर गुलाबपाण्याचा वापर जरूर करा.

त्वचा मऊ होते –

मऊ आणि मुलायम सिल्कप्रमाणे त्वचा कोणाला  नाही आवडत. मात्र अती प्रदूषण आणि सतत सौंदर्य प्रसाधने वापरण्यामुळे त्वचेचं नुकसान होऊन त्वचेचा मऊपणा कमी होत जातो. गुलाबाचं तेल तुमच्या त्वचेला नैसर्गिक पद्धतीने मऊ करतं. हिवाळ्यात त्वचेला येणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी गुलाबाचं तेल वापरणं एक चांगला पर्याय आहे.

ADVERTISEMENT

Shutterstock

गुलाब तेल तयार करण्याची सोपी पद्धत –

आता पर्यंत आम्ही तु्म्हाला गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार होणारे अनेक घरगुती फेसपॅक आणि गुलाब पाणी घरीच तयार करण्याची पद्धत सांगितलेली आहे. आता घरच्या घरी गुलाबाचं तेल कसं तयार करावं हे जाणून घ्या.

साहित्य –

  • एक कप गुलाबाच्या पाकळ्या
  • एक कप ऑलिव्ह ऑईल
  • पाणी

गुलाबाचं तेल तयार करण्याची पद्धत – 

ADVERTISEMENT
  • एका काचेच्या बाटलीत ऑलिव्ह ऑईल घ्या
  • त्या बाटलीत गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि झाकण बंद करा
  • एका भांड्यात तेल गरम करा
  • बाटलीचे झाकण बंद करून रात्रभर ती बाटली त्या भांड्यात ठेवा
  • दुसऱ्या दिवशी हे तेल एका वेगळ्या बाटलीत भरून ठेवा

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

गुलाबाच्या पाकळ्यांचा असा करा उपयोग आणि खुलवा सौंदर्य

गुलाबपाणी… त्वचा आणि केसांचं सौदर्य खुलवणारा नैसर्गिक उपाय! (Benefits Of Rose Water)

ADVERTISEMENT

मऊ आणि मुलायम केसांसाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा असा करा वापर

27 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT