उन्हाळा म्हटलं की, त्वचेसाठी अतिशय वाईट ऋतू. पूर्ण तीन महिने तुम्हाला त्वचेची नीट काळजी घ्यावी लागते. पण तुम्ही तुमच्या घरातली काकडीचा तुमच्या त्वचेसाठी उपयोग केल्यास, जास्त त्रास घ्यावा लागणार नाही. तुमच्या त्वचेसाठी काकडी हा अतिशय उपयुक्त पदार्थ असून उन्हाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काकडी तुमच्या शरीराला योग्य प्रकारात हाडट्रेडेट (hydrated) ठेवते आणि त्यामुळे दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहाता. काकडी नक्की कशा प्रकारे तुमच्या त्वचेचं सौंदर्य वाढवते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1. डोळ्याखालील काळी वर्तुळं
काकडी तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळं लवकरात लवकर आणि अगदी सोप्या पद्धतीने मिटवते. यामधील असेलेल्या अँटीऑक्सिडंट्स (antioxidants) आणि सिलिका (silica) मुळे काळे डाग कमी करण्याचं काम काकडी करते. यासाठी तुम्ही काकडीचे दोन स्लाईस कापून साधारण 20 मिनिटांसाठी डोळ्यांवर ठेवा. तुम्हाला फरक जाणवेल अथवा तुम्ही काकडीच्या रसात कापूस भिजवून तुमच्या डोळ्यांवर ठेवा. यामुळेदेखील तुमची काळी वर्तुळं कमी होतील.
2. डोळ्यांवरील सूज (Puffy Eyes)
झोपून उठल्यावर बरेचदा तुमचे डोळे जर सुजल्यासारखे दिसत असतील तर त्यासाठी काकडी हा उत्कृष्ट पर्याय आहे. अशा सुजलेल्या डोळ्यांसाठी (Puffy Eyes) काकडीचा वापर करावा कारण यामध्ये असकोर्बिक अॅसिड (ascorbic acid) चं प्रमाण जास्त असतं जे डोळ्यांमधील water retention कमी करतं आणि तुमच्या डोळ्यांवरील सूज कमी करण्याचं काम करतं. असं तुम्ही आठवड्यातून तीन वेळा केलंत तरी तुम्हाला आराम मिळू शकतो. तुमच्या डोळ्यांवरील येणारी सूज कमी होते.
3. चेहऱ्यावरील ब्राऊन पॅच (Freckles)
काही जणांच्या चेहऱ्यावर हलक्या ब्राऊन रंगाचे पॅच (patches) असतात, जे बऱ्याचदा उन्हामुळे तुमच्या चेहऱ्यावर तयार होतात. हे डाग कमी करण्यासाठी काकडीचा उपयोग होतो. तुम्ही काकडीचा रस काढून हा रस तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि काही वेळ अर्थात किमान अर्धा तास तरी हा रस तसाच ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने तुम्ही हे धुऊन टाका.
त्वचेसाठी मेकअप गाईड (Makeup Tips For Skin With Freckles In Marathi)
4. चेहऱ्यावर चमक
चेहऱ्यावर चमक आणणं हेच काकडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. काकडीच्या रसामध्ये लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी हा उपाय सर्वोत्कृष्ट आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूपच चांगली चमक येते.
5. सनबर्न (Sunburn)
तुम्ही जास्त वेळ उन्हामध्ये राहात असाल आणि सनबर्न अर्थात सूर्यकिरणांमुळे तुमच्या त्वचेवर होणाऱ्या डागामुळे त्रस्त असाल, तर तुम्हाला काकडी नक्की सुटका मिळवून देईल. काकडीचा थंडपणा तुमच्या त्वचेला अधिक थंडावा मिळवून देतो. तुम्ही काकडीचे स्लाईस अशावेळी आपल्या त्वचेवर ठेऊन हे चट्टे घालवू शकता.
6. ओपन पोअर्स (open pores)
काकडी एक सर्वोत्कृष्ट टोनरदेखील (excellent toner) देखील आहे. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही आपल्या ओपन पोअर्ससाठी काकडीच्या रसात अॅप्पल सायडर व्हिनेगर (apple cider vinegar), लिंबू रस, मध, कोरफड जेल अथवा टॉमेटो पल्प मिसळून एकत्र करून तुमच्या चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमचे ओपन पोअर्स लवकरात लवकर टाईट होतील.
7. सेल्युलाईट (Cellulite)
तुमच्या मांडीवरील cellulites वरदेखील काकडी हा चांगला उपाय आहे. अर्धा कप ग्राऊंड कॉफीमध्ये काकडीचा रस मिक्स करा. आता त्यामध्ये 1 चमचा मध घाला. यामुळे तुमच्या सेल्युलाईट बाधित शरीरावर लावा आणि मग तो भाग मुसलिनने बांधून ठेवा आणि अर्ध्या तासानंतर एक्सफोलिएट (exfoliate) करा. याशिवाय तुम्ही रोज काकडी खाल्ल्यास तुमच्या मांड्यावरील सेल्युलाईट्स निघून जाण्यास मदत होते.
फोटो सौजन्य – Shutterstock
हेदेखील वाचा –
मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी वापरा 6 घरगुती उपाय
सुंदर डोळे दिसण्यासाठी घरगुती उपायांनी कमी करा अंडरआय बॅग