ADVERTISEMENT
home / Fitness
काय आहे केशर दूधात विशेष जाणून घ्या Benefits of Saffron Milk

काय आहे केशर दूधात विशेष जाणून घ्या Benefits of Saffron Milk

दूध पिणं हे तर सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे पण केशर दूधात असं काय खास आहे की, राजा-महाराजांच्या काळापासून हे दूध खासकरून पुरूषांसाठी फायदेशीर सांगितलं जातं. केसर घातलेलं दूध पिणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. लहान मुल, वयस्कर आणि महिला सर्वांनाच केसर दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध हा कॅल्शिअमचा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगलंच असतं. पण तुम्हाला माहीत आहे का केसर घालून दूध प्यायल्यास ते जास्त फायदेशीर ठरतं. 

केशराचं महत्त्व

saffron-milk-2

केशराला मसाल्यांचा राजा असं म्हटलं जातं. जगभरात केशराला सॅफ्रन किंवा जाफरान या नावाने ओळखलं जात. केशर हे जगभरातील सर्वात महागड्या मसाल्यामध्ये गणलं जातं. आपल्या देशात केशराचं उत्पादन हे जम्मू-काश्मीरमध्ये ऑक्टोबर आणि फेब्रुवारीच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात होतं. ईराणमध्ये केशराचं सर्वात जास्त उत्पादन होतं. आकडेवारीनुसार जगभरात केशराची सर्वात जास्त शेतीही ईराणमध्येच होतो. अफगाणिस्तानात होणाऱ्या केशराच्या उत्पादनबद्दल तर असं म्हटलं जातं की, इथली अफूची पैदास थांबवण्यासाठी केशराची लागवड सुरू करण्यात आली. यात अनेक फ्लेवर आढळतात आणि हे आरोग्यासाठी खूप लाभदायक असतं. केशराच्या फायद्यांसोबतच केसर हे त्याच्या विशिष्ट चव आणि औषधीय गुणांमुळे ही फार महाग असतं. केशराला असलेली वेगळी चव ही त्यात असलेलं केमिकल कंपाऊंट पिक्रोक्रोकिन आणि सैफ्रानालमुळे त्याला प्राप्त झालेली असते. याच वेगळ्या चवीमुळे केशराचा वापर हा जगभरातील अनेक पाककृतींमध्ये केला जातो. तसंच केशराचा वापर हा अनेक गंभीर आजारांवरील उपायासाठीही केला जातो.

पिस्त्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत हवेत

ADVERTISEMENT

केशर दूधातील आश्चर्यकारक गुण

saffron-milk-1

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, केशरामध्ये दीडशेहून जास्त असे घटक आहेत जे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला केशर दूधासोबत घेण्याचे फायदे सांगणार आहोत.

सर्दी तापावर गुणकारी केशर दूध

खोकला झाल्यावर आपण बरेचदा दूध आणि हळद घेतो. पण सर्दी ताप असेल तर केशरयुक्त दूधही गुणकारी आहे. केशर, दूध आणि मध यांचं मिश्रण घ्यावं. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

निद्रानाशाची समस्या होईल दूर

जर कोणाला झोप न लागण्याची समस्या असेल तर त्यावर रामबाण इलाज म्हणजे केशर दूध. रात्री झोपण्याआधी केशर दूध घेतल्यास झोप न लागण्याची समस्या दूर होते.

ADVERTISEMENT

तुळशीच्या औषधी वापराविषयी देखील वाचा

जखमा भरतील लवकर

कोणतीही जखम लवकर भरण्यासाठी हे सर्वात चांगलं औषध आहे. कोणत्याही जखमेवर हे एखाद्या औषधासारखं काम करतं. ज्यामुळे लवकर बरं वाटतं.

खराब पोटाचा त्रास होईल कमी

केशर पोटाशीनिगडीत अनेक समस्यावर गुणकारी आहे. उदाहरणार्थ अपचन, पोटात गॅस होणं यावर खूपच गुणकारी आहे. रोज दूधासोबत केशराचं सेवन केल्यास तुम्हाला आराम मिळेल.

शारीरिक उर्जा वाढेल

केशरयुक्त दूध हे शारीरिक उर्जा वाढवण्याचंही कार्य करतं. पुरूषांनी केशरासोबतच बदाम आणि मध यांचं सेवन केल्यासही भरपूर फायदा होतो.

ADVERTISEMENT

केशर दूधात आहेत कामोत्तेजक तत्त्व

तुम्ही पूर्वी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये सुहागरातच्या सीनमध्ये भरून ठेवलेला केशरयुक्त दूधाचा ग्लास पाहिलाच असेल. आयुर्वेदानुसार या दूधात अशी तत्त्व आहेत जी रीप्रोडेक्‍टिव्ह सेलना चालना देतात. यामुळे या दूधाला कामोत्तेजक पेय मानले जाते. यामुळेच पूर्वीच्या काळी राजा महाराजा केशर असलेलं दूध सेवन करत असत. केशरयुक्त दूध प्यायल्याने पुरूषांच्या आरोग्यावर चमत्कारिक परिणाम होतो. केशरमध्ये 150 पोषक तत्‍व आढळतात. जी पुरूषांच्या आरोग्यासाठी जणू वरदान आहेत. डॉक्टरांनुसार, केशर दूध रोज पिणाऱ्या पुरूषांमध्ये स्पर्म काऊंट वाढतो आणि अशा पुरुषांना संतानप्राप्तीबाबत कोणतीही समस्या जाणवत नाही.

ओठांसाठी कोरफड च्या फायदे देखील वाचा

केसरयुक्त दूध हे आहे अँटी ऑक्‍सीडंट्सयुक्त

अँटी ऑक्‍सीडंट्स हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. केशरयुक्त दूध हे अँटी ऑक्सीडंट्सयुक्त असते. तसंच यामध्ये अमिनो अॅसीड्स असतात ज्यामुळे पुरूषांचा सेक्स परफॉर्मन्सही चांगला होण्यास मदत होते. या दूधात असलेले कॅरेटेनॉईड्स पुरूषांमधील इन्फर्टीलिटीच्या समस्येचं निराकारण करतात.

केशर दूधाने इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या होते दूर

आधुनिक काळात जास्तकरून पुरूषांमध्ये इरेक्‍टाइल डिस्‍फंक्‍शनची समस्या आढळते. केशरयुक्त दूध हे या समस्येवर रामबाण उपाय आहे. केशरामध्ये असलेल्या तत्त्वात टेस्‍टेस्‍टोरॉन आणि एस्‍ट्रोजन हार्मोनची लेव्हल सामान्‍य राहते आणि त्यामुळे पुरूषांना ही समस्या जाणवत नाही.

ADVERTISEMENT

महिलांसाठीही आहे उपयोगी केशर दूध  

थंडीच्या दिवसात केशराचं रोज सेवन केल्यास महिलांना पीरियड्सनिगडीत समस्या आणि गर्भाशयला सूज अशा समस्या दूर होतात.

 

केशराचं किता प्रमाणात सेवन करावं

saffron2

वेगवेगळ्या समस्यांसाठी केशराच्या सेवनाचं प्रमाण हे वेगवेगळं आहे. तुम्ही ज्या समस्येसाठी केशराचं सेवन करणार असाल, त्या आधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. केशराचं नैसर्गिक सप्लिमेंट म्हणून सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला खूपच महत्त्वाचा आहे, कारण जर तुम्ही 20 ग्रॅमपेक्षा जास्त केशराचं सेवन केलंत तर ते धोकादायक असू शकतं. हे टाळण्यासाठी तुम्ही नियमितपणे फक्त पाच ग्रॅम केशरचं सेवन करा. मुख्य म्हणजे बऱ्याच काळासाठी केशराचं सेवन केल्यास तुम्हाला नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे केशराचं सेवन सुरू करण्याआधी आपल्या आरोग्यानुसार डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

ADVERTISEMENT

केशराचे काय आहेत फायदे आणि दुष्परिणाम

केशर दूध बनवताना 

safforn-milk-fi

केशर दूध बनवणं अगदी सोपं आहे. केशर दूध बनवण्यासाठी लागणारा मसाला ही बाजारात अगदी सहज मिळतो किंवा तुम्ही दूधातही सरळ केशर घालू शकता. आम्ही तुम्हाला सूचवू की, तुम्ही नुसतं केशर घ्यायचं असल्यास हे केशर घेऊ शकता. किंमत 475 रूपये. नुसतं केशर नको असल्यास हा मसाला घेऊ शकता. किंमत 160 रूपये

कमी वेळात चमकदार त्वचा हवी असल्यास वापरा बदामाचं तेल 

ADVERTISEMENT

केशर दूधासाठी लागणारं साहित्य आणि कृती :

आवश्यक साहित्य :

दूध 2 ग्लास

10 बदाम

ADVERTISEMENT

केशरच्या 4-5 काड्या

अर्धा चमचा वेलची पावडर

साखर 4 चमचे

असं बनवा केशर दूध

ADVERTISEMENT

– 6 ते 7 तास बदाम चांगले रात्रभर दूधात भिजवून ठेवा.

– दूधातून बदाम काढून ते वाटून घ्या.

– यानंतर मंद आचेवर एक भांड्यात वाटलेले बदाम, दूध आणि केशर मिक्स करून थोडं गरम करा.

– जेव्हा दूध अर्ध आटेल तेव्हा त्यात साखर घाला आणि मिक्स करा. मगच गॅस बंद करा.

ADVERTISEMENT

– आता वरून वेलची पावडर घाला. दूध थंड करण्यासाठी ठेवा.

– तयार आहे तुमचं केशरयुक्त दूध.

आरोग्य आणि चवीचा खजिना आहे जायफळ, जाणून घ्या फायदे आणि नुकसान 

केशरदूधाबद्दलचे FAQs

saffron5

ADVERTISEMENT

– केशरयुक्त दूध रोज घेतलं तर चालेल का ?

केशरयुक्त दूध हे अनेक गोष्टींवर फायदेशीर असल्याचं आपण वर वाचलंच असेल. केशरयुक्त दूध जर तुम्ही रोज रात्री झोपण्याआधी घेतलं तर तुमच्या आरोग्यनिगडीत समस्याही दूर होतील आणि शांत झोपही लागेल.

– केशरयुक्त दूध घेण्याचे काही साईड ईफेक्ट्स आहेत का?

केशरात कितीही चांगले गुणधर्म असले तरी कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त घेतल्यास त्यामुळे नुकसानचं होतं. त्यामुळे केशर दूधाचं सेवन सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

– केशर दूध हे त्वचेसाठीही चांगलं आहे का?

केशरांध्ये अनेक व्हिटॅमीन्स आणि अँटी ऑक्सीडंट्स असल्यामुळे तुमच्या त्वचेसाठीही हे निश्चितच चांगलं आहे. असं म्हणतात की, केशर दूधाच्या सेवनाने तुमची त्वचा उजळते. त्यामुळेच अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही केशराचा वापर केला जातो.

You Might Like These:

ADVERTISEMENT

आरोग्यदायी पंचामृत सेवनाचे फायदे

6 Benefits Of Gioly In Marathi

Benefits Of Olive Oil & Best Oil Brands In India In Marathi

Saffron Benefits for Skin in Hindi

ADVERTISEMENT
21 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT