तुम्हालाही लघवीला वारंवार जावे लागते व गेल्यावर जळजळ होते का किंवा त्रास होतो का? यामागील सर्वात मोठं कारण आहे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI). ही समस्या साधारणतः 18-60 या वयोगटातील महिला आणि पुरूषांमध्ये आढळते. पण ही समस्या जास्तकरून महिलांमध्ये जास्त आढळते. कारण बॅक्टेरियांच्या संसर्गामुळे UTI ची समस्या निर्माण होते. ज्यामुळे लघवी करताना जळजळ होणं आणि दुखणं यासारखा त्रास जाणवतो. तर पुरूषांमध्ये ही समस्या प्रोस्टेट संबंधी समस्यांमुळे निर्माण होते. कोणत्याही प्रकारच्या युरिनरी इंफेक्शनमुळे लघवी करताना जळजळ, वेदना किंवा बैचेनी जाणवत असल्यास लगेच डॉक्टरांना संपर्क करावा आणि त्वरित उपचार घ्यावा. हा त्रास फक्त औषधं घेऊनही बरा होऊ शकतो. पण यावर काही घरगुती उपचारही उपयोग पडतात. जे कोणत्याही साईड ईफेक्ट्सशिवाय तुम्हाला लघवी करताना होणारी जळजळ आणि वेदनेपासून आराम देतात. चला तर जाणून घेऊया युरिनरी इन्फेक्शनबाबत सर्व माहिती.
Table Of Content
1. युरिन इन्फेक्शन होण्याची कारणं
3. लघवी थांबवल्यास होणारे दुष्परिणाम
4. युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी हे करा
5. युरिन इन्फेक्शनवरील घरगुती उपाय
6. युरिन इन्फेक्शनबाबत विचारले जाणारे प्रश्न
युरिन इन्फेक्शन होण्याची मुख्य कारणं (Causes Of Urine Infection In Marathi)
मॉर्डन लाईफस्टाईलमुळे आजकाल युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) हा त्रास कॉमन झाला आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे अस्वच्छ पब्लिक टॉयलेटचा वापर करणं. कारण आजही भारतात तुम्ही प्रवासाला किंवा रोज अगदी नोकरी करायला बाहेर पडल्यासही नाईलाजास्तव तुम्हाला अस्वच्छता असलेल्या पब्लिक टॉयलेटचा वापर करावाच लागतो. पण तरीही या समस्येकडे गंभीरतेने पाहिलं जात नाही. त्यामुळे अनेकदा महिला या इन्फेक्शनच्या बळी पडतात. तसं पाहता हे तेवढं गंभीर इन्फेक्शन नाही पण जर वेळेवर इलाज न केल्यास याचा किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. तर दुसरीकडे घरातील टॉयलेटची नियमित रूपाने सफाई न केल्यासही तुम्हाला हे इन्फेक्शन होऊ शकतं.
असं होतं इन्फेक्शन (How You Get Infected With Urine Infection)
युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन हे इतकं कॉमन आहे की, प्रत्येक महिलेला आपल्या आयुष्यात एकदा तरी या इन्फेक्शनचा उपचार करून घ्यावा लागतोच. युटीआई तेव्हा होतं जेव्हा बॅक्टेरिया किंवा फंगस आपल्या पचन तंत्रातून निघून किंवा इतर माध्यमातून लघवीच्या मार्गावर चिकटतात आणि वेगाने वाढत जातात. जर या इन्फेक्शनकडे वेळीच लक्ष न दिल्यास बॅक्टेरिया तुमच्या ब्लॅडर आणि किडनीपर्यंत पोहचू शकतात आणि तुम्हाला इजा होऊ शकते.
युरिन इन्फेक्शन मुख्य लक्षणं (Urine Infection Symptoms In Marathi)
युरिन इन्फेक्शनची काही मुख्य लक्षणं वेळीच पाहिल्यास पुढील त्रास टळू शकतो. पाहा कोणती आहेत ही लक्षणं.
– लघवी करताना दुखणं किंवा जळजळ होणं.
-ओटीपोट किंवा पाठीच्या खालच्या भागात दुखणं.
-हुडहुडी भरणं
-शरीराचं तापमान वाढणं
-कधी खूप गरम किंवा खूप थंडी वाजणं
– उलटीसारखं वाटणं
– रात्रीसुद्धा लघवीला जाणं
-लघवीला दुर्गंधी येणं
-लघवीचा रंग फिकट किंवा हलका लाल होणं
युरिन इन्फेक्शनवरील घरगुती उपाय (Urine Infection Home Remedies In Marathi)
काही लघवीच्या जागी जळजळ होणे उपाय टाळू शकता. पाहा काय आहेत लघवी इन्फेक्शन उपाय हे सोपे घरगुती उपाय.
नारळाचं पाणी (Coconut Water)
लघवी करताना होणारी जळजळ ही खूपच त्रासदायक असते. यावरील रामबाण घरगुती उपाय म्हणजे नारळाच पाणी. आपल्या सगळ्यांनाच नारळाचं पाणी प्यायला आवडतं. मग जर तुम्हालाही लघवीला गेल्यावर जळजळ किंवा दुखत असेल तर नारळाच पाणी हा उत्तम आणि सोपा उपाय आहे. नारळामध्ये खूप गुणकारी तत्त्व आहेत जी लघवीमुळे होणारी जळजळ, वेदना आणि बैचेनी यांसारख्या समस्या दूर करतात. आपल्या शरीरात ही समस्याही तेव्हाही निर्माण होते जेव्हा आपलं शरीर डीहायड्रेट होतं आणि त्यातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात नारळाचं पाणी प्यायल्याने लघवीच्या वेळी होणारी जळजळ आणि वेदनेपासून सुटका मिळू शकेल.
वाचा – Fungal Infection On Skin In Marathi
काकडी (Cucumber)
काकडीची कोशिंबीर किंवा चटणी हा सुरूवातीपासून भारतीय आहारातील महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. भारतीय जेवणातील डावी बाजू ही कोशिंबीरीसाठीच राखीव असते. याचं मुख्य कारण म्हणजे काकडीतील थंडावा. लघवीच्या वेळी होणाऱ्या जळजळ आणि वेदनेवरील अजून एक उपाय म्हणजे काकडीचं सेवन. कारण यातील अल्कलाईन तत्त्व आपल्याला शरीराला आतून थंडावा देतं आणि पचन क्रियाही सुधारतं. यामध्ये अनेक प्रकारची अँटीऑक्सीडंट्सही आढळतं. त्यामुळे काकडी आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक आहे. मग आजपासूनच सलाड, कोंशिबीर आणि चटणीच्या रूपात काकडीचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करा.
वाचा – हुकवर्मसाठी काही सोपे घरगुती उपाय
व्हिटॅमीन सी (Vitamin C)
व्हिटॅमीन सी चं आपल्या निरोगी आरोग्यात खूप महत्त्वाचं योगदान आहे. लघवीच्या वेळी होणारी जळजळ आणि वेदना थांबवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून तुम्ही व्हिटॅमीन सी युक्त पदार्थाचं सेवन करू शकता. व्हिटॅमीन सीमुळे आपल्या लघवीतील अॅसिडची मात्रा वाढते आणि त्यामुळे बॅक्टेरियाचा नायनाट होतो. परिणामी इन्फेक्शनचा धोका कमी होतो. फळ आणि भाज्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन सी आढळतं. लिंबाचा रस, संत्र्याचा रस, किवी फ्रूट, द्राक्ष आणि आवळा हे व्हिटॅमीन सी चे खूप चांगले स्त्रोत आहे. ज्याचं सेवन केल्यास तुमचं युरिन इन्फेक्शन नक्कीच कमी होईल.
अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
तुम्हाला हा घरगुती उपाय ऐकून थोड आश्चर्य वाटेल पण हाही एक रामबाण उपाय आहे. कारण अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये एन्झाईम, पॉटेशिअम आणि खूप प्रमाणात खनिज आढळतात. तसंच यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणही असतात. जे शरीरातील बॅक्टेरिया आणि फंगची वाढ होऊ देत नाही. तसंच लघवीला होणारी जळजळ आणि वेदनाही दूर करतात.
वाचा – उन्हाळी लागणे उपाय
बेकिंग सोडा (Baking Soda)
बेकिंग सोडा हा खूपच उपयोगी पडणार घरगुती पदार्थ आहे. याचा उपयोगही तुम्ही युरिन इन्फेक्शनमध्ये करू शकता. बेकिंग सोड्यातील अल्कलाईन तत्व लघवीतील अॅसिडचं प्रमाण वाढू देत नाहीत आणि शरीराचा pH स्तरही योग्य ठेवतात. बेकिंग सोड्याच्या सेवनाने तुम्हाला वारंवार लघवीला जाण्याच्या त्रासापासूही सुटका मिळते. तसंच वेदना आणि जळजळही दूर होते.
आलं (Ginger)
प्रत्येक घरातील किचनमध्ये आलं तर हमखास असतंच असतं. आल्यामधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल तत्वांमुळे लघवीतील बॅक्टेरिया आणि अन्य प्रकारचे व्हायरस यांना आळा बसतो. ज्यामुळे युरिन इन्फेक्शन दूर होतं. तुम्ही आल्याचा रस कोमट दूधातून किंवा आल्याचा चहा घेऊनही करू शकता.
दही (Curd)
दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. प्रत्येकीकडे रोज ताजं दही लावलं जातं. हेच दही तुम्हाला युरिन इन्फेक्शनमुळे होणारा त्रासही दूर करू शकतं. याचं मुख्य कारण म्हणजे दह्यात आहे वाईट बॅक्टेरियाचा नाश करण्याची ताकद आणि चांगला बॅक्टेरिया वाढवण्याची क्षमता. जर तुम्च्या योनीमध्ये बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाल्यास दह्यामुळे नक्कीच आराम मिळेल आणि pH स्तरही सामान्य राहील.
मेथीचे दाणे (Fenugreek Seeds)
मेथीचे दाणे हे युरिन इन्फेक्शनवरील अजून एक सोपा घरगुती उपाय आहे. मेथीचे दाणे शरीरातील विषारी पदार्थांना शरीराबाहेर टाकतं आणि pH स्तर कायम ठेवतात. मेथीच्या दाणांच्या सेवनाने तुम्हाला युरिन इन्फेक्शनमध्ये नक्कीच आराम मिळेल.
धने (Coriander Seed)
लघवीला होणारी जळजळ आणि वेदना दूर करण्यासाठी तुम्ही धन्याचा वापर करू शकता. कारण धने हे शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देतात. तसंच धन्याच्या दाण्यांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणही असतात. जे आपल्याला युरिनरी इन्फेक्शनपासून वाचवतात आणि आपल्या शरीराचं तापमान स्थिर ठेवतात. त्यामुळे धन्याच्या दाण्यांचा वापर हा खूपच गुणकारी आहे.
थंड दूध (Cold Milk)
सायविरहीत थंड दूध प्यायल्याने शरीराचं तापमान स्थिर राहतं आणि लघवीला होणारी जळजळ कमी होते. तुम्ही थंड दूधात वेलची पावडर घालूनही ते पिऊ शकता.
हे सर्व घरगुती उपाय वापरून तुम्ही युरिन इन्फेक्शन टाळू शकता. कारण हे सर्वच घरगुती उपाय सोपे आणि गुणकारी आहेत.
वाचा – अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय
लघवी थांबवल्यास होणारे दुष्परिणाम (Side Effects Of Holding Urine In Marathi)
बरेचदा आपण लघवीला जाण्याचा कंटाळा करतो. पण नंतर मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. त्यामुळे शक्यतो असं करणं टाळा.
वेदना (Pain)
जास्त वेळ लघवी कंट्रोल केल्यास तुमच्या मूत्राशय आणि किडनीमध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे लघवीला गेल्यावर तुम्हाला वेदना होतात. तसंच तुम्हाला पेल्व्हीक क्रॅम्पसचा त्रासही होऊ शकतो.
युटीआय (Urinary Tract Infection In Marathi)
जे लोक आवश्यक प्रमाणात पाणी पित नाहीत, त्यांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास होतो. यामध्ये बॅक्टेरिया मूत्र मार्गात फैलावतात. यामुळे इन्फेक्शनचा धोका असतो.
मूत्राशय आकुंचन पावणे (Secretion Of Bladder)
खूपवेळ लघवी थांबवल्याने तुमचं मूत्राशय आकुंचन पावू शकतं. यामुळे मूत्राशयााला सामान्यपणे लघवी करणं अशक्य होतं. कोणाचं मूत्राशय निकामी झाल्यास कॅथ्रेटरसारखा अतिरिक्त उपाय आवश्यक होतो.
पेल्व्हीक स्नायूंचं नुकसान (Pelvic Floor Muscle Damage)
वारंवार लघवी केल्यामुळे पेल्व्हीकच्या स्नायूंच नुकसान होतं. पेल्व्हिक फ्लोर एक्सरसाईज जसं केगल्स केल्याने स्नायूंना मजबूती मिळते आणि लघवीला होणारा त्रासही थांबतो.
किडनी स्टोनचा धोका (Risk Of Kidney Stone)
लघवी कंट्रोल केल्याने किडनी स्टोनचा त्रास होण्याची शक्यता असते. हा त्रास शक्यतो त्या व्यक्तींना होण्याचा धोका असतो ज्यांच्या लघवीत खनिजची मात्रा जास्त असते. ज्यामुळे अजूनही गंभीर परिणाम होऊ शकतात. यासाठी जाणून घ्या मुतखड्यावर घरगुती उपाय.
लघवी कंट्रोल करण्याचे इतर परिणाम (Effects Of Urinary Control)
तुमचं मूत्राशय हे तुमच्या मूत्र प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे मूत्रमार्गाच्या माध्यमाने आपल्या किडनीशी जोडलेलं असतं. काही वेळा लघवी किडनीमध्ये किंवा वारंवार लघवी गेल्यास इन्फेक्शन होऊन किडनीचं नुकसान होऊ शकतं.
युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी हे करा (How To Prevent Urine Infection In Marathi)
युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी पुढील काही गोष्टी नक्की करा.
– भरपूर पाणी प्या (Drink Adequate Water)
युटीआय टाळण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे जास्तीत पाणी प्या आणि बॅक्टेरिया बाहेर टाका. जर तुम्ही व्यवस्थित पाणी प्यायलात तर तुम्ही व्यवस्थित हायड्रेट राहाल आणि त्यामुळे लघवीही वेळेवर होईल.
– व्यवस्थित स्वच्छता (Maintain Hygiene)
जेव्हा जेव्हा तुम्ही लघवीला जाल तेव्हा ती जागा व्यवस्थित पाण्याने किंवा टीश्यूजने नक्की वाईप करा. त्यामुळे बॅक्टेरियाचा फैलाव होणार नाही. खासकरून महिलांनी सेक्स केल्यानंतर या गोष्टींटी काळजी घ्यावी.
– फेमेनाईन प्रोडक्ट्सचा वापर (Use Feminine Products)
योनीची स्वच्छता करण्यासाठी योग्य फेमेनाईन प्रोडक्ट्सचा वापर करा. सेटेंड स्प्रेज किंवा सेेटेंड पावडरचा वापर टाळा.
– बर्थ कंट्रोलच्या साधनांचा वापर (Use Birth Control Pills)
काही वेळा लुब्रिकेटेड कॉन्डम किंवा ईतर काही बर्थ कंट्रोल साधनांमुळेही युटीआय होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो वॉटर बेस्ड कॉन्डमचा वापर करा.
Also Read Home Remedies For Vaginal Yeast Infection In Marathi
जर तुम्हाला लघवी लगेच करणं शक्य नसल्यास हे करा (What To Do If You Need To Hold Urine?)
काहीवेळा प्रवासात असताना किंवा एखाद्या ठिकाणी शौचालय उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला लगेच लघवीला जाणं शक्य नसतं. अशावेळी तुम्ही लक्ष दुसरीकडे केंद्रित करून लघवी थांबवू शकता. पण जर तुम्हाला लघवीला जाणं शक्य असल्यास कधीच जाणं टाळू नका.
लघवी कंट्राोल करण्यासाठी उपाय (Measures To Control Urination)
जेव्हा तुम्हाला लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होते पण शक्य नसतं. तेव्हा तुम्ही तुमचं मन गाण ऐकण्यात किंवा वाचनात गुंतवा. मोबाईल वापरा किंवा सोशल मीडियावर वेळ घालवा. शरीराला उष्ण ठेवण्याचा प्रयत्न करा.कारण थंडाव्याने तुम्हाला लघवीला जाण्याची तीव्रतेने इच्छा होईल.
युरिन इन्फेक्शनबाबत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
1. घरच्या घरी युरिन इन्फेक्शन कसं तपासावं?
युरिन इन्फेक्शन घरच्या घरी तपासण्यासाठी तुम्ही मेडिकलमध्ये मिळणाऱ्या युरिन टेस्ट स्ट्रीप्सचा वापर करू शकता. ज्या तुम्ही तुमच्या युरिन सँपलमध्ये बुडवून इन्फेक्शन आहे की नाही हे पाहू शकता. पण कोणत्याही स्ट्रीप्सचा वापर करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
2. महिलांमधील ब्लॅडर इन्फेक्शनची लक्षणं कोणती?
– लघवी करताना जळजळ किंवा दुखणं
-सारखं लघवीला जावं लागणं
-लघवीला वास येणे
– लघवीला वारंवार जाण्याची घाई होणे
– लघवीला गेल्यावर किंवा जाऊन आल्यावर कळ येणे
3. दर अर्ध्या तासाने लघवीला जाणं नॉर्मल आहे का?
युरिनरी फ्रिक्वेन्सी म्हणजे 24 तासात तब्बल 7 पेक्षा जास्त वेळा लघवीला जावं लागणं. जर तुम्ही दिवसभरात 2 लीटर पाणी पित असाल तर हे साहजिक आहे. पण काही व्यक्तींमध्ये हे जास्त वेळा घडतं. तेव्हा ते डॉक्टरकडे जाणं पसंत करतात.
4. युरिन इन्फेक्शन टाळल्यास काय परिणाम होतील?
वर सांगितल्याप्रमाणे युरिन इन्फेक्शनचे गंभीर परिणाम दिसून येतात. असं झाल्यास तुम्हाला हेवी अँटीबायोटीक्सचा डोस घ्यावा लागू शकतो किंवा इतरही ट्रीटमेंट घ्याव्या लागू शकतात.