पुणे म्हटलं कि महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ. पुणे शहराला विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक विकएन्डला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात. पुणे शहर मुंबई शहरापासून जवळ असल्याने शनिवार आणि रविवार पुण्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यास काहीच हरकत नाही. पुणे शहराला स्वतःची एक ओळख, संस्कृती आणि इतिहास आहे. पुणे शहरात कोणत्याही ऋतूत आल्हाददायक वातावरण असते. शिवाय पुण्याच्या आसपास अशी काही थंड हवेची ठिकाणं आहेत जिथे तुम्ही उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात पिकनिकसाठी नक्कीच जाऊ शकता. यासाठी पुणे शहर आणि पुण्यातील पर्यटन स्थळांविषयी जरूर जाणून घ्या.
Table of Contents
पुण्यातील लोकप्रिय ठिकाणं (Places To Visit In Pune In Marathi)
पुणे शहर फिरण्याचा विचार करताय, मग या ठिकाणांशिवाय तुमची पुण्याची पिकनिक पूर्णच होऊ शकत नाही.
शनिवार वाडा (Shanivar Wada)
शनिवार वाडा म्हणजे पुणे शहरातील एक ऐतिहासिक वास्तू. शनिवार वाडा ही पेशवेकालीन वास्तू आहे. या ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली हा राजवाडा बांधला होता. त्या काळी या वाडा पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक मानले जायचा. मात्र इंग्रजांनी या वाड्यावर कब्जा केला आणि हा वाडा जाळून टाकला. आता या वास्तूंमधील सर्व अवशेष नष्ट झाले आहेत. वाड्याचा पाया आणि तटबंदीचा भाग आजूनही कायम आहे. हा वाडा पाहताना एक ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो.
आगा खान पॅलेस (Aga Khan Palace)
गांधी मेमोरिअल सोसायटीचा हा आगा खान पॅलेस इटालियन बनावटीचा आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये या पॅलेसचा उपयोग भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधी, कस्तूरबा गांधी,महादेव भाई यांच्यासाठी तुरूंगासाठी करण्यात आला होता. असं म्हणतात की महादेव भाई आणि कस्तूरबा गांधी यांनी याच पॅलेसमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. या पॅलेसमध्ये त्यांचे स्मारकदेखील आहे.
वाचा – रत्नागिरी पर्यटन स्थळे
लाल महल (Lal Mahal)
पुणे शहराच्या मध्यभागी असलेला लाल महल पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजांचे बालपण याच वास्तूत गेले. याच वास्तूत त्यांनी स्वराज्याचे धडे गिरवले. त्यानंतर स्वराज्यावर कब्जा करणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटेदेखील शिवाजी महाराजांनी याच महलात कापली होती. आता पुणे महानगरपालिकेने लाल महलची पुर्नबांधणी केली आहे. त्यामुळे आताची वास्तू एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नक्कीच पाहण्यासारखी आहे.
वाचा – महाबळेश्वर पर्यटन स्थळे
सारसबाग (Saras Baug)
पुणे शहरातील स्वारगेट येथे सारसबाग आहे. हिरव्या गार झाडे आणि फुलझाडांनी नटलेली ही बाग पुणे शहराची शान आहे. बागेत एक छोटे तळे असून त्यामध्ये एक गणपतीचे मंदिर आहे. या गणपतीच्या मंदिला तळ्यातला गणपती असे म्हणतात. बागेत व्यायाम आणि बोटींगसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी छोटी फुलराणी नावाची एक रेल्वेदेखील साारसबागेत आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या लहानमुलांना घेऊन पुण्यात जाणार असाल तर सारसबागेत जरूर जा.
भारतात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहेत ही ठिकाणं (Best Treks In India In Marathi)
पर्वती (Parvati)
पुणे शहरात सकाळी फिरायला जाण्यासाठी पर्वती हे ठिकाण नक्कीच उत्तम आहे. पर्वती ही छोटेखानी टेकडी आहे ज्यावर अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. पुण्यात मॉर्निंगवॉकसाठी पर्वतीवर जाण्याची पद्धत आहे. पुर्वीच्या काळी पेशव्यांचे प्रार्थना करण्याचे ठिकाण म्हणून पर्वती प्रसिद्ध होती. सकाळच्या रम्य वेळी शुद्ध हवेत मेडीटेशन करण्यासाठी पर्वतीवर आजही लोक जातात.
भारतातील या धबधब्यांना नक्की द्या भेट (List of Waterfalls In India In Marathi)
राजीव गांधी प्राणीसंग्रहालय (Rajiv Gandhi Zoological Park)
कात्रजमधील राजीव गांधी सर्पोद्यान जवळजवळ 130 किमीवर पसरलेले आहे. या उद्यानामध्ये विविध जातीचे सर्प आणि जंगलातील प्राणीसंग्रहालय आहे. हे प्राणीसंग्रहालय फिरण्यासाठी कमीत कमी एक दिवस तुम्हाला लागेल एवढं मोठं आहे. दिवसभराच्या दगदगीतून निवांतपणा हवा असेल या उद्यानात नक्की जा.
शिंदे छत्री (Shinde Chhatri)
शिंद्यांची छत्री हे पुण्यातील वानवडी येथील एक स्मारक आहे. मराठा साम्राज्यातील मातब्बर सरदार महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आलेलं आहे. या वास्तूवर राजस्थानी शैलीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. पुण्यात गेल्यावर या ऐतिहासिक वास्तूला जरूर भेट द्या.
जुन्नर लेणी (Lenyadri Caves)
पुण्यातील जुन्नर गावाला लेण्यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. लेण्यामध्ये या गावाचा प्रथम क्रमांक लागतो. जुन्नर तालुक्यात जवळ जवळ 11 ठिकाणी विविध समुहामध्ये ही लेणी कोरलेली आहेत. जुन्नर तालुक्यातील ही सर्व लेणी पाहण्यासाठी कमीतकमी चार ते पाच दिवस लागू शकतात.
तुळशीबाग (Tulsi Baug)
पुण्यात गेल्यावर जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर पुण्यातील तुळशीबागेला जरूर भेट द्या. तुळशीबागेत तुम्हाला काय मिळेल यापेक्षा काय मिळणार नाही हेच विचारावं लागेल. कारण तुळशीबागेत तुम्हाला सौंदर्यसाधने, देवदेवतांच्या मुर्ती, भांडी-कुंडी, खेळणी, भेटवस्तू अशा सर्वच गोष्टींमध्ये निरनिराळे प्रकार मिळू शकतात.
विश्रामबाग वाडा (Vishrambaug Wada)
विश्रामबाग वाडा हा पेशवा दुसरा बाजीराव यांचे निवासस्थान होते. वडिलोपार्जित शनिवारवाड्यात राहण्यापेक्षा दुसरे बाजीराव विश्रामबागेत राहणं पसंत करत असत. आता पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी एक सांस्कृतिक केंद्र सुरू केले आहे.
पुण्यातील संग्रहालय ( Popular Museums In Pune)
पुणे शहरामध्ये अशी अनेक वस्तू संग्रहालये आहेत. ज्यामधून पुण्याच्या संस्कृतीचं दर्शन घडतं.
महात्मा फुले संग्रहालय (Mahatma Phule Museum)
पुण्यात घोळे रोडवर शिवाजी नगर येथे महात्मा फुले संग्रहालय आहे. महात्मा फुलेंचे हे निवासस्थान होते. पूर्वी या संग्रहालयाला ‘रे म्युझियम’ असे म्हटले जायचे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आणि पुण्यातील कार्य सर्वश्रुत आहे. या संग्रहालयात शेती, शेतीची साधने, हस्तकला, दागदागिने, कोरिव काम, पुतळे अशा जुन्या वस्तूंचे जतन केलेले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती
राजा दिनकर केळकर संग्रहालय (Raja Dinkar Kelkar Museum)
पुणे शहरातील हे एक जुने वस्तूसंग्रहालय आहे. या संग्रहालयाची निर्मिती दिनकर गंगाधर टिळक उर्फ कवी या अज्ञातवासी व्यक्तीने केलेली आहे. या संग्रहालयाला त्यांनी त्यांच्या राजा या अल्पवयात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव दिलेले आहे. दिनकर केळकर यांना जुन्या पुरातन वस्तू जमा करण्याचा छंद होता. पुण्यात गेला तर हे संग्रहालय जरूर पहा.
पुण्यातील मंदिरे (Temples To Visit In Pune)
पुण्यामध्ये अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. पुण्यातील मानाचे गणपती आणि त्यांची सजावट पाहण्यासाठी गणेशोत्सवात देश-विदेशातून भक्तमंडळी पुण्यात येतात.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Dagadusheth Halwai Ganapati Temple)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे एके काळचे पुण्यातील प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांनी पुण्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची लोकप्रियता वाढत आहे. गणेशोत्सवामध्ये या गणपतीला मानाचे स्थान आहे.
पाताळेश्वर मंदिर आणि लेणी (Pataleshwar Temple And Caves)
पुण्यातील शिवाजी नगरमध्ये वसलेलं हे एक शिवालय आहे. या मंदिरामध्ये शिवालय राजवटीच्या खुणा दर्शवणाऱ्या सुंदर लेण्या आहेत. ही लेणी जमिनीखाली खोदण्यात आलेली आहेत. शांतता हवी असेल तर पाताळेश्वर मंदिराला जरूर भेट द्या.
बालाजी मंदिर (Balaji Temple)
पुण्यापासून नारायणगाव, केतकवळे येथे तिरूपती बालाजीचे मंदिर आहे. तिरूपती बालाजीप्रमाणे त्याची रचना करण्यात आलेली आहे . या मंदिराला प्रतीबाजाली या नावाने ओळखलं जातं.
वाचा – मुंबईत हँगआऊटसाठी बेस्ट कॅफे, तुमचाही वेळ जाईल मस्त
चतुश्रुंगी मंदिर (Chaturshringi Temple)
पुण्यातील अनेक ठिकाणांप्रमाणेच हे मंदिरदेखील फार प्रसिद्ध आहे. चंतुश्रुंगी मंदिर हे देवीचं मंदिर असून या मंदिरात भाविकांची सतत रांग सुरू असते. हे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे असं म्हणतात.
रांजणगाव गणपती (Ranjangaon)
महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी एक अष्टविनायक पुण्यातील रांजणगावात आहे. असं म्हणतात की त्रिपूरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने या ठिकाणी गणपतीची पुजा केली होती. या मंदिराच्या प्रसिद्धीमुळे अनेक भक्त मंडळी या ठिकाणाला भेट देतात.
मोरेश्वर मंदिर (Moreshwar Temple)
मोरेश्वर हा देखील अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. मोरेश्वराचे मंदिर हे काळ्या दगडात बांधलेले आहे. गावच्या मध्यभागी हे मंदिर बांधलेले असून त्याच्या चारही बाजूंनी उंच मनोरे आहेत.
लेण्याद्री (Lenyadri)
पुण्यात असाल तर या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या लेण्याद्री गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जरूर जा. मात्र या गणपतीच्या दर्शनासाठी तुम्हाला या उंच डोंगरावर चढण्याची तयारी ठेवावी लागेल.
पुणे शहरातील धरणे (Famous Dams)
पुणे शहराला पाणीपूरवठा करणारी धरणे देखील फारच प्रसिद्ध आहेत. पावसाळ्यात या धरणांच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी पर्यटक येतात.
मुळशी धरण (Mulshi Dam)
पुण्यातील मुळा नदीवर वसलेलं सुंदर धरण म्हणजे मुळशी धरण. पुणे शहरात या धरणातील पाण्याचा पूरवठा केला जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगा निसर्गरम्य घाट आणि दऱ्या, चहूबाजूने पसरलेलली हिरवळ, पक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी या धरणाच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे. या धरणासोबत कोराईगड आणि धानगडदेखील तुम्ही नक्कीच पाहू शकता. पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठी या ठिकाणाला अनेक पर्यटक भेट देतात.
खडकवासला धरण (Khadakwasla Dam)
पुणे शहरातील खडकवासला हे एक प्रमुख धरण आहे. पुणे शहराला या धरणातून पाणीपूरवठा केला जातो. पुणे शहरापासून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या खडकवासला धरणाला पुण्याची चौपाटी असं म्हणतात. सिंहगडला जाताना खडकवासला धरण वाटेवरच लागते. त्यामुळे तुम्ही सिंहगडला जाणार असाल तर खडकवासला धरणालादेखील जरूर भेट द्या.
पानशेत धरण (Paanshet Dam)
पुणे शहराला पाणी पूरवठा करणारं पानशेत हे एक जुनं आणि महत्त्वाचं धरण आहे. पावसाळ्यात या धरणाच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. डोंगरावर जमा झालेले ढग, गावागावातील शेतमळी, धबधबे, आहोळ पाहण्यासाठी पानशेतला जरूर भेट द्या.
पुणे शहरापासून जवळ असलेली पर्यटन स्थळं (Places To Visit Near Pune)
पुणे शहराप्रमाणेच पुण्याच्या आजूबाजूलादेखील अनेक पर्यटन स्थळं आहेत. पुणे आणि मुंबईपासून काही किलोमीटरवर असल्याने तुम्ही सुट्टीच्या दिवशी या ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकता.
लोणावळा (Lonavla)
पुण्यापासून जवळ असलेल्या ठिकाणांमध्ये लोणावळा हे ठिकाण फारच लोकप्रिय आहे. लोणावळा हे एक थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. लोणावळा पुण्यापासून 150 किमीवर आहे. ज्यामुळे मुंबईहून पुण्याला जाताना लोणावळा मध्ये लागतं. लोणावळ्यामध्ये राजमाची पॉईंट, वळवण धरण, धबधबे, भुशी धरण, टायगर्स लीप, कार्ला लेणी, लोहगड, विसापूर अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत. याशिवाय या ठिकाणची चिक्की फारच प्रसिद्ध आहे.
खंडाळा (Khandala)
लोणावळ्यापासून अगदी पाच किलोमीटरवर असलेलं खंडाळा देखील एक छान पर्यटन स्थळ आहे. उन्हाळ्यात थंडाव्यासाठी आणि पावसाळ्यात गिर्यारोहणासाठी या ठिकाणांना पर्यटक भेट देतात.
लवासा सिटी (Lavasa City)
लवासा सिटी हे पुण्यातील एक नियोजित, निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. पुण्यापासून काहीश्या अंतरावर असलेल्या लवासा सिटीची ख्याती जगभरात पसरलेली आहे. प्रशस्त हॉटेल्स आणि अत्याधुनिक सुविधांनी नटलेलं हे एक छोटंसं शहर आहे. थोडंस खर्चिक असलं तरी लवासामध्ये राहण्याचा अनुभव नक्कीच रोमांचक असू शकतो.
अॅम्बी वॅली
पुणे शहराजवळ वसलेलं अॅंम्बी व्हॅली हे देखील एक निसर्गरम्य छोटेखानी शहर आहे. लोणावळ्यातून तुम्ही अॅंम्ही व्हॅलीला जावू शकता. अकरा हजार एकरमध्ये हे शहर वसलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही दोन ते तीन दिवस निवांतपणे राहण्यासाठी नक्कीच जाऊ शकता.
मोराची चिंचोळी (Chincholi)
पुणे – अहमदनगर रोडवर शिरूर जवळ मोराची चिंचोळी हे एक छान पर्यटन स्थळ आहे. या गावात मोरांचे वास्तव्य असल्याने याला मोराची चिंचोळी असं नाव पडलं आहे. मोकळ्या वातावरणात फिरणारे मोर पाहण्यासाठी पर्यटक या गावाला भेट देतात. पावसाळ्यात मोरांचे नृत्य पाहण्याची एक वेगळाच आनंद तुम्हाला या गावात नक्कीच मिळू शकतो. शिवाय या गावांमध्ये पर्यटकांसाठी होम स्टेची व्यवस्थादेखील करण्यात येते.
जेजुरी (Jejuri)
पुण्यातील सर्व ठिकाणं फिरून झाली असतील तर खंडोबादेवाच्या दर्शनासाठी तुम्ही पुण्याजवळ जेजुरीला जावू शकता. जेजुरी महाराष्ट्राचे कुलदैवत असून ते जेजुरीचा खंडोबा या नावानेदेखील ओळखलं जातं. खंडोबा देव अनेक लोकांचे आराध्यदैवत असून देवदर्शनासाठी भक्तमंडळी या गावात येत असतात.
आळंदी (Alandi)
पुण्यापासून जवळ असलेल्या आळंदी गावादेखील तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. देवाची आळंदी या नावाने आळंदी गावाची ख्याती आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी गावात समाधी घेतली होती. आळंदी इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं एक गाव आहे.
देहू (Dehu)
पुण्यात फिरताना आळंदीसोबत देहूलादेखील जरूर जा. आळंदी आणि देहू ही भक्तीरसात भिजलेली गावं आहेत. ज्यांना संतांच्या चरित्रात रस आहे अशा लोकांनी या ठिकाणांना अवश्य भेट द्यावी. तुम्हा या दोन्ही गावांमध्ये अप्रतिम भक्तीचा अनुभव येऊ शकतो. देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. देहूमध्ये भंडारा डोंगर आणि गाथा मंदिर पाहण्यासारखी स्थळं आहेत.
आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही यापैकी कोणत्या पर्यटन स्थळाला भेट दिली हे आम्हाला जरूर कळवा.
पुण्यातील गड आणि किल्ले (Forts And Castles)
पुणे शहरात अनेक दुर्गम किल्ले आहेत. ज्यांच्याकडे पाहून छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळू शकतो.
लोहगड (Lohagad Fort)
पुणे शहराजवळ असलेला लोहगड हा किल्ला स्वराज्यातील एक बळकट किल्ला होता. गडावर जाण्यासाठी चार प्रमुख प्रवेशद्वार आणि निमुळता रस्ता आहे. प्रवेशद्वारांना गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा अशी नावे आहेत. लोहगडावर शंभर लोक एकत्र राहू शकतील अशी गुहा आहे. स्वराज्याच्या ऐतिहासिक खुणा पाहण्यासाठी या गडाला जरूर भेट द्या.
पुरंदर (Purandar Fort)
पुण्याजवळ असलेल्या पुरंदर किल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कात्रज घाट अथवा दिवे घाट ओलांडून तुम्ही पुरंदरवर जावू शकता. पुरंदराच्या चौफेर माच्या आहेत. पुरंदरसोबतच तुम्ही वज्रगडदेखील पाहू शकता. गडावर पाहण्यासाठी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
शिवनेरी किल्ला (Shivneri)
पुण्यातील जुन्नर गावात शिवनेरी किल्ला आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्याने या किल्ल्याला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. गडावर आजही शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काही खुणा तुम्हाला दिसू शकतात. ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास आणि शिवाजी महाराजांविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल त्यांनी या स्थळाला अवश्य भेट द्यावी.
रायगड (Raigarh)
रायगड किल्याची महाराष्ट्राच्या इतिहासात एक विशिष्ठ ओळख आहे. रायगड किल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख होती. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेकदेखील याच गडावर झाला होता. पूर्वी या किल्ल्याचे रायरी नाव होते मात्र नंतर स्वराज्याची राजधानी झाल्यावर या किल्ल्याला रायगड हे नाव देण्यात आले. पुणे शहरात फिरताना रायगड किल्ला पाहण्यास मुळीच विसरू नका. गडावर रोप वेने जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय गडावर राहण्याची आणि जेवणाची सोयदेखील आहे.
राजगड (Rajgarh)
पुण्यात किल्लाची सफर करताना राजगड किल्ला विसरून कसं चालेल. राजगड हा शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेला एक भव्य दिव्य किल्ला आहे. या किल्लावर तीन माच्या आणि एक बालेकिल्ला आहे. राजगड निसर्गसौंदर्याने नटलेला एक किल्ला असून या किल्लावर शिवाजी महाराजांच्या वास्तव्याच्या अनेक खुणा तुम्हाला दिसू शकतात.
सिंहगड (Singhgarh)
सिंहगड हे पुण्यात पर्यटकांना आकर्षक करणारं एक अप्रतिम स्थान आहे. पुर्वी या गडाला कोंढाणा या नावाने ओळखलं जायचं. कोंढाणा मुघलांच्या तावडीतून सोडवताना युद्धात मृत्युमुखी पडलेल्या तानाजी मालुसरे यांच्याबाबत शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले होते. तेव्हापासून या किल्लाला सिंहगड या नावाने ओळखण्यात येतं. सिंहगड पुण्यातील हवेली तालुक्यामधील डोणजे गावात आहे. सिंहगड जमीनीपासून जवळजवळ 1290 मी. उंचीवर आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सिंहगडावर पर्यटकांची गर्दी असते. पावसाळ्यात सिंहगड अतिशय मनमोहक दिसतो. गडावर जाण्यासाठटी पक्का रस्ता असल्याने गाडीने गडावर जाता येतं. ज्यामुळे सिंहगडावर जाणं फारच सोपं झालं आहे.
You Might Like This: