ADVERTISEMENT
home / आरोग्य
tondacha vas ka yeto

तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे घरगुती उपाय | Tondachi Durgandhi Upay

#badbreath अर्थातच तोंडाचा वास येणे अथवा दुर्गंधी येण्याचा त्रास अनेकांना होत असतो. वास्तविक हा वास त्या व्यक्तीच्या तोंडातून येत नसून  त्यांच्या श्वासाला येत असतो. यामागे अनेक कारणं असू शकतात जसं की कांदा, लसणाचे अथवा मांसाहारी पदार्थ खाणे, एखादा गंभीर आजार असणे, पोट स्वच्छ नसणे, तोंडाची अस्वच्छता, म्हातारपण अशा अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असू शकतात.  बोलताना अशा लोकांच्या तोंडातून अतिशय घाणेरडा दुर्गंध येऊ लागतो. ज्यामुळे समोरची व्यक्ती त्यांच्यापासून दूर जाते. तोंडातून घाण वास येत असल्यामुळे अशा लोकांशी बोलण्याआधी लोक बराच विचार करतात.शिवाय अशी समस्या असलेल्या लोकांना इतरांशी बोलण्याची लाज वाटू लागते. यासाठीच या समस्येची लक्षणं, कारणं आणि उपाययोजना जाणून घ्या. ज्यामुळे तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्याचा संकोच वाटणार नाही.

तोंडाचा वास येणे लक्षणे (Tondacha Vas Ka Yeto)

tondacha vas ka yeto
tondacha vas ka yeto

तोंडाला घाण वास येण्यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे याबाबत विशिष्ट लक्षणे सांगता येणं कठीण आहे. मात्र जर खालीलपैकी काही लक्षणं आढळली तर त्वरीत तुमच्या डेंटिस्टची भेट घ्या.

  • तोंडातून सतत आणि अतिशय घाणेरडा वास येणं
  • तोंडाची चव जाणं
  • तोंडात आंबट पाणी निर्माण होणं
  • जीभेवर घाणीचा थर जमा होणं 
  • सर्दी-खोकल्यामुळे नाकातून घाणेरडा वास येणे
  • हिरड्या अथवा दातांमध्ये इनफेक्शन होणे

तोंडाचा वास येण्याची कारणे (Causes Of Bad Breath In Marathi)

आधीच सांगितल्याप्रमाणे या समस्येची कारणं विविध असू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला वर दिलेली काही लक्षणे आढळली तर त्यामागची कारणे शोधून त्याप्रमाणे या समस्येवर उपचार नक्कीच करता येऊ शकतात.

तोंडाची अस्वच्छता

प्रत्येक माणसाने शरीराची योग्य काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण शरीर हीच खरी माणसाची संपत्ती आहे. तोंडाची स्वच्छता हा शरीराच्या स्वच्छतेतील एक महत्त्वाचा भाग आहे. आपण नियमित काही ना काही तरी खात असतो. त्यामुळे दररोज दोन वेळा दात, हिरड्या, जीभ यांची स्वच्छता राखणं गरजेचं आहे. मात्र असं न केल्यामुळे दातांमध्ये अन्नकण अडकून राहतात. ते तिथे कुजतात आणि तोंडाचे इनफेक्शन होते. ज्यामुळे दातदुखी होऊ शकते आणि तोंडाला घाणेरडा वास येणं अगदी स्वाभाविक आहे.

ADVERTISEMENT

उग्र वासाचे अन्नपदार्थ खाणे (Eating A Foul-Smelling Food)

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये स्वयंपाकामध्ये कांदा, लसूण, मसाले, हिंग अशा उग्र वासाचे पदार्थ वापरण्यात येतात. या पदार्थांना एक प्रकारचा तीव्र वास असतो. ज्यामुळे असे पदार्थ कितीही स्वादिष्ट लागले तरी त्याचा वास आपल्या तोंडातून येतो. त्यामुळे जर तुम्ही सतत असे पदार्थ खात असाल तर त्यानंतर दात आणि तोंड स्वच्छ धुणे गरजेचे आहे. मात्र असं न केल्यास तुमच्या तोंडाला घाणेरडा वास नक्कीच येऊ शकतो.

तोंड कोरडे होणे

जर तुमच्या तोंडात योग्य प्रमाणात लाळ निर्माण झाली नाही तर तुमच तोंड कोरडं होतं. बऱ्याचदा काही आजारांवर घेण्यात येणाऱ्या औषधांमुळे तोंडात लाळ निर्माण होण्याचं प्रमाण कमी होत असतं. लाळ शरीरातील अन्नाचे पचन करण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका निभावत असते. शिवाय लाळेमुळे तोंडातील जीवजंतू, साचलेले अन्नकण निघून जात असतात. मात्र लाळ कमी निर्माण झाल्यामुळे तोंड कोरडं होतं आणि  तुमच्या तोंडाला घाणेरडा वास येऊ लागतो.

धुम्रपान आणि मद्यपान

तोंडाला घाणेरडा वास येण्यामागच प्रमुख कारण व्यसनांच्या आहारी जाणं असू शकतं. कारण धुम्रपान, तंबाखू, मद्यपान याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीराच्या स्वास्थ्यावर होत असतो. व्यसनांमुळे दातांवर डाग निर्माण होतात. दातांचं आणि हिरड्यांच्या स्नायूंवर याचा परिणाम झाल्यामुळे तोंडांच्या समस्या निर्माण होतात. ज्यामुळे तुमच्या तोंडातून घाणेरडा वास येण्याची समस्या निर्माण होते. 

काही आजार

काही आरोग्य समस्यांमुळेदेखील तुमच्या तोंडाला घाणेरडा वास येऊ शकतो. जसं की दात अथवा हिरड्यांना इनफेक्शन झाल्यास, पोटाच्या अथवा आतड्यांशी संबंधित विकार, घशाचे इनफेक्शन, सर्दी, खोकला, फुफ्फुसांशी निगडीत आजार, मधुमेह, अपचानाची समस्या, यकृत अथवा किडनीचे आजार अशा विविध प्रकारच्या आजारांमुळे तुमच्या तोंडाला घाणेरडा वास येऊ शकतो.

ADVERTISEMENT

वाचा – अक्कल दाढ दुखीवर उपाय

तोंडाचा वास येणे यावर कशी काळजी घ्यावी (How To Care For Odor In Marathi)

ज्या व्यक्तीच्या तोंडाला घाणेरडा वास येत असेल त्याने नियमित काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमच्या तोंडाला येणारा दुर्गंध कमी करता येऊ शकतो. 

  • दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात स्वच्छ करा.
  • तोंड धुताना गुळणी करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. ज्यामुळे तुमच्या तोंडातील जीवजंतू नष्ट होतील
  • नियमित जीभ स्वच्छ करा.
  • व्यसनांपासून शक्य तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा कारण व्यसनांमुळे तुमच्या तोंडाला घाणेरडा वास येऊ शकतो.
  • फार काळ उपाशी राहू नका
  • सतत भरपूर पाणी पिण्याची सवय स्वतःला लावा
  • नियमित तुमच्या डेटिंस्टला भेट द्या
  • जर तुम्ही उग्र वास असणारे पदार्थ खाल्ले असतील तर त्यानंतर एखादा मुखवास खा. 

तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे घरगुती उपाय (Home Remedies To Reduce Odor In Marathi)

तोंडाला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपचार नक्कीच करू शकता. तुमच्या स्वयंपाकघरातील काही छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळवता येऊ शकते. अगदी प्राचीन काळापासून हे घरगुती उपाय केले जात आहेत.

भरपूर प्रमाणात पाणी प्या

भरपूर प्रमाणात पाणी पिण्याने तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळवता येऊ शकते. पाण्यामुळे तुमच्या तोंडाला कोरडेपणा येणार नाही शिवाय यामुळे तोंडाची स्वच्छता राखली जाईल आणि तुमच्या तोंडाच्या दुर्गंधीपासून नक्कीच सुटका मिळेल.

ADVERTISEMENT

कोंथिंबीर (Coriander)

कोंथिंबीर अथवा धण्यांना स्वतःचा एक वेगळाच अॅरोमा असतो. कोथिंबीरीचे अनेक फायदे आपल्याला माहितच आहेत. त्यामुळे जर तुम्ही कोंथिंबीर अथवा धणे चावून खाल्ले तर तुमच्या तोंडाला येणारा वास कमी होईल. जेवणानंतर अथवा दिवसभरात कधीही तुम्ही कोंथिंबीर अथवा धणे चघळू शकता.

दह्याचा आहारात समावेश करा

एका संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की तोंडाला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी दही खाणे फायदेशीर ठरू शकते. दह्यामधील काही घटकांमुळे तुमच्या तोंडाला येणारा वास कमी होऊ शकतो.

लिंबूवर्गीय फळे खा

तोंडाचा वास कमी करण्यासाठी संत्री, लिंबू खाणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कारण यामधील व्हिटॅमिन सी तोंडातील जीवजंतूंशी लढा देतं ज्यामुळे ते नष्ट होतात. ज्यामुळे तुमच्या तोंडाला येणारा वास कमी होऊ शकतो. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांना बॅक्टेरिआ फायटर असंही म्हटलं जातं.

जेवणानंतर बडीशेप खा

बडीशेप हा मुखवासाचा एक चांगला प्रकार आहे. जेवणानंतर थोडीशी बडीशेप चघळल्यास जेवणानंतर तोंडाला येणारा उग्र वास नक्कीच कमी करता येऊ शकतो. म्हणूनच बऱ्याचदा मांसाहार अथवा जड जेवण केल्यावर बडीशेप देण्याची पद्धत आहे.

ADVERTISEMENT

वेलची चघळा

वेलची चघळल्यानेदेखील तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. वेलची ही अॅंटिसेप्टिक असल्यामुळे वेलची खाण्याने तुमच्या तोंडातील बॅड बॅक्टिरिया नक्कीच कमी होतात. तोंडाला येणारा घाण वास या उपायाने (tondacha vas upay) कमी करता येऊ शकतो. 

तोंडात लवंग ठेवा

लवंग तोंडात ठेवल्याने तुम्हाला तुमच्या तोंडाला येणारा घाण वास कमी करता येऊ शकतो. लवंगाचे अनेक फायदे आहेत. लवंग हा एक मसाल्याचा पदार्थ असल्याने त्याला स्वतःचा एक सुगंध असतो. ज्यामुळे तोंडाचा वास कमी करण्यास मदत होते.

दालचिनीचा तुकडा चघळा

दालचिनीचा वापर करून तुम्ही ही समस्या सोडवू शकता. दालचिनीत अॅंटि बॅक्टिरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे तोंडातील जीवजंतू कमी करण्यास मदत होते. बॅगेत या वस्तू ठेवून तुम्ही घराबाहेरही या समस्येपासून दूर राहू शकता. 

गुळण्या करा

गुळण्या केल्यामुळे तोंडातील जीवजंतू कमी होतात आणि तोंडाला येणारा वास कमी होतो. चांगला परिणाम हवा असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्याने दिवसभरात दोन वेळा गुळणी करा. हा उपाय तोंडाच्या स्वच्छतेसाठी अतिशय उत्तम आहे.  

ADVERTISEMENT

पुदिन्याची पाने खा

पुदिन्याची पाने फायदेशीर आहेत. त्यामुळे ही पानं चघळूनदेखील तुम्ही तोंडाला येणारी ही दुर्गंधी कमी करू शकता. पुदिन्याची पानांना एक विशिष्ट सुगंध असतो. ज्यामुळे तुमच्या तोंडाला येणारा घाणेरडा वास कमी होण्यास मदत होते. अनेक मुखवासांमध्येदेखील याचा वापर केला जातो.

Eat Mint Leaves

Tondacha Vas Upay

तोंडाचा वास येण्याबाबत काही महत्त्वाचे प्रश्न (FAQ’s)

1. तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळू शकते का?

तोंडाला येण्यामागचं कारण काय यावरून तुमच्या तोंडाला येणारा वास कमी करता येऊ शकतो की नाही हे समजू शकते. जर एखादा आजार यामागचं कारण असेल तर डॉक्टरांकडून त्यावर योग्य ते उपचार करून घ्या. शिवाय दातांची आणि तोंडाची योग्य काळजी घ्या. जीवनशैलीत बदल करून तुम्ही तुमच्या या समस्येतून तुमची सुटका नक्कीच करून घेऊ शकता.

2. तोंडांच्या अस्वच्छतेमुळे एखादा आजार होऊ शकतो का?

तोंडाची स्वच्छता राखणं प्रत्येकासाठी नक्कीच फार गरजेचं आहे. मात्र जर तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाही. तर यामुळे तोंडाचे इनफेक्शन अथवा इतर गंभीर आजार नक्कीच होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

3. लहान मुलांना तोंडाची स्वच्छता राखण्यास कसं शिकवावं?

संपूर्ण शरीराची काळजी कशी घ्यावी याबाबत लहान मुलांना वेळीच शिकवणं गरजेचं आहे. नित्यनेमाने अंघोळ करणं, दररोज कमीतकमी दोन वेळा दात, हिरड्या कशा स्वच्छ करावं हे त्यांना तुम्ही लहानपणीच शिकवू शकता. जेवणापूर्वी हात स्वच्छ करणं आणि जेवणानंतर चूळ भरायला शिकवून तुम्ही त्यांच्या दातांची काळजी घेऊ शकता. 

आम्ही सांगितलेले हे उपाय तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉस्कमध्ये जरूर कळवा.

15 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT