लग्न हे सगळ्याच मुलींसाठी एक स्वप्नवत सोहळ्याप्रमाणे असते. आपल्या आवडीचा जोडीदार निवडल्यानंतर त्याच्यासोबत विवाहसोहळ्यात बांधले जाताना तो सोहळा तो क्षण अगदी मनासारखा व्हावा असे प्रत्येकीला वाटते. या सोहळ्यासोबतच लग्नात सगळ्यात सुंदर आणि वेगळे दिसायची इच्छाही प्रत्येकीची असते म्हणूनच या दिवसाचा मेकअपही खास असतो. इतर मेकअपच्या तुलनेत bridal makeup हा वेगळा असतो. तुम्ही येत्या काही काळात लग्न करणार आहात? तर मग तुम्हाला bridal makeup काय ते माहीत हवं. जाणून घेऊया bridal makeup संदर्भात सर्वकाही
Table of Contents
Bridal makeup का असतो खास? (Why Bridal Makeup Is Different?)
लग्नाच्या दिवशी नवरीने केलेला मेकअप हा वेगळाच असला पाहिजे तरच तुम्ही नवरी आहात हे लोकांना कळेल. असं म्हणतात, लग्नात नवरीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आलेले असते. जर तुम्ही त्याला योग्य मेकअपची साथ दिली. तर तुमचा ग्लो अधिक खुलून येतो. तुम्ही इतरवेळी पावडर, लिपस्टिक, मस्कारा, काजळ, ब्लशर लावणे गोष्ट वेगळी आणि लग्नाच्या दिवशी लावणे गोष्ट वेगळी. कारण तुमच्या प्रत्येक लुकप्रमाणे तुम्हाला मेकअप करण्यात येतो. तो इतका परफेक्ट असतो की, तुम्हाला तुम्ही कसे दिसता याची काळजी घ्यावी लागत नाही. शिवाय इतर दिवशींच्या मेकअपच्या तुलनेत या दिवशी वापरले जाणारे कॉस्मेटिक्सही वेगळे आणि खास असतात. इतकं सगळं वेगळं आणि खास असतं की, त्यामुळेच तुमचा मेकअप इतर दिवसांच्या तुलनेत फारच वेगळा आणि खास असतो.
नववधूंवर खुलून दिसतील बाजूबंदच्या या ’15’ डिझाईन्स
पुण्यातील Best bridal makeup artist खास तुमच्यासाठी (Best Bridal Make Up Artist In Pune)
आता जर तुम्ही पुण्यात असाल तर तुमच्यासाठी आम्ही पुण्यातील best bridal makeup artist ची यादी तुमच्यासाठी काढली आहे. प्रत्येक आर्टिस्टची स्पेशालिटी आणि बजेट या नुसार आम्ही ही यादी केली असून तुम्ही त्याचा उपयोग करु शकता.
नववधूला ब्रायडल मेकअप विषयी ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्या
1. तेजस्विनी मेकअप आर्टिस्ट (Tejaswini Makeup Artist)
पुण्यातील best makeup artist मध्ये तेजस्विनी मेकअप आर्टिस्टचे नाव अगदी आवर्जून घेतले जाते. लग्न कोणत्याही पद्धतीचे असो तुम्हाला इच्छित असलेला लुक देण्यासाठी हे मेकअप आर्टिस्ट प्रसिद्ध आहे.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): प्री वेडींग पासून ते रिसेप्शनपर्यंत सगळ्या लुकसाठी तुम्हाला इथे मेकअप करुन मिळेल. तिच्या मेकअपमधील वैविध्यामुळेच तिला या ठिकाणी सर्वाधिक पसंती मिळते.
*बजेट (Budget) : 10 हजारांच्या पुढे
*पत्ता (Address): शॉप क्रमांक 2 आणि 3, पहिला मजला,रोहित रेसिडन्सी, कपिल मल्हार बिल्डींगच्या समोर, बाणेर, पुणे 4111045
*इन्स्टाग्राम अकऊंट (Instagram account): https://www.instagram.com/tejaswini_makeupartist/?hl=en
दक्षिण भारतीय केशरचनांबद्दल देखील वाचा
2, युजे मेकओव्हर (Uj’s Makeover)
महाराष्ट्रीय मेकअपसाठी तुम्हाला पुण्यात कोणी मेकअप आर्टिस्ट हवी असेल तर तुम्ही uj’s मेकओव्हरला नक्कीच संपर्क साधून शकता. तुम्हाला काहीतर युनिक आणि वेगळी करायची इच्छा असेल तरी देखील त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मेकअप करुन मिळेल.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): महाराष्ट्रीयन नवरीला साजेसा असा मेकअपही येथील खासियत आहे. उत्तम हेअरस्टाईलदेखील तुम्हाला अगदी वाजवी दरात या ठिकाणी करुन मिळेल. जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये काही करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता.
*बजेट(Budget): साधारण 5 हजारांच्या पुढे
*पत्ता (Address): तिरुपती काटे पिंपळ रोड, पिंपरी कॉलनी, चिंचवड, पुणे-411017
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account):
Fhdhghttps://www.instagram.com/ujsmakeover/
मेकअप उत्पादनांबद्दल देखील वाचा
3, मेकअप आर्टिस्ट निकिता काळे (Makeup Artist Nikita Kale)
लग्नाचा दिवस नवरीसाठी किती खास असतो हे आम्ही तुम्हाला सांगितले. त्यामुळे या दिवशी तुम्हाला सगळ्यात जास्त सुंदर बनवते ते निकिता काळे या मेकअप आर्टिस्टचा मेकअप. महाराष्ट्रीयन,साऊथ इंडियन, गुजराती कोणत्याही नववधूला नटवण्यात हे एक्सपर्ट आहेत.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): तुम्ही कसेही दिसा तुम्हाला पूर्णपणे बदलण्याचे मेकअप कौशल्य निकिता काळे हीच्या टीमकडे आहे. बेसिक ते अगदी प्रोफेशनल असा मेकअप आणि उत्तम हेअरस्टाईल तुम्हाला या ठिकाणी करुन मिळेल.
*बजेट(Budget): 10 हजार रुपयांच्या पुढे
*पत्ता (Address): वडगाव-बुद्रुक- मुंबई बँगलोर हायवे, सिंहगड रोड, पुणे 411041
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/makeupartist_nikitakale/?hl=en
हेही वाचा: मराठा मध्ये वेडिंग मेकअप
4. मेकअप बाय प्रतिची (Makeup By Pratichi)
आता जर तुम्हाला तुमच्या लग्नात रॉयल असा लुक हवा असेल तर तुमच्यासाठी मेकअप बाय प्रतिची हा बेस्ट पर्याय आहे. तुम्हाला मेकअपची विविधता या ठिकाणी पाहायला मिळेल.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): वर सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला रॉयल लुक हवा असेल तर तुम्हाला तसा लुक तुम्हाला या मेकअप आर्टिस्टकडून दिला जातो. उत्तम मेकअप प्रोडक्ट यासाठी वापरले जातात.
*बजेट(Budget): साधारण 16 हजार रुपयांच्या पुढे
*पत्ता (Address): B 304, सुप्रीम इस्तोदो, बिहाईंड सुप्रीम हेडक्वाटर्स, बाणेर, पुणे- 411045
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/makeupbypratichi/
तसेच भारतात सर्वोत्कृष्ट डिओडोरंट वाचा
5. खुशबू घोडके मेकअप आर्टिस्ट (Khushboo Ghodke Makeup Artist)
मेकअपसाठी पुण्यातील खुशबू घोडके या मेकअप आर्टिस्टचे नावसुद्धा फार प्रसिद्ध आहे. तुम्हाला तिच्या मेकअपमध्ये विविधता पाहायला मिळेल. विविधतेसोबतच तुम्हाला सूट होईल असाच मेकअप तुम्हाला तिच्याकडून करुन मिळेल.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): खुशबू घोडके मेकअप आर्टिस्ट कंपनीला एकूण 4 वर्षांचा या क्षेत्राचा अनुभव असून कित्येक नववधूंना त्यांनी आतापर्यंत नटवले आहे. नुसता मेकअप नाही तर त्यासोबत तुम्हाला उत्तम हेअरस्टाईल आणि मार्गदर्शनही तिच्याकडून करुन मिळेल.या शिवाय तुम्ही तिच्या मेकअपचा पेड ट्रायअल आधी घेऊ शकता.
*बजेट(Budget): साधारण 15 हजार रुपये
*पत्ता (Address): मयुर कॉर्नर, फ्लॅट क्रमांक 11,12, लेन क्रमांक 4, प्रभात रोड, डेक्कन जिमखाना, पुणे- 411004
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account):https://www.instagram.com/khushbooghodke/?hl=en
Also Read Benefits Of Primer In Marathi
6. निता कुडाळे मेकअप (Neeta Kudale Makeup Artist)
लग्नासाठीचा परफेक्ट लुक तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी निता कुडाळे मेकअप आर्टिस्ट आणि त्यांची टीम बेस्ट आहे. अगदी वाजवी दरात उत्तम प्रीवेडींग आणि वेडींग शूट असे पॅकेज तुम्हाला या ठिकाणी मिळेल.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): निता यांना या क्षेत्राचा तब्बल 10 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी कित्येक नववधूंना त्यांच्या लग्नासाठी तयार केले आहे. अगदी साडी ड्रेपिंग, मेकअप पासून सगळ्यागोष्टी त्या अगदी परफेक्ट अशा या ठिकाणी करतात. शिवाय उत्तम दर्जाचे मेकअप प्रोडक्टही या ठिकाणी वापरले जातात.
*बजेट(Budget): साधारण 10 हजार रुपयांपुढे
*पत्ता (Address): साईलीला निवास क्रमांक- 43, शिवांजली लेन क्रमांक- 2, दत्त नगर पुणे – 411046
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/neetas_makeup_/
Also Read Bridal Makeup Things In Marathi
7. अभिषेक निंबाळकर मेकअप आर्टिस्ट ( Abhishek Nimbalkar Makeup Artist)
पुण्यातील अभिषेक निंबाळकर यांचे नाव मेकअपच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे. तुम्हाला ट्रेडिशनल-वेस्टर्न लुकसाठी हे प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्हाला काही वेगळे ट्राय करायचे असेल तर नक्की अभिषेक निंबाळकरला संपर्क साधा.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): हेअरस्टाईल आणि मेकअपमध्ये अभिषेकच्या टीमचा हातखंडा आहे. नववधूनुसार वेगवेगळे लुक ट्राय केले जातात.तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला ते करुन मिळू शकते.
*बजेट(Budget): साधारण 10 हजार रुपयांपुढे
*पत्ता (Address): गंगाधाम फेज 2, G2-101, पुणे 411037
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/makeupartistabhishek/
वाचा – मेकअप किट (Makeup Kits In Marathi)
8. वृंदा मोरये मेकअप आर्टिस्ट (Vrunda Morey Makeup Artist)
नवरीचे संपूर्ण पॅकेज तुम्हाला कोणाला द्यायचे असेल तर तुम्ही वृंदा मोरये यांना ही जबाबदारी देऊ शकता. नववधूला संपूर्ण सजवण्याची जबाबदारी या ठिकाणी घेतली जाते. या शिवाय लग्नाची इतर तयारी देखील त्यांच्या टीमकडून पार पाडली जाते
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): वृंदाकडून मेकअप करुन घेतलेल्यांचा अत्यंत चांगला अनुभव आहे. तुमच्या चेहऱ्याला अगदी नॅचरल वाटेल असा मेकअप ती करुन देते. मेकअप शिवाय तुम्हाला कोणत्याही अन्य सुविधा हव्या असतील तर त्या देखील पुरवल्या जातात
*बजेट(Budget): साधारण 20हजार रुपये
*पत्ता (Address): एम. जी. रोड कॅम्प, पुणे
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/vrundamoray/
9. धीरा मेकअप स्टुडिओ (Dhira’s Makeup Studio)
तुम्हाला जर तुमच्या बजेटमधील कोणता पर्याय हवा असेल तर तुम्ही धीरा मेकअप स्टुडिओला पसंती देऊ शकता. संपूर्ण मेकओव्हर करण्यात धीरा मेकअप स्टुडिओ एक्सपर्ट आहे
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): सुंदर एलिगंट असा लुक या मेकअप स्टुडिओकडून मिळू शकेल. शिवाय तुमच्या बजेटमध्ये बसणारा असा हा मेकअप स्टुडिओ आहे.
*बजेट(Budget): साधारण साडेपाच हजारांच्या पुढे
*पत्ता (Address): शंभू विहार सोसायटी, सीझन्स रोड, सानेवाडी, औंध, पुणे- 411007
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/dhira_makeupstudio/
Also Read Celebrity Bridal Looks In Marathi
10. शीतल पळसांदे आणि मेकअप आणि हेअर (Sheetal Palsande Makeup And Hair)
सेलिब्रिटी मेकअपसाठी शीतल पळसांदे या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वॉलवर गेल्यानंतर तुम्हाला तिने केलेले मेकअप आणि हेअरस्टाईल पाहायला मिळतील
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): आता वर सांगितल्याप्रमाणे सेलिब्रिटी मेकअपसाठी शीतल प्रसिद्ध आहे. पण तिने सजवलेल्या नववधूंचा मेकअपही तितकाच खास असतो. तिला जवळजवळ या क्षेत्राचा 10 हून अधिक वर्षांचा अनुभव आहे.
*बजेट(Budget): साधारण 20 हजार रुपये
*पत्ता (Address): 32, गृहलक्ष्मी बंगलो, शिवप्रसाद हौसिंग सोसायटी, सिंहगड रोड, पुणे 411030
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/sheetalpalsande/
11. तानिया अरोरा मेकओव्हर्स (Tanya’s Makeovers)
पुण्यातील तानिया यांचा ब्रायडल मेकअप फारच प्रसिद्ध आहे. तुम्ही तिची इन्स्टा प्रोफाईल पाहिल्यानंतर तुम्हाला या मेकअपचा अंदाज येईल.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): HD मेकअप आणि AIRBRUSH मेकअप ही तानिया मेकओव्हर्सची खासियत असून तुम्हाला अशा पद्धतीचा अॅडवान्स मेकअप तुम्ही करु शकता.
*बजेट(Budget): 15 हजार रुपयांच्या पुढे
*पत्ता (Address): पॅन कार्ड क्लब रोड,बाणेर, पुणे-411045
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/tanyaaroramakeovers/
12. ANA मेकओव्हर्स (ANA Makeovers)
जर तुम्हाला ग्लॅम मेकअप करायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही ANA मेकओव्हर्सला पसंती देऊ शकता. तुम्हाला सगळे अॅडव्हान्स मेकअप या ठिकाणी मिळू शकतील.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): प्रोफेशनल हेअरस्टाईलिंग आणि मेकअपमध्ये ANA मेकओव्हर्स प्रसिद्ध आहे. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये
*बजेट(Budget): 15 हजार रुपयांच्या पुढे
*पत्ता (Address): विमाननगर,खराडी,पुणे
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/makeovers_by_ana/
13. नेहा झा मेकओव्हर स्टुडिओ ( Neha Jha Makeover Studio)
जर तुम्हाला अनुभवी आणि नव्या गोष्टी ट्राय करणारी मेकअप आर्टिस्ट हवी असेल तर तुम्ही नेहा झाची निवड करु शकता. तिच्याकडे मेकअपची जबाबदारी दिल्यानंतर तुम्हाला काहीही पाहावे लागत नाही.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): नेहा झा हिला या क्षेत्राचा तब्बल 4 वर्षांचा अनुभव असून 200 हून अधिक नववधूंचे मेकअप तिने केलेले आहेत. अॅडव्हान्स मेकअपोबत तुम्हाला हवा तसा मेकअप या ठिकाणी करुन मिळेल.
*बजेट(Budget): 10 हजार रुपयांच्या पुढे
*पत्ता (Address): धनलक्ष्मी दर्शन अपार्टमेंट, चंदन नगर, पुणे – 411014
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/nehajha_makeoverstudio/
14. नयनकारी ( Nayankaari Makeup Artist)
सलोनी मुठा हिचा हा मेकओव्हर स्टुडिओ असून ब्रायडल मेकओव्हरसाठी फारच प्रसिद्ध आहे. या क्षेत्राचा अगदी चार महिन्यांचा अनुभव असला तरी तिला समाधानकारक अशा प्रतिक्रिया आहेत.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): नवरीच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे पॅकेज या ठिकाणी स्विकारले जाते. अगदी वाजवी दरात अॅडव्हान्स मेकअप केला जातो. डोळ्यांच्या मेकअपसाठी ती फारच प्रसिद्ध आहे.
*बजेट(Budget): 10 हजार रुपयांच्यापुढे
*पत्ता (Address): नीळकंठ निवास, ममता नगर लेन क्रमांक 3, जुने सांगवी, पिंपरी-चिंचवड, पुणे
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/makeovers_by_salony_mutha/
15. अमृता बोक्ये मेकअप आर्टिस्ट (Amrita Bokey Makeup Artist)
जर तुम्ही रॉयल पण एलिगंट लुकच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी अमृता ही बेस्ट आहे. तुम्हाला तिच्या मेकअपमध्ये विविधता आढळेल. शिवाय तुम्ही तिचे इन्स्टाग्राम पेज पाहिल्यावर त्याचा अंदाज येईल.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): अमृता हिला या क्षेत्राचा 5 वर्षांचा अनुभव असून तिने अनेक वेगळ्या पद्धतीचे मेकअप केले आहेत. एअर ब्रश आणि HD मेकअपसाठी ती प्रसिद्ध आहे.
*बजेट(Budget): 20 हजारांच्या पुढे
*पत्ता (Address): 87, शिवाजी को.ऑप हौसिंग सोसायटी, भागीरथ गोखले नगर, पुणे -4111016
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/amritabokey_/
16.
सेलिब्रिटी मेकअपसाठी गणेश जाधव प्रसिद्ध आहे. त्याने आतापर्यंत अनेक ब्राईडना छान वेगळा लुक दिला आहे. यासोबतच त्याच्या प्रोफाईलवर तुम्हाला त्याने सेलिब्रिटीजना केलेले लुक पण दिसतील.
Also Read: Winter Makeup Tips For Dry, Normal & Oily Skin In Marathi
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): गणेश याला या क्षेत्राचा 3 वर्षांचा अनुभव असून पार्टी मेकअप, हेअर स्टायलिंग यासाठी तो प्रसिद्ध आहे. चांगल्या प्रतीचे प्रोडक्ट आणि नवीन मेकअपच्या पद्धती करण्यात त्याचा हातखंडा आहे.
*बजेट(Budget): 15 हजार रुपयांच्यापुढे
*पत्ता (Address): सिंहगड रोड, पुणे – 411051
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/ganeshjadhav_gj/
17. शीतल तत्कार मेकअप आर्टिस्ट (Sheetal Tatkar Makeup Artist)
पुण्यातील दत्तवाडी परीसरात शीतल हिचा स्टुडिओ असून लग्नाच्या प्रत्येक गोष्टींसाठी तिच्याकडे मेकअपची व्हरायटी आहे.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): तुम्हाला हिच्या मेकअपचा ट्रायअल मिळू शकेल. अनेक अॅडव्हान्स मेकअप टेकनिक तिने शिकलेल्या आहेत.
*बजेट(Budget): 8 हजार रुपयांच्यापुढे
*पत्ता (Address): गृहलक्ष्मी बंगलो, शिवप्रसाद सोसायटी, दत्तवाडी, पुणे
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/sheetaltatkar_makeupartist/
18. गोल्डन टच ब्युटी क्लिनिक (Golden Touch Beauty Clinic)
तुम्हाला महाराष्ट्रीयन ब्राईडचा मेकअप एक पाऊल पुढे न्यायचा असेल तर तुम्ही गोल्डन टच ब्युटी क्लिनिकमध्ये जायलाच हवे.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): गोल्डन टच ब्युटी क्लिनिकला या क्षेत्राचा 4 वर्षांचा अनुभव असून तुम्हाला air brush आणि HD मेकअप करुन मिळेल.
*बजेट(Budget): 12 हजार रुपयांच्या पुढे
*पत्ता (Address): 2098, कलाप्रसाद मंगल कार्यालय, एसपी कॉलेज, पुणे- 411030
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/goldentouchbeautyclinic/
19. रोझ मेकअप आर्टिस्ट्री (Rose Makeup Artistry)
तुम्ही जर अगदी रिझनेबल दरात मेकअप आर्टिस्ट पुण्यात पाहत असाल तर तुम्हाला या ठिकाणाला भेट देता येईल.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): उत्तम दर्जाचे मेकअप प्रोडक्ट या ठिकाणी वापरले जातात. पार्टीवेअर मेकअप, साडी ड्रेपिंग, नेलपॉलिश असे तुम्हाला करुन मिळेल.
*बजेट(Budget): 8 हजार रुपयांच्यापुढे
*पत्ता (Address): हडपसर, पुणे
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account): https://www.instagram.com/rosemakeupartistry/
20. आशिष मेकअप आर्टिस्ट (Ashish Makeup Artist)
आशिष अदक एक फ्रिलान्सर मेकअप आर्टिस्ट असून महाराष्ट्रीयन ब्राईडमध्ये विविधता आणण्यात तो एक्सपर्ट आहे.
*मेकअप आर्टिस्टची विशेषता(Speciality): ट्रेडिशनल मेकअप, पार्टीवेअर मेकअप, एअरब्रश, एन्गेंटमेंट मेकअप, हेअरस्टाईलिंग असे तुम्हाला येथून करता येईल.
*बजेट(Budget): साधारण 12 हजार रुपये
*पत्ता (Address): भोसरी, पिपंरी- चिंचवड
*इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account):https://www.instagram.com/ashishadak_makeupartist/
तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवेत हे Best Bridal Look (Best bridal look you wanna try )
अनेकदा लग्न लागताना पिवळी साडी नेसली जाते अशावेळी तुम्ही असा साधा सोपा लुक नक्की ट्राय करु शकता.
जर तुम्ही हेवी पैठणी नेसली असेल आणि तुम्हाला थोडा वेगळा आणि हेवी लुक हवा असेल तर तुम्ही अशी प्रकारची हेअर स्टाईल आणि मेकअप करु शकता.
मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांनी खुलू शकतो नववधूचा शृगांर
जर तुम्हाला केस मोकळे सोडून काही वेगळे करायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारचा लुक ट्राय करु शकता. यामध्ये फुलांचा मांगटिक्का वापरण्यात आला आहे.
जर तुम्हाला एकदम टिपिकल महाराष्ट्रीयन ब्राईडचा लुक हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा लुक कॅरी करु शकता. मांग टिका आणि केसांचा पफ असे कॉम्बिनेशन करण्यात आले आहे.
जर तुम्ही लेहंगा घालणार असाल तर तुम्ही अशा प्रकारचा लुक नक्कीच ट्राय करु शकता. मोकळे केस सोडलेला हा लुक चांगला वाटू शकतो.
जर तुम्ही डिझायनर साडी घालत असाल तर तुम्हाला त्या साडीला या पद्धतीचा हेवी लुकसुद्धा देता येईल.
जर तुम्हाला तुमचे डोळे आकर्षक करायचे असतील तर तुम्ही अशाप्रकारचा मेकअप नक्कीच करुन पाहू शकता.
जर तुम्ही काही पेस्टल रंगामध्ये घालणार असाल तर तुमचा मेकअप तुमच्या लुकला अशाप्रकारे उठावदारपणा आणू शकतो.
जर तुम्ही कुंदन ज्वेलरीची निवड करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचा लुक नक्कीच ट्राय करता येईल.
जर तुम्ही कुंदन किंवा तन्मणी अशा ज्वेलरी घालणार असाल तर असा मेकअप लुक ट्राय करायला हरकत नाही.
Bridal makeup संदर्भात पडणारे हमखास प्रश्न (FAQ)
1. Bridal makeupसाठी वापरले जाणारे कॉस्मेटिक्स हे इतर कॉस्मेटिक्सपेक्षा वेगळे असतात का?
नवरीच्या मेकअपचा विचार करता तिला संपूर्ण दिवस टिकेल असा मेकअप केला जातो. अनेक विधी आणि धावपळीमुळे मेकअप जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच नवरीला केल्या जाणाऱ्या मेकअपचे कॉस्मेटिक्स हे वेगळे असतात. ते कमी ऑईलबेस आणि जास्त टिकणारे असतात. जर तुमचेही लग्न असेल तर तुम्ही तुमच्या मेकअप आर्टिस्टला कोणते कॉस्मेटिक्स वापरणार ते आधी विचारुन घ्या.
2. Bridal makeup करण्यासाठी साधारण किती वेळ जातो?
नवरीचा मेकअप म्हणजे थोडावेळ तर लागणारच ना! नवरीच्या मेकअपमध्ये व्हरायटी असते. अगदी फाऊंडेशनपासून ते डोळ्यांपर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते. स्मोकी आईज, ड्युएल कलर आईज, शिमर आईज असे कित्येक प्रकार त्यामध्ये असतात. त्यामुळेच ते अगदी परफेक्ट करायला वेळ लागतो. त्यामुळे साधारण नवरीचा मेकअप पूर्ण होण्यासाठी किमान तासभर तरी लागतो. जर तुमचा लुक ठरलेला असेल तर कदाचित वेळ कमी लागू शकेल.
3. दुसऱ्यांच्या लग्नात bridal makeup केला तर चालेल का?
जर तुम्ही इतरवेळी अशा पद्धतीचा मेकअप करण्याचा विचार करत असाल तर तसे करु नका. कारण हा मेकअप अनेकदा खूप लाऊड होण्याची शक्यता असते. जर तुम्ही असा मेकअप करत असाल तर तो तुम्हाला त्या पद्धतीने कॅरी करता यायला हवा. शिवाय तुम्ही इतरांसाठी उगाचच आकर्षणाचा बिंदूदेखील व्हायला नको. म्हणूनच तुम्ही शक्य असेल तितका लाईट मेकअप दुसऱ्यांच्या लग्नात करायला हवा.
4. नववधूच्या मेकअप किटमध्ये कोणते कॉस्मेटिक्स असायलाच हवे ?
लग्नानंतर काही दिवस नववधूला पै पाहुण्यांची उठबस करावी लागते. घरात कित्येक कार्यक्रम असतात. घरी पूजा, देवाचे दर्शन, नातेवाईकांकडे जाणे सुरुच असते.अशावेळी लोकांच्या नजरा या नववधूकडेच असतात. त्यामुळे तुम्ही अगदी कसेही जाऊन चालत नाही. अशावेळी तुमच्याकडे काही बेसिक मेकअप हवा. म्हणजे फाऊंडेशन, बेस पावडर ,मस्कारा, चांगल्या लिपस्टिकच्या शेड (फार डार्क नसाव्यात), काजळ, टिकली, कंगवा, कॉटन पॅड आणि डिओ असे तत्सम तुमच्या मेकअप किटमध्ये असायलाच हवे.
5.Bridal makeup वेगळा का असतो?
लग्नाचा दिवस हा नववधूसाठी एकदम खास असतो. त्या दिवशी तिला इतर कोणत्याही दिवसांपेक्षा सुंदर दिसायचे असते हा तिच्यासाठी हा सोहळा असतो. म्हणून या दिवसासाठी तिला कसाही मेकअप करुन चालत नाही तर त्यामध्ये विविधता असावी लागते म्हणूनच तुमचा लग्नाचा मेकअप हा खास असला पाहिजे आणि तो नववधूसाठी वेगळाच असतो.
You Might Like This:
Affordable Banquet Halls In Mumbai In Marathi
पुण्यातील डिझाईनर बुटीक्स आणि त्यांची माहिती (Designer Boutiques In Pune In Marathi)