दिवाळी येताना खूप सारा आनंद आणि मजा घेऊन येते. घराघरात आनंद पसरलेला दिसतो. सर्व कुटुंब एकत्र येतं. तर सर्वात जास्त महत्त्व असतं ते दिवाळीमध्ये घरात तयार करण्यात येणाऱ्या मिठाईला. हल्ली वेळ नसल्यामुळे बऱ्याचदा बाहेरून मिठाई आणली जाते. पण घरच्या घरी सर्वांनी एकत्र येऊन मिठाई करण्यातला आनंद काही वेगळाच आहे. काही मिठाई बनवणं अतिशय सोपं असतं. आम्ही तुम्हाला इथे यावर्षी दिवाळीला कोणत्या खास मिठाई कराव्या याची रेसिपी देत आहोत. तुम्ही या रेसिपी वाचून नक्कीच या मिठाई करू शकता. तसंच तुम्हाला हे बनवण्यासाठी जास्त वेळेचीही गरज नाही. त्यामुळे या दिवाळीला शुभेच्छा (marathi diwali wishes) देताना खास मिठाई तयार करा आणि आपल्या घरच्या सदस्यांना करा आनंदी.
चंपाकळी
साहित्य – मैदा – 1 वाटी, मोहनासाठी 1 चमचा तूप, चवीनुसार मीठ, पाणी अथवा दूध, केशरी रंग, लिंबू रस, साखर – 2 वाटी, केशर, बदाम, काजू
चंपाकळी बनवण्याची पद्धत
चार कप पाण्यात दोन वाटी साखर घालून त्याचा पाक तयार करून घ्या. या पाकात थोडा लिंबाचा रस घाला. त्याची चव गोड आंबट लागण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच यामध्ये केशरी रंग आणि केशर घाला. त्यापूर्वी मैदा, थोडं मीठ, त्यामध्ये तूप घाला आणि दुध अथवा पाणी घालून घट्ट भिजवून घ्या. हे मिश्रण दोन तास भिजवून ठेवा. त्यानंतर त्याची पुरी लाटून घ्या आणि मधून करंजी चक्राचा वापर करून त्याला करंजीसारख्या रेषा आखा. नंतर हे तुम्ही चंपाकळीच्या आकाराप्रमाणे गोल फिरवा आणि मग तेलात तळून ते पाकामध्ये टाका. पाकात जास्त भिजवू नका. साखरेची चव लागेपर्यंत ठेवा. बाहेर काढून त्यावर काजू आणि बदामाचे तुकडे वरून पेस्ट करा. चवीला हे अप्रतिम लागतं.
स्टीम संदेश
साहित्य – दूध 7 लीटर, साखर – 300 ग्रॅम, हिरवी वेलची 10 ग्रॅम, ड्रायफ्रूट्स 200 ग्रॅम, तूप 10 मिली
स्टीम संदेश बनवण्याची पद्धत
दूध उकळून घ्या त्यामध्ये व्हिनेगर घाला. त्यामुळे दूध फाटेल. कोणताही बारीक कपडा घेऊन त्यामध्ये हे फाटलेलं दूध घाला आणि त्यातील पाणी काढून घ्या. आता जे पनीर तयार झालेलं असेल ते व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत फेटून घ्या. आता त्यामध्ये साखर, कापलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर मिक्स करा. ज्या ट्रे मध्ये तुम्हाला हे करायचं आहे त्याला आधी तूप लावून घ्या. त्यावर संपूर्ण तयार झालेलं मिश्रण घाला आणि चमच्याने सारखं करून घ्या. कोणत्याही थंड ठिकाणी अल्युमिनिअम फॉईल त्यावर घालून साधारण एक तास ठेवा. त्यानंतर एका भांड्यात 30 मिनिट्ससाठी 180 डिग्री सेंटीग्रेडवर वाफ द्या. त्यानंतर कापून तुम्ही सर्वांना ही मिठाई देऊ शकता.
मुंबईची शान असलेला वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
काजू पिस्ता रोल
साहित्य – काजू 700 ग्रॅम, पिस्ता 300 ग्रॅम, साखर 800 ग्रॅम, वेलची पावडर 5 ग्रॅम, चांदीचा वर्ख सजवण्यासाठी
काजू पिस्ता रोल बनवण्याची पद्धत
काजू भिजवा आणि पिस्त्याची सालं काढा. आता दोन्ही वेगवेगळं मिक्सरमधून वाटून घ्या. ही काजूच्या पेस्टमध्ये तुम्ही साधारण 650 ग्रॅम साखर मिक्स करा आणि पिस्ता पेस्टमध्ये 150 ग्रॅम साखर मिक्स करून घ्या. या दोन्ही पेस्ट वेगवेगळ्या भांड्यात भाजा. साखर यामध्ये पूर्णतः मिसळली आहे की नाही याची खात्री करून घ्या. त्यानंतर यामध्ये वेलची पावडर मिक्स करा. कढईमधून पहिले काजू पेस्ट काढून ट्रे मध्येय काढा आणि पसरा आणि त्यानंतर त्यावर भाजलेली पिस्ता पेस्ट पसरा. त्यानंतर वरून चांदीचा वर्ख लावा. सुकल्यावर याचे तुकडे करून ही मिठाई तुम्ही सर्व्ह करू शकता.
मायक्रोवेव्हमध्ये होणाऱ्या 5 चविष्ट भारतीय रेसिपीज
कलाकंद
साहित्य – दूध 5 लिटर, साखर 300 ग्रॅम, केशर चिमूटभर, व्हिनेगर 10 मिली.
कलाकंद बनवण्याची पद्धत
दूध उकळून यामध्ये व्हिनेगर घाला. जेव्हा दूध फाटेल तेव्हा त्यामध्ये साखर आणि केशर मिसळा. हे मिश्रण तुम्ही हलक्या आचेवर चढवा. हे घट्ट होईपर्यंत तुम्ही शिजवत राहा. त्यानंतर एका ट्रे मध्ये तूप लावा आणि हे मिश्रण त्यामध्ये दाबून त्याचा लेअर तयार करा. त्यानंतर थंड ठिकाणी ठेवा. एक ते दोन तासानंतर तुम्हाला जे आकार तयार करायचे आहेत त्याप्रमाणे त्याला आकार द्या आणि कलाकंद खा.
हैदराबादमध्ये जाणार असाल तर इथे खा चविष्ट चिकन बिर्याणी
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.