आपल्या देशात असे अनेक महापुरूष होऊन गेले आहेत. ज्याचं जीवन आणि विचार आजही आपल्याला बरंच काही देऊन जातं. जसं महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, वीर सावरकर यांचे विचार. जे असे होते की, जे निराश व्यक्तीने वाचले तर त्यांच्या जीवनाला नवं ध्येयं मिळू शकतं. यापैकीच एक महापुरूष म्हणजे स्वामी विवेकानंद. ज्यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने खास स्वामी विवेकानंद सुविचार (Swami Vivekananda Marathi Quotes), विवेकानंद यांचे विविध विषयांवरील विचार (Thoughts Of Swami Vivekananda In Marathi) आणि स्वामी विवेकानंद कोट्स (Swami Vivekananda Marathi Suvichar) शेअर केले जातात.
Table of Contents
- Swami Vivekananda Quotes In Marathi For Youth | स्वामी विवेकानंद यांचे युवांसाठी कोट्स
- Swami Vivekananda Quotes Marathi On Love | स्वामी विवेकानंदाचे प्रेमाबाबतचे कोट्स
- Thoughts Of Swami Vivekananda In Marathi On Education | स्वामी विवेकानंदांचे शिक्षणाबाबतचे विचार
- Swami Vivekananda Thoughts In Marathi | स्वामी विवेकानंद यांचे विचार
- Swami Vivekananda Motivational Quotes In Marathi | स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी कोट्स
Swami Vivekananda Quotes In Marathi For Youth | स्वामी विवेकानंद यांचे युवांसाठी कोट्स
स्वामी विवेकानंद यांचे विचार (Swami Vivekananda Quotes In Marathi) आजही युवापिढीसाठी प्रेरणा स्त्रोत ठरणारे आहेत. त्यामुळे आजच्या पिढीनेही स्वामींच्या विचारांचा नक्की अभ्यास करावा. विद्यार्थ्यांसाठी आणि युवांसाठी सुविचार जे स्वामी विवेकानंदाच्या विचारांशी प्रेरित आहेत.
- बह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे. हे आपणच आहोत जे डोळ्यांवर हात ठेवून म्हणत आहोत की, समोर काळोख आहे. – स्वामी विवेकानंद
- अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. – स्वामी विवेकानंद
- पावित्र्य, धैर्य आणि दृढ़ता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत. – स्वामी विवेकानंद
- दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल. – स्वामी विवेकानंद
- चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या. – स्वामी विवेकानंद
- शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा. – स्वामी विवेकानंद
- जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही. – स्वामी विवेकानंद
- असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. – स्वामी विवेकानंद
- स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील – स्वामी विवेकानंद
- जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. – स्वामी विवेकानंद
वाचा – महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती
Swami Vivekananda Quotes Marathi On Love | स्वामी विवेकानंदाचे प्रेमाबाबतचे कोट्स
युवांना अनेक महत्त्वपूर्ण संदेश देत असतानाचा स्वामींनी प्रेमाबाबतही अनेक महत्त्वपूर्ण विचार (Swami Vivekananda Quotes In Marathi) मांडले आहेत.
- मनुष्यसेवा हीच देवाची सेवा आहे. – स्वामी विवेकानंद
- धन्य आहेत ते लोकं जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात. – स्वामी विवेकानंद
- जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे. – स्वामी विवेकानंद
- शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे. – स्वामी विवेकानंद
- स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं. कोणीही दुसरं शिक्षक नाही उलट तुमची आत्मा आहे. – स्वामी विवेकानंद
- जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जीवंत प्राण्यात पाहू शकत नाही तर आपण त्याला शोधायला कुठे जाऊ शकतो. – स्वामी विवेकानंद
- महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो. – स्वामी विवेकानंद
- आपलं कर्तव्य आहे की, आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील आणि सोबतच आदर्शाला जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. – स्वामी विवेकानंद
- वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते. – स्वामी विवेकानंद
- सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये. – स्वामी विवेकानंद
वाचा – स्वामी समर्थ कोट्स मराठीत
Thoughts Of Swami Vivekananda In Marathi On Education | स्वामी विवेकानंदांचे शिक्षणाबाबतचे विचार
शिक्षणाबाबत स्वामी विवेकानंद यांनी अनेक महत्त्वपूर्ण विचार मांडले (Swami Vivekananda Thoughts In Marathi) आहेत. जे आजच्या काळातही तंतोतंत लागू होतात. पाहूया शिक्षणाबाबतचे त्यांचे विचार.
- आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल.– स्वामी विवेकानंद
- आपल्या दुर्दशेचं कारण नकारात्मक शिक्षा प्रणाली आहे.– स्वामी विवेकानंद
- कोणंतीही गोष्ट जी तुमच्या शारीरिक, बौद्धीक आणि आध्यात्मिक रूपाने कमकुवत बनवतात, त्या गोष्टी विषसमान मानून नका दिला पाहिजे – स्वामी विवेकानंद
- विश्व एक व्यायामशाला आहे, जिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येता.– स्वामी विवेकानंद
- जर स्वतःवर विश्वास ठेवणं आणि अधिक विस्तृतपणे शिकवणं आणि अभ्यास घेण्यात आला असता तर मला विश्वास आहे की, वाईट आणि दुःखाचा एक मोठा भाग गायब झाला असता.– स्वामी विवेकानंद
- ज्या वेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा कराल, त्याचवेळी ते केलं ही पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल.– स्वामी विवेकानंद
- कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.– स्वामी विवेकानंद
- जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे.– स्वामी विवेकानंद
- हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. – स्वामी विवेकानंद
- सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वताःवर विश्वास ठेवा. – स्वामी विवेकानंद
- जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीची दोष नाही. – स्वामी विवेकानंद
वाचा – भीम जयंती कोट्स मराठीमध्ये (Bhim Jayanti Quotes In Marathi)
Swami Vivekananda Thoughts In Marathi | स्वामी विवेकानंद यांचे विचार
स्वामी विवेकानंद यांचे अनेक विचार आज आपल्या मायमराठीतही उपलब्ध आहेत. पाहूया त्यांचे अनमोल विचार.
- जेव्हा कोणतेही विचार विशेष रूपाने आपल्या मनावर ताबा मिळवतात. तेव्हा तो विचार वास्तविक, भौतिक आणि मानसिक स्थितीत बदलतो. – स्वामी विवेकानंद
- असा विचार कधीही करू नका की, आत्म्यासाठी काही असंभव आहे. असा विचार करणं चुकीचं आहं. जर पाप असेल तर एकमात्र पाप आहे की, तुम्ही निर्बल आहात आणि दुसरा कोणी निर्बल आहे. – स्वामी विवेकानंद
- बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे.
- तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचं चांगलं कराला, तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि ईश्वर त्यात वास करेल.
- जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे. – स्वामी विवेकानंद
- त्या व्यक्तीने अमरत्व प्राप्त केलं आहे जी संसारिक वस्तूसाठी व्याकुळ होत नाही.
- जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशिर्वाद द्या. असा विचार करा ते लोकं तुमच्यातील वाईट गोष्ट काढून तुमचीच मदत करत आहेत. – स्वामी विवेकानंद
- ज्या प्रकारे विविध स्त्रोतांतून उत्पन्न झालेले प्रवाह त्यांचं पाणी समुद्रात आणतात. तसंच मनुष्याद्वारे निवडलेला मार्ग चांगला असो वा वाईट देवापर्यंत जातो. – स्वामी विवेकानंद
- मन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका. – स्वामी विवेकानंद
- स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा. – स्वामी विवेकानंद
वाचा – जाणून घ्या गुरूपौर्णिमेचे महत्त्व
Swami Vivekananda Motivational Quotes In Marathi | स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी कोट्स
प्रत्येकालाच आयुष्यात एका क्षणी प्रेरणेची गरज असते. अशावेळी तुम्हीही विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार नक्की वाचा. (Swami Vivekananda Thoughts In Marathi)
- उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका – स्वामी विवेकानंद
- संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकीच तुमचं यश शानदार असेल. – स्वामी विवेकानंद
- स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे. – स्वामी विवेकानंद
- एक रस्ता निवडा. त्यावर विचार करा. त्या विचाराला आपलं जीवन बनवा. त्याचंच स्वप्न पाहा. यशाचा हाच मार्ग आहे. – स्वामी विवेकानंद
- तुम्ही जोखीम उचलण्याचं भय बाळगू नका. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकता. – स्वामी विवेकानंद
- वेळेचं पक्कं असणं लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढवण्यास मदत करतं.– स्वामी विवेकानंद
- मी देवाकडे शक्ती मागितली आणि देवाने मला कठीण संकटात टाकलं. – स्वामी विवेकानंद
- जेव्हा तुम्ही बिझी असता तेव्हा सगळं सोपं वाटतं. पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपं वाटत नाही. – स्वामी विवेकानंद
- मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका. हळूहळू सुरूवात करा, जमीनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा. – स्वामी विवेकानंद
You Might Like This:
वाईट मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला आनंदी ठेवतील हे आनंदी कोट्स
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी कोट्स
गौतम बुद्धांची शिकवण आणावी आचरणात, आयुष्य होते सुखकर
जीवनावरील मराठी प्रेरणादायी कविता (Motivational Kavita In Marathi)
Struggle Status In Marathi For Students | विद्यार्थ्यांसाठी स्ट्रगल स्टेटस मराठीतून