ADVERTISEMENT
home / Natural Care
नाजूक त्वचेसाठी winter skin routine

नाजूक त्वचेसाठी winter skin routine

हिवाळा आला की, सरसकट सगळ्यांचीच त्वचा बदलू लागते. जर तुमची त्वचा फारच नाजूक असेल तर अशा त्वचेची काळजी घेणे फारच कठीण होऊन जाते. तुमची त्वचा नाजूक असेल तर तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी आणि काही skin routine  जाणून घेणे फारच गरजेचे आहे. कारण जर तुम्ही तुमच्या त्वचेची अशा पद्धतीने काळजी घेतली तर तुमची त्वचा थंडीतही चांगली राहील. तुम्हाला थोडी काळजी घेण्याची गरज आहे जी तुम्ही घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने आरामात घेऊ शकता. 

मॉश्चरायजर मस्ट

shutterstock

तुमची त्वचा नाजूक असली तरी तुम्हाला  मॉश्चरायझर गरजेचे असते हे लक्षात ठेवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे नाजूक त्वचेला सरसकट कोणतेही मॉश्चरायझर वापरता येत नाही, तुम्हाला मॉश्चरायझर निवडायची भीती असेल तर तुम्ही बेबी लोशन लावा. कारण तुम्ही बेबी लोशन लावले तर त्याचा जास्त त्रास तुम्हाला होणार नाही. कारण त्यामधील घटक बाळांच्या नाजूक त्वचेसाठी अगदी योग्य असतात. म्हणून तुम्हाला असे मॉश्चरायझर वापरायला काहीच हरकत नाही. पण तुम्ही आंघोळ केल्यानंतर आणि रात्री झोपताना मॉश्चरायझर लावा. 

ADVERTISEMENT

या घरगुती उपायांनी दूर करा गुडघे आणि कोपराचा काळेपणा

सतत चेहरा धुवू नका

shutterstock

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. तुमची त्वचा सतत कोरडी पडत असेल तर तुमच्या त्वचेसाठी ती हायड्रेट ठेवणे फारच गरजेचे असते. जर तुम्ही सतत चेहरा धूत राहाल तर तुमचा चेहरा कोरडा पडेल. त्यामुळे दिवसातून फक्त दोनदा चेहरा धुवा. फेसवॉश निवडताना तुम्ही एकदम लाईट फेसवॉश निवडा. म्हणजे त्यामुळे तुमचा चेहरा कोरडा पडणार नाही.

ADVERTISEMENT

स्क्रब करु नका

जर तुमचा चेहरा खूपच नाजूक असेल तर मग तुम्ही चेहरा स्क्रब करु नका. कारण त्यामुळे तुमचा चेहरा कोरडा पडून चेहरा फुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नाजूक त्वचा असणाऱ्यांना या दिवसात स्क्रब टाळा.

स्ट्रॉबेरी खा आणि मिळवा सुंदर नितळ त्वचा

वाफ घेणेही ठरु शकते त्रासदायक

shutterstock

ADVERTISEMENT

चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला वाफ घेण्याची सवय असेल तर तुम्ही ते ही अजिबात करु नका. कारण सतत वाफ घेतल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मॉश्चर निघून जाते.त्वचा कोरडी पडून तुम्हाला रॅशेश येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही शक्यतो वाफ घेऊ नका. 

आहारात असू द्या व्हिटॅमिन C

shutterstock

तुम्हाला जर नैसर्गिकरित्या चांगली त्वचा हवी असेल तर तुम्ही तुमच्या आहारात फळं असू द्या. जर तुम्हाला फळ खायला जमत नसतील तर आणि  व्हिटॅमिन C चे सप्लिमेंट तुम्हाला चालत असतील तर तुम्ही व्हिटॅमिन C चे सेवन करु शकता. पण तुमच्या त्वचेतील तजेला टिकवण्यासाठी व्हिटॅमिन C आवश्यक असते. 

ADVERTISEMENT

अगदी सोप्या गोष्टी करुन तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घ्या आणि सुंदर दिसा.

गडद गुडघा आणि कोपरांपासून मुक्त कसे करावे
 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

19 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT