ADVERTISEMENT
home / आरोग्य
जाणून घ्या हिवाळ्यात महिलांना युरिन इन्फेक्शनचा का असू शकतो जास्त धोका

जाणून घ्या हिवाळ्यात महिलांना युरिन इन्फेक्शनचा का असू शकतो जास्त धोका

हिवाळ्यातील कमी तापमानामुळे वातावरणात गारवा वाढतो. असे थंड वातावरण जीवजंतूंसाठी पोषक असते. ज्यामुळे या वातावरणात सर्दी, खोकला, ताप, त्वचा रोग अशा अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात हवामान कोरडे झाल्यामुळे तुम्हाला कमी तहान लागते. ज्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि युरिन इनफेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो. व्हजायनाला आलेल्या कोरडेपणामुळे जीवाणू मूत्रमार्गातून मुत्राशयात शिरतात. वास्तविक आपल्या शरीरात निर्माण होणारे टॉक्सिन्स युरिनवाटे शरीराबाहेर टाकले जातात. पण जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायला नाहीत तर शरीराकडून टॉक्सिन्स वेळेवर बाहेर टाकले जात नाहीत. मात्र हवेतील गारव्यामुळे तुम्हाला तहान कमी लागते. आणि याच कारणामुळे हिवाळ्यात तुम्हाला युरिन इन्फेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो.

पाठ दुखीतून सुटका मिळवण्यासाठी करा ही दहा योगासने

युरिन इन्फेक्शन झाले आहे कसे ओळखावे

हिवाळ्यात पाणी कमी पिण्यामुळेच अनेक लोकांना युरिन इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो. युरीन इनफेक्शन  झाल्यास लघवी करताना तीव्र वेदना व जळजळ होते. ज्यामुळे युरिनला जाणे तुम्ही टाळता आणि तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स वाढत जातात. विशेषत: महिला युरिन इन्फेक्शन बाबत डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा संकोच करतात. अशा वेळी अनेकजणी घरगुती उपचार करणे पसंत करतात. लक्षात ठेवा आरोग्य समस्येचे कारण माहीत नसताना असे स्वत:च उपचार करणे युरिन इनफेक्शनबाबत धोक्याचे ठरू शकते. कारण त्यामुळे कदाचित तुमचे इन्फेक्शन अधिकच वाढू शकते. युरिन इनफेक्शन अधिक वाढू नये यासाठी त्यावर लगेच व वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

सावधान! तणावामुळे तुमच्या ‘या’ शारीरिक प्रक्रियेवर होतोय गंभीर परिणाम

युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी सोपे उपाय

मूत्रमार्गातील इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी व शरीरात पाण्याचे योग्य सतुंलन राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिता तेव्हा तुमच्या शरीरातील युरीन डायल्युट होते. युरिनमध्ये पाणी मिसळल्यामुळे इनफेक्शन होण्याचा धोका  कमी होतो. मात्र यासाठी चुकूनही थंड पाणी पिऊ नका त्यापेक्षा कोमट पाणी अथवा फळांचा रस तुम्ही घेऊ शकता. डॉक्टरांच्या मते काही रुग्णामध्ये युरिन इनफेक्शनची लक्षणे पटकन दिसतात तर काहींमध्ये ही लक्षणे उशीरा जाणवतात. मग अशा वेळी रूग्णाला जाणवणारी लक्षणे पाहूनच उपचार केले जातात. यासाठी लघवीला वारंवार जाणे व लघवी करताना जळजळ अथवा दाह जाणवत असेल, व्हजायनाला खास येत असेल तर त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण या समस्येवर वेळीच आणि योग्य उपचार केल्यास युरिन इन्फेक्शन लवकर बरे करता येते.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

जाणून घ्या दातांच्या दुखण्यावर रामबाण घरगुती उपाय

ADVERTISEMENT

हिवाळ्यात करा तिळाचं सेवन, गंभीर आजारातून होईल सुटका

गरोदरपणातही करा ही सोपी योगासने

16 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT