पूर्वीच्या काळी मोबाईल फोन नसूनसुद्धा लोकांची स्मरणशक्ती चांगली होती. त्यांना कितीतरी गोष्टी लक्षात राहायच्या. अगदी कितीही जुने दाखले, हिशोब, गणितं त्यांना अगदी तोंडपाठ असायची. पण आता मात्र लोकांना मोबाईल फोन घेतल्याशिवाय काही आठवणार नाही. सगळ्या गोष्टी एका क्लिकवर करायची सवय लागली आहे. पण समजा काही कारणास्तव तुमच्याकडे मोबाईल फोन नसेल. अशावेळी मात्र तुम्हाला तुमच्या बुद्धीवर जोर द्यावा लागेल की नाही. म्हणूच आज आपण स्मरणशक्ती वाढवण्यावर थोडी अधिक माहिती घेणार आहोत यामध्ये आपण स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार, स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासने, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदीक उपचार, लक्षात ठेवण्याचे उपाय.. शिवाय केलेला अभ्यास लक्षात राहत नाही अशांसाठी काही सोप्या गोष्टी आणि बुद्धी कशी वाढवावी या विषयी अधिक माहिती घेणार आहोत मग करुया सुरुवात.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय | Smaranshakti Vadhavnyasathi Upay
तुम्हालाही स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय जाणून घ्यायचे असतील तर त्यासाठी आम्ही खास स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय शोधून काढले आहेत. जे तुम्हाला नक्कीच मदत करतील.
ध्यानसाधना
हल्ली अनेकांनी एकाग्रतेचा त्रास असतो. टीव्ही, मोबाईल अशा सगळ्या गोष्टींमध्ये मन इतके रमलेले असते की, त्यामुळे कशातही एकाग्रता होत नाही. मुलांमधील किंवा मोठ्यांमधील एकाग्रता वाढवण्यासाठी मेडिटेशन करायला हवे. ध्यानसाधना करणे दिवसातून 5 मिनिटे तरी नक्कीच शक्य असते. फोन आणि टीव्हीमधून बाहेर पडून एका जागी डोळे बंद करुन शांत बसा. त्यामुळे मेंदू शांत होण्यास मदत मिळते.
वजन नियंत्रणात ठेवणे
वजनाचा देखील तुमच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम होत असतो. जर तुमचे वजन वाढलेले असेल तर साहजिकच तुमच्या शरीराच्या सगळ्या क्रिया या मंदावलेल्या असतात. त्यामुळे तुमच्यामध्ये कोणतीही चुणूक दिसत नाही. तुमचे वजन तुमच्या उंचीनुसार असायला हवे. ते कमी असताही कामा नये कारण कमी आणि जास्त असे दोन्ही वजन तुमच्या मेंदूवर परिणाम करते.
पुरेशी झोप
पुरेशी झोप ही चांगल्या आरोग्यासाठी फारच जास्त महत्वाची असते. जर तुम्ही योग्य झोप घेतली तर तुमचा थकवा निघून जातो. मेंदूवरील ताण कमी होण्यास मदत मिळते. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली तर तुमच्यातील निर्णय क्षमता अधिक वाढते. त्यामुळे तुम्हाला पुरेशी झोप घेणे फार गरजेचे असते.
वाचन करणे
वाचन केल्यामुळे देखील मेंदूला चालना मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे शक्य असेल तेवढ्या वेळी तुम्ही वाचा. वाचनामुळे तुम्हाला प्रश्न पडतात. त्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी तुम्ही मेंदूचा वापर करता. त्यामुळे तुम्ही नक्कीच वाचन करा. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय यामधील हा महत्वाचा उपाय आहे
मेंदूला चालना देणे
मेंदूला चालना देणाऱ्या ॲक्टिव्हिटीज मुलांकडून करुन घ्या. कारण त्यामुळे ते सतत बिझी राहतात. त्यामुळे मुलांकडून सतत काहीतरी करुन घ्या. त्यांच्याकडून रंगकाम, खेळाचे प्रकार करुन घ्या. त्यामुळे नक्कीच तुमचा मेंदू बिझी राहतो. त्यामुळे मुलांकडून काहीतरी करुन घेत जा.
अधिक अभ्यास करणे
मेंदू सक्रीय हवा असेल तर त्याच्यासाठी काहीना काही करणे गरजेेचे असते. सतत कशात तरी बिझी राहण्यासाठी तुम्ही काहीतरी करुन घेत जा. त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला चांगला बदल जाणवेल
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम | Exercise To Increase Memory In Marathi
स्मरणशक्ती कशी वाढवावी अशा विचार करताना तुम्हाला काही स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सोपे व्यायाम प्रकारही करता येतील जे नक्कीच तुम्हाला मदत करतील.
सर्वांगासन
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सगळ्यात पहिलं आसन आपण पाहणार आहोत ते सर्वांगासन. सर्वांगासनामध्ये तुमचे दोन्ही पाय हवेत वर करायचे असतात. असे करताना तुम्हाला कमरेकडून आधार द्यायचा असतो. या आसनामुळे तुमच्या मेंदूला योग्य तो रक्तपुरवठा होतो. मेंदूला झालेल्या योग्य रक्तपुरवठ्यामुळे तुमचा मेंदू कार्यरत राहतो. त्यामुळे याचा फायदा तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी होतो.
भुजंगासन
भुजंगासनामध्ये तुम्हाला सापाप्रमाणे मान मागे करायची असते म्हणूनच याला cobra pose असे सुद्धा म्हणतात. तुम्हाला पोटावर झोपून हाताच्या मदतीने अंग उचलायचे आहे. असे करताना तुम्हाला तुमचे डोके पाठीच्या दिशेने झुकवायचे आहे असे करताना तुम्हाला या आसनामध्ये काही किमान 1 मिनिटं तरी तसेच राहायचे आहे. यामुळे तुमच्या मज्जासंस्थेला चालना मिळते आणि त्याचा परीणाम तुमच्या मेंदूवर होतो. योग्य प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यामुळे तुमची बुद्धी तल्लख राहते.
पद्महस्तासन
पद्महस्तासन हा व्यायामप्रकारसुद्धा तुमच्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चांगला आहे. तुम्हाला सरळ उभं राहून हात वर करुन तसेच कंबरेतून वाकत खाली यायचे आहे. असे करताना तुम्हाला जमिनीला हात टेकवता यायला हवा. शिवाय गुडघ्यात न वाकता तुम्हाला तुमचे डोकं तुम्हाला गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या आसनामुळे तुमच्या मज्जासंस्थेवर ताण पडतो. शिवाय तुमच्या मेंदूला योग्य असा रक्तपुरवठा होतो. स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय करत असताना तुम्ही हे आसन करू शकता.
हलासन
हलासनामध्ये तुम्हाला पाठीवर झोपायचे असते. पाय हवेत उचलून तुम्हाला ते तुमच्या डोक्यापर्यंत आणायचे असतात असे करत असताना तुमच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा होतो. तुमच्या पाठीच्या कण्यासोबतच तुम्हाला मेंदूचे कार्य सुरळीत होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्ही हलासन करु शकता.
पद्मासन
स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी आणखी एक सोपं आसन तुम्ही करु शकता ते म्हणजे पद्मासन. पद्मासनामुळे तुमचे मन शांत होते. मन शांत झाल्यामुळे तुमच्या मेंदूवरील ताण कमी होतो. ताण कमी झाल्यामुळे तुमचं डोकं शांत राहतं. त्यामुळे तुम्ही पद्मासन अगदी घरच्या घरी आणि कधीही करु शकता. पद्मासन करत असताना तुम्ही ओमकार म्हटला तरी चालू शकेल.
मत्स्यासन
माशासारखे आसन म्हणजे ‘मस्त्यासन’ (Fish Pose) हे आसन दिसायला फार कठीण असे वाटले तरी रक्तपुरवठा करत शरीराची लवचिकता वाढवण्याचे काम हे आसन करते. हे आसन करताना सगळा भार हा डोक्यावर जातो. अर्थात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा होतो. मेंदूला चालना देण्यासाठी हा एक उत्तम असा व्यायाम प्रकार आहे. आसन थोडे कठीण असले तरी देखील सरावाने येऊ शकते. स्मरणशक्ती कशी वाढवावी असा विचार करत असाल तर हे आसन नक्की करा.
भ्रमरी प्राणायाम
भ्रामरी म्हणजे भुंगा. प्राणायामाचा हा प्रकार करताना भुग्यांचा भुणभुण केल्याचा आवाज होतो. म्हणून याला भ्रामरी प्राणायाम म्हणतात. उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी हा प्राणायाम खूपच चांगला आहे. मायग्रेनसारखी डोकेदुखी असणाऱ्यांनी हा प्रकार नक्की करायला हवा. त्यामुळे शरीराला शांती मिळण्यास मदत मिळेल.चिंता, काळजी दूर करण्याचे काम हा प्रकार करतो. त्यामुळे मेंदू शांत राहतो. मेंदूचे आरोग्य चांगले राहिले तर स्मरणशक्ती चांगली राहते.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार (Foods That Improve Memory In Marathi)
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासनं पाहिल्यानंतर आता आपण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार पाहणार आहोत. हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे खानपानात झालेले बदल तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम करत असतात. त्यामुळे तुम्ही नेमका काय आहार घ्यायला हवा ते पाहुया.
1. स्मरणशक्तीला चालना देणारे पदार्थ
- मासे: माशांमध्ये असणारे फिश ऑईल तुमच्या शरीरासाठी चांगले असते. माशांच्या सेवनामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात याचा समावेश अगदी हमखास करायला हवा.
- आवळा (Gooseberry):आवळ्यामध्ये फायटोन्युट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे ब्रेन डॅमेज करणाऱ्या सेल्सला दूर ठेवण्याचे काम करतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन C हे शरीराला मेंदूसाठी आवश्यक असलेले घटक पुरवण्यास मदत करतात.
- आलं (Ginger):ब्रेन डॅमेजपासून वाचवण्यासाठी आलं हे खूपच चांगले असते. आल्याच्या रसामध्ये असे काही घटक असतात. जे मेंदूला चालना देऊन स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.
- कोथिंबीर (Coriander): अल्झायमर जो विसरण्याचा आजार आहे. त्या आजारावर मात करण्याचे काम कोथिंबीर करते. अनेक अभ्यासांती असे सिद्ध झाले आहे की, कोथिंबीर ही बुद्धीसाठी खूपच चांगली असते. कोथिंबीरीच्या सेवनामुळे बुद्धी तल्लख राहण्यास मदत मिळते.
- बदाम (Almonds):बदामामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन E असते जे मेंदूचे कार्य सुरळीत करण्यासाठी फार फायद्याचे असते. बदामामुळे मेंदूला आवश्यक असलेला घटक मिळाल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते.
- सॅच्युरेटेड फॅट: दूध,मांस, चिकन, तेल, चीझ यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. तुमच्या आरोग्यासाठी या गोष्टी अतिरिक्त खाणे चांगले नाही.असे सांगितले जाते. पण एका अभ्यासात असे समोर आले आहे की या पदार्थांच्या योग्य सेवनामुळे तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदा होऊ शकतो.
- पालेभाज्या: पालेभाज्याही तुमच्या शरीराला अॅक्टीव्ह ठेवण्याचे काम करते. व्हिटॅमिन k, ल्युटेन, फ्लोलेट असते जे तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगले असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात मेथी, पालक, मुळा, लालमाठ अशा भाज्यांचे सेवन करायला हवे
- ग्रीन टी: चहा पिण्यापेक्षा जर तुम्ही ग्रीन टी चे सेवन केले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. म्हणून तुम्ही ग्रीन टीचे सेवन करा. ग्रीन टी तुम्हाला कायम अॅक्टीव्ह ठेवते. त्यामुळे तुम्ही अधिक कार्यक्षम राहता आणि तुमच्यामध्ये अधिक चुणूक दिसून येते. स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय करणं अतिशय सोपे आहे.
2. डार्क चॉकलेट
चॉकलेट हे नेहमीच शरीरासाठी चांगले असते. तुम्ही जर डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे तुम्हाला नक्कीच जाणवतील. डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे तुमच्यावरील अतिरिक्त ताण कमी होतो आणि तुमच्या बुद्धीला चालना मिळते.
3. फिश सप्लिमेंट
जर तुम्ही आहारात मासे खाऊ शकत नसाल तर तुम्ही योग्य सल्ला घेऊन फिश सप्लिमेंट घेऊ शकता. याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तुमच्या बुद्धीला चालना देण्याचे काम फिश सप्लिमेंट करु शकतात. त्यामुळे तुम्ही योग्य सल्ला घेऊन फिश सप्लिमेंट घेतात.
4. कोको पावडरचा वापर
चॉकलेटमध्ये असलेले कोकोआदेखील तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगले असते. मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्यासाठी कोकोआ चांगले आहे. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास कोकोआ खा. कारण त्याचा तुम्हाला योग्य तो फायदा होऊ शकेल. हल्ली बाजारात कोकोरआची पावडर मिळते. ज्याचा उपयोग तुम्ही करु शकता.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic Treatment For Memory Power)
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी अनेक चांगले आयुर्वेदिक उपचार आहेत. जर तुम्हाला आर्युवेदिक उपचारपद्धती हव्या असतील तर तुम्ही हे आर्युवेदिक उपचारही करु शकता. जाणून घेऊया याच आर्युवेदिक उपचार पद्धती.
अश्वगंधा
अश्वगंधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यापैकीच स्मरणशक्तीवर होणारा अश्वगंधाचा परिणाम हा वाखाणण्यासारखा आहे. अश्वगंधाची मुळे औषधांप्रमाणे घेतल्याने तुम्हाला फायदे होतात. अभ्यासातूनही हे समोर आले आहे. तुमच्या मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्याचे काम अश्वगंधा करते.
ब्राम्ही
अश्वगंधाप्रमाणे ब्राम्हीही तुमच्या मेंदूला अॅक्टीव्ह ठेवण्याचे काम करते. अनेकदा मन शांत होण्यासाठी ब्राम्ही घेण्याचा सल्ला दिला जातो. अल्झायमर सारख्या आजारांपासून ब्राम्ही तुम्हाला दूर ठेवते. मेंदूला चालना देण्याचे काम ब्राम्ही करते. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात ब्राम्हीचे सेवन करु शकता.
शंखपुष्पी
आयुर्वेदात शंखपुष्पीचे अनेक फायदे सांगितले आहेत. बुद्धीसाठी शंखपुष्पी चांगले असल्याचे पुराणात सुद्धा म्हटले आहे. शंखपुष्पीच्या सेवनामुळे तुमची बुद्धी तल्लख राहते आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही शंखपुष्पीचे योग्य प्रमाणात सेवन करायला हवे.
4. गोटू कोला
गोटू कोला अनेक बाबतीत फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. अगदी त्वचेच्या समस्येपासून ते सेक्सपर्यंत त्याचे अनेक फायदे आहेत. पण तुमच्या मेंदुला चालना देण्यासाठीही गोटू कोला चांगले आहे. गोटू कोला नावाची वनस्पती तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगली असून तुम्ही त्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. एका प्रयोगादरम्यान गोटू कोलाच्या वापरामुळे चांगले बदल झाल्याचे दिसून आले आहेत.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
1. मेंदूच्या आरोग्यासाठी केळ्यांचे सेवन करणे चांगले आहे का ?
केळ्यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. त्याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे चांगल्या स्मरणशक्तीसाठी तुम्ही केळ्यांचे सेवन केल्यास फारच उत्तम.
2. अभ्यासात मुलांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी काय करायला हवे ?
मुलांच्या अभ्यासासंदर्भात पालकांच्या अनेकदा तक्रारी असतात की ते अभ्यास करत नाहीत किंवा त्यांचे अभ्यासाकडे लक्ष नाही. अशावेळी तुम्ही मुलांना अधिकाधिक चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवा. फोनपासून दूर ठेवत त्यांना मैदानी खेळ खेळांंमध्ये अधिक गुंतवून ठेवा. त्यांना वाचनाची आवड लावा. त्यांच्यासोबत असे खेळ खेळा जे त्यांना सतत प्रश्न निर्माण करण्यास उद्युत करतील.
3. तुमच्या खाण्याच्या सवयी तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम करतात का ?
तुमच्या आहारातील खाद्यपदार्थांचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. जर तुमच्या जंक फूड किंवा असे काही पदार्थ असतील तर ते तुमच्या शारिरीक क्रिया मंदावू शकतात. त्यामुळे तुम्हाला आहारात योग्य पदार्थ घेता आले तर फारच उत्तम
आता तुम्हाला जर तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही या गोष्टी नक्कीच विचारात घ्या.
अधिक वाचा –