ADVERTISEMENT
home / आरोग्य
पुरूषांपेक्षा महिलांना जास्त असतो या आजारांचा धोका

पुरूषांपेक्षा महिलांना जास्त असतो या आजारांचा धोका

लहानपणापासून आपल्याला आरोग्य हिच खरी संपत्ती आहे हे शिकवले जाते. मात्र तरिही आरोग्याकडे आपण नकळत दुर्लक्षच करत असतो. विशेषतः महिला त्यांच्या आरोग्याकडे कधीच लक्ष देत नाहीत. नवऱ्याची, मुलांची आणि घरातील वडिलधाऱ्यांच्या आरोग्याची वेळोवेळी आणि  जाणिवपूर्वक काळजी घेणाऱ्या घरातील स्त्रीयांना आरोग्याचे धोके इतरांच्या तुलनेत जास्त असतात. म्हणूनच या काही आरोग्यासमस्यांबाबत महिलांनी विशेष काळजी घ्यायला हवी. चाळीशीनंतर प्रत्येकीने वर्षांतून एकदा स्वतःचे संपूर्ण हेल्थ चेकअप करायला हवे. 

पुरुषांपेक्षा महिलांना या आजाराचा असतो अधिक धोका –

काही आजारपणांचा त्रास महिलांना अधिक असतो. म्हणून त्यांनी या पासून स्वतःचा बचाव करण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. 

थायरॉईड असंतुलन –

एका संशोधनानूसार भारतीय लोकसंख्येच्या बत्तीस टक्के लोकसंख्येतील प्रत्येकी तिसऱ्या व्यक्तीला थायरॉईड असंतुलनाची समस्या असते. या समस्येमुळे आजकाल जवळजवळ सर्वच महिलांना अतीवजन आणि हॉर्मोनल असंतुलनाचा त्रास जाणवतो. वास्तविक प्रत्येकाच्या गळ्याजवळील स्वरयंत्राजवळ थायरॉईड ही महत्त्वाची ग्रंथी असते. या ग्रंथीच्या सक्रियतेमुळे शरीरातील महत्वाचे हॉर्मोन्स संतुलित राहतात. मात्र जेव्हा तिच्या कार्यात अडथळा येतो तेव्हा  तुम्हाला थायरॉईड असंतुलनाची समस्या जाणवते. थाररॉईड असंतुलनाचे हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड असे दोन प्रकार असतात. ज्यामध्ये तुम्हाला थकवा, केस गळणे, मासिक पाळीच्या अडचणी, अंगदुखणे, अशक्तपणा अशा समस्या जाणवतात.

ADVERTISEMENT

shutterstock

मधुमेह –

आजकाल बऱ्याच लोकांना मधुमेहाचा त्रास असतो. मात्र एका संशोधनानुसार याचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांना जास्त आहे असं आढळलं आहे. एवढंच नाही तर महिलांच्या वाढत्या मधुमेहामुळे त्यांना ह्रदयविकाराच्या समस्यादेखील वाढताना दिसत आहेत. वास्तविक आपण जे अन्न खातो त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होत असते. ज्यामुळे शरीराला शारीरिक कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. आपल्या शरीरातील स्वादुपिंडातून इन्सुलीन या हॉर्मोनची निर्मिती होत असते. ज्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशाली पुरेसे ग्लुकोज मिळू शकते.  पण जर तुम्ही मधुमेही असाल तर तुमचे शरीर पुरेसे इन्सुलीन निर्माण करू शकत नाही अथवा तुमच्या शरीरातील निर्माण होणाऱ्या इन्सुलिनच्या कार्यात बिघाड होतो. ज्यामुळे रक्तात अतिरिक्त साखर अथवा ग्लुकोज साठू लागते. ज्याचा परिणाम तुमच्या शारीरिक कार्यावर होतो. मधुमेहाची समस्या निर्माण होण्याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे सतत तहान लागणे, भुकेच्या प्रमाणात वाढ होणे, सतत युरिनला जाण्याची इच्छा होणे, ह्रदयाची धडधड वाढणे. जर तुम्हाला या प्रकारची लक्षणे जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

shutterstock

ADVERTISEMENT

स्तनांचा कर्करोग –

कर्करोग हा महिलांमध्ये वाढत जाणारा एक भयंकर आजार आहे. महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणूनच महिलांमध्ये याबाबत वेळीच जागरुकता करणे फार गरजेचे आहे. स्तनांचा कर्करोग होण्यामागची कारणे निरनिराळी असू शकतात. ज्यामुळे महिलांच्या स्तनांमध्ये गाठी निर्माण होतात. ज्या महिला वर्षातून एकदा स्वतःचे हेल्थ चेकअप करून घेतात. त्यांच्या या आजाराचे निदान वेळीच झाल्यामुळे त्यांचा कर्करोग लवकर बरा होऊ शकतो. मात्र याबाबत योग्य ज्ञान नसल्यामुळे बऱ्याच महिला स्वतःची काळजी घेत नाहीत. उशीरा निदान झाल्यास हा रोग धोकादाक ठरू शकतो. स्तनांचा कर्करोगाचे वेळीच निदान होण्यासाठी प्रत्येक महिलेने तिच्या स्तनांची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. शिवाय यासाठी महिन्यातून एकदा  प्रत्येकीने स्वतःच्या स्तनांची स्वतःच तपासणी करायला हवी. कारण यामुळे स्तनात झालेल्या गाठी लवकर समजतात. स्तनांच्या त्वचेचा बदलेला रंग, स्तनाग्रांमधील बदल, स्तनांमधुन येणारा चिकट स्त्राव अशा अनेक लक्षणांमधुन याची जाणिव होऊ शकते. 

फोटोसौैजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

मासिक पाळी लवकर येण्यासाठी सोपे उपाय

पोटाचा घेर कमी करायचा आहे का, मग नियमित खा ‘हे’ पदार्थ

सायटिका आजाराकडे करताय दुर्लक्ष; कंबर, पायांवर होतील दुष्परिणाम

ADVERTISEMENT

 

05 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT