चांगल्या केसांसाठी काय करु तितके कमीच असतेच. केसांच्या वाढीसाठी तेल, शँम्पू, सीरम आपण सर्वसाधारणपणे लावतो. केसांची फारच काळजी घ्यायची झाली तर आपण हेअर स्पा, हेअर मसाज असं काही करुन घेतो. जर तुम्हाला तुमच्या केसांसाठी थोडी अॅडव्हान्स ट्रिटमेंट करायची असेल तर आज मी तुम्हाला एक चांगला पर्याय सुचवणार आहे. मी सुद्धा माझ्या केसांसाठी ही ट्रिटमेंट घेतली त्यानंतर माझे केस मला चांगले वाटू लागले म्हणूनच मी तुम्हाला आज या विषयी सगळी माहिती देणार आहे. ही ट्रिटमेंट आहे केरेटीन (Keratin) हेअर ट्रिटमेंट. तुम्ही ही तुमच्या स्टायलिस्टकडून आणि सलोनमधून हा प्रकार ऐकला असेलच जाून घेऊया याविषयी
तुमच्या केसांसाठी हा हेअर स्पा ठरु शकतो वरदान
केरेटीन ट्रिटमेंट(Keratin) म्हणजे काय?
ज्या वेळी तुम्ही स्पा करायचा आहे असे सांगता त्यावेळी तुमचे केस पाहून स्टायलिस्ट अनेकदा केरेटीन ट्रिटमेंट(Keratin) देण्याचा सल्ला दिला जातो. आता केरेटीन ट्रिटमेंट म्हणजे काय असा प्रश्न तुम्हााल पडला असेल तर ज्या पद्धतीने स्मुथिंग केले जाते अगदी त्याच काही स्टेप्स फॉलो करुन केरेटीन ट्रिटमेंट केले जाते. केसांसाठी आवश्यक असलेले केरेटीन प्रोडक्ट वापरुन तुमच्या केसांना शाईन आणली जाते. यामध्ये केसांवर आयनिंग मशीन फिरवली जाते.पण या ट्रिटमेंटचा उद्देश्य केस सरळ करणे असा होत नाही. तर केसांना यामुळे एक बाऊन्स आणि शाईन मिळते. तुमच्या केसांचा फॉल छान पडतो. केस सुटसुटीत दिसतात. केसांचा गुंता होत नाही आणि विशेष म्हणजे साधारण 6 महिने तुम्हाला केसांच्या मेन्टनंसशिवाय काही वेगळे करावे लागत नाही.
अशी केली जाते केरेटीन (Keratin Treatment)
आता केरेटीन करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर अशापद्धतीने केरेटीन ट्रिटमेंट सर्वसाधारणपणे केले जाते.
- सगळ्यात आधी तुमच्या केसांची लांबी पाहिली जाते. केसांचा गुंता सोडवून तुमच्या केसांना शँम्पू केले जाते. तुम्ही केस अगदी आज सकाळी जरी धुतले असतील तरीसुद्धा तुमच्या केसांसाठी केरेटीन किटसोबत येणारा शँम्पू वापरणे अनिवार्य असते. त्यामुळे त्या शँम्पूचा वापर करुन तुमचे केस धुतले जाते.
- केस धुतल्यानंतर टॉवेलने त्यातले पाणी टिपून तुमच्या केसांचे सेक्शन्स केले जातात. सेक्शन्सचे अनेक लहान सबसेक्शन तयार केले जातात.
- आता वेळ असले केरेटीन क्रिम लावण्याची तुमच्या केसांच्या मुळापासून बोटाचे एक पेर सोडून केसांना क्रिम लावली जाते. ही क्रिम लावताना ती तुमच्या केसांमध्ये जिरवण्यासाठी केसांवर सतत बोट फिरवली जातात किंवा उलटा कंगवा फिरवला जातो.
- संपूर्ण केसांना केरेटीन लावल्यानंतर स्ट्रेटनिंग केले जाते. तुमच्या केसाच्या पोतानुसार तुमच्यासाठी स्ट्रेटनिंगची हिट निवडली जाते. तुमच्या केसांची एक एक बट घेऊन केस स्ट्रेट केले जातात.
- तुमचे केस स्ट्रेटनिंग केल्यानंतर शाईनी दिसायला लागतात. त्यानंतर तुमचे केस धुतले जात नाही.
- दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा हेअर वॉशसाठी बोलावले जाते.
- हा हेअर वॉश नुसता हेअरवॉश नसतो. तुम्ही गेल्यानंतर स्ट्रेटनिंग केले जाते. पुन्हा एकदा सेक्शन पाडून तुमच्या केसांना स्ट्रेनिंग केले जाते.
- स्ट्रेटनिंग पूर्ण झाल्यानंतर केला जातो हेअरवॉश. हेअरवॉशसाठीही केरेटीन शँम्पू वापरला जातो.
- हेअरवॉश केल्यानंतर तुम्हाला कंडीशनर लावून मसाज केला जातो. हा मसाज तुम्हाला खूप रिलॅक्स करतो.
- केस धुतल्यानंतर तुमचे केस ब्लोड्राय केले जातात आणि केसांना सीरम लावले जाते. आणि तुमचे केरेटीन झाले.
त्वचेला आणि केसांना नवी चमक देण्यासाठी वापरा कोरफड, अफलातून फायदे
केरेटीन ट्रिटमेंटबद्दल हेही माहीत हवे
केरेटीन केल्यानंतर तुम्हाला ते जास्त काळ टिकावे असे वाटत असेल तर तुम्ही सांगितलेला शँम्पू वापरणे अधिक चांगले असते.
हेअरवॉश केल्यानंतर साधारण 15 दिवस तरी तेल लावू नका. कारण तुम्ही तेल लावल्यामुळे ही ट्रिटमेंट मुरण्याचा कालावधी कमी होतो.
आठवड्यातून किमान तीन वेळा तरी तुम्ही तुमचे केस धुवा. केस धुतल्यानंतर कंडीशनर लावायला विसरु नका.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/