केसांसाठी रिबाऊंडिंग अधिक चांगले की केरेटिन, नक्की फायदा कशाचा

केसांसाठी रिबाऊंडिंग अधिक चांगले की केरेटिन, नक्की फायदा कशाचा

ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी आपले केस मॅनेज करणं खूपच कठीण असतं. सुंदर केस सगळ्यांनाच हवे असतात पण त्याची काळजी घेणं रोजच्या आयुष्यात जमतंच असं नाही. तर काही जणी केसांची काळजी घेण्यासाठी केमिकल्सचा वापर जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे काही काळासाठी केस सुंदर आणि सिल्की, मऊ आणि मुलायम होतात. पण यामुळे केसांचे बरेच नुकसान होते. तर आता केसांमध्ये रिबाऊंडिंग आणि स्मूदनिंगच्या जागी हेअर केराटिन हे पर्याय जास्त वापरले जाताना दिसून येत आहेत. पण या दोनापैकी नक्की कोणता प्रकार केसांसाठी चांगला आहे असाही प्रश्न महिलांना नेहमी सतावत असतो. कारण पार्लरमध्ये गेल्यानंतर सर्वच प्रकार चांगले अशल्याचे सांगितले जाते. तर आता तुमचा अधिक गोंधळ पार्लरमध्ये गेल्यानंतर होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला रिबाऊंडिंग आणि हेअर केराटिन यातील नक्की कोणता प्रकार जास्त चांगला आहे आणि कशातून केसांना अधिक प्रोटीन मिळू शकेल आणि केस अधिक सिल्की आणि मुलायम होऊ शकतील याची माहिती देणार आहोत.

रिबाऊंडिंग अधिक प्रसिद्ध पण होते केसांचे नुकसान

Shutterstock

ऑफिसला जाणाऱ्या महिलांना आपल्या केसांची काळजी घेणं हे अत्यंत त्रासदायक ठरत असते. त्यामुळे महिलांमध्ये रिबाऊंडिंग जास्त प्रसिद्ध आहे. रिबाऊंडिंगची ट्रिटमेंट करताना केसांना सरळ आणि सिल्की करण्यात येते. या ट्रिटमेंटमध्ये केमिकलचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. यामुळे केस काही काळासाठी सरळ आणि सिल्की होतात पण त्यानंतर मात्र केसांचे जास्त प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे रिबाऊंडिंगची क्रेझ कमी होऊ लागली आहे. आता बऱ्याच जणी हेअर केराटिन करून घेताना दिसतात. तुमचे केस अधिक रफ झाले असतील अर्थात कोरडे झाले असतील तर ते अधिक सिल्की आणि मुलायम बनवण्यासाठी याचा वापर हल्ली जास्त प्रमाणात होऊ लागला आहे.

केसगळती रोखण्यासाठी वापरा घरगुती 5 सोपे हेअर मास्क

हेअर केरेटिनला लागतो कमी वेळ

Shutterstock

हेअर केरेटिनला रिबाऊंडिंग आणि स्मूथनिंगच्या तुलनेत कमी वेळ लागतो. रिबाऊंडिंगमध्ये बऱ्याच प्रकारच्या केमिकल्सचा उपयोग केला जातो. ज्यामुळे केस खराब होतात. तर केरेटिनमध्ये केवळ एकाच क्रिमचा वापर करण्यात येतो. केसांच्या वाढीनुसार हे क्रिम केसांमध्ये 90 मिनिट्स अथवा त्यापेक्षा जास्त वेळ लावून ठेवण्यात येते. त्यानंतर हेअर वॉशऐवजी त्याजागी हेअर स्ट्रेटनरने केस सरळ करण्यात येतात. असं केल्याने केस आधीच्या तुलनेत अधिक सिल्की आणि मुलायम दिसू लागतात आणि केसांचे जास्त  प्रमाणात नुकसानही होत नाही. 

काय फरक असतो हेअर स्ट्रेटनिंग आणि हेअर स्मूदनिंगमध्ये (Hair Smoothening At Home In Marathi)

रिबाऊंड की हेअर केरेटिन, काय अधिक चांगले?

Shutterstock

रिबाऊंडिंगच्या तुलनेत हेअर केरेटिन अधिक चांगले असे म्हटले जाते. केरेटिनची ट्रिटमेंट घेतल्यानंतर केस 60 टक्के सरळ होतात. तसंच हेअर केरेटिनमध्ये केसांना अधिक जास्त प्रमाणात प्रोटीन मिळतं. जे काही महिन्यांपर्यंत केसांना पोषण देतं आणि टिकून राहाते. पण हेअर केरेटिन नक्की कोणी करायला हवं हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचे आहे. केसांवर कोणत्याही प्रकारच्या केमिकल्सचा प्रयोग जास्त प्रमाणात करू नये. पण ज्या महिला आपल्या केसांवर केमिकल्सचा जास्त वापर करतात त्यांनी हेअर केरेटिन ट्रिटमेंट करावी. कारण यामध्ये केमिकल्सचा वापर कमी असतो. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे केस अधिक रफ आणि कोरडे झाले आहेत, त्यांनीही ही हेअर केरेटिनची ट्रिटमेंट घ्यावी ज्यामुळे त्यांच्या केसांना चांगले पोषण मिळते. 

कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार करून मिळवा सुंदर केस

रिबाऊंडिंग आणि हेअर केरेटिनचा साधारण खर्च

Shutterstock

रिबाऊंडिंगची वाढती मागणी असली तरीही लहान सलॉनमध्ये साधारण 3 हजार पर्यंत याचा खर्च होतो. पण सुरूवातीला रिबाऊंडिंगचा खर्च हा साधारण 10 हजार इतका होा. तर आता केरेटिनची मागणी अधिक आहे त्यामुळे याचा खर्च साधारण 10-12 हजार इतका होतो. काही लहान सलॉनमध्ये मात्र याची किंमत साधारण 3-4 हजार इतकी घेण्यात येते. पण लहान पार्लर्समध्ये यासाठी वापरण्यात येणारे क्रिम हे स्वस्तातील असते ज्यामुळे केसांचे नुकसान अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला जर हेअर केरेटिन करून घ्यायचे असेल तर तुम्ही चांगल्या हेअर सलॉनमध्येच जावे. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.