ADVERTISEMENT
home / Recipes
झटपट आणि पौष्टिक सँडविच रेसिपीज (Easy Sandwich Recipe In Marathi)

झटपट आणि पौष्टिक सँडविच रेसिपीज (Easy Sandwich Recipe In Marathi)

सँडविच म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतं ते मस्तपैकी दोन ब्रेडमध्ये भाज्या घातलेला भरपूर बटर, टोमॅटो सॉस आणि वरून शेव भुरभुरून सर्व्ह केलेला पदार्थ. सकाळ असो संध्याकाळ सँडविच हा असा पदार्थ आहे जो कोणत्याही वेळी खाल्ला तरी चालतो. अगदी तुम्ही टिफीनमध्ये सँडविच देऊ शकता किंवा डिनरसाठीही करू शकता. काहीजणांना चहासोबत सँडविच आवडतं. थोडक्यात काय तर सँडविच हा झटपट होणारा आणि पोटभरीचा पौष्टिक पदार्थ आहे. खरंतर सँडविचमध्ये भरपूर प्रकार पाहायला मिळतात. सँडविच बनवण्याच्या विविध पद्धतीही आहेत. काहीजण काकडी आणि टोमॅटो वापरून व्हेज सँडविच खातात तर काही जण अंड आणि चिकन वापरून नॉनव्हेज सँडविच खातात. त्यासाठी POPxoMarathi तुमच्यासाठी घेऊन आलं आहे सँडविच रेसिपी मराठी (sandwich recipe in marathi).

व्हेजिटेबल सँडविच रेसिपी मराठी (Veg Sandwich Recipe In Marathi)

व्हेजिटेबल सँडविच - Veg Sandwich Recipe In Marathi

Shutterstock

ADVERTISEMENT

नेहमीच्या व्हेजिटेबल सँडविचपेक्षा हे सँडविच थोडं वेगळं आहे. व्हेज सँडविच करण्यासाठी साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे 

साहित्य – 

250 gm उकडलेला बटाटा, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 हिरवी ढोबळी मिरची, 1/2 टी स्पून जीरे आणि मीठ – चवीनुसार, 1/2 टी स्पून लाल तिखट, 1/2 टी स्पून धने पावडर, 1/4 टी स्पून गरम मसाला, 1 टी स्पून चिरलेली कोथिंबीर, 1 टी स्पून तेल, 8-10 स्लाइसेस ब्रेड, बटर. 

कृती –

ADVERTISEMENT
  • सर्वात आधी उकडलेल्या बटाट्याची सालं काढून घ्या. तुमच्या आवडीनुसार बटाट मॅश करून किंवा छोटे तुकडे करून तुम्ही वापरू शकता. 
  • आता कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची बारीक चिरून घ्या. 
  • आता एका कढईत तेल घेऊन त्यात जीरं घाला. तेल तापल्यावर त्यात हिरवी मिरची आणि कांदा घाला. 3-4 मिनिटं फ्राय करा. आता यात टोमॅटो घाला आणि त्यावर मीठ घाला. म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल. नंतर त्यात तिखट आणि धनेपावडर घाला. 
  • हे मिश्रण जेव्हा तेल सोडेल तेव्हा त्यात बटाटा घाला आणि चांगलं परतून घ्या. सर्वात शेवटी कोथिंबीर घाला. 
  • आता नॉन स्टिक पॅनवर बटर घालून त्यावर ब्रेड स्लाईस भाजून घ्या. नंतर त्यावर बटाटा मिश्रण घालून दुसरा ब्रेड स्लाईस ठेवून बंद करा.
  • तुम्हाला हवं असल्यास हे सँडविच तुम्ही टोस्टर किंवा सँडविच मेकरमध्येही बनवू शकता. 
  • टोस्ट झाल्यावर टोमॅटो सॉस किंवा चटनीसोबत सर्व्ह करा.

बॉम्बे सँडविच रेसिपी (Bombay Sandwich Recipe)

बॉम्बे सँडविच रेसिपी

Shutterstock

बॉम्बे सँडविच म्हणजे बटाट्याच्या भाजीचं (potato sandwich recipe in marathi) हा पोटभरीची उत्तम डिश आहे. दोन बॉम्बे सँडविच खाल्लं की पोट भरलंच म्हणून समजा. अगदी डिनर डिश म्हणूनही तुम्ही हा प्रकार करू शकता. बटाटा हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे या बटाटा सँडविचला कोणी नाही म्हणूच शकत नाही.

ADVERTISEMENT

साहित्य –  

8 ब्रेड स्लाईस, 1 टोमॅटो, 1 कांदा, 1 उकडलेला बटाटा, 1 कप चीज, 1/2 तुकडा दालचीनी, 1/2 टी स्पून जीरं, 1/2 टी स्पून काळी मिरी, 1/2 टी स्पून आमचूर पावडर, 1 टी स्पून हिरवी चटणी, 2 टी स्पून बटर, मीठ चवीनुसार.  

कृती 

  • बॉम्बे किंवा बटाटा सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी जीरं, दालचिनी आणि आमचूर पावडर मिक्स करून वाटून घ्या. 
  • आता उकडलेले बटाटे कुस्करून ते एका कढईत वरील मिश्रण आणि हवं असल्यास कांदा घालून परतून घ्या. चांगलं परतल्यावर भाजी थंड करा. 
  • आता ब्रेड स्लाईसवर टोमॅटोचे गोल तुकडे आणि आवडीनुसार काकडीचे गोल तुकडे स्लाईसवर ठेवा व बटाट्याची भाजी घाला. त्यावर दुसऱ्या स्लाईसवर हिरवी चटणी आणि बटर लावून घ्या. तसंच चीजही घालून दोन्ही स्लाईस एकमेकांवर ठेवा. आता हे सँडविच छान ग्रील करून घ्या. तयार आहे तुमचं चविष्ट बॉम्बे सँडविच आणि बटाटा सँडविच.

वाचा – पाहा बॉम्बे सँडविच रेसिपीचा व्हिडिओ

ADVERTISEMENT

क्रिम सँडविच रेसिपी मराठी (Cream Sandwich Recipe)

क्रिम सँंडविच - Cream Sandwich Recipe

Instagram

नेहमीच्या सँडविचपेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे. त्यामुळे ही पौष्टिक रेसिपी तुम्ही नक्की करून पाहा. क्रिम सँडविच हा प्रकार अमेरिकेत जास्त प्रसिद्ध आहे. मुख्य म्हणजे हे सँडविच बनवणं खूपच सोपं आहे. 

ADVERTISEMENT

साहित्य –

8 स्लाईस ब्रेड, 1 टोमॅटो, 1 कप क्रीम, 1 कप बारीक चिरलेला कोबी, 1/2 कप चिरलेलं गाजर, 1/4 टी स्पून हिरवी चटणी, 1/4 टी स्पून काळी मिरी पावडर, 1 टी स्पून बटर, 2 टी स्पून बारीक चिरलेली कोंथिबीर, मीठ चवीनुसार.

कृती –

  • क्रिम सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी एका वाडग्यात बारीक चिरलेला कोबी आणि गाजर घालून मिक्स करा. नंतर त्यात टोमॅटोही चिरून घाला. 
  • आता या मिश्रणात मीठ, हिरवी चटणी, काळी मिरी आणि कोथिंबीर व क्रिम घालून चांगलं मिक्स करा. सँडविच फिलींग तयार आहे. 
  • आता हे मिश्रण ब्रेड स्लाईसवर लावण्याआधी बटर लावा. आता या मिश्रणातलं थोडं मिश्रण ठेवा आणि थोडं स्लाईसवर लावा. 
  • आता या स्लाईसवर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवा. सर्व ब्रेड आणि मिश्रण असंच लावून सँडविच बनवा. 
  • सर्व सँडविच याच पद्धतीने बनवा आणि सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

ADVERTISEMENT

चटणी सँडविच रेसिपी मराठी (Chutney Sandwich Recipe In Marathi)

चटणी सँडविच - Chutney Sandwich Recipe In Marathi

Shutterstock

तुम्ही म्हणाल की, या सँडविचमध्ये काय वेगळं आहे. खरंतर हे सँडविच सगळीकडे अगदी आरामात मिळतं. खासकरून दक्षिणेकडे हे जास्त प्रसिद्ध आहे. भाज्या खाण्याचा कंटाळा असल्यास किंवा घरात भाज्या नसल्यास सँडविच खाण्याचा मूड झाल्यावर झटपट होणार हे सँडविच आहे. 

साहित्य – 

ADVERTISEMENT

8 ब्रेड स्लाईस, 1 कप पनीर किसलेलं, 1 सिमला मिरची, 1 टोमॅटो, 1 कांदा, 1 टी स्पून चाट मसाला, 1 टी स्पून हिरवी मिरची पेस्ट, 1 टी स्पून हिरवी चटणी, 1 टी स्पून लाल चटणी, 1 टी स्पून बटर, 1 टी स्पून काळी मिरी, 1 टी स्पून जिरेपूड, मीठ चवीनुसार 

हिरवी चटणी रेसिपी (Chuteny Recipe For Sandwich) 

हिरव्या चटणीसाठी तुम्ही तिखटपणानुसार दोन ते चार मिरच्या, चार काड्या कोथिंबीर, थोडंसं जीरं, चार-पाच कडीपत्त्याची पानं, छोटा तुकडा किसलेलं आलं, दोन ते तीन पाकळ्या लसूण, चवीनुसार मीठ आणि पुदिना दोन-चार काड्या घ्या. हे सगळं मिक्सरमध्ये तीन-चार चमचे पाणी घालून वाटून घ्या. तयार आहे तुमची हिरवी चटणी.   

कृती –

ADVERTISEMENT
  • चटणी सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो स्वच्छ करून घ्या. नंतर गोलाकार तुकडे करा. 
  • आता एका भांड्यात पनीर, जिरेपूड, काळी मिरी, चाट मसाला, हिरवी चटणी आणि मीठ चवीनुसार घालून मिक्स करा. आता या मिश्रणात सिमला मिरची, कांदा आणि टोमॅटोचे तुकडे घालून मिक्स करा. 
  • स्लाईस ब्रेडवर बटर लावा आणि सर्व मिश्रण स्लाईस ब्रेडवर लावून सँडविच बनवा. आवडीनुसार तसंच किंवा ग्रील करा. 
  • तयार आहे तुमचं चटणी सँडविच.

वाचा – मैद्यापासून तयार करा या स्वादिष्ट रेसिपीज (Maida Recipes In Marathi)

व्हेज मेयोनीज सँडविच रेसिपी मराठी (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi)

व्हेज मेयोनीज सँँडविच - Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi

Shutterstock

ADVERTISEMENT

व्हेज सँडविच हे फारच पौष्टिक स्नॅक्सचा प्रकार आहे. हे सँडविच खाल्ल्यावर तुम्हाला योग्य ते न्यूट्रीशनही मिळेल आणि भूकही भागेल. त्यासोबत मेयोनीज घातल्यामुळे मुलंही आवडीने हे सँडविच खातील. (Mayonnaise sandwich recipe in Marathi)

साहित्य –

8 ब्रेड स्लाईस, 2-3 चमचे मेयोनीज, 1 काकडी, 1 टोमॅटो, 1 कांदा, 1 उकडलेला बटाटा, 1 कप चीज, 1/2 तुकडा दालचीनी, 1/2 टी स्पून जीरं, 1/2 टी स्पून काळी मिरी, 1 टी स्पून हिरवी चटणी, 2 टी स्पून बटर, मीठ चवीनुसार.

कृती –

ADVERTISEMENT
  • व्हेज सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी सर्व भाज्या गोलाकार चिरून त्यावर दालचिनी, जीरं आणि काळी मिरी घालून मिक्स करा. 
  • ब्रेड स्लाईसवर सर्वात आधी बटर आणि चटणी लावा. नंतर भाज्यांचे तुकडे ठेवा. नंतर चीज किसून आणि मेयोनीज घाला. नंतर दुसऱ्या स्लाईसने कव्हर करा. 
  • आता सँडविच ग्रीलरमध्ये ग्रील करा. सँडविचवर बटर, सॉस आणि शेव भुरभुरून सर्व्ह करा.

व्हेज नूडल्स सँडविच रेसिपी मराठी (Veg Noodle Sandwich)

व्हेज नूडल्स सँडविच - Veg Noodle Sandwich

Shutterstock

नूडल्स मुलांना हमखास आवडतात. त्यातच तुम्ही नूडल्स सँडविच हा नवा प्रकार त्यांना करून दिल्यास ते सँडविचही नक्कीच आवडीने खातील. मग करून पाहा ही नवीन सँडविच रेसिपी. 

ADVERTISEMENT

साहित्य –

ब्रेड स्लाईस 8, नूडल्स 1 कप (उकडलेले), टोमॅटो 1 (बारीक चिरलेला), कांदा 1 (बारीक चिरलेला), बटर 2 चमचे, मीठ चवीनुसार, चिली सॉस1 चमचा, टोमॅटो सॉस 1 चमचा, बारीक चिरलेला कोबी 2-3 चमचे, काळी मिरी पावडर अर्धा चमचा. 

कृती –

  • नूडल्स सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी सँडविच फिलींग बनवून घ्या. फिलींग बनवण्यासाठी सर्वात आधी फ्राईंग पॅनमध्ये दोन चमचे बटर घालून गरम करत ठेवा. बटर वितळल्यावर किसलेला कोबी, टोमॅटो, कांदा, चिली सॉस, टोमॅटो सॉस, मीठ आणि काळी मिरी पावडर घालून दोन ते तीन मिनिटं फ्राय करा. आता हा फ्राय केलेल्या मसाल्यात नूडल्स घाला आणि परत दोन मिनिटं परतून घ्या. आता गॅस बंद करा. 
  • नूडल्स सँडविच बनवण्यासाठी आता सँडविच मेकर गरम करून घ्या. ब्रेड स्लाईसवर हे फिलींग लावा आणि ते बटर लावून सँडविच मेकरमध्ये ठेवून ग्रील करा. 
  • गरमागरम नूडल्स सँडविच सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. 

वाचा – मॅगी नूडल्स वापरूनही तुम्ही हे सँडविच बनवू शकता

ADVERTISEMENT

चना सँडविच (Chana Sandwich Recipe)

चना सँडविच - Chana Sandwich Recipe

Instagram

चणे हे खूपच पौष्टिक असतात. जर मुलं चण्याची भाजी किंवा चण्याचे इतर पदार्थ आवडीने खात नसतील तर सँडविचमधून त्यांना तुम्ही चणे खाऊ घालू शकता. प्रत्येकवेळी आपल्याकडे भाज्या असतीलच असं नाही. त्यामुळे चणा सँडविच हा वेगळा प्रकार तुम्ही नक्की करून पाहा. कारण हे सँडविच एकाच वेळी पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे.  

ADVERTISEMENT

साहित्य –

8 ब्रेड स्लाईस, 1 कप उकडलेले चणे, 1 टोमॅटो, 1 कांदा, 1 टी स्पून चाट मसाला, 1 टी स्पून हिरवी मिरची पेस्ट, 1 टी स्पून हिरवी पुदीना चटणी, 1 टी स्पून बटर, 1 टी स्पून काळी मिरी, 1 टी स्पून भाजलेलं जीरं, मीठ चवीनुसार. 

कृती –

  • चणे सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी कांदा आणि टोमॅटो स्वच्छ धुवून गोलाकार चिरून घ्या.
  • आता एका भांड्यात उकडलेले चणे, काळी मिरी, भाजलेलं जीरं, चाट मसाला, हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्या. जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याची मिक्सरमध्ये वाटून पेस्टसारखंही बनवू शकता. 
  • ब्रेड स्लाईसवर बटर लावा. त्यानंतर हे मिश्रण स्लाईसवर नीट लावा. दुसऱ्या स्लाईसवर पुदीना चटणी लावा. तसंच कांदा आणि टोमॅटो स्लाईसेसही ठेवा. आता दुसरी स्लाईस ठेवून बंद करा. 
  • तुम्ही हे सँडविच असंच किंवा टोस्ट करूनही खाऊ शकता. ग्रील किंवा टोस्ट करायचं असल्यास किमान 2-4 मिनिटं करा. 
  • आता हे सँडविच सॉस किंवा पुदिना चटणीसोबत सर्व्ह करा.

ADVERTISEMENT

चॉकलेट चीज सँडविच (Chocolate Cheese Sandwich Recipe In Marathi)

चॉकलेट चीज सँडविच - Chocolate Cheese Sandwich Recipe In Marathi

Shutterstock

चॉकलेट सँडविच हा बच्चे कंपनीचा आवडता स्नॅक्स प्रकार आहे. ज्याला ते कधीही नाही म्हणत नाहीत. नेहमीच्या सँडविचप्रमाणे यात भाज्या नाहीतर चॉकलेट आणि चीजचा (cheese sandwich recipe in marathi )वापर केला जातो. 

साहित्य –

ADVERTISEMENT

4 ब्रेड स्लाईस, 1 कप चोको चिप्स किंवा हर्शीज चोको सॉस, 1 केळं, 2 टी स्पून बटर

कृती 

  • चॉकलेट सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी सर्व साहित्य एका ठिकाणी घ्या. केळ्याचं साल काढून त्याचे बारीक पण लांबसर तुकडे करा किंवा तुम्हाला हवं असल्यास गोल तुकडेही करू शकता. 
  • सँडविच मेकर गरम करा आणि त्यावर बटर लावा. आता एक ब्रेड स्लाईस घ्या आणि त्यावर बटर लावा आणि चोको चिप्स किंवा चोको सॉस लावून घ्या. त्यावर केळ्याचे तुकडे ठेवा. 
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चीजही किसून यावर घालू शकता. आता दुसऱ्या स्लाईसने हे कव्हर करा. 
  • आता हे सँडविच मेकरमध्ये ठेवून टोस्ट करून घ्या. शेकल्यावर प्लेटमध्ये काढा. आता हे सँडविच तयार आहे. हवं असल्यास तुम्ही वरूनही या सँडविच चॉकलेट सॉस, चीज किंवा चोको चिप्स गार्निश करू शकता.

वाचा – पाहा चॉकलेट सँडविच रेसिपीचा व्हिडिओ 

ADVERTISEMENT

अंड सँडविच रेसिपी मराठी (Egg Sandwich Recipe In Marathi)

अंड सँडविच रेसिपी मराठी - Egg Sandwich Recipe In Marathi

Shutterstock

अंड सँडविच हे खूपच पौष्टिक आहे. आम्ही सांगणार आहोत ती अंड सँडविच रेसिपीही थोडीशी तिखट आणि मसालेदार आहे. तुम्ही हे सँडविच ब्रेकफास्ट किंवा जेवणाऐवजीही खाऊ शकता.  

साहित्य –

ADVERTISEMENT

4 अंडी उकडलेली, 8 ब्रेड स्लाईस, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 टी स्पून हिरवी मिरची पेस्ट, 1 टी स्पून बटर, 1 टी स्पून टोमॅटो सॉस, 1 टी स्पून चिली सॉस, 1/2 टी स्पून काळी मिरी, 1/2 टी स्पून तिखट, मीठ चवीनुसार.

कृती –

  • एग सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी उकडलेली अंडी सोलून घ्या. आता सुरीने त्याचे गोल तुकडे करून घ्या. त्याच पद्धतीने टोमॅटो आणि कांद्याचेही गोल तुकडे करून घ्या. 
  • आता ब्रेड स्लाईसवर बटर, टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि थोडीशी हिरव्या मिरचीची पेस्ट लावा. त्यावर दुसरी ब्रेड स्लाईस ठेवून बंद करा. अशाच पद्धतीने सर्व सँडविच बनवा.
  • तुम्हाला हवं असल्यास असंच किंवा तव्यावर शेकूनही हे सँडविच तुम्ही खाऊ शकता. 
  • तुमचं एग सँडविच बनून तयार आहे. हे सँडविच तुम्ही टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीसोबतही खाऊ शकता.

टोमॅटो सँडविच (Tomato Sandwich Recipe)

टोमॅटो सँडविच - Tomato Sandwich Recipe

ADVERTISEMENT

Shutterstock

नेहमीचं सँडविच खाऊन कंटाळा आला असल्यास हे टोमॅटो सँडविच तुम्हाला नक्की आवडेल. आपल्या प्रत्येकाकडे घरी टोमॅटो तर असतोच. त्यामुळे या सँडविचसाठी जास्त काही वेगळं सामान आणण्याचीही गरज नाही. 

साहित्य –

8 ब्रेड स्लाईस, 4 टोमॅटो, 1 टी स्पून चाट मसाला, 1 टी स्पून हिरवी मिरची पेस्ट, 1 टी स्पून बटर, 1 टी स्पून काळी मिरी, 

ADVERTISEMENT

मीठ चवीनुसार. 

कृती –

  • सँडविचसाठी सर्वात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. आता त्याचे गोलाकार तुकडे करा. 
  • टोमॅटोला मीठ, काळी मिरी, हिरवी मिरची पेस्ट आणि चाट मसाल्याने चांगलं मॅरिनेट करा. 
  • टोमॅटो मॅरिनेशन झाल्यावर ब्रेड स्लाईसवर बटर लावा आणि त्यावर मॅरिनेटेड टोमॅटो ठेवा. स्लाईसवर नीट पसरून घ्या. नंतर त्यावर दुसरा स्लाईस ब्रेड ठेवा. 
  • अशाच पद्धतीने सर्व सँडविच बनवून घ्या. हवं असल्यास असंच किंवा टोस्टरमध्ये गरम करून घ्या. तुम्ही हे सँडविच ग्रिल केल्यास ते अजून चांगलं लागेल. तयार आहे तुमचं टोमॅटो सँडविच

पालक सँडविच (Palak Sandwich)

पालक सँडविच - Palak Sandwich Recipe

Canva

ADVERTISEMENT

पालकातील आरोग्यासाठी उपयुक्त गुणधर्म आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. पण तुम्ही पालक सँडविच प्रकार ट्राय केला आहे का? नसेल तर ही रेसिपी नक्की करून पाहा. तुमची मुलं जर इतरवेळी पालक खात नसतील तर त्यांना सँडविचमधून तुम्ही पालक खाऊ घालू शकता. 

साहित्य – 

8 ब्रेड स्लाईस, 2 कप पालक, 1/4 टी स्पून काळी मिरी, 1 टी स्पून स्वीट कॉर्न, 1 टी स्पून भाजून घेतलेली जीरं पावडर, 2 टी स्पून लिंबाचा रस, 2 टी स्पून बटर, मीठ चवीनुसार. 

कृती –

ADVERTISEMENT
  • सर्वात आधी पालकाची पानं स्वच्छ धुवून घ्या. आता त्यावरील पाणी नीट पुसून घ्या आणि पालक चिरा. 
  • एका कढईत बटर गरम करा. यामध्ये चिरलेला पालक, स्वीट कॉर्न, काळी मिरी, मीठ आणि जीरं पावडर घालून चांगलं मिक्स करा. किमान 2-3 मिनिटं हे परतून घ्या. 
  • नंतर हे मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात लिंबू पिळा आणि पुन्हा चांगल मिक्स करा. तुमचं सँडविच फिलींग तयार आहे. 
  • आता ब्रेड स्लाईसवर बटर लावा. नंतर हे मिश्रण पसरा. त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवा. 
  • तुम्ही हवं असल्यास हे सँडविच असंच खाऊ शकता किंवा टोस्ट करूनही खाऊ शकता. तयार आहे तुमचं हेल्दी पालक सँडविच.

मशरूम सँडविच (Mushroom Sandwich Recipe In Marathi)

मशरूम सँडविच - Mushroom Sandwich Recipe In Marathi

Shutterstock

मशरूममध्ये भरपूर व्हिटॅमीन्स असतात. त्यामुळे जर तुम्ही मुलांना मशरूम सँडविचमध्ये घालून दिलं तर त्यांना नक्कीच सर्व व्हिटॅमीन्स मिळतील. या सँडविचला खूपच कमी वेळ लागतो.

साहित्य – 

ADVERTISEMENT

8 ब्राउन ब्रेड, 100 ग्रॅम पनीर, 1 कप मशरूम बारीक चिरलेला, 1/2 कप कांदा बारीक चिरलेला, 1/4 टी स्पून हिरव्या मिरचीची चटणी, 1/4 टी स्पून काळी मिरी पावडर, 1 टी स्पून बटर, 2 टी चमचे धने पावडर, मीठ चवीनुसार.

कृती – 

  • मशरूम सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या पॅनमध्ये बटर घालून ते गरम झाल्यावर त्यात मशरूम आणि कांदा घाला. आता हे चांगलं परतून घ्या. त्यात मीठ, काळी मिरी आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घाला. 
  • हे मिश्रण चांगल परतल्यावर एका बाऊलमध्ये काढून थंड होऊ द्या. नंतर पनीर कुस्करून तेही यात मिक्स करा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पनीरही मशरूमसोबत परतून घेऊ शकता. तुमचं सँडविच फिलींग तयार आहे. 
  • एवढं करून झाल्यावर ब्रेड स्लाईसवर बटर लावा. त्यावर हे मिश्रण लावा आणि नीट पसरा. वरून दुसरा स्लाईस ब्रेड ठेवा. 
  • आता सँडविच मेकर गरम करा आणि तयार सँडविच त्यात ठेवून 2-4 मिनिटं ग्रील करा. 
  • तयार आहे तुमचं मशरूम सँडविच. यासोबत तुम्ही सॉस, चटणी किंवा मेयोनीजही सर्व्ह करू शकता.

हेही वाचा – 

झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास

ADVERTISEMENT

बनवा सोप्या सूप रेसिपीज

सोप्या केक रेसिपीज

‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज

16 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT