कुरळ्या केसांना ब्लो ड्राय करण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स

कुरळ्या केसांना ब्लो ड्राय करण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स

तुमचे केस जर कुरळे असतील तर त्यांची नीट काळजी घेणं गरजेचं असतं. कुरळे केस आवडत नसल्यामुळे तुम्ही ते सरळ करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते पुन्हा कुरळेच दिसतात. यासाठी स्वतःच्या केसांवर प्रेम करा. आजकाल कुरळ्या केसांचा  ट्रेंड आहे. तेव्हा उगाच तुमच्या केसांना स्ट्रेटनरने सरळ करत बसण्यापेक्षा तुमच्या केसांना फक्त ब्लो ड्राय करा आणि स्टायलिश दिसा. यासाठी ब्लो ड्राय करण्यापुर्वी या टिप्स जरूर वाचा.

Instagram

घरीच ब्लो ड्राय करण्यासाठी लागणारे साहित्य

 • ड्रायर (अॅडवान्स)
 • हेअर शॅम्पू
 • हेअर कंडिशनर अथवा हेअर स्पा क्रीम
 • जुना टीशर्ट अथवा सुती टॉवेल
 • लिव्ह इन कंडिशनर
 • हेअर जेल अथवा हेअर मूझ
 • हेअर क्लिप
 • राऊंड ब्रश
 • मोठ्या दातांचा कंगवा अथवा टेलकोम्ब
 • स्टायलिंग टूल्स
 • हेअर सिरम

 

केसांची निगा राखण्यासाठी आम्ही तुम्हाला या साहित्याची यादी दिली आहे. मात्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील उत्पादने निवडू शकता. 

 

कुरळ्या केसांची निगा राखण्यासाठी खालील व्हिडिओ जरूर पाहा.

कुरळे केस घरीच ब्लो ड्राय करण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स

 • सर्वात आधी  तुमच्या केसांसाठी योग्य हेअर शॅंम्पू आणि हेअर कंडिशनरने हेअर वॉश घ्या. तुम्ही घरच्या घरी चांगल्या हेअरमास्कने हेअर स्पादेखील करू शकता. केस धुण्यासाठी कोमट पाणी अथवा थंड पाणी वापरा. कारण गरम पाण्याने तुमचे केस जास्त कोरडे होतील. कुरळे केस कोरडे झाल्यास ते फारच वाईट दिसतात. त्यामुळे केसांना योग्य पद्धतीने कंडिशनर करा.
 • एखाद्या मऊ टॉवेलने अथवा जुन्या टीशर्टने तुमचे केस टिपून घ्या. ज्यामुळे तुमच्या केसांचे कर्ल पॅटर्न खराब होणार नाही. घरीच ब्लो ड्राय करताना केस नॅचरल कर्ली दिसण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. 
 • केस ब्लो ड्राय करण्यापूर्वी ते 85 टक्के कोरडे करावेत ज्यामुळे जास्त नुकसान होत नाही.
 • तुमचे केस मॉश्चराईझ करण्यासाठी केसांना लिव्ह इन कंडिशनर लावा. तुमच्या केसांच्या लांबीनुसार त्याचे योग्य प्रमाण हातावर घ्या. अगदी हळूवारपणे ते केसांवर लावा.  लिव्ह इन कंडिशनरमुळे केसांवर एक सुरक्षित कोट निर्माण होईल. 
 • केसांमध्ये लिव्ह इन कंडिशनर मुरल्यानंतर आवश्यक असल्यास तुम्ही एखादे हेअर जेल अथवा मूझदेखील केसांवर लावू शकता. ज्यामुळे तुमचे केस फ्रिझी न होता व्यवस्थित कर्ली दिसतील. 
 • केसांचे चार समान भाग करून ते क्लिप करा आणि एक एक भाग मोकळा करत केस ब्लो ड्राय करा. 
 • ड्रायर कुलिंग सेटिंगवर ठेवा. जर तसा ऑप्शन नसल्यास कमी तापमानावर तुमचा ड्रायर ठेवा कारण जास्त हिटमुळे केस खराब होऊ शकतात. शिवाय ब्लो ड्राय करताना तुमचा स्काल्पला उष्णता लागणार नाही याची काळजी घ्या.
 • कर्ल करणारे हेअर टुल्स अथवा राऊंड ब्रश वापरणार असाल तर तो जास्त गरम होणार नाहीत याची काळजी घ्या.
 • ड्रायरला नोझल लावा तसे न केल्यास केसांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे.
 • ड्रायर मध्यावरून टोकाकडे असा फिरवा ज्यामुळे केस जास्त ड्राय होणार नाहीत. 
 • केसांना ब्लो ड्राय करताना जाड दातांचा कंगवा वापरा. छोट्या दातांचा कंगवा अथवा नॉर्मल हेअर ब्रश वापरल्यामुळे केस जास्त गुंतण्याची शक्यता असते. 
 • केस ब्लो ड्राय केल्यावर ते कोरडे दिसू नयेत यासाठी एखादे चांगले हेअर सिरम केसांवर लावा.

 

सूचना - केसांना वारंवार ब्लो ड्राय करणं टाळा. कारण यामुळे केस कोरडे आणि निस्तेज होऊ शकतात. त्यामुळे फक्त गरज असेल तेव्हाच केसांना ब्लो ड्राय करा.