ADVERTISEMENT
home / Fitness
दररोज शीर्षासन करा आणि मिळवा फायदे (Shirshasana Benefits In Marathi)

दररोज शीर्षासन करा आणि मिळवा फायदे (Shirshasana Benefits In Marathi)

योग हा उत्तम आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. हे आपण सारेच जाणतो. शरीर निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही रोज काही योगासनं ही करायलाच हवी. पद्मासन, पश्चिमोत्तानासन, शवासन, सर्वांगासान, सूर्यनमस्कार अशी कित्येक आसनं आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. शरीर सुडौल ठेवण्यासोबतच तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ही आसनं फारच लाभदायक असतात. आज आपण ज्या आसनाविषयी विस्तृतपणे माहिती घेणार आहोत ते आसन आहे ‘शीर्षासन’ खाली डोकं वर पाय करत हे आसन केले जाते. हे आसन करण्याची विशिष्ट अशी पद्धत आहे. या योगासनामुळे आरोग्याशी निगडीत अनेक फायदे आपल्याला होतात. म्हणूनच आज आपण शीर्षासनाविषयी अधिक माहिती घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया दररोज शीर्षासन करण्याचे फायदे.. . करुया सुरुवात

असे करा शीर्षासन (How To Do Shirsasana Step By Step)

असे करा 'शीर्षासन'

Instagram

शीर्षासन या शब्दाची फोड केली तर संस्कृतातील ‘शीर्ष’ आणि ‘आसन’ अशी त्याची फोड होते. शीर्ष म्हणजे डोकं आणि आसन म्हणजे ते करण्याची पद्धत. याला इंग्रजीमध्ये ‘Headstand’असे म्हणतात. शीर्षासनाचे फायदे जाणून घेण्याआधी हे आसन योग्य पद्धतीने कसे करायचे ते जाणून घेऊया.

ADVERTISEMENT
  • दोन्ही पाय दुमडून वज्रासनामध्ये या. 
  • तुमचे दोन्ही हात समोर ठेवून बोट एकमेकांमध्ये अडकून जमिनीवर ठेवा. 
  • बोटांमध्ये असलेल्या जागेमध्ये डोकं ठेवून डोकं त्या बोटांमध्ये व्यस्थित ठेवा. 
  • आता पाय उचलण्याचा प्रयत्न करा. पहिल्या प्रयत्नात तुम्हाला पाय वर करता येणार नाही. पण तुम्ही थोडे लक्ष केंद्रित केले की, तुमचा पाय तुम्हाला वर नेता येईल. 
  • पाय सरळ वर घेऊन अशा आसनात 30 सेकंद राहा. श्वास सुरळीत असू द्या. 
  • मानेची हालचाल करु नका. कारण त्यामुळे तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता असते. 
  • आसनात असताना तुम्हाला काहीही त्रास होत असेल तर तुम्ही आसन सोडा. (आसन करताना तुम्ही भिंतीचा आधार घेतला तरी चालेल)

पावर योगा आणि त्याचे फायदे (Benefits Of Power Yoga In Marathi)

शीर्षासन करण्याचे फायदे (Benefits Of Shirsasana In Marathi)

शीर्षासन कसे करायचे हे जाणून घेतल्यानंतर आता त्याचे फायदे काय ते आता जाणून घेऊया.

नजर सुधारते (Healthy Eye Vision)

नजर सुधारण्यास मदत

Instagram

ADVERTISEMENT

नजर चांगली असेल तर अनेक शरीरावर येणारा ताण आपोआप कमी होतो. नजर चांगली राहण्यासाठी डोळ्यांना उत्तम रक्त पुरवठा होणे आवश्यस असते. शीर्षासनामुळे नजर चांगली होण्यास फायदा मिळतो. तुम्ही दररोज शीर्षासन केले. तर तुमच्या डोळ्यांच्या आजुबाजूला असणाऱ्या असंख्य नसांना रक्तपुरवठा मिळतो. त्यामुळे त्या अधिक चांगल्या पद्धतीने काम करतात. योग हा अगदी कोणत्याही वयातील व्यक्ति करु शकतो. जर तुम्हाला तुमची नजर कायम चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही शीर्षासन नित्यनेमाने करायला हवे. 

वाचा – प्राणायामाचे फायदे मराठीमध्ये

खांदे आणि हात बळकट करते (Strengthen Shoulder And Arms)

आपल्या शरीराला आपला भार उचण्याची सवय असली तरी आपण पायांवर हा भार उचलत असतो. पण खांदे आणि हातही तितकेच बळकट आणि मजबूत करायचे असतील तर शीर्षासन फारच फायदेशीर आसन आहे. शीर्षासन करताना आपण संतुलन राखण्याचे काम करतो. हे संतुलन खांदे, हात आणि श्वसन अर्थात छातीवर अवलंबून असते. ज्यावेळी हे आसन आपण करतो त्यावेळी या सगळ्या अवयवांची मदत आपल्याला होतो. नव्याने आसन करताना तुम्हाला थोडे थरथरल्यासारखे वाटेल पण कालांतराने तुम्हाला त्याची सवय होईल. 

पचनशक्ती सुधारण्यास मदत करते (Improves Digestion)

पचनशक्ती सुधारते

ADVERTISEMENT

Instagram

अनेक आसनांचा प्रत्यक्ष संबंध हा आपल्या पोटाच्या आरोग्यासाठीही फारच फायदेशीर असतो. हल्लीच्या धकाधकीत प्रत्येकाला होणारा पोटाच्या आरोग्याशी निगडीत त्रास म्हणजे अपचन. तुम्हाला अपचनाने ग्रासले असेल तर तुमच्यासाठी शीर्षासन हे उत्तम आसन आहे.  तुमच्या शरीरातील पाचक रसाला अॅक्टिव्ह करुन शरीरातील पचन क्रिया सुरळीत करतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्हाला त्यातूनही सुटका मिळू शकेल. 

आश्चर्यकारक! डान्स वर्कआऊट करुन तुमचे वजन होऊ शकते कमी

स्नायूंना आणते बळकटी (Strengthen Core Muscle)

शरीराची हालचाल उत्तम होण्यासाठी हाडांसोबत स्नायूंनाही बळकटी असणे आवश्यक असते. स्नायू मजबूत असतील तर तुम्हाला पटकन थकवा येत नाही. शीर्षासन करताना तुम्ही तुमच्या शरीराचा भार उचलता अशावेळी तुमच्या थकलेल्या स्नायूंना रिलॅक्स करण्याचे आणि त्यांना बळकट करण्याचे काम हे आसन करते.  तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचे काम करते. 

ADVERTISEMENT

केस करते सुंदर (Healthy Hair and Scalp)

केस करते सुंदर

Instagram

सुंदर केसांसाठी योगसाधना करत असाल तर शीर्षासन तुमच्यासाठी उत्तम आसन आहे. खाली डोकं वर पाय असे शीर्षासन करताना रक्ताचा पुरवठा मेंदू आणि पर्यायाने तुमच्या केसांच्या आतील त्वचा म्हणजे स्काल्पला होतो. तुमची स्काल्प चांगली असेल तर तुमचे केस चांगले राहतात. स्काल्पला रक्ताचा उत्तम पुरवठा झाल्यामुळे केसांची उत्तम वाढ आणि केसांना चमक प्रदान करण्यास हे आसन फारच फायदेशीर ठरते.  शिवाय तुम्हाला असलेला केसगळतीचा त्रास कमी करुन पांढऱ्या केसांची समस्या दूर करते. 

योगासन केल्यामुळे होतं आरोग्य निरोगी (Benefits Of Yoga In Marathi)

ADVERTISEMENT

लक्ष केंद्रित करण्यास मदत (Increase Focus)

आसन करताना ते अगदी जपून आणि जाणीवपूर्वक करावे लागते.त्यात शीर्षासन हे सगळ्या आसनांपेक्षा कठीण असे आसन आहे. हे आसन करताना तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते. हे आसन करताना अनेकदा धडपडायला होते. हे आसन करताना तुम्हाला मनातून सगळे विचार काढून टाकावे लागतात आणि मन लावून आसन करावे लागते. या आसनाच्या सवयीमुळे तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. 

मानसिक आरोग्य सुधारते (Increase Mental Health)

मानसिक आरोग्य

Instagram

शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक स्वास्थ्य राखणे महत्वाचे असते. मेंदूला उत्तम रक्त पुरवठा झाल्यामुळे तुमच्या मनामध्ये सुरु असलेली अस्वस्थता कमी होते. हल्लीच्या कामाच्या गडबडीत आणि कामाच्या ताणामुळे सुरु असलेली स्पर्धा आणि त्यामुळे बिघडणारे मानसिक स्वास्थ्य यासाठी शीर्षासन उत्तम आसन आहे. तुम्ही नियमितपणे हे आसन करा. तुमचे मन शांत होईल.

ADVERTISEMENT

                                                                                                                      योगासनाचे फायदे (Benefits Of Yoga In Marathi)

शांत झोप येण्यास मदत (Healthy Sleep)

निद्रानाश हा हल्ली अनेकांना होणारा त्रास आहे. योगसाधनेमुळे झोपेसंदर्भातील अनेक तक्रारी दूर होतात. शीर्षासनामुळे रक्तपुरवठा सुरळीत होते. त्यामुळे तुमचे शरीर रिलॅक्स होते आणि त्यामुळे तुम्हाला झोप येण्यास मदत होते. जर तुम्हाला झोपे संदर्भात तक्रारी असतील तर तुम्ही  शीर्षासन हे आसन अगदी आवर्जुन करायला हवे तुम्हाला याचा फायदा नक्की जाणवेल. 

लैंगिक आजार करते बरे (Helps To Treat Sexual Disorder)

लैगिंक समस्या दूर करते

Instagram

ADVERTISEMENT

ताणतणावासोबत जाणवू लागलेला आजार म्हणजे लैंगिक आजार. अनेकांना या आजारासंदर्भात कोणाशीही चर्चा करायला आवडत नाही. त्यामुळे या समस्यांचे निराकरण करणे फार कठीण जाते. शीर्षासनाच्या मदतीने लैंगिक तक्रारी कमी होण्यास मदत मिळते. तुमच्या शरीराला आवश्यक असलेली उर्जा देत तुमचे शारीरिक संबंध सुधारण्याचे काम शीर्षासन करते. त्यामुळे असा त्रास असणाऱ्यांनी हे आसन हमखास करावे. 

ताणतणाव करते कमी ( Stress Reliever)

शरीराला आणि मनाला आलेला ताण तुम्हाला कमी करायचा असेल तर शीर्षासन हे अगदी योग्य आसन आहे. तुम्हाला मानसिक शांती देण्यापासून ते शारीरिक व्याधींपासून दूर ठेवण्याचे काम हे आसन करते त्यामुळे ताणतणावाला दूर सारण्याचे मोठे काम हे आसन करते. शीर्षासनाच्या नित्य आचरणामुळे तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला बदल नक्कीच जाणवेल. तुमचे चित्त थाऱ्यावर येऊन तुम्हाला अनेक नव्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. शीर्षासन किती वेळासाठी करायला हवे?
हे आसन तुम्ही नव्याने करणार असाल तर सुरुवातीला किमान 30 सेकंद तरी या आसनस्थितीत राहण्याचा प्रयत्न करा.  तुम्हाला या आसनाची सवय झाल्यानंतर 5 मिनिटं या आसनस्थितीत राहा. त्यानंतर तुम्हाला या आसनाचे फायदे मिळतील. तुम्ही हे आसन योग्य करे पर्यंत मार्गदर्शकांच्या मदतीने केले तर फारच उत्तम. 

2. शीर्षासन कोण करु शकत नाही?
शीर्षासन करणे कितीही फायदेशीर असले तरी ठराविक वयोगटातील मुलांनी हे आसन करु नये. विशेषत: 7 वर्षांखाली मुलांना हे आसन करायला लावू नये. कारण लहान मुलांचा टाळू फारच नाजूक असतो. त्यामुळे त्यांनी हे आसन करु नये. गर्भवती महिलांसाठी हे आसन धोक्याचे आहे. कारण त्यामुळे बाळाला आणि आईला दोघांना त्रास होऊ शकतो.  या शिवाय मायग्रेन, ह्रदयरोग, ग्लुकोमा, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हे आसन त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे त्यांनी हे आसन करु नये. 

ADVERTISEMENT

3. केसांच्या वाढीसाठी शीर्षासन चांगले असते का?
शीर्षासनामुळे मेंदूला उत्तम असा रक्तरपुरवठा होतो हे आपण जाणतो. पण इतक्याच गोष्टीसाठी हे आसन फायदेशीर नाही. तर तुमच्या स्काल्पला ही या आसनामुळे रक्तपुरवठा होतो. त्यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यासाठी मदत होते. शिवाय अकाली केस पांढरे होण्याचा त्रास असेल तरी देखील केसांचा रंग पुन्हा काळा करण्यासाठी हे आसन मदत करते. 

14 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT