ADVERTISEMENT
home / Make Up Products
Best BB Cream For Skin In Marathi

त्वचेसाठी बेस्ट आहेत या बीबी क्रीम (Best BB Cream For Skin In Marathi)

मेकअप निरनिराळ्या पद्धतीने करता येतो. जर तुम्हाला नेहमीसाठी आणि नॅचरल लुक करायचा असेल तर फाऊंडेशन ऐवजी बीबी क्रीम (BB cream in marathi)चा तुम्ही वापर करू शकता. कारण त्यामुळे तुम्हाला फाऊंडेशन इफेक्टही मिळतो आणि तुमची त्वचा हायड्रेटही राहते. जेव्हा तुम्हाला फुल अथवा मध्यम कव्हरेज मिळण्याची गरज असते तेव्हा तुम्हाला फाऊंडेशन लावणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र दैनंदिन मेकअपसाठी बीबी क्रीम वापरण्यास काहीच हरकरत नाही. बीबी क्रीमचा अर्थ ब्युटी बाम अथवा ब्लेमिश बाम क्रीम असा होतो. बीबी क्रीममुळे जरी तुमच्या चेहऱ्यावरील डाग, व्रण, काळसरपणा पूर्ण झाकला जात नसला तरी यामुळे तुम्हाला एकसमान स्कीन टोन मिळू शकतो. शिवाय फाऊंडेशनपैक्षा बीबी क्रीममुळे तुमच्या त्वचेतील मऊपणा टिकून राहतो. आपण ही मलई हँड क्रीम म्हणून वापरू शकता किंवा चेह apply्यावर लावू शकता. बाजारात अनेक प्रकारच्या बीबी क्रीम उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला लाईट ते मिडिअम कव्हरेजदखील मिळू शकतं. यासाठी या बेस्ट बीबी क्रीम अवश्य ट्राय करा.

COLORBAR Perfect Match BB Cream

परफेक्ट लुकसाठी तुम्हाला मेकअप आणि स्कीन केअर या दोन्ही गोष्टी एकत्र करण्याची गरज असते. कलरबारच्या या मल्टी बेनिफिट ब्युटी बाममुळे तुमच्या फाईन लाईन्स झाकल्या जातात, तुमची त्वचा मऊ होते, तुमचा स्कीन टोन करेक्ट होतो शिवाय तुम्हाला मध्यम कव्हरेजही मिळते. कारण यात तुमच्या लुकसाठी परफेक्ट मॅच हे टेकनिक वापरण्यात आलं आहे. ज्यामुळे ते तुमच्या त्वचेत व्यवस्थित मुरतं आणि तुम्हाला एकसमान स्कीन टोन देतं.

फायदे – 

  • लाईटवेट आणि नॉन ग्रिसी फॉर्म्युला
  • पेराबेन फ्री
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त
  • सफरचंद आणि कोरफडाचा अर्क वापरण्यात आला आहे
  • यात SPF 20 चा समावेश करण्यात आलेला आहे

तोटे –

ADVERTISEMENT
  • मर्यादित शेड आहेत
  • फुल कव्हरेजसाठी फाऊंडेशनसोबत लावावे लागते

MAC Prep+Prime BB Beauty Balm Cream

जर तुम्हाला मेकअपने तुमचं स्कीन टेक्चर नीट करायचं असेल, डाग लपवायचे असतील तर मॅकचं हे बीबी क्रीम अगदी परफेक्ट आहे. कारण यामुळे तुमच्या त्वचेतील तेलाच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवलं जातं आणि तुम्हाला लगेच एकसमान स्कीन टोन मिळते. यामध्ये SPF 35 असल्यामुळे तुमच्या त्वचेचं सुर्यप्रकाशापासून संरक्षण होतं. शिवाय त्वचा मॉईस्शराईझदेखील होते. बीबी क्रीमशिवाय इतरही केस काढून टाकण्याची क्रीम्स आहेत.

फायदे –

  • डाग आणि व्रण झाकले जातात
  • मिडिअम कव्हरेज साठी परफेक्ट
  • अती तेलकट आणि अती कोरड्या त्वचेसाठी परफेक्ट
  • सुंगधित उत्पादन आहे
  • त्वचा हायड्रेट राहते
  • चेहऱ्यावर ग्लो येतो


तोटे-

  • मर्यादित शेडमध्ये उपलब्ध
  • महागडे आहे

Maybelline Dream Fresh BB Cream

मेबिलिनची ही बीबी क्रीम आता नव्या पॅकिंगमुळे नव्या रूपात आणि ट्रॅव्हल फ्रेंडली पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. यातील लाईटवेट आणि शीर फॉर्म्युला तुमच्या त्वचेला एकसमान स्कीन टोन नक्कीच देऊ शकतो. शिवाय यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि त्यातील SPF 30 मुळे तुमच्या त्वचेचं सुर्यप्रकाशापासून संरक्षणही होतं. तुम्ही तुमच्या मॉर्निंग स्कीन केअर रूटीनमध्ये या बीबी क्रीमचा समावेश नक्कीच करू शकता.

ADVERTISEMENT

फायदे –

  • त्वचा हायड्रेट राहते
  • काळे डाग आणि काळसरपणा झाकला जातो
  • तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार बदल होतात
  • लाईटवेट फॉर्म्युला 
  • सुर्यकिरणांपासून रक्षण होते

तोटे –

  • मर्यादित शेड
  • महागडे आहे

Garnier Skin Naturals BB Cream

विविध ब्रॅंडच्या बीबी क्रीम सध्या बाजारात उपलब्ध आहेत. यातून तुमच्यासाठी परफेक्ट बीबी क्रीम निवडाची असेल तर ही निवडा. कारण गार्निअरने स्कीन केअरमध्ये खूप चांगली उत्पादने बाजारात आणली आहे जी स्वस्त आणि मस्तही आहेत. या बीबी क्रीममध्ये तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी, बदामाचा अर्क आणि ब्राईटनिंग मिनरल्सचा वापर केलेला आहे. ज्यामुळे तुमची त्वचा दिवसाचे 24 तास हायड्रेट आणि मऊ राहते. शिवाय याचा तुमच्या फाईन लाईन, काळे व्रण लपवण्यासाठीही चांगला फायदा होतो. यातदेखील SPF 24 वापरण्यात आलेलं आहे. त्याही हातांनी काळजी घेणारी क्रीम आहेत.

फायदे –

ADVERTISEMENT
  • व्हिटॅमिन सी, बदामाचा अर्क, ब्राईटनिंग मिनरल्स युक्त
  • दिवसभर त्वचा मऊ आणि हायड्रेट राहते
  • स्वस्त आहे
  • बाजारात सहज उपलब्ध आहे

तोटे –

  • फुल कव्हरेज मिळत नाही
  • शेड मर्यादित

POND’S BB+ Cream

पॉंड्सची ही व्हाईट ब्युटी बीबी क्रीम फेअरनेस क्रीमही असल्यामुळे तुम्हाला ती कधीही, कुठेही वापरता येते. याचा परिणाम तुमच्या त्वचेत खोलवर होतो. ज्यामुळे तुम्हाला नॅचरल आणि ग्लो असलेला लुक मिळतो. यातून तुम्हाला फेअरनेस आणि फाऊंडेशन असा दुहेरी फायदा मिळू शकतो. शिवाय याचे उत्पादन खास भारतीय त्वचेसाठी करण्यात आलेलं आहे. यात एक युनिक जीन व्हाईट कव्हर फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुम्हाला इव्हन स्कीन टोन मिळतो.

फायदा –

  • युनिक जीन व्हाईट कव्हर फॉर्म्युला 
  • फाऊंडेशन आणि फअरनेस दोन्ही फायदे
  • SPF 30  आहे
  • स्वस्त आहे
  • भारतीय त्वचेसाठी परफेक्ट आहे

तोटे-

ADVERTISEMENT
  • फुल कव्हरेज मिळत नाही
  • शेड मर्यादित आहेत

Olay Day Cream Total Effects 7 in 1 BB Cream

ओलेचं टोटल इफेक्ट 7 च्या डे वन डे क्रीम मध्ये बीबी क्रीमचाही वापर करण्यात आलेला आहे. यातील व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई मुळे तुमची त्वचा तजेलदार होते. ओलेची उत्पादने ही अॅंटि एजिंगसाठी लोकप्रिय आहेत. त्यामुळे वयानुसार निर्माण होणाऱ्या फाईन लाईन्स, सुरकुत्या. त्वचेतील कोरडेपणा यामुळे कमी होतो. शिवाय याचा वापर तुम्ही मेकअप पूर्वी फाऊंडेशनप्रमाणे करू शकता. चेहर्‍यावरील सुरकुत्या लपविण्यासाठी सर्वोत्कृष्ट फाऊंडेशनचा वापरा.

फायदे –

  • अॅंटि एजिंग असल्यामुळे फायदेशीर
  • फाईन लाईन्स, सुरकुत्या कमी होतात
  • यातील पोषक घटकांमुळे त्वचेचं रक्षण होत
  • नैसर्गिक लुक मिळतो

तोटे –

  • फुल कव्हरेज मिळू शकत नाही

REVLON Photoready BB Cream Skin Perfector

रॅव्हलॉनचं बीबी क्रीम सुंदर अशा चंदेरी आणि काळ्या पॅकिंगमध्ये मिळतं. यामुळे तुमच्या त्वचेला त्वरीत ग्लो मिळेल आणि तुमच्या चेहऱ्यावरील काळेपणा लपवला जाऊ शकतो. यामुळे तुमच्या त्वचेला मॉईश्चराईझर आणि सनस्क्रीनचा फायदाही मिळतो. 

ADVERTISEMENT

फायदे –

  • त्वचेसाठी हलकं आहे
  • ग्लो मिळतो
  • जास्त तेलकट नाही
  • डार्क सर्कल्स झाकले जातात
  • त्वचा मऊ होते

तोटे –

  • सतत लावावं लागते
  • शेड मर्यादित
  • महाग आहे
  • सहज उपलब्ध नाही

SUGAR Cosmetics Goddess Of Flawless SPF30+ BB Cream

नो मेकअप लुकसाठी अथवा नॅचरल लुकसाठी अतिशय परफेक्ट उत्पादन आहे. यातील SPF 30 मुळे तुमच्या त्वचेचं रक्षण होतं. मॅट फिनिश लुक यामुळे तुम्हाला मिळतो. ज्यामुळे तुम्हाला घाम येत नाही आणि तुमचा चेहरा तेलकट दिसत नाही. तुम्ही याचा वापर प्रायमर, फाऊंडेशन, मॉईश्चराईझर, सनस्क्रीनप्रमाणे करू शकता

फायदे –

ADVERTISEMENT
  • ऑल इन वन उत्पादन 
  • नो मेकअप लुकसाठी परफेक्ट 
  • मॅट फिनिश मिळू शकते
  • चेहरा तेलकट दिसत नाही

तोटे –

  • फुल कव्हरेज मिळत नाही

Deborah Milano 5-In-1 BB Cream

डेबोराह मिलानो फाईव्ह इन वन बीबी क्रीम तुमच्या मेकअप कीटमध्ये असायलाच हवी. कारण यामुळे तुमचा स्कीन टोन तर परफेक्ट होतोच शिवाय तुम्हाला आणखी अनेक फायदे मिळतात. यातील मल्टी टास्किंग फॉर्म्युलामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. याचा वापर तुम्ही मेकअपआधी प्रायमर, कन्सिलर, मॉईस्चराईझर, कलर करेक्टरसाठी करू शकता. हे क्रीम त्वचेत लवकर मुरतं आणि त्वचेवर एकसमान दिसतं. 

फायदे –

  • निरनिराळ्या गोष्टींसाठी वापरता येते
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त

तोटे –

ADVERTISEMENT
  • फुल कव्हरेज मिळत नाही
  • शेड मर्यादित आहेत

L’OREAL Paris True Match BB Cream

लॉरिअल पॅरिसच्या ट्रू मॅच बीबी क्रीममध्ये अडवान्स टेकनिकचा वापर केलेला आहे. ज्यामुळे कोलीजीन वर नियंत्रण राहते आणि तुमच्या त्वचेला मऊपणा मिळतो. शिवाय यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, व्रण कमी करण्यास मदत होते. याच्या सेमी मॅट लुकमुळे तुमचा चेहरा उजळ दिसू लागतो. याचा वापर अॅंटि एजिंग क्रीमसाठी केला जाऊ शकतो. 

फायदे –

  • मिडिअम ते फुल कव्हरेज मिळू शकते
  • चार ते पाच त्वचेवर टिकते
  • भरपूर शेड उपलब्ध आहेत

तोटे-

  • तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेसाठी उपयुक्त नाही
  • त्वचेचे पोअर्स ब्लॉक होण्याची शक्यता 

बीबी क्रीमबाबत मनात असलेले प्रश्न -FAQs

1. बीबी क्रीमसाठी कोणता ब्रॅंड परफेक्ट आहे ?

बाजारात अनेक प्रकारच्या बीबी क्रीम आहेत. आम्ही वर त्यातील बेस्ट ब्रॅंड तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. यापैकी तुमच्या गरजेनुसार ब्रॅंड तुम्ही निवडू शकता.

2. बीबी क्रीम आणि सीसी क्रीम मध्ये मुख्य फरक कोणता ?

बीबी क्रीमचा अर्थ ब्युटी बाम अथवा ब्लेमिश बाम क्रीम असा होतो तर सीसी क्रीमचा अर्थ करेक्टर क्रीम अथवा कॉम्प्लेशन करेक्टर क्रीम असा होतो. या दोन्ही क्रीम दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असतात. प्रत्येक वेळी आपण फाऊंडेशनचा वापर करू शकत नाही. अशा वेळी या दोन्ही क्रीम उपयुक्त ठरतात. बीबी क्रीम तुम्ही फाऊंडेशनचा वापर टाळण्यासाठी करू शकता तर सीसी क्रीम तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा स्कीन टोन एकसमान करण्यासाठी फाऊंडेशनसोबत लावावं लागतं.

3. कोणती बीबी क्रीम तुम्ही दररोज वापरू शकता ?

आम्ही वर दिलेल्या जवळजवळ सर्वच क्रीम या दररोज वापरण्यासाठी उत्तम आहेत. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेला मॉईच्शराईझर, सनस्क्रीनचा फायदादेखील मिळतो. दररोज फाऊंडेशनचा वापर टाळण्यासाठी तुम्ही यातील कोणतीही क्रीम वापरू शकता. आपण केस काढून टाकण्यासाठी क्रीम आणि फाउंडेशनचा वापर टाळण्यासाठी या वापरू शकता

4. बीबी क्रीम फाऊंडेशनपेक्षा उत्तम असते का ?

नक्कीच नाही कारण फाऊंडेशनमुळे तुम्हाला फुल कव्हरेज मिळते. जे तुम्हाला बीबी क्रीमने मिळेलच असं नाही. मात्र बीबी क्रीम त्वचेवर हलक्या असल्याने तुम्ही याचा वापर दररोज करू शकता. शिवाय बीबी क्रीममुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होत नाही.

5. बीबी क्रीममध्ये त्वचेसाठी योग्य शेड कशी निवडावी ?

त्वचेच्या प्रकार आणि शेडनुसार तुम्हाला योग्य प्रकारची बीबी क्रीम निवडावी लागेल. बीबी क्रीममध्ये फाऊंडेशन प्रमाणे जास्त प्रमाणात शेड उपलब्ध नसतात. मात्र तुम्ही बीबी क्रीमचा शेड निवडण्यासाठी सेमच उपाय वापरू शकता. हे सर्वोत्तम कीटाणू मारुन हाताची काळजी घेणारी क्रीम आहे आणि आपण ते तोंडावर लावू शकता. तुमच्या स्कीनटोनपेक्षा एक शेड उजळ शेड निवडा.

पुढे वाचा – 

ADVERTISEMENT

Best Face Cream in Hindi

08 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT