फाऊंडेशन हा आपल्या चेहऱ्यावर मेकअप करण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अर्थात सगळ्यांना फाऊंडेशन लावण्याची पद्धत आणि कोणते फाऊंडेशन वापरायचे याची माहिती नसते. फाऊंडेशन हे मेकअप अधिक चांगला दाखविण्यासाठी मदत करते. इतकंच नाही तर जे मेकअप करत नाहीत तेदेखील केवळ फाऊंडेशनचा उपयोग करून आपला चेहरा आकर्षक दाखवू शकतात. पण फाऊंडेशनची निवड कशी करायची? कारण बाजारामध्ये अनेक ब्रँड्सचे फाऊंडेशन तुम्हाला दिसून येतील. त्यामुळे फाऊंडेशनची निवड कशी करायची याचा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे भारतातील उत्कृष्ट 10 फाऊंडेशन आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. तुमच्या तेलकट त्वचेसाठी फाऊंडेशन ठरतील उत्तम.
मेबेलिन न्यूयॉर्क फिट मी मॅट + पोअरलेस लिक्विड फाऊंडेशन (Maybelline Fit Me Liquid Foundation)
मेबेलिन एक प्रसिद्ध आणि विश्वासार्ह उत्पादन ब्रँड आहे. ज्याचे अनेक मेकअप उत्पादने बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यामधील एक आहे मेबेलिन न्यूयॉर्क फिट मी मॅट + पोअरलेस लिक्विड फाऊंडेशन. हे फाऊंडेशन 16 वेगवेगळ्या शेड्समध्ये उपलब्ध आहे. कंपनीनुसार हे भारतीय महिलांच्या स्किनटोन अर्थात त्वचेच्या रंगानुसार बनविण्यात आले आहे. हे केवळ चेहऱ्याला मीडियम कव्हरेज देतं असं नाही तर मॅट फिनिश देऊन चेहरा तेलकट होण्यापासूनही दूर ठेवते.
फायदे (Pros)
- हे नॉर्मलपासून ते तेलकट सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे
- हे हलके फाऊंडेशन आहे
- हे अत्यंत सोप्या पद्धतीने ब्लेंड होते
- अजिबात चिकट नाही
- कंपनीनुसार हे पोअर्स व्यवस्थित झाकते
- अत्यंत चांगला फिनिश आणि नैसर्गिक लुक देते
- जास्त काळ टिकते
- त्वचा विशेतज्ज्ञांकडून परीक्षण करण्यात आले आहे
- नॉन-अलर्जिक फाऊंडेशन आहे
- ट्यूबपॅकमध्येदेखील उपलब्ध
तोटे (Cons)
कोणतेही तोटे नाहीत
लॉरिअल पॅरिस ट्रू मॅच सुपर ब्लेंडेबल लिक्विड फाऊंडेशन (L’Oreal Paris Super Blendable Liquid Foundation)
सर्वात उत्कृष्ट फाऊंडेशनच्या यादीमध्ये लॉरिअल पॅरिस ट्रू मॅच सुपर ब्लेंडेबल लिक्विड फाऊंडेशनचा समावेश करण्यात येतो. भारतीय त्वचेसाठी हे तयार करण्यात आलं असून अत्यंत नैसर्गिक लुक देण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. तसंच ग्लिसरीन, विटामिन बी आणि ई युक्त असे हे फाऊंडेशन त्वचेला पोषण देण्याचे काम करते. कंपनीचा दावा आहे की, हे हाय कव्हरेज देणारे फाऊंडेशन असून प्रत्येक त्वचेासठी आणि टेक्स्चरसाठी उपलब्ध आहे.
फायदे (Pros)
- यामध्ये एसपीएफ – 17 असून सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचविण्यासाठी फायदेशीर ठरते
- संपूर्ण कव्हरेज देते
- त्वचेला हायड्रेट करते
- हे चेहऱ्याला अत्यंत फ्लॉलेस लुक देते
- हे पंप बाटलीमध्ये उपलब्ध आहे
तोटे (Cons)
हे स्पंजच्या वापराने ब्लेंड करणं सोपं आहे. मात्र हाताच्या बोटाने ब्लेंड करणं कठीण होतं
लॅक्मे परफेक्टिंग लिक्विड फाऊंडेशन (Lakme Perfecting Liquid Foundation In Marathi)
सौंदर्य प्रसाधनांच्या कंपनीबद्दल बोलायचे झाले तर लॅक्मे हा अत्यंत जुना आणि विश्वासार्ह ब्रँड मानला जातो. लॅक्मेचे अनेक प्रॉडक्ट्स अर्थात उत्पादने बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यापैकीच एक आहे लॅक्मे परफेक्टिंग लिक्विड फाऊंडेशन. हे फाऊंडेशन पटकन पसरते आणि चेहऱ्यावरील डाग, काळी वर्तुळे आणि पॅची स्किन झाकण्याचे काम करते. विटामिन ई सह युक्त असणारे फाऊंडेशन तुम्ही नियमित वापरू शकता.
फायदे (Pros)
- तेलमुक्त अर्थात ऑईल फ्री आहे
- हे वॉटर रेझिस्टंट आहे
- अतिशय हलके आहे
- त्वचेला पोषण देण्याचे काम करते
- अतिशय पटकन ब्लेंड होते
- किंमत पण परवडण्याजोगी आहे
- बाजारात पटकन उपलब्ध होते
तोटे (Cons)
- यामध्ये सिलिकॉन आहे
- जास्त शेड्स उपलब्ध नाहीत
- काचेच्या बाटलीमध्ये हे उपलब्ध असते, ज्यामुळे पटकन फुटण्याची शक्यता असते
बॉडी शॉप मॉईस्चर फाऊंडेशन विथ एसपीएफ 15 (Body Shop Moisture Foundation)
बॉडी शॉपचे अनेक उत्पादन बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि ही भारतातील सौंदर्य प्रसाधनांपैकी एक उत्तम कंपनी समजली जाते. याच्या उत्पादनांमुळे कोणत्याही प्रकारची अलर्जी होत नसून अगदी संवेदनशील त्वचेसाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे याची मागणी जास्त आहे. यामध्ये एसपीएफ 15, विटामिन ई, कम्युनिटी ट्रेड मारूला ऑईल आणि कार्बनिक मेणाचा वापर करण्यात आला आहे. बॉडी शॉप मॉईस्चर फाऊंडेशन विथ एसडीएफ 15 हे केवळ तुमच्या त्वचेला मॉईस्चराईज करण्याचे काम करत नाही तर सूर्याच्या प्रखर किरणांपासून तुमची त्वचा सुरक्षित राखण्याचे कामही करते.
फायदे (Pros)
- त्वचेला चांगेल मॉईस्चराईज करते
- उत्तम कव्हरेज देते
- नियमित उपयोगासाठी उत्तम
- ट्यूब पॅकेजिंगसह येते
तोटे (Cons)
कोणतेही तोटे नाहीत
वेट अँड वाईल्ड फोटो फोकस फाऊंडेशन (Wet & Wild Photo Focus Foundation In Marathi)
सर्वात उत्कृष्ट फाऊंडेशनबद्दल बोलायचे झाल्यास वेट अँड वाईल्ड फोटो फोकस फाऊंडेशनचे नाव घ्यायलाच हवे. कंपनीचा दावा आहे की, हे फाऊंडेशन उत्तम कॅमेरा लुक देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला कॅमेरा रेडी मेकअप करण्यासाठी मदत मिळते. तसंच तुम्हाला कोणत्याही पार्टी अथवा कार्यक्रमात जाण्यासाठी एक वेगळा आणि आकर्षक लुक देण्यासाठी याचा फायदा करून घेता येतो. हे मेकअप लुक अधिक आकर्षक करून वेगवेगळ्या लाईट्समध्ये तुम्हाला एक परफेक्ट पिक्चर मिळवून देते.
फायदे (Pros)
- एकदम सहज चेहऱ्यावर बसते
- डाग आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळं लपविण्यासाठी उत्तम
- डागविरहीत आणि चिकना लुक देते
- त्वचेला हायड्रेट ठेवते
- मीडियम ते फुल कव्हरेज देते
- अजिबात चिकट नाही
तोटे (Cons)
- हलके नाही
- मर्यादित शेड्स उपलब्ध आहेत
- काही जणांना याचा सुगंध स्ट्राँग वाटू शकतो
लोटस हर्बल नॅचरल ब्लेंड कम्फर्ट लिक्विड फाऊंडेशन (Lotus Natural Blend Comfort Liquid Foundation)
लोटस एक भारतातील प्रसिद्ध ब्रँड आहे, ज्याचे अनेक प्रॉडक्ट्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी असणारे एक लोटस हर्बल नॅचरल ब्लेंड कम्फर्ट लिक्विड फाऊंडेशन. हे पोअर्स बंद न करता एकदम फ्लॉलेस लुक देते. द्राक्षांच्या बिया आणि सोया लेसिथिन (Soya Lecithin) युक्त असणारे हे फाऊंडेशन त्वचेवर चमक आणण्यासाठी मदत करते आणि यामुळे चेहरा अधिक आकर्षक दिसतो.
फायदे (Pros)
- यामध्ये एसपीएफ 20 आहे
- हे त्वचेला हायड्रेट करते
- हे ऑईल फ्री फाऊंडेशन आहे
- त्वचेला चमकदार बनविण्यासाठी मदत करते
- पूर्ण कव्हरेज देते
- हर्बल असून याचा सुगंध मनमोहक आहे
- हे पंप बाटलीमध्ये उपलब्ध आहे
तोटे (Cons)
- कमी शेड्समध्ये उपलब्ध
- हलके नाही
- याला ब्लेंड व्हायला जरा वेळ लागतो
मॅक स्टुडिओ फ्लुईड फाऊंडेशन (MAC Studio Fluid Foundation)
भारतामधील सर्वात उत्तम फाऊंडेशनपैकी मॅक हा यादीमधील चांगला ब्रँड समजण्यात येतो. मॅकचे स्टुडिओ फिक्स फ्लूईड फाऊंडेशन हे मेकअपसाठी परफेक्ट बेस असून एक नैसर्गिक लुक देते. तसंच हे जास्त काळ चेहऱ्यावर टिकणारे फाऊंडेशन आहे.
फायदे (Pros)
- हे हलके आहे
- कंपनीनुसार, याच्यासह कन्सिलर लावण्याची गरज भासत नाही
- यामध्ये एसपीएफ – 15 आहे
- हे लावणे सोपे आहे
- प्राईमरशिवाय हे जास्त काळ टिकू शकते
तोटे (Cons)
- हे त्वचेला कोरडे बनवते
- अन्य फाऊंडेशनच्या तुलनेत हे महाग आहे
रेवलॉन फोटोरेडी एसपीएफ 20 फाऊंडेशन (Revlon Photoreday SPF 20 Foundation)
सौंदर्य प्रसाधनांमध्ये रेवलॉन कोणाला माहीत नाही असं होणार नाही. रेवलॉन फोटोरेडी एसपीएफ 20 फाऊंडेशन हे त्यांच्या उत्पादनांपैकी एक असून याचा तुम्हाला मेकअपच्या बेससाठी फायदा मिळतो. तसंच सूर्याच्या प्रखर किरणांपासून वाचण्यासाठी याची मदत मिळते. हे चेहऱ्यावरील डाग, निशाण लपविण्यासाठी उपयुक्त असून चेहरा नैसर्गिक चमकदार दाखवतो
फायदे (Pros)
- अगदी सहज त्वचेवर पसरते
- 6 तास चेहऱ्यावर टिकून राहाते
- हे हलके आहे
- यामध्ये नावाप्रमाणेच एसपीएफ 20 आहे
- नैसर्गिक लुक देते
तोटे (Cons)
हे काही जणांना थोडे चिकट वाटू शकते
लॅक्मे 9 टू 5 मूस फाऊंडेशन (Lakme 9 to 5 Mousse Foundation)
उत्कृष्ट फाऊंडेशनच्या यादीमध्ये लॅक्मेच्या या उत्पादनाचाही क्रमांक लागतो. लॅक्मे 9 टू 5 च्या रेंजमधील सौंदर्य उत्पादने खूपच चर्चेत असतात तशीच याला खूप मागणी आहे. यामध्ये लॅक्मे 9 टू 5 मूस फाऊंडेशनचा समावेश आहे. हे रोज तुम्ही वापरू शकता. हे मिनी पॅकमध्ये उपलब्ध असल्याने प्रवासात घेऊन जाणे सोपे आहे.
फायदे (Pros)
- अगदी हलके फाऊंडेशन आहे
- हे सहज ब्लेंड होते
- ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त
- पूर्ण दिवस टिकून राहाते
- मॅट फिनिश देणारे आहे
- कोणत्याही त्वचेसाठी उपयुक्त
- अजिबात चिकट नाही
- परवडण्याजोगे आहे
तोटे (Cons)
काही शेड्समध्येच उपलब्ध आहे, विशेषतः मिनी पॅकमध्ये
मनिष मल्होत्रा एफएफ क्रिम फाऊंडेशन पॅलेट (Manish Malhotra FF Cream Foundation Palette)
उत्कृष्ट फाऊंडेशनच्या यादीमध्ये आता मनिष मल्होत्राच्या या फाऊंडेशन पॅलेटचाही समावेश करावा लागेल. ऑईल फ्री आणि जास्त काळ टिकून राहणारे हे फाऊंडेशन असून प्राईमर, कन्सिलर, एसपीएफ 30 यासगळ्यासह हे पॅलेट येते. त्यामुळे एकाच पॅलेटमध्ये तुम्हाला याचा फायदा मिळतो.
फायदे (Pros)
- अगदी हलके फाऊंडेशन आहे
- जास्त काळ टिकून राहते
- अतिशय सहज परिणामकारक
- मीडियम ते हाय असे कव्हरेज
- एसपीएफ परीक्षण केलेले
- पॅराबेन, प्रिझर्वेटिव्ह्ज, मिनरल्स ऑईल्स, नॅनो घटक आणि डी5 या सगळ्यापासून मुक्त
तोटे (Cons)
कोणतेही तोटे नाहीत
त्वचेनुसार फाऊंडेशन कसे निवडावे? (How To Choose Foundation For Skin In Marathi)
Shutterstock
प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या फाऊंडेशनची गरज भासते. पण हे फाऊंडेशन कसं निवडावे याबद्दल सगळ्यांना माहिती नसते. त्यामुळे त्वचेनुसार फाऊंडेशन कसे निवडायचे याची माहिती आपण जाणून घेऊ.
- तेलकट त्वचेसाठी फाऊंडेशन हवे असेल तर ऑईल फ्री अथवा मॅट फाऊंडेशनची निवड करावी
- तुमची त्वचा कोरडी असेल तर मॉईस्चराईजरयुक्त फाऊंडेशनची निवड करा
- ज्यांची त्वचा सामान्य आहे त्यांनी मॉईस्चराईज आणि वॉटर बेस्ड फाऊंडेशनची निवड करावी
- आपल्या त्वचेच्या टोननुसार फाऊंडेशनची निवड करा आणि फाऊंडेशन घेताना त्याची शेड हातावर लाऊन बघा
- आर्टिफिशियल लाईटऐवजी सूर्यप्रकाशातील किरणांमध्ये फाऊंडेशनचा रंग तुम्ही बघा
- फाऊंडेशन कोणत्या खास कार्यक्रमासाठी हवे आहे की रोजच्या वापरासाठी हेदेखील तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे निवड करा
- नेहमी लाईट वेट अर्थात कमी वजन असणाऱ्या फाऊंडेशनची निवड करावी
- पटकन ब्लेंड होईल अशा फाऊंडेशनचा वापर करायला हवा
- तसंच ऋतूप्रमाणे फाऊंडेशनची निवड तुम्हाला करावी लागते ही गोष्ट लक्षात ठेवा
फाऊंडेशन लावण्याची योग्य पद्धत (How To Use Foundation In Marathi)
फाऊंडेशन लावण्याची योग्य पद्धत कोणती हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या चेह on्यावर पाया घालण्यापूर्वी आपल्याला फेस प्राइमर लागू करण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच जणांना फाऊंडेशन नक्की कसे लावायचे याची माहिती नसते. जाणून घेऊया –
- सर्वात पहिल्यांदा चेहऱ्यावर माईल्ड फेसवॉश लाऊन चेहरा धुऊन घ्या
- त्यानंतर चेहऱ्यावर मॉईस्चराईजर लावा. त्यानंतर काही सेकंद सुकू द्या
- जेव्हा मॉईस्चराईजर सुकेल तेव्हा प्राईमरचे काही थेंब घ्या आणि चेहऱ्याला व्यवस्थित लावा
- चेहऱ्यावर जर काही डाग असतील ते लपविण्यासाठी तुम्ही कन्सिलरचा वापर करा
- त्यानंतर काही सेकंदाने हातावर थोडेसे फाऊंडेशन घ्या आणि बोटाच्या मदतीने पूर्ण चेहऱ्यावर डॉट्स काढा
- आता स्पंजच्या मदतीने हलके हलके रगडून संपूर्ण चेहऱ्याला आणि मानेला व्यवस्थित पसरून फाऊंडेशन लावा
- मग मेकअप सेटिंग पावडरच्या मदतीने फाऊंडेशन सेट करा
- सर्वात शेवटी तुमच्या इच्छेनुसार हायलायटर, काजळ, आयमेकअप आणि लिपस्टिक लाऊन आपला मेकअप पूर्ण करा
तुम्हाला जास्त मेकअप आवडत नसेल तर तुम्ही केवळ फाऊंडेशन आणि काजळ लिपस्टिक लावा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक