ADVERTISEMENT
home / Natural Care
Benefits Of Tea Bags For Skin In Marathi

सुंदर त्वचेसाठी असा करा टी बॅगचा वापर (Benefits Of Tea Bags For Skin In Marathi)

नैसर्गिक पद्धतीने त्वचा सुंदर ठेवण्यासाठी नैसर्गिक उपायांचा अवलंब करायला अनेकांना आवडते. कारण नैसर्गिक उपाय हे त्रासदायक नसतात. त्यामध्ये कोणतेही केमिकल्स नसल्यामुळे त्वचा अधिक चांगली होण्यास मदत मिळते. किचनमधील बेसन, हळद, दही, तांदुळाचे पीठ यांचा उपयोग त्वचेसाठी करुन झाला असेल तर आज आपण टी बॅगचे त्वचेसाठी होणारे फायदे पाहणार आहोत. टी बॅग वापरुन झाल्यानंतर तुम्ही फेकून देत असाल तर आतापासून तुम्ही त्वचेवर त्याचा उपयोग केल्याशिवाय फेकून देऊ नका. कारण या टी बॅग त्वचेसाठी फारच उपयुक्त असतात. त्याचा उपयोग करुन तुम्हाला इच्छित असलेली त्वचा मिळू शकेल. चला तर जाणून घेऊया टी बॅगचे फायदे आणि त्याचा उपयोग नेमका कसा करायचा ते. करुया सुरुवात

टी बॅग म्हणजे काय? (What Is Tea Bags?)

टी बॅग

Instagram

ADVERTISEMENT

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचा चहा मिळतो. हे वेगवेगळ्या स्वरुपातील चहा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये असतात. चहा सोपा आणि पटकन बनवता यावा म्हणून हल्ली त्याच्या टी बॅग्ज तयार केल्या जातात. ज्याचा उपयोग करुन तुम्हाला पटकन चहा बनवता येतो. टी बॅग्जमुळे चहा पिताना चहाची पावडर किंवा त्यांचे कण मध्ये येत नाहीत. टी बॅग्ज असल्यामुळे ती संपूर्ण पावडर एका बॅगमध्येच राहते. या टी बॅग्जमध्ये असलेल्या चहाचे गुणधर्म तसेच राहिल्यामुळे तुम्हाला ते पुन्हा वापरता येतात.आता या वापरलेल्या टी बॅग्जचे फायदे काय ते जाणून घेऊया. 

टी बॅगचे त्वचेसाठी होणारे फायदे (Benefits Of Tea Bag For Skin In Marathi)

ग्रीन टी, रोझमेरी टी, उलुंग टी, व्हाईट टी, ब्लॅक टी असे चहाचे वेगवेगळे प्रकार मिळतात. चहाचे प्रकार, त्यांचे नाव आणि चव वेगळी असली तरी त्यांचे त्वचेसाठी असलेले चहाचे फायदे अचंबित करणारे असतात.

सूज करते कमी (Reduces Swelling)

सूज करते कमी

ADVERTISEMENT

Instagram

डोळ्यांसाठी टी बॅग्जचा उपयोग करणे हा त्याचा पहिला फायदा फारच प्रसिद्ध आहे. डोळ्यांसाठी हा एक स्वस्त आणि मस्त असा पर्याय असून त्याचा वापर अनेकजण करतात. टी बॅग्ज डोळ्यांवर ठेवल्यामुळे अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली आलेली सूज, काळीवर्तुळे, डोळ्यांचा लालसरपणा कमी होण्यास मदत मिळते. चहामध्ये असलेले कॅफेन आणि अँटीऑक्सिडंट हे घटक डोळ्यांसंदर्भातील तक्रारी दूर करण्यास मदत करतात.

असा करा वापर (How To Use):

  • तुम्ही ग्रीन टी किंवा इतर कोणतीही चहाची टी बॅग्ज वापरुन झाली असेल तर ती पिळून घ्या.
  • टी बॅग जर गरम असेल तर ती थंड करुन घ्या. कारण अशी गरम गरम टी बॅग लावणे घातक ठरु शकते.
  •  डोळ्यांना अधिक थंडावा मिळण्यासाठी टी बॅग साधारण 15-20 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. ती बाहेर काढून डोळ्यांवर ठेवून द्या.
  • जर तुम्ही डोळ्यांखाली लावणार असाल तर डोळे उघडे ठेवून तुम्ही ते डोळ्यांखाली ठेवा. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

पोअर्स करते लहान (Tighten Pores)

त्वचा वार्धक्याकडे झुकू लागली आहे याचे पहिले लक्षण म्हणजे तुमच्या त्वचेवर पोअर्स दिसणे. या पोअर्सकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण त्वचेवर बारीक बारीक खड्डे दिसू लागतात. जर खूप लहान वयात तुम्हाला असा ओपन पोअर्सचा त्रास असेल तर कालांतराने ही त्वचा अनाकर्षक दिसू लागते. अशा त्वचेवर पिंपल्सचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही ग्रीन टीची टी बॅग वापरली तर ग्रीन टी मधील घटक तुमचे पोअर्स कमी करतात

ADVERTISEMENT

असा करा वापर (How To Use):

  • एका भांड्यात एक चमचा किंवा एक ग्रीनटी बॅग घ्या. 
  • साधारण दोन कप पाणी त्यात घालून हे मिश्रण चांगले उकळून घ्या.
  • थंड झाल्यावर त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि अॅलोवेरा जेल घालून एकजीव करुन घ्या. 
  • एका स्प्रे बॉटलमध्ये टाकून त्यामध्ये तयार सीरम घेऊन ते दिवसातून तीनवेळा स्प्रे करा. तुमच्या त्वचेवर असलेले पोअर्स स्वच्छ होतील आणि त्याचा आकार कमी होईल.

सनबर्नवर परिणामकारक (Treat Sunburn)

सनबर्न करते कमी

Instagram

उन्हात गेल्यानंतर अनेकांना त्वचेसंदर्भातील सनबर्नचा त्रास पटकन होतो. अंगावर लाल चट्टे उमटतात. हे चट्टे उमटले की, त्याची प्रचंड जळजळ होते. तुम्हालाही हा त्रास होत असेल तर टी बॅग तुमच्यासाठी फारच फायदेशीर आहे. टी बॅग्जमध्ये असलेले टॅनिक अॅसि आणि थिओब्राईम हे जळजळ, दुखापत कमी करण्यास फारच उपयुक्त असते. सनबर्नवर हे कमालीचे काम करते.

ADVERTISEMENT

असा करा वापर (How To Use):

  • एका भांड्यात साधारण ग्लासभर पाणी गरम करा. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीची कोणतीही ग्रीन टी किंवा टी बॅग्ज घाला. 
  • पाण्यात चहा चांगला उकळू द्या. 
  • कापसाचे पॅड किंवा कापसाचा बोळा त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा.आचेवरुन चहा काढून साधारण तासाभरासाठी त्याला थंड होऊ द्या. याकाळात तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवले तरी चालेल. 
  • थंड झाल्यानंतर ते सनबर्न झालेल्या ठिकाणी लावा. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

नितळ त्वचा (Get Smooth Skin)

नितळ त्वचा हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्वचा नितळ असेल तर ती अधिक चमकते आणि आकर्षक दिसते. त्वचेच्या पोअर्समध्ये अडकलेली धूळ, मातीचे कण  काढून टाकण्याचे काम टी बॅग्ज करते. यामधील अँटी – ऑक्सिडंट घटक त्वचेला तजेला देत त्वचेवरील व्रण काढून टाकण्यास मदत करतात. 

असा करा वापर (How To Use):

  • वापरलेली टी बॅग उघडून एका भांड्यात काढून घ्या. जर ती खूपच कोरडी झाली असेल तर त्यामध्ये थोडे गरम पाणी घालून घ्या. 
  • चहा थेट चेहऱ्याला लावून स्क्रब करा. हे मिश्रण थोडेसे गरम असल्यामुळे त्वचेच्या आत जाऊन मुरते.
  •  त्वचेवरील समस्या असलेल्या ठिकाणी जाऊन बॅक्टेरियाशी लढते. त्यामुळे त्वचा नितळ होण्यास मदत मिळते. 

त्वचेसाठी उत्तम अँटी- ऑक्सिडंट (Best Antioxidant For Skin)

त्वचेसाठी अँटी- ऑक्सिडंट

ADVERTISEMENT

Instagram

जर त्वचेमध्ये ऑक्सिडंट घटक वाढले की, त्वचा ही अधिक रुक्ष दिसू लागते. त्वचेच्या तक्रारी वाढू लागतात. टी बॅगमध्ये अँटी ऑक्सिडंट घटक असतात जे त्वचेच्या अनेक समस्या कमी करण्याचे काम करतात. त्वचेच्या समस्या म्हणजेच पिंपल्स, त्वचेवरील ताण कमी करण्यास मदत करते.

असा करा वापर (How To Use):

  • कोणत्याही टी बॅग्ज घेऊन त्यातील जास्तीचे पाणी काढून टाकून चेहऱ्यावर पिंपल्स किंवा जळजळ असलेल्या ठिकाणी लावा. 
  • साधारण 15 मिनिटांनी ते काढून टाका. असे आठवड्यातून तीनवेळा करा.

त्वचा करते हायड्रेट (Rehydrating skin)

काही कारणास्तव तुमच्या त्वचेचा तजेला कमी झाला असेल तर टी बॅग्ज तुमच्यासाठी वरदान आहे. त्वचा कोरडी झाली असेल किंवा त्वचा प्रमाणापेक्षा जास्त तेलकट जाणवत असेल तर त्वचेमधील मॉईश्चर टिकून त्वचा योग्यपद्धतीने हायड्रेट करण्याचे काम टी बॅग्जमधील घटक करतात.

ADVERTISEMENT

असा करा वापर (How To Use):

  • एका भांड्यात टी बॅग्ज काढून घ्या. त्यामध्ये मध किंवा ओट्स घालून त्याचा एक मास्क तयार करुन घ्या. 
  • हा मास्क चेहऱ्याला लावून ठेवा. साधारण 10 मिनिटांसाठी हा ठेवा. तुम्हाला त्वचा अधिक हायड्रेट वाटेल.
  • यासाठी तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक टी, उलुंग टीचा वापर करु शकता. 

अँटी- एजिंग (Anti-Aging)

अँटी- एजिंग

Instagram

त्वचेवरील वार्धक्याच्या खुणा कमी करण्याचे काम टी बॅग्ज करते. त्वचेवरील सुरकुत्या, पोअर्स कमी करण्याचे टी बॅग्ज करते. त्यामधील अँटी-ऑक्सिडंट घटक त्वचा अधिक काळासाठी तारुण्य राखण्याचे काम करते. याचा वापर योग्य वेळी आणि नित्यनेमाने केला तर हा फरक नक्की जाणवेल.

ADVERTISEMENT

असा करा वापर (How To Use):

  • Rooibos नावाची लाल रंगाची हर्बल टी यासाठी फारच उपयुक्त आहे.
  •  टी बॅग्ज घेऊन तुम्ही त्याचा थेट वापर तुमच्या त्वचेवर करा.
  • एखादा मास्क किंवा स्क्रब म्हणून त्याचा वापर केल्यामुळे तुम्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

उत्तम स्क्रब (Good Scrub)

त्वचेसाठी उत्तम स्क्रब हवा अेसेल तर टी बॅगही त्वचेसाठी उत्तम स्क्रब आहे. त्वचेवर लावल्यानंतर हा स्क्रब नुसतेच तुमचे पोअर्स क्लिन करत नाही तर त्वचेच्या अन्य समस्या कमी करण्याचे काम करतो.

असा करा वापर (How To Use):

  • तुमच्याकडे असलेले कोणतीही टी बॅग घेऊन ती उघडा.
  •  त्यामध्ये थोडेसे पाणी घालून चेहरा स्क्रब करुन घ्या.
  •  जास्तीत जास्त दोन मिनिटांसाठी हे स्क्रब करा. 

ADVERTISEMENT

त्वचेसाठी अशी वापरा टी बॅग (How To Use Tea Bags)

टी बॅगचा असा करा उपयोग

Instagram

वर सांगितलेल्या फायद्यानंतर जर तुम्ही टी बॅगचा उपयोग वेगळ्या पद्धतीने करु इच्छित असाल तर तुम्ही याचा वापर खाली दिलेल्या पद्धतीनेही करु शकता. 

  1. जास्मिन टी बॅग घ्या. जास्मिन टी मध्ये असलेले घटक त्वचेवरील पिंपल्स कमी करतात. हा चहा पिऊन झाल्यानंतर ही टी बॅग पिंपल्स आलेल्या भागावर ठेवा. पिंपल्स सुकून जाईल आणि त्याचे डागही पडणार नाहीत. 
  2. वापरलेली टी बॅग्ज घेऊन त्यामध्ये ओट्स, मध,लिंबू पिळून त्याचा एक चांगला मास्क तयार करुन घ्या. हा मास्क चेहऱ्याला लावा. साधारण 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. शक्य असल्यास चेहरा स्वच्छ झाल्यानंतर ग्रीन टी सीरम किंवा टोनर लावा.
  3. ग्रीन टी जर तुम्हाला थोडी वेगळ्या पद्धतीने वापरायची असेल तर तुम्ही वापरलेली ग्रीन टी एका भांड्यात काढून पुन्हा उकळा. एक बर्फाचा ट्रे घेऊन त्यामध्ये ती सेट करायला ठेवा. ज्यावेळी तुम्ही सगळा मेकअप काढून टाकता त्यावेळी तुम्ही हा बर्फ चेहऱ्याला शेका. तुम्हाला आराम मिळेल. 
  4. ओठांचा कोरडेपणा घालवण्यासाठीही टी बॅग फायदेशीर आहे. टी बॅग्ज गरम असताना त्या ओठाेंवर ठेवा. ओठांना मॉश्चराईज करायचे काम त्या करतात. 
  5. व्हाईट टी हा चहाचा एक प्रकार फारसा उपलब्ध नाही किंवा तुम्ही तो फार ऐकला नसेल पण चहाचा हा प्रकार त्वचा उत्तम पद्धतीने स्वच्छ करण्याचे काम करतो. त्यामुळे त्वचेला ग्लो येतो. त्वचा अधिक चांगली आणि मॉईश्चराईज दिसू लागते.

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’S )

चहाचे वेगवेगळे प्रकार

Instagram

टी बॅग त्वचेसाठी चांगल्या असतात का?

चहामधील घटक हे त्वचेवर कमालीचे काम करतात. त्वचेवरील थकव्याच्या खुणा कमी करुन त्वचेला तजेला देण्याचे काम टी बॅग करते.याशिवायही टी बॅगचे अनेक फायदे आहेत जे त्वचेसाठी लाभदायक आहे. त्यामुळे टी बॅग या फायद्याच्या असतात.

वापरलेल्या टी बॅगचा कसा वापर करता येतो?

ब्युटी ट्रिटमेंट व्यतिरिक्तही टी बॅग्जचा  वापर करता येतो. जर तुम्ही टी बॅग्ज त्वचेसाठी वापरुन झाल्या असतील तर तुम्ही त्याचा उपयोग माती म्हणून करु शकता. उरलेला चोथा वाळवून तो एकत्र करा. चहा पावडर ही हलकी असल्यामुळे या कुंड्या हलक्या असतात. याचा उपयोग करुन तुम्ही खतंही तयार करु शकता. 

किती वेळासाठी टी बॅग्ज या त्वचेवर ठेवायला हव्यात?

चेहऱ्यावर एखादी गोष्ट जास्त काळासाठी लावणे मुळीच चांगले नाही. जर तुमची त्वचा नाजूक आणि संवेदनशील असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेवर टी बॅग्ज लावताना विशेष काळजी घ्या. ती त्वचेवर जास्तीत जास्त 5 मिनिटांसाठी ठेवा. कारण हल्ली चहामध्येही आलं-लिंबू असे घटक असतात. जे त्वचेची जळजळ वाढवू शकतात. 

आता डीप डीप टी बॅग्जचा चहा पिऊन झाल्यानंतर त्याचा उपयोग त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी करा. तुम्हाला त्वचेत नक्कीच फरक जाणवेल. 

24 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT