प्रत्येकाला कदाचित कढी आवडतेच असं नाही. पण असेही काही लोक आहेत जे वाटीवर वाटी कढी पितात. कधी कधी कढी उरते. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच कढी खायचा कंटाळा आल्याने काही जण ती कढी फेकून देतात अथवा खराब झाली असं समजतात. पण तुम्ही उरलेल्या कढीपासून काही चविष्ट अर्थात टेस्टी डिश घरच्या घरी तयार करू शकता. यातून तुम्हाला हेल्दी ब्रेकफास्टही मिळेल आणि अन्नही वाया जाणार नाही. नक्की कोणते पदार्थ बनवता येतात ते जाणून घेऊया.
पराठे हा उत्तम नाश्ता आहे. यामुळे पोटंही भरतं आणि चवीलाही उत्तम आहे. तुम्ही उरलेल्या कढीचे चविष्ट पराठे बनवू शकता.
आवश्यक साहित्य
उरलेली कढी
2 वाटी गव्हाचे पीठ
स्वादानुसार मीठ
अर्धा चमचा लाल मिरची पावडर
पाव चमचा हळद
1 चमचा धने पावडर
2 हिरव्या मिरच्या (बारीक कापलेल्या)
2 चमचे कापलेली हिरवी कोथिंबीर
तूप अथवा तेल अथवा बटर (तुमच्या आवडीनुसार)
बनविण्याची पद्धत
उरलेल्या कढीमध्ये गव्हाचे पीठ आणि इतर साहित्य मिक्स करा
याची कणीक नीट मळून घ्या
गोलाकार करून पराठे पीळ लाऊन तयार करा
गॅसवर तवा ठेवा आणि तेल अथवा बटरवर पराठे शेकून घ्या
चटणी, लोणचं आणि दह्यासह पराठे खायला द्या
उरलेल्या कढीपासून बनवलेले हे तिन्ही ब्रेकफास्ट लहान मुलांनाही नक्कीच आवडतील. त्यामुळे तुम्ही कढी फुकट न घालवता पुढच्या वेळेपासून हे पदार्थ नक्की ट्राय करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक