अनादी काळापासून केसांसाठी आवळा हे उत्तम औषध ठरते हे सर्वांनाच माहीत आहे. सध्या प्रदूषण आणि धुळीमुळे केसांची खूपच काळजी घ्यावी लागते. पण आवळा, रिठा आणि शिकाकाईचा वापर पण कमी झाल्याचे दिसून आले आहे. अनेकदा वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेऊन केसांची काळजी घेत असल्याचे दिसून येते. पण अजूनही तुम्ही घरच्या घरी आवळा पावडरचा वापर करून केसगळतीची समस्या थांबवू शकता. तुम्हालाही केसगळतीची समस्या त्रासदायक ठरत असेल तर आम्ही सांगितलेले काही उपाय तुम्ही करून नक्की पाहा. आवळा केवळ कोंडा वाढण्यापासून थांबवत नाही तर तर केस तुटण्यापासून वाचवते आणि केसगळती थांबविण्यासाठीही फायदेशीर ठरते. आवळा पावडरचा नक्की केसांसाठी कसा उपयोग करून घ्यायचा ते पाहू.
आवळा पावडर आणि दही
Shutterstock
आवळा पावडर आणि दही हे मिश्रण केसातील कोंडा दूर करून केसगळती थांबविण्यास मदत करते. यासाठी तुम्ही आवळा पावडरमध्ये शिकाकाई, लिंबाचा रस आणि दही मिक्स करून पेस्ट करून घ्या. ही पेस्ट तुम्ही अगदी व्यवस्थित स्काल्पपासून केसांना लावा. साधारण अर्धा तास हे केसांवर तसंच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. आठवड्यातून तुम्ही असे दोन वेळा करू शकता. हा उपाय तुम्हाला नक्की केसगळतीपासून सुटका मिळवून देऊ शकतो.
आवळा पावडर आणि तुळशीची पाने
Shutterstock
आवळ्यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिबॅक्टेरियल घटक असतात. जे केसांमधील सर्व घाण काढून टाकण्यास आणि केसातील कोंडा दूर करण्यास मदत करतात. कोंडा दूर झाल्यावर आपोआपच तुम्हाला केसगळतीपासून सुटका मिळते. यासाठी तुम्ही आवळला पावडर घ्या. 8-10 तुळशीची पाने घ्या आणि याची व्यवस्थित पेस्ट तयार करा. ही पेस्ट हाताने तुम्ही स्काल्पपासून केसांना लावा आणि साधारण अर्धा तास तसंच राहू द्या. केसांना थंड पाण्याने धुवा आणि सॉफ्ट क्लिन्झरने केस स्वच्छ करा.
चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो आवळ्याचा रस
आवळा पावडर आणि मेंदी
Shutterstock
आवळ्यामध्ये ते सर्व पोषक तत्व असतात जे केसांना वेळेच्या आधी सफेद होण्यापासून रोखतात आणि केसांची चमक तशीच ठेवण्यास मदत करते. आवळा पावडर तुम्ही मेंदीसह मिक्स करा आणि ही जाडसर मेंदी आवळ्याची पेस्ट केसांना लावा. नैसर्गिक स्वरूपात तुम्हाला केस काळे करायचे असतील तर तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसंच तुमचे केस अधिक चमकदार होतात आणि तुटण्यापासून रोखतात.
मजबूत चमकदार केसांसाठी वापरा आवळा, रीठा आणि शिकाकाई
आवळा, शिकाकाई आणि रिठा
Shutterstock
आवळ्यामध्ये केसांना आवश्यक असणारे फॅटी अॅसिड आहे जे केसांच्या मुळांपर्यंत पोहचून केसांना मुलायम, चमकदार आणि घनदाट बनवतात. आवळ्यामध्ये लोहाचे अधिक प्रमाण असते जे केसांची वाढ करण्यास उत्तम ठरते. यासाठी तुम्ही आवळा पावडरमध्ये शिकाकाई आणि रिठा घालून पाण्याने भिजावा आणि एक चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावा. सुकल्यावर केस माईल्ड शँपूने थंड पाण्याने धुवा. तुम्हाला लवकरच याचे परिणाम दिसून येतील.
पांढरे केस काळे करण्यासाठी आवळ्यापासून तयार करा नॅचरल डाय
आवळा पावडर आणि अंडे
आवळा पावडरमुळे केसांमधील कोंडा आणि दुहेरी केस समस्या दूर होते. यासाठी तुम्ही आवळा पावडर आणि अंडे मिक्स करून घ्या. अंड्यामध्ये असलेले प्रोटीन केसांसाठी उत्तम मानले जाते. ही पेस् तुम्ही हेअरमास्कप्रमाणे केसांना लावा. एक तासाने केस माईल्ड शँपून लाऊन थंड पाण्याने धुवा आणि केसांमध्ये चमक मिळवा. केसगळती थांबण्यासाठीही याचा उपयोग होतो.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक